Monday, April 27, 2020

प्रेम

क्रौर्यानं आवाज दाबता येतील, काळजातलं गाणं बंद करता येत नाही. शौर्यानं भूभाग जिंकता येतील, माणसांवर राज्यही करता येईल. मात्र माणसं जिंकायची असतील कायमची, तर प्रेमच करावं लागतं.
-गावझुला (शाम पेठकर)

Tuesday, April 14, 2020

डॉ.बाबासाहेबआंबेडकर जयंती

विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती
निमित्त महामानवास शत शत नमन व
आपणास व आपल्या परिवारास 
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!
┈┉┅━❀꧁ω❍ω꧂❀━┅┉┈


क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका

क्रांतिसूर्य तू शिल्पकार तू भारताचा
बोधिसत्व, मूकनायका…
मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्यतेजा
तूच सकल न्यायदायका

जीवन तुझे आम्हास प्रेरणा,
दाही दिशा तुझीच गर्जना,
गर्जना! ||
भीमरायाssss… माझा भीमराया,
भारताचा पायाsss… माझा भीमराया,
आला उद्धरायाsss… माझा भीमराया

Sunday, April 12, 2020

संविधान

8 वर्षाचं पोरगंय हे, तिसरीत आहे.  
गाव आहे चाटगाव. 
गेल्यावर्षी नेहमीसारखं हातात तुराटीची काठी डांबरीवर ओढत शाळेत चाललेलं तर  ह्याला अचानक मधेच कोणतरी चिरकल्याचा आवाज ऐकू यायला लागला. म्हणून हा शेजारी तळयाकडे जोरात पळत गेला. तर समोर एक बारकी पोरगी तळ्यात पडलेली. ती बुडायला लागली 
ह्यानं थोडा विचार केला अन टाकली उडी. दोघांनी मिळून गटांगळ्या खाल्ल्या. नाकातोंडात पाणी गेलं... ठसकायला लागली पण बलवत्तर. बुडता बुडता वाचली. 
"पोरीचा जीव वाचवला अन एवढा बारका असूनबी यानं स्वतःच्या जीवाची किंमत काडी करत , डेरिंग करत तिला जिवंत बाहेर काढलं" म्हणून सगळी नवाजाय लागली.
बातमी पसरली तसं बऱ्याच ठिकाणाहून सत्कार व्हायला लागला. काही ठिकाणी रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळायला लागली. 
बाप बीड ते परळी रेल्वे रुळावर मजुरी करून स्वतःचं अन कुटूंबाचं पोट भरतो.
दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करून रात्री खायला कसंबसं अन्न मिळवणाऱ्या कुटुंबाला अधिकचा एक रुपयापण एकेक हजारा सारखा वाटतो.
त्यात याला सगळीकडून मिळून 10 हजार रुपये मिळालेले.
याने हे सगळेच्या सगळे- म्हणजे 10 हजार रुपये कोरोना हरवायच्या लढाईला सुपूर्द केलेत...
अन,त्याहीपेक्षा शहारे आणणारी गोष्ट म्हणजे याचं नाव----संविधान !

Copied 

Thursday, April 9, 2020

कोरोना_को_हराना_है

शेजारी मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो.तो उपाशी झोपला असेल आणि तुम्ही जेवून झोपलात तर तुमची सगळी कर्मकांडे व्यर्थ आहेत.आणि मुख्य म्हणजे 'धर्म ' हा काही माणुसकीच्या वाटेतील अडथळा  नाही!

Monday, April 6, 2020

Think you have symptoms of COVID-19?

Think you have symptoms of COVID-19? 

Call on COVID-MADAT helpline 0951361550 to access a pool of 3000+ doctors for teleadvice. 

Don't worry, we are here for you!

 


Saturday, April 4, 2020

anger

It's natural to feel angry when someone or something hurts you, but eventually, you have to let it go before it destroys your peace of mind and your health.

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...