रामोशी समाजाची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्रात आढळते. रामोशी हे स्वताला रामवंशी समजत असत. म्हणून काही तज्ञ व्यक्ति रामोशी या शब्दाची फोड रामवंशी व काही तज्ञ रानवंशी अशी करतात कारण की रानात राहत असत म्हणून. रामोशी लोक किंवा जमात ही जंगलाने राहणारी असल्यामुळे ते शरीराने बळकट उंच बांधेसुध असत. म्हणून ते शेती पशुपालन व्यवसाय करत असत. तसेच किल्ल्यांचा बंदोबस्त व पहारेकरी म्हणून देखील ते काम करत असत. गावचा महसूल गोळा करण्याचे काम देखील ते करत असत. इंग्रजांचे साम्राज्य आले तेव्हा त्यांना अनेक शाही कामातून मुक्त करण्यात आले त्यामुळे रामोशांचा इंग्रजाविरुद्ध रोष होता. रामोशी लोक निजामाच्या प्रदेशातील शोरापुर च्या राजास आपला प्रमुख मानत असत तसेच आपल्या नावाच्या पुढे नाईक आशा संज्ञा लावत असत.
उमाजी नाईक हे रामोशांचे नेते होते. त्यांचा जन्म पुरंदर मधील भिवरी गावात इ. स. 1791 मध्ये झाला. त्यांचे वडील दादजी अन्यायाच्या विरोधात काम करत असत. उमाजी अकरा वर्षाचा असतानाच दादजीचा मृत्यू झाला. वडिलांच्या काळापासूनच उमाजी पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होते. रामोशी लोक जुलमी सावकाराच्या घरावर दरोडे टाकत असत.
भोर जवळील विंग गावात इ. स. 1818 साली दरोडा टाकताना उमाजी पकडला गेला. तुरुंगात असताना उमाजी साक्षर झाला. उमाजीच्या अगोदर संतु नाइकाच्या नेतृत्वाखाली सर्व रामोशी समाज एकवटला होता. संतूच्या नेतृत्वाखाली उमाजी आणि त्याचा भाऊ अमृता याने भांबुड्यांचा लष्करी खजिना लुटला (1824-25). संतु नाईकांच्या मृत्यू नंतर सर्व रामोशांचे नेतृत्व उमाजी नाइकाच्या हातात आले.
रामोशांचे नेतृत्व हातात येताच उमाजी नाइकाने त्याचवर्षी सात दरोडे आठ वाटमार्या घडून आणल्या. अनेक धंनिकांना लुटले. त्यामुळे उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यास पकडून देणार्यास 100 रूपयांचा इनाम घोषित करण्यात आला. परंतु इंग्रजांच्या जाहीरनाम्याचा काहीही फायदा झाला नाही. यावरून इंग्रजांनी एकच निष्कर्ष काढला तो म्हणजे सर्व लोक उमाजी नाईकांच्या बाजूने आहेत. पहिल्या जाहीरनाम्याचा काहीच उपयोग झाला नसल्याने इंग्रजांनी दूसरा जाहीरनामा काढला या जाहीरनाम्यात जो कोणी उमाजी नाईकाची साथ देईल त्यास सजा देण्यात येईल असे घोषित करण्यात आले होते. परंतु इंग्रजांच्या या घोषणेचा देखील काहीच फायदा झाला नाही.
जेजूरी, सासवड, परींचे, भिवरी, किकवी, या भागात उमाजीने प्रचंड लुटालूट करून इंग्रजांना जेरीस आणले होते. इंग्रजी राजवटीची कायदा व सुव्यवस्था अस्था व्यस्त झाली होती. कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी इंग्रजांनी ठिकठिकाणी पोलिस चौकी स्थापन केल्या. घोडदळाची नेमणूक केली तसेच तिसरा जाहीरनामा काढून उमाजी नाईकास पकडून देणार्यास 1200 रु देण्यात येतील असे घोषित केले. पण याचा परिणामही उमाजी नाईकावर झाला नाही. कारण समाजातील प्रतिष्ठित लोकांची साथ उमाजी नाईकाला होती.
एवढे सर्व झाल्यानंतरही इंग्रज उमाजी नाईकाला पकडू शकले नव्हते. त्यामुळे उमाजी नाईकने स्वतःला राजे म्हणून घ्यावयास सुरुवात केली. त्याचा दरबार भरत असे. गोरगरीबांना दक्षना देण्याचे काम त्याने सुरू केले होते. त्याच्यासोबत सर्व जातीचे लोक असत. त्याने अनेक कारस्थाने करून इंग्रजांना आव्हान केले होते.
