Wednesday, October 24, 2018

In Memoriam

In Memoriam

by Ewart Alan Mackintosh (killed in action 21st November 1917 aged 24)

So you were David’s father,
And he was your only son,
And the new-cut peats are rotting
And the work is left undone,
Because of an old man weeping,
Just an old man in pain,
For David, his son David,
That will not come again.

Oh, the letters he wrote you,
And I can see them still,
Not a word of the fighting,
But just the sheep on the hill
And how you should get the crops in
Ere the year get stormier,
And the Bosches have got his body,
And I was his officer.

You were only David’s father,
But I had fifty sons
When we went up in the evening
Under the arch of the guns,
And we came back at twilight - 
O God! I heard them call
To me for help and pity
That could not help at all.

Oh, never will I forget you,
My men that trusted me,
More my sons than your fathers’,
For they could only see
The little helpless babies
And the young men in their pride.
They could not see you dying,
And hold you while you died.

Happy and young and gallant,
They saw their first-born go,
But not the strong limbs broken
And the beautiful men brought low,
The piteous writhing bodies,
They screamed “Don’t leave me, sir”,
For they were only your fathers
But I was your officer.

Saturday, October 20, 2018

NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती

(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती


जाहिरात क्र.: Kakrapar Gujarat Site/HRM/01/2018

Total: 59 जागा

पदाचे नाव:  

1. ड्रायव्हर-सह-पंप ऑपरेटर-सह-फायरमन/A(DPOF): 04 जागा

2. नर्स/A: 07 जागा

3. टेक्निशिअन/C ( एक्स रे टेक्निशिअन): 01 जागा

4. स्टायपेंडरी ट्रेनी-(डेंटल टेक्निशिअन): 01 जागा

5.स्टेनोग्राफर ग्रेड I: 21 जागा

6.असिस्टंट ग्रेड I  (HR): 09 जागा

7.असिस्टंट ग्रेड I (F&A): 07 जागा

8. असिस्टंट ग्रेड I (C & MM): 09 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1:
(i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)   
(ii) 01 वर्षे अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना 
(iii) फायरमन कोर्स

 पद क्र.2: 
(i) 12 वी उत्तीर्ण 
(ii) नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा  किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा समतुल्य 

पद क्र.3:
(i) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण  
(ii) मेडिकल रेडिओग्राफी /एक्स रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र   
(iii) 02 वर्षे अनुभव 

पद क्र.4:
(i) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)   
(ii) डेंटल टेक्निशिअन डिप्लोमा 

पद क्र.5: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  
(ii) संगणकावर इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि

पद क्र.6: 
(i) 50% गुणांसह BA/B.Com/B.Sc  
(ii) संगणकावर इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि 
(iii) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

पद क्र.7:
(i) 50% गुणांसह B.Com 
(ii) संगणकावर इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि 
(iii) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

पद क्र.8:
(i) 50% गुणांसह B.Com/B.Sc (PCM)  
(ii) संगणकावर इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि 
(iii) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

वयाची अट: 
25 ऑक्टोबर 2018 रोजी,

 [SC/ST:05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 3: 18 ते 25 वर्षे 

पद क्र.2: 18 ते 30 वर्षे 

पद क्र.4: 18 ते 24 वर्षे 

पद क्र.5 ते 8: 21 ते 28 वर्षे 

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: तापी, गुजरात

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 ऑक्टोबर 2018 (04:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

_____________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+  महत्वाच्या चालू घडामोडी
+  नोकरी च्या जाहिराती , मार्गदर्शन ,निकाल
+  प्रत्येक विषयावर सराव प्रश्न
+ प्रत्येक विषयावर महत्वाच्या नोट्स
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे

Wednesday, October 17, 2018

सर्वश्रेष्ठ दाता

          एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते.
               अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही?

लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि   अर्जुनाला म्हणाला......   हे सगळे सोने गावकऱ्यांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस. 
              लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की... मी प्रत्येक गावकऱ्याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.
               दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जुन अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
         शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....! आता यापुढे मी काम करू शकत नाही. 
              मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की....... या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......
                 लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....

