Monday, April 4, 2016

द फाउंटनहेड

द फाउंटनहेड या कादंबरीतील हा
एक फार बोलका परिच्छेद.
व्यक्तीस्वातंत्र्य हिसकावून घेऊन
हुकूमशाही आणण्याच्या
प्रयत्नातला एक विद्वान एल्सवर्थ
टूही आपलं मनोगत व्यक्त करतो
आहे...
जे चाललं आहे जगात आजवर ईशवाद,
धर्मवाद किंवा एकसंध
विचारप्रणालींचा वर्चस्ववाद
याबाबत सावध करणारं हे मनोगत.
"माणसाकडे एक अस्त्र आहे.
विवेकाचं. त्यामुळे ते त्याच्याकडून
काढून घेणं हे महत्त्वाचं. विवेकाचे
आधारच काढून घ्यायचे.
काळजीपूर्वक हं... तो अगदीच
नाकारूनही चालत नाहीत.
काहीही पूर्णपणे नाकारून चालत
नाही, नाहीतर मग हातचा डाव
जातो. विवेकविचार म्हणजे पाप
नाही ठरवून चालत... काहींनी
तेही करून झालंय म्हणा... आणि
यशस्वीही झाले ते. पण तरीही
आधुनिक जगात आपण एवढंच म्हटलेलं
पुरे असतं... की विवेकनिष्ठेला
मर्यादा असतात. त्यापलिकडेही
काहीतरी आहे म्हणायचं. काय?
काहीही स्पष्ट करण्याची गरज
नसते. त्यापलिकडे काहीही
कितीही असू शकतं...
’अंतःप्रेरणा’- ’भावना’-
’साक्षात्कार’-’अंतर्ज्ञान’-
’द्वंद्वात्मक पदार्थवाद’. कुठेतरी
एखाद्या गुंतागुंतीच्या मुद्द्यात
अडकलात आणि कुणी सांगितलं
की तुमच्या तत्वांना काही अर्थ
नाही- तर काय आपण तयारच असलं
पाहिजे... आपण सांगून द्यायचं की
रूढ अर्थांच्या पलिकडेही
काहीतरी असतं. केवळ विचार न
करता थोडं महत्त्व
भावभावनांनाही द्यायला हवं.
थोडी श्रध्दा हवी. विवेक
खुंटीला टांगला की एक जोकर
वापरता येतो. तुम्हाला जे हवं ते
बोलू शकता तुम्ही. गरजेनुसार बदल
करू शकता आपल्या युक्तीवादात.
तुमच्या घोळात अडकतोच तो.
विचारी माणसांवर राज्य करता
येईल कां कुणाला? आम्हाला
विचारी माणसंच नको आहेत.”

कोण आहेत आंबेडकर अन काय केलंय आंबेडकरांनी????

कोण आहेत आंबेडकर अन काय केलंय आंबेडकरांनी????

मित्रा,
तू कोणत्या जातीचा धर्माचा याच्याशी काही देणे घेणे नाही,
पण तू ज्या कुठल्या ठिकाणी काम करतोयेस ना त्या
ठिकाणी तू आज '१४' तासांच्या ऐवजी '८' तासांची ड्यूटी
करतोयेस ते '१४' चे '८' तास ज्यांनी केले ते आहेत "आंबेडकर" 
        तुझी बहिण, बायको ज्या     ठिकाणी काम करतायेत
त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या सोयी किंवा मुभा असतात,
त्या गरोदर असताना मिळणाऱ्या सुट्ट्या देऊ करणारे कायदे
निर्माण केलेत ते आहेत "आंबेडकर"
       त्यांना सर्वात जास्ती सक्षम बनवण्यासाठी
आरक्षणात महिलांना अधिक प्राधान्य दिले ते आहेत
आंबेडकर...
         ज्यांच्या आराखड्यावर मजबूत आणि ज्यांच्या कल्पनेतून
'The Reserve Bank Of India' आधारली आहे ते आहेत आंबेडकर...
      तूला, मला अन आपल्या प्रेत्येकाला जो 'P. F.' मिळतो ना,
ते आहेत "आंबेडकर"....
        आंबेडकर तर तुझे माझे नंतर आहेत, ते सर्वात आधी या
'देशाचे' आहेत.
संपूर्ण स्वातंत्र्यची मागणी करणारे पहिले 'देशभक्त' ते
आहेत…आंबेडकर
        सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाची सूत्र कोणच्या हातात
देयचे हे ठरवण्याचा हक्क "मतदान" हे ज्यांनी तुला मिळवून दिले
ते आहेत आंबेडकर...
अजून एक...
आंबेडकर महान आहेत, कित्येक गोष्टींचे निर्माते आहेत...
ज्या तुला माहितही असतील पण त्या कोणामुळे आहेत हे
तुला माहित नसेल,
आंबेडकर मोठे अन महान आहेतच पण जातीयवाद्यांनी अन
बिकावू मिडिया ने अजनुही आंबेडकर पुरेपूर आपल्या पर्यंत
पोहोचू दिले नाही .
"साहेबांचे साहेब बाबासाहेब"

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...