Monday, November 11, 2019

वाटणी - एक उत्तम निर्णय

वडील -          बापुराव 
मोठा मुलगा -   राकेश
मधला -    सुरेश
धाकटा -      मुकेश

राकेश 
"बाबा  ! पंचमंडळी जमली आहे , आता वाटणी करा. " 

सरपंच 
"जर एकत्र रहाण जमत नसेल तर मुलांना वाटुन दिलेल बरं, आता हे सांगा की तुम्ही कोणत्या मुला बरोबर रहाणार ?" 

(सरपंचांनी बापुरावना विचारले. )

राकेश  
"हे काय विचारण झाल, चार महीने बाबा माझ्या कडे रहातील आणि  चार महीने मधल्या कडे, चार महीने धाकट्या कडे रहातील "

सरपंच
" चला तर मग निर्णय पक्का झाला , आता संपत्तीची वाटणी करुया !" 

बापुराव
(एवढा वेळ आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अचानक ओरडला ,) 
कसली वाटणी ? 
वाटणी मी करणार , या तिघांनी अंगावरच्या कपड्यांवर माझ्या घरातून बाहेर निघावे "
"चार महीने आळीपाळीने माझ्या घरी रहायला याव, आणि बाकीच्या महिन्यांची व्यवस्था ज्याचीत्याने करावी ...."

"संपत्तीचा मालक मी आहे "

तीनही मुलं आणि पंचमंडळींचा आवाज बंद झाला , बापुरावनी वाटणीची नवीनच शक्कल लढवून सगळ्या वयस्कर मंडळींचे डोळे उघडले .

👌 याला म्हणतात निर्णय

वाटणी पोरांनी नाही,
आईबापांनी वाटणी करायची

Wednesday, November 6, 2019

मनाचा धनवान

पिंगळी बु.ता.माण येथील धनाजी यशवंत जगदाळे (वय ५४) याचे हातावरचे पोट. 
रोज काम केल तर कुटूंब चालवणारा सर्वसामान्य व्यक्ती. दहिवडी आठवडा बाजार झालेवर हा उशिरा दहिवडी स्टँडवर आला. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्याच्याकडे नव्हते. गावातील ओळखीचा ही त्या दरम्यान तिथे दिसत नव्हते. एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायच कस हा विचार करत दिवसभर कंटाळलेला बिच्चारा धनाजी बसल्या जागेवर झोपून गेला. धनाजीला जाग आली तेव्हा अंधार पडला होता. दरम्यान जो घरी जाण्यासाठी ७ रूपयांसाठी कोणाची तरी वाट पहात होता त्याच्याजवळ ४० हजार रुपयेचा बंडल पडलेला दिसला. आपण ७ रूपये मिळतायत का बघत होतो पण आतातर ४० हजार रूपये सापडेलत. चला निघून जावू ,आता गाडी भाडयाने करून जावू ,दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही. धनाजीने आजूबाजूच्या सर्वाना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. कोणच काहीच बोलत नव्हते. शेवटी तो शोधाशोध करून स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसला. खूप वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले, तेव्हा काही प्रवाशांनी आताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली. त्यांनी बसस्टँड पालथे घातले तेव्हा स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेला दिसून आले. त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचे सांगताच धनाजी बोलला किती रक्कम आहे ,नोटा कशा होत्या असे प्रश्न करीत ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी सर्व चौकशी करून घेतली. त्यावर ते ४० हजार रूपये आहेत .पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले असे त्याने सांगितले. धनाजीने ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. त्याने बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजीला देवू केले. पण मनाने धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना. मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले. तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितले की ,ते १ हजार त्याच बंडलात ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी ७ रुपये द्या. धनाजीचा प्रामाणिक आणि भाबडेपणामुळे माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं.

Tuesday, November 5, 2019

बोधकथा

एक सावकार आपल्या कुत्र्यासोबत होडीतून नदी पार करीत होता.
 कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. 
त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालवणारा नावाडी ही हैराण झाला.
होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते.स्वतः तर बूडेल बरोबर सगळ्यानाच घेऊन बूडेल.
सावकाराच्या लक्षात ही गोष्ट आली, तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षाही जास्त गडबड करू लागला.
हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि नम्रपणे सावकाराला म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."
सावकाराने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या नाका-तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांताने नावेचा आधार घेऊन तो तरंगू लागला. आता त्याला नावेची गरज लक्षात आली.
थोड्या वेळाने त्याला ओढून पुन्हा नावेवर घेतले,मग मात्र तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.
त्याचे हे वर्तन पाहून सावकार चकीत झाला व म्हणाला "पाहिलं आधी किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."
प्रवाशी हसून म्हणाला  "महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही.जेव्हा त्याला पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी आणि नावेची गरज,लक्षात आली.

तात्पर्य

जो  पर्यंत अंगात रग आहे तो पर्यंत माणूस असाच वागतो. देवाचे अस्तित्वच विसरतो.देव किंवा परमेश्वर त्याला वारंवार जाणीव करुन देत असतात पण अंगातील मस्ती .. मायेत गुरफटून गेल्या मुळे देवाच्या किंवा गुरूच्या बोलण्या कडे त्यांच्या संकेताकडे तो दुर्लक्ष करतो.
पण मग जेंव्हा फटके बसतात तेंव्हा तोच देवा शिवाय गुरु शिवाय  पर्याय नाही हे जाणून शरण येतो.

Sunday, November 3, 2019

उसूलों पे जहाँ आँच आये



उसूलों पे जहाँ आँच आये टकराना ज़रूरी है

जो ज़िन्दा हों तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है

नई उम्रों की ख़ुदमुख़्तारियों को कौन समझाये
कहाँ से बच के चलना है कहाँ जाना ज़रूरी है

थके हारे परिन्दे जब बसेरे के लिये लौटें
सलीक़ामन्द शाख़ों का लचक जाना ज़रूरी है

बहुत बेबाक आँखों में त'अल्लुक़ टिक नहीं पाता
मुहब्बत में कशिश रखने को शर्माना ज़रूरी है

सलीक़ा ही नहीं शायद उसे महसूस करने का
जो कहता है ख़ुदा है तो नज़र आना ज़रूरी है

मेरे होंठों पे अपनी प्यास रख दो और फिर सोचो
कि इस के बाद भी दुनिया में कुछ पाना ज़रूरी है


वसीम बरेलवी


माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...