Sunday, March 17, 2019

ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय?

जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय?

आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना विविध 6 हक्क प्राप्त झाले आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

1) संरक्षणाचा/सुरक्षिततेचा हक्क : 
जीवित किंवा मालमत्तेला धोकादायक अशा वस्तूंच्या  वापरापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क ग्राहकाला आहे.


2) माहिती मिळविण्याचा हक्क : 
आपण जी वस्तू खरेदी करतो तिच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे.


3) निवडीचा हक्क : 
योग्य किंमतीत आपल्या वस्तूची निवड करण्याचा हक्क ग्राहकाचा आहे. ग्राहकांनी दक्ष राहून वस्तूच्या किंमती व गुणवत्ता यांचा विचार करुनच योग्य वस्तूची खरेदी करावी.


4) तक्रार निवारणाचा हक्क : 
वस्तूच्या खरेदीनंतर काही दोष आढळल्यास किंवा खरेदीत फसवणूक झाली असे वाटत असल्यास ग्राहकांना त्या संबंधी ग्राहक न्यायालयात तक्रार करण्याचा अधिकार आहे.


5) ग्राहक शिक्षणाचा हक्क : 
बाजारपेठेची व व्यापारी व्यवहाराची ग्राहकाला माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत.


6) आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क : 
ग्राहकांना प्रदूषणापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. याबरोबरच प्रामाणिकता मिळविण्याचा, मत प्रदर्शन करण्याचा ग्रहाकांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क ही ग्राहकाला आहे.


7) ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? :

▪ कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता.

▪ सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही. चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांना नाही.

▪ जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता.

▪ जर रुग्णालयानं काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत. जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

8)सर्व माहिती एकाच ठिकाणी :
ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या jagograhakjago.gov.in या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल.

2 comments:

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...