सिकंदर आणि डायोझेनस एकाच देशाचे.
सिकंदरला बेफाट सत्ता हवी होती, जग काबीज करायचे होते. त्यासाठी तो कष्ट घेत होता, लढत होता, जगभरावर स्वारी करत होता.
डायोझेनस हा फकीर होता. आपल्या गरजा कमी करत करत जगत होता. एक दिवस जनावरे जगातात तर आपण का नाही याचा विचार करून त्याने आपली वस्त्रे देखील त्यागून टाकली. पाणी प्यायला एक भांड यापलीकडे त्याची संपत्ती नव्हती. एका कुत्राला वाहत्या पाण्यात तोंडाने पाणी पितांना बघून त्याने ते भांडे देखील फेकून दिले.
एका रम्य सकाळी समुद्र किनारी डायोझेनस सकाळचे कोवळे ऊन खात बसला होता. सिकंदर तिथे आला, त्याची सावली डायोझेनसवर पडली. त्याला असे विवस्त्र बघून सिकंदर म्हणाला,
-मी सम्राट आहे इथला, माग काय मागायचे ते.
-मला काहीही नको आहे.
-अरे माग, असे काहीही नाही जे मी तुला देऊ शकणार नाही.
-नकोय मला काहीही.
-अरे पण का?
-कारण तू मला जे हवे ते देऊ शकणार नाहीस.
-असे काय आहे जगात.
-मित्रा बाजूला हो, तुझ्यामुळे माझ्या अंगावर येणारे हे कोवळे ऊन अडले आहे. हे कोवळे ऊन मला फक्त सूर्य देऊ शकतो, कितीही अब्जाधीश तू असलास तरी नाही. आयुष्यात काहीही करता आले नाही तरी चालेल पण काळजी घे.
-कसली?
-कोणाच्याही आयुष्यात येणारा प्रकाश तू अडवू नकोस कारण प्रकाश देण्याची क्षमता तुझ्यात नाही !!!!
****
मार्क ट्वेन एकदा आपल्या कार मधून घरी निघाले होते. रस्त्यात गटारीत एक कुत्र्याचे छोटू पिल्लू पडले होते. ते पिल्लू वर येण्याची धडपड करत होते, पण त्याला जमत नव्हते. कार पुढे गेली, मार्कने ड्राइव्हरला गाडी फिरवायला सांगितली. त्या गटारात हात घालून त्यांनी पिल्लाला बाहेर काढले, पिल्लू आनंदाने शेपटी हलवत निघून गेले.
हात रुमालाला पुसून मार्क गाडीत येऊन बसला. गाडी निघाली, ड्राइव्हरला चैन पडेना, त्याने विचारले.
-असे का केले तुम्ही, आय मीन अशी काय गरज होती.
हे बघ, मी त्याला काढले नसते तर ते पिल्लू नक्की मरणार होते. आणि मुख्य म्हणजे मला रात्रभर झोप आली नसती.
-का झोप आली नसती?
-माझ्या आयुष्याचे काही सेकंद खर्च केल्याने एकाचा जीव वाचू शकला असता आणि मी स्वार्थी माणसासारखी ती काही सेकंद खर्च केली नाही ह्या विचाराने मला आयुष्यभर झोप आली नसती. जे आयुष्य मी देऊ शकत नाही, ते मी वाचवू नक्की शकतो...
*****
दोन्ही कथा माझ्या नाहीत, कुठेतरी वाचल्यात. जो प्रकाश आपण देऊ शकत नाही तो हिरावून घेऊ नये आणि माणूस म्हणून मिळालेल्या या जीवनाचे शक्य तितकी मदत करून सार्थकी लावावे....
🌹☺😊🌹