Monday, November 11, 2019

वाटणी - एक उत्तम निर्णय

वडील -          बापुराव 
मोठा मुलगा -   राकेश
मधला -    सुरेश
धाकटा -      मुकेश

राकेश 
"बाबा  ! पंचमंडळी जमली आहे , आता वाटणी करा. " 

सरपंच 
"जर एकत्र रहाण जमत नसेल तर मुलांना वाटुन दिलेल बरं, आता हे सांगा की तुम्ही कोणत्या मुला बरोबर रहाणार ?" 

(सरपंचांनी बापुरावना विचारले. )

राकेश  
"हे काय विचारण झाल, चार महीने बाबा माझ्या कडे रहातील आणि  चार महीने मधल्या कडे, चार महीने धाकट्या कडे रहातील "

सरपंच
" चला तर मग निर्णय पक्का झाला , आता संपत्तीची वाटणी करुया !" 

बापुराव
(एवढा वेळ आकाशाकडे डोळे लावून बसला होता. अचानक ओरडला ,) 
कसली वाटणी ? 
वाटणी मी करणार , या तिघांनी अंगावरच्या कपड्यांवर माझ्या घरातून बाहेर निघावे "
"चार महीने आळीपाळीने माझ्या घरी रहायला याव, आणि बाकीच्या महिन्यांची व्यवस्था ज्याचीत्याने करावी ...."

"संपत्तीचा मालक मी आहे "

तीनही मुलं आणि पंचमंडळींचा आवाज बंद झाला , बापुरावनी वाटणीची नवीनच शक्कल लढवून सगळ्या वयस्कर मंडळींचे डोळे उघडले .

👌 याला म्हणतात निर्णय

वाटणी पोरांनी नाही,
आईबापांनी वाटणी करायची

Wednesday, November 6, 2019

मनाचा धनवान

पिंगळी बु.ता.माण येथील धनाजी यशवंत जगदाळे (वय ५४) याचे हातावरचे पोट. 
रोज काम केल तर कुटूंब चालवणारा सर्वसामान्य व्यक्ती. दहिवडी आठवडा बाजार झालेवर हा उशिरा दहिवडी स्टँडवर आला. समोर घरी जाण्यासाठी बस लागली होती. परंतु तिकिटासाठी ७ रुपये त्याच्याकडे नव्हते. गावातील ओळखीचा ही त्या दरम्यान तिथे दिसत नव्हते. एक गाडी सोडली दुसरी सोडली पण ओळखीची व्यक्ती कोणीच दिसेना. जायच कस हा विचार करत दिवसभर कंटाळलेला बिच्चारा धनाजी बसल्या जागेवर झोपून गेला. धनाजीला जाग आली तेव्हा अंधार पडला होता. दरम्यान जो घरी जाण्यासाठी ७ रूपयांसाठी कोणाची तरी वाट पहात होता त्याच्याजवळ ४० हजार रुपयेचा बंडल पडलेला दिसला. आपण ७ रूपये मिळतायत का बघत होतो पण आतातर ४० हजार रूपये सापडेलत. चला निघून जावू ,आता गाडी भाडयाने करून जावू ,दिवाळी चांगली साजरी होईल असा किंचितही विचार धनाजीच्या मनात आला नाही. धनाजीने आजूबाजूच्या सर्वाना तुमचे पैसे पडलेत का अशी विचारणा सुरू केली. कोणच काहीच बोलत नव्हते. शेवटी तो शोधाशोध करून स्टँड पोलीस चौकीजवळ पोलीसांची वाट पहात बसला. खूप वेळाने एक गृहस्थ स्टँडवर आले व बसलेल्या ठिकाणी आपले पैसे शोधू लागले, तेव्हा काही प्रवाशांनी आताच एक उंचीला कमी असलेला माणूस कुणाचे पैसे पडलेत का विचारत असल्याची त्यांना कल्पना दिली. त्यांनी बसस्टँड पालथे घातले तेव्हा स्टँड पोलीस चौकीजवळ धनाजी पोलिसांची वाट पाहत बसलेला दिसून आले. त्यांनी धनाजीला पैसे हरवल्याचे सांगताच धनाजी बोलला किती रक्कम आहे ,नोटा कशा होत्या असे प्रश्न करीत ज्याचे आहेत त्यालाच पैसे मिळावेत यासाठी सर्व चौकशी करून घेतली. त्यावर ते ४० हजार रूपये आहेत .पत्नीचे ऑपेरशन आहे त्यासाठी पैसे घेऊन निघालो होतो. गाडी न मिळाल्याने बाकावर बसून होतो तेव्हा खिशातून पडले असे त्याने सांगितले. धनाजीने ते पैसे काढून देताच हाच आपला पैशांचा बंडल म्हणून त्या व्यक्तीचे डोळे पाणावले. बायकोचे ऑपरेशन कसे करायचे हा त्यांना पडलेला प्रश्न आता सुटणार होता. त्याने बक्षीस म्हणून त्या बंडलातील एक हजार रूपये काढून धनाजीला देवू केले. पण मनाने धनवान असलेला धनाजी ते बक्षीस घेईना. मला काहीही बक्षीस नको तुमचे पैसे तुम्हाला मिळाले. आता तुम्ही तुमच्या बायकोचे ऑपरेशन करू शकता यात मला सर्व काही मिळाले. तरीही त्या व्यक्तीने खूप आग्रह केल्यावर धनाजीने एकच वाक्य सांगितले की ,ते १ हजार त्याच बंडलात ठेवा. घरी जाण्यासाठी माझ्याकडे ७ रूपये नाहीत म्हणून मी स्टँडवरच पडून राहिलो. मला फक्त घरी जाण्यासाठी ७ रुपये द्या. धनाजीचा प्रामाणिक आणि भाबडेपणामुळे माणसाच्या डोळ्यांत पाणी आलं.

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...