या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जुन चकित होऊन पाहात बसला.
        हा विचार आपल्या मनात का आला नाही..... या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला..... अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....! तू गर्वाने प्रत्येक....... गावकऱ्याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....! 
              कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय..... गुणगान गातंय...... हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे..... शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे..... म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............

         "काय चुकलं" हे शोधायला हवं, पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.. आपली माणसं मोठी करा,

आपोआप आपणही मोठे होऊ...

Wednesday, October 10, 2018

वादळात टिकाव धरण्यासाठी

शेजारशेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या अंगणात शोभेची झाडं दोघांनी लावली होती. डॉक्टर आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत.
हळूहळू दोघांकडे असलेली झाडे वाढत होती. मात्र डॉक्टर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं मात्र टुमदार, छान असली तरी अंग धरून होती.
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी बागेचं नेमकं काय घडलय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून डॉक्टरला धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती. डॉक्टर विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून डॉक्टरने आजोबांना याचे कारण विचारले.
आजोबा म्हणाले “तुम्ही झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गरजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. तुमच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाडं मस्त उभी आहेत.”
Note : आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.. जितके जास्त जपाल तितके मुलांना कमकुवत कराल. निसर्गाने प्रत्येकाला लढण्याची शक्ती दिलेली असते. ती खच्ची करू नका. उलट थोडेफार ऊन वारा पाऊस त्याला सोसू द्या ! तरच तो मजबूत बनेल. मग जीवनात कितीही वादळे आली तरी तो पालकांच्या (खत पाण्यावर) म्हणजेच भरोशावर जगणार नाही !
हेच खरे पालकत्व आहे !!!! 
- अच्युत गोडबोले (मानसोपचार विशेषक)

Monday, October 8, 2018

कथेचे शीर्षक : स्पर्श वेडा

कथेचे शीर्षक : स्पर्श वेडा

पदव्युत्तर झाल्यानंतर वर्ष भराच्या आतच त्याला एका चांगल्या IT कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीने रहाण्याची आणि तिथून येण्या जाण्याची सोय केली होती. कंपनीत रुजू झाल्यानंतर आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले. त्यांचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.

सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला. रोज सकाळी उठून हा वेडा खाली धावायला आणि व्यायाम करायला जायचा. त्याचे मित्र मात्र आरामात उठायचे. सकाळी उशिरा उठूनही याच्या मित्रांची कामे आटोपता आटोपता त्यांना थोडा उशीर व्हायचा. हा मात्र सर्वात अगोदर गाडीत. स्वाभाविकपणे रोजच त्याला खिडकी जवळ जागा मिळायची. गाडी सुरू झाल्यावर तो कानात इअर फोन लावून एकतर fm ऐकायचा किंवा कोणातरी नातेवाईकांना किंवा गावच्या मित्रांना फोन लावायचा. त्याचे बाकीचे मित्र मात्र समाज माध्यमांद्वारे आपल्या शेकडो मित्रांच्या संपर्कात यायचे, चहा, कॉफी, फुलं, गुलदस्ते, चॉकलेट आणि अजूनही खूप काही वाटायचे आणि तितकेच स्वीकारायचे.... किती छान ना. हा वेडा मात्र गाणी ऐकत खिडकीतून रस्त्याच्या आजूबाजूची झाडे, झुडपे, वनराई बघायचा. पक्षी, प्राणी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे बघायचा. खिडकीतून येणाऱ्या थंड हवेने कधी डुलकी लागलीच तर छानशी झोपही घायचा. त्याला कंपनीने दिलेला रोजचा २ GB डेटा मात्र नेहमीच वाया घालवायचा, त्याचा मोबाईल नेहमी रिकामाच असायचा . ना फुला-फळांचे, ना पक्षा प्राण्यांचे फोटो काहीच नाही. कोणाशी काही देवाण घेवाणचं नाही तर हे सगळे येणार कुठून. हा पठ्ठ्या दोन दोन दिवस तर नेट सुद्धा चालू करायचा नाही. नेट चालू झाल्यावर येणारा पोस्ट्स चा खच तो काही मिनिटात बाजूला सारायचा.... काही वाचून तर काही न बघता न उघडता. ऑफिस मधेही याचे वेडे चाळे संपायचे नाही. सर्वांच्या जवळ जाऊन बोलायची याला भारी हौस. ऑफिसने कर्मचाऱ्यांना दिलेले चॅट एप्लिकेशन तो फक्त कामा पुरताच वापरायचा. माणसांशी प्रत्यक्ष बोलण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्याला ऑफिसचे चौकीदार बोडके काकांच्या मुलीने संगणक शास्त्रात विशारद केल्याचं समजलं होतं. त्यासाठी मोबाईलवर पोस्ट शेयर करून अभिनंदन करायचे सोडून या वेड्याने बोडके काकांची गळाभेट घेऊन अभिनंदन केले होते. तेव्हा केवढे भावुक झाले होते काका. पण याला लोकांना असं रडवायची सवयच होती. त्याच्या या वेडाची कल्पना ऑफिस मधल्या सगळ्या चतुर्थ श्रेणी कामगारांना होती. या सवयीमुळे त्याचा डेस्क नेहमी न सांगता साफ व्हायचा, पिण्याचे पाणी, चहा कॉफी सर्व काही जागेवर यायचे. ऑफिसमध्ये त्याला भेटायला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार अगदी चांगला व्हायचा. असेच एकदा ऑफिस मधल्या बर्वे मावशींच्या मुलीला मुलगी झाल्याचे कानावर आल्यावर त्याने दुसऱ्या दिवशी घरून आईने पाठवलेले डिंकाचे लाडू आणून गुपचूप मावशींच्या हातावर देत "ताईला बाळ झालंय ना, तिला द्या" म्हणाला. ते बघून केवढा गहिवर दाटून आला होता त्या माऊलीच्या नजरेत काय म्हणून सांगावा.