त्याने इंग्रजांना आव्हान देण्यासाठी पुण्याच्या कलेक्टर एच डी रॉबर्टसन याच्याकडे ई. स. 1827 मध्ये पुढील मागण्या केल्या. इंग्रजांनी अमृता रामोशी व विनोबा भावे यांना मुक्त करावे. रामोशांची परंपरागत वाटणे परत करावीत. पुरंदर व इतर ठिकाणी असणार्या रामोशांच्या वतनाला इंग्रजांनी हात लाऊ नये.
वरील प्रमाणे न वागल्यास त्यांना रामोशांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. कलेटक्टर रॉबर्टसन ने खालील जाहीरनामा काढून उमाजी च्या जाहीरनाम्याला उत्तर दिले. (15 डिसेंबर 1827) जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये व सहकार्य करू नये. उमाजी, भुसाजी, पांडुजी व येसाजी या बंडखोरांना पकडून देणार्यास प्रत्यकी रु 5000 बक्षीस दिले जाईल. रामोशी चार परगण्यामध्ये जनतेला त्रास देत आहे. त्यामुळे त्यांचा कठोरपणे बंदोबस्त केला जाईल. रामोशासोबत सामील झालेली कोणतीही व्यक्ति सरकारात आल्यास त्यास पूर्ण माफी दिली जाईल. बंडखोरास माहिती देणार्यास खास बक्षीस दिले जाईल.
कलेक्टर जॅक्सन चा जाहीरनामा वाचून उमाजी संतापला. त्याने पाच दिवसात पाच इंग्रजांना पकडले व त्यांची मुंडी कापून सासवड येथील ब्रिटिश आधिकार्यास पाठविली. त्यानंतर पाच दिवसांनी 25 डिसेंबर 1827 ला दूसरा जाहीरनामा काढला त्याचे पुढील मुद्दे पुढील प्रमाणे सांगता येतील.
ठाणे जिल्ह्यातील पाटील, मामलेदारांनी महसूल सरकारकडे जमा न करता तो थेट उमाजीस द्यावा. उमाजीची माणसे येतील तेव्हा पैसा तयार ठेवा अन्यथा होणार्या परिणामला सबंधित व्यक्ति जबाबदार असतील.
या जाहीरनाम्यानंतर भोर संस्थानामधील 13 गावांनी उमाजी ला महसूल दिला. दरम्यानच्या काळातच उमाजिनी, कोल्हापूरचे छत्रपती व आंग्रे यांच्याशी सलोख्याचे सबंध प्रस्थापित केले. याचा फायदा घेऊन उमाजिनी ब्रिटिशांविरोधात दहशत निर्माण केली. त्यामुळे ब्रिटीशांना धक्का बसला.
उमाजी ला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने वेगवेगळे प्रयत्न केले. पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता. तेव्हा इंग्रजांनी नीतीतत्वाच्या विरोधात जाऊन उमाजी च्या नातेवाईकांना किंवा जवळच्या व्यक्तींना पकडूनच उमाजीला कैदेत टाकता येईल असा निष्कर्ष काढला. तेव्हा त्यांनी माहिती काढून उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना पकडून कैदेत टाकले. त्याचा परिणाम तसाच झाला जसा इंग्रजांना हवा होता. उमाजीने आपल्या परिवाराखातर स्वतःला इंग्रजांच्या स्वाधीन केले. परंतु उमाजीला सजा न देता इंग्रजांनी त्यास नौकारीवर ठेवले. पुणे व सातारा भागात शांतता टिकविण्याचे काम त्याच्याकडे सोपवले. त्याने त्या भागात शांतता टिकवली परंतु भोर संस्थानातील तेरा गावाच्या महसुलावरून उमाजीचा इंग्रजांशी संघर्ष चालूच होता. त्यातच खटाव, नातेपुते या भागात उमाजीने माणसे जमवल्याची खबर इंग्रजांना लागली म्हणून त्यास इंग्रजांनी कैद केले. परंतु उमाजी त्यांच्या कैदेतून सुटला.
उमाजी इंग्रजांच्या कैदेतून सुटल्यानंतर त्याने पुन्हा रामोशांना एकत्र करण्यास सुरुवात केली. त्याने इंग्रजांच्या प्रदेशात दंