समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्या गरजेवर ठरतं. माझा मोठा बंगला असावा, घरासमोर फोर व्हीलर असावी, घरात सगळ्या सुविधा असाव्यात म्हणजे मी सुखी, असा आपल्या सर्वसामान्य माणसांचा गैरसमज असतो. प्रत्यक्षात हे सगळं पूर्ण होतं तेव्हा समजतं, की आपल्या अपेक्षा तर अजून मोठ्या आहेत. अपेक्षांच्या मागं धावत राहणं आणि सुख वेचत राहणं हे आपलं काम. अपेक्षांचं आणि पैशांचं गणित ज्याला जमलं तो खरा सुखी