तो घरी दारी सारखाच वागायचा. सुट्टी झाल्यावर घरी आले की त्याचे सर्व मित्र लॅपटॉप, मोबाईल घेऊन तासंतास बसायचे. कोणी समाज माध्यमांतून मित्रांशी संवाद घालायचे तर कोणी रोजच्या चहा, कॉफी किंवा जेवणाचे छायाचित्र पाठवून भरपूर लाईक्स मिळवायचे. त्यांची मित्र संख्या दिवसेंदिवस वाढत होती. हा मात्र रोज संध्याकाळी घरी आल्यावर कपडे बदलून खाली सोसायटीच्या बागेत जायचा. मिळेल त्या वयाच्या मुला माणसां सोबत खेळायचा. फिरायला आलेल्या सत्तरीतल्या तरुणां सोबतही त्याची खूप गट्टी जमायची. या वर्गाची दुःख काहीशी वेगळी असतात याची चांगली जाण त्याला खूप लवकर आली होती. तो त्यांच्याशी बोलायचा, हसायचा, खिदळायचा, त्यांच्या सुख दुःखाची चौकशी करायचा. ती म्हातारी माणसं त्याला बऱ्याचदा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत का रहात नाही म्हणून विचारायची, तो त्यांना फक्त मिश्किल स्मित देऊन विषय टाळायचा. तो निघून गेल्यावर त्याच्या पाठीमागे तीच माणसे त्याला प्रेमाने वेडा म्हणायची. त्याला येणारे मैदानी खेळ बागेतल्या छोट्या मुलांना शिकवताना त्या मुलांबरोबर त्यांच्या आईवडिलांच्या देखील तो ओळखीचा झाला होता.

त्याला आता सोसायटीत अडीच तीन वर्ष झाली होती. नेहमी तरुण पुरुष भाडेकरूंच्या नावाने ओरडा करणारी तोंडे हळू हळू शांत झाली होती. एकदा असाच खेळताना पाय मुरगळला म्हणून त्याने सकाळच्या व्यायामाला दांडी मारली, संध्याकाळी देखील त्याला बागेत जाणे जमले नव्हते. डॉक्टरांनी चार दिवस पूर्ण आराम करायला सांगितले होते. एव्हाना आपल्या लाडक्या दादाच्या दुखण्याची बातमी चिल्ल्या पिल्ल्यांनी अख्ख्या सोसायटीत पसरवली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो घरात एकटा असताना दारावरची घंटी वाजली म्हणून हळू हळू चालत जाऊन त्याने दरवाजा उघडला तर दारात शिंदे आजी आणि पवार आजी उभ्या होत्या. शिंदे आजींनी त्याच्या पायासाठी लेप बनवून आणला होता. दरवाजा उघडताच "काय रे पोरा, एवढं लागलं तर सांगायचं नाही का?" म्हणून प्रश्नांच्या फैरी झाडत दोघी घरात शिरल्या. त्याच्या परवानगीची वाट न पहाता त्याला बसायला लावून त्याच्या पायावर सोबत आणलेला लेप लावला. तुम्हाला कसं समजलं म्हणून विचारलं तर अगदी तिखट आवाजात शिंदे आजींनी "अरे पोरा, बागत तू येईना म्हणून आमचे म्हातारे बी घर सोडीनात, त्यांच्या बदबडीच्या जाचा पायी तुला हुडकीत आले" अशी बतावणी केली. त्यांचे उत्तर ऐकताना त्याच्या गालावर छानसं हसू आलं होतं. लेप लावून होई पर्यंत घरात गर्दी वाढतच गेली. शिंदे, पवार आणि जोशी आजोबा, गफूर चाचा, नायर आंटी, प्रमिला काकू, चिल्ली पिल्ली गँग आणि अजूनही बरेच जण आले होते. ऑफिस सुटून मित्र घरी पोहोचले तेव्हा घरात बसायला देखील जागा शिल्लक नव्हती. आपल्या मित्राची सोसायटीत इतकी ओळखअसेल याची जरा सुद्धा कल्पना त्यांना नव्हती. त्याचे मित्र "फ्रेंड्स लिस्ट" वाढवत होते तेव्हा हा माणसे जोडत होता. त्याचे मित्र आभासी दुनियेत रममाण व्हायचे तेव्हा हा वेडा खऱ्या खुऱ्या दुनियेत फिरायचा. त्याच्या मित्रांना लाखो किलोमीटर अंतरावर असलेल्या लोकांशी "टच" मधे रहायला आवडायचे, याला मात्र लोकांना "स्पर्श" करायला आवडायचे. तो लोकांच्या मनाला स्पर्श करायचा, त्यांच्या भावनेतील ओलावा जपायचा. कधी त्यांच्या घरात तर कधी आयुष्यात डोकवायचा, त्यांच्या मनात आणि आठवणीत घर करून राहायचा. आज घरात आणि घराबाहेर जमलेली गर्दी म्हणजे त्या वेड्याने जोडलेली माणसे होती. केवळ स्पर्शाने माणूस इतका श्रीमंत झाल्याची उदाहरणे तशी विरळच.

एवढ्या घाईत पवार आजींनी त्याला लवकर बरा होण्यासाठी फर्मान काढले आणि पुढच्या महिन्यात येऊ घातलेल्या त्यांच्या नातीच्या लग्नाचं आमंत्रण दिलं.
आज प्रत्येकाच्या ठायी स्पर्शाचे असे वेड जपण्याची गरज वाढत चालली आहे.
डॉ आशीष अवस्थी, मेहकर

Saturday, October 6, 2018

ECIL Apprentice Recruitment 2018

ECIL Apprentice Recruitment 2018 for ITI Trades Hyderabad ecil.co.in


★ Recruitment Office :- [Electronics Corporation of India Limited]ECIL – Hyderabad 500062

★ Advertisement No. :- ECIL/CLDC/2018/01 

★ Date : 07/09/2018

★ Total Post:- 250 Posts

★ official website:- www.ecil.co.in/

★ Post Name’s:-
1) Fitter – 60 Posts
2) Turner – 10 Posts
3) Machinist – 01 Posts
4) Sheet Metal Worker – 03 Posts
5) Electrician – 50 Posts
6) Ref. & A/C Mechanic – 09 Posts
7) Motor Mechanic Vehicle – 01 Posts
8) Electronics Mechanic / R&TV – 86 Posts
9) COPA – 10 Posts
10) Welder – 10 Posts
11) Plumber – 03 Posts
12) Carpenter – 05 Posts
13) Diesel Mechanic – 02 Posts

Total – 250 Posts

Pay scale for ECIL Apprentice Recruitment 2018

Pay-Scale:-
1) Post 1 – 8:- Rs. 8655/- per month.
2) Post 9 – 13:- Rs.7694/- per month.

Education Details And Experience:-
Related ITI Trade Pass.

Apply Mode:-
Offline : means application must be sent through by Post.

Selection procedure:
1) The selection of apprentices will be based on the marks obtained by the candidate in ITI.

Application Postal Address:-
Deputy General Manager (CLDC),
Nalanda complex,
Near TIFR building,
ECIL -Post Hyderabad. 500062.


Application Fee :- NA

Age Limits :- as on date 01/08/2018
Minimum 14 Year.SC/ST – 05 years Relaxable.OBC – 03 years Relaxable.

Important Date’s:-
Application Postal Last Date:- 28/09/2018 (05:00 PM)

============================
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी
+ नोकरीच्या जाहिराती, मार्गदर्शन ,निकाल 
+प्रत्येक विषययावर सराव प्रश्न
+ प्रत्येक विषयावर हस्तलिखित नोट्स
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे

Tuesday, October 2, 2018

विकतची भावंडं

विकतची भावंडं

Submitted by Arnika 

कॉलेजला जाताना त्या चौघीजणी रस्त्यात भेटल्या. अभ्यासाचं वर्ष सुरू होऊन चार महिने झाले तरी त्यांच्याशी तोंडदेखलं हसून पुढे जाण्याइतकीच ओळख होती. त्या बाकी मुला-मुलींमधे फार मिसळायच्या नाहीत. तासालाही एकमेकींच्याच शेजारी बसायच्या. इंग्लिशचा एखादा शब्द समजला नाही तर त्याबद्दल मॅंडरिन मधे आपापसात चिवचिवाट करायच्या. चौघींची नावंही थोड्याफार फरकाने मला सारखीच वाटायची. निंग्निंग, लिन-शाओ, निंग्जुन, ज्युन-पू वगैरे वगैरे... त्यादिवशी विशेष खुशीत असाव्यात; मला स्वत:हून ओळख दाखवून हसल्या. मी रेंगाळले म्हंटल्यावर चक्क स्वतःहून बोलायला लागल्या!

अभ्यास झालाय का वगैरे वायफळ गप्पा झाल्या आणि जिचं नाव मला निंग्जुन वाटायचं तिने विचारलं,
“तू त्या वरच्या वर्गातल्या मिंग्यू ला ओळखतेस ना?”
चायनीज़ सोसायटीमुळे त्याही मिंग्यू ला ओळखत होत्या. मी हो म्हणायच्या आतच ज्युन-पू म्हणाली,
“अरे वा! घरचे सोडूनही बाकी मित्र-मैत्रिणी आहेत वाटतं मिंग्यू ला ?”
बाकीच्या सगळ्या छद्मी हसल्या, पण त्यात इतका दंश का होता मला कळलं नाही.
मिंग्यू तशी वेगळीच होती. पक्की चायनीज़ असली तरी सगळ्यांमधे मिसळणारी, सगळीकडच्या मुला-मुलींशी भरपूर बोलणारी, एकदा घरच्यांबद्दल बोलायला लागली की पावसासारखी कोसळणारी, आणि चायनीज़ सोसायटीतल्या घोळक्यात कधीच न दिसणारी! दुपारी एकत्र जेवताना ती नेहमी माझ्या मागे उभी असायची, त्यामुळे हळुहळू ओळख वाढली तसतशा खूप गप्पा व्हायला लागल्या. त्या मुलीत यांना नावडण्यासारखं इतकं काय असेल?
अजून महिन्यभरात या चौघींशीही गाठभेट जास्त व्हायला लागली. वर्गात एकमेकींच्या शेजारी बसायला लागलो; कधीतरी जेवायलाही एकमेकींच्या खोलीवर जायला लागलो. एक दिवस नेमकी मिंग्यू माझ्याकडे आलेली असतानाच लिन आणि ज्युनपण मला फ्राइड राइस द्यायला आल्या होत्या. एकमेकींना बघून अतिघीही अवघडल्या, आणि मिंग्यू लगेचच आम्हाला अच्छा करून निघाली. त्यादिवशी मला अगदीच राहवलं नाही. MSc संपत आलं आणि हे कसली पाचवीतली भांडणं असल्यासारखं वागणं? मी लिन ला विचारलं...

“कंटाळा येतो गं अर्निका, सारखं तिच्या बहीण-भावांबद्दल ऐकून. माझ्या भाच्या अशा आणि माझा भाऊ असा... हो कळलं आम्हाला; असतील मस्त. सतत घरच्यांबद्दल बोलणं इतकं शिष्ट वाटतं. शिवाय जरा पैशांचा गर्व.” लिन जरा वैतागून म्हणाली. “सांगणार असलीस तर सांग तिला. कोणीतरी सांगायला हवंच आहे.”
मिंग्यू ला मी काय सांगणार? मलाच गणित सुटत नव्हतं...पैशांचा गर्व? छानछोकीने रहाणाऱ्या, ब्रॅंडेड कपडे घालणाऱ्या, रोज हॉटेलात जेवणाऱ्या आणि मिनरल वॉटर आणायलाही लॅक्मेचं लिपस्टिक लावून जाणाऱ्या याच मुलींच्या कितीतरी मैत्रिणी मी रोज बघत होते. जरा चार दिवसांची सुट्टी मिळाली की भरमसाठ खर्च करून युरोपात फिरून येणारे यांचे बॉयफ्रेंडही मी बघत होते. ते सगळे नॉर्मल, निगर्वी! आणि ही साधीसुधी रहाणारी-वागणारी मुलगी घरच्यांबद्दल बोलते म्हणून पैशाचा माज करणारी?

"लिन, म्हणजे मी तर तुमच्या लेखी जगातली सगळ्यात उद्दाम आणि गर्विष्ट मुलगी असणार! बहीण-भावंडांच्या गोष्टी सांगणारी... तरी माझ्याशी बोलताच की तुम्ही." मी म्हणाले.
“तुझा काय संबंध? उद्दाम नाही, सुदैवी आहेस तू! आमच्याकडे एकच मूल असू शकतं ना... One-child policy. आम्ही सगळ्या एकेकट्या आहोत. निंग्नुओ आणि माझे आईबाबाही एकुलती एक मुलं आहेत त्यांच्या त्यांच्या आई-वडिलांची. दुसरं मूल होऊ द्यायचंच असेल तर तुम्हाला सरकारला दाखवून द्यावं लागतं की आमच्या घरची परिस्थिती उत्तम आहे; अजून एक मूल पोसण्याची आमची कुवत आहे; आमच्याकडे तितका पैसा खेळता आहे...तसं तरी, किंवा मग सरकारात असाल तर असतात बाकी अपवाद.

मिंग्यूच्या घरची परिस्थिती चांगलीच असावी त्या काळातही. तिला मोठा भाऊ आहे...भावाला दोन मुलं आहेत आता. शिवाय आत्ते-मामे भावंडांबद्दलही ऐकलंय बरेचदा. कशाला सांगायच्या सारख्या विकतच्या भावंडांच्या गोष्टी? आमची काय किंवा बाकी बऱ्याच जाणांची काय, काय परिस्थिती आहे माहित्ये ना तिला?”

माणसांनी बजबजलेल्या देशातल्या लोकांच्या नशिबात असा एकटेपणा असू शकेल ही कल्पनाही केली नव्हती! त्यांची श्रीमंती मी पैशात मोजत होते, आणि माझी श्रीमंती त्या माझ्या भावंडांमध्ये. भावंडांना किंमत, म्हणजे अक्षरश: पैशात मोजली जाणारीही किंमत असते, हे मला त्यादिवशी पहिल्यांदा जाणवलं.

त्यांचं असणं, त्यांच्याशी भाडणं, त्यांच्याबरोबर रहाणं, त्यांची कौतुकं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं, एकत्र खेळलेली भातुकली, एकत्र जागवलेल्या रात्री, एकत्र न केलेला अभ्यास, आई-बाबांवर रुसल्यावर हक्काने तक्रार सांगायला त्यांच्यापाशी जाणं, गृहित धरलेलं रक्षाबंधन आणि भाऊबीज, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायचं असताना कधीतरी जबरदस्तीने यांच्याबरोबर रहायला लागणं आणि त्यामुळे होणारी धुसफूस, जरा कोणी वेणी ओढली तरी घरी येऊन एकमेकींकडेच सगळं सांगून टाकणं... हे आठवून हसायला किंवा डोळ्यात पाणी आणायला आपल्याला मुळात हक्काची भावंडं आहेत, आपल्या आई-बाबांनाही ती आहेत, हे घरचं केवढं मोठं वैभव आहे हा विचारच कधी केला नव्हता! लहानपणी घरी भांडण झालं की आम्ही एकमेकांना चिडून म्हणायचो, “नको बोलू. काही मोठं सोनं लागलं नाहीये तुला.” पण खरंच सोनं लागलेलं होतं आम्हाला सगळ्यांना!

तेव्हापासून लिन आणि तिच्या बाकी तिघी मैत्रिणी आपापसातच रहातात याचं वाईट वाटेनासं झालं. आम्ही भावंड एकत्र असलो की त्या कोंडाळ्याबाहेर काय चाललंय याची शुद्धही नसते आम्हाला. ती गोष्ट या मुलींच्या वाट्याला अशी आडवळणाने आली असेल कदाचित!

त्यादिवशी जेवताना मी घरी सगळ्यांना फोन केला. माझ्या भावंडांना केला... मग आईबाबांच्या भावंडांना...आणि नंतर आजीच्याही भावंडांना! उगाच शिळोप्याचं बोलायला...भांडण उकरून काढायला... पत्र लिही म्हणून हट्ट करून घ्यायला... हक्क गाजवायलाही... एका राखीत सगळ्यांना घट्ट एकत्र बांधून टाकावंसं वाटत होतं!
लिन ने आणून दिलेला तिखट फ़्राइड राइससुद्धा उगाच नारळीभातासारखा गोड लागत होता...

- संग्रहित लेख

Monday, October 1, 2018

HPCL Recruitment 2018

HPCL Recruitment 2018

Total: 122 Posts

Name of the Post:

A) Assistant Process Technician: 67

B) PostsAssistant Boiler Technician: 06 Posts

C) Assistant Laboratory Analyst: 07 Posts

D) Assistant Maintenance Technician (Electrical): 07 Posts

E) Assistant Maintenance Technician (Instrumentation): 07 Posts

F) Assistant Maintenance Technician (Mechanical): 09 Posts

D) Fire Operator: 19 Posts

Educational Qualification:

A) Post No.1: 60% aggregate marks in B. Sc. with Chemistry as Principal Subject or 60% aggregate marks in Diploma in Chemical Engineering. [50% aggregate marks for SC/ST/PWD]

B) Post No.2: (i) SSC or equivalent  (ii) 1st Class Boiler Attendant Competency Certificate.

C) Post No.3: 60% aggregate marks in B.Sc. with Chemistry as principal subject and 60% aggregate in Principal Subject. [50% aggregate marks for SC/ST/PWD]

D) Post No.4: 60% aggregate marks in Diploma in Electrical  Engineering. [50% aggregate marks for SC/ST/PWD]

E) Post No.5: 60% aggregate marks in Diploma in Electrical Instrument Engineering. [50% aggregate marks for SC/ST/PWD]

F) Post No.6: 60% aggregate marks in Diploma in Mechanical Engineering. [50% aggregate marks for SC/ST/PWD]

G) Post No.7: (i) Intermediate/XII with Science and Certificate in Basic Fire Fighting Course for Fireman from State Fire Training Centre.   (ii) Valid Driving License

Age Limit: as on 01 October 2018,  [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]

Job Location: Mumbai

Fee: No fee.

Last Date of Online Application:31 October 2018

Notification: View

Online Application: Apply Online 

_______________________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी
+ नोकरी च्या जाहिराती , मार्गदर्शन ,निकाल
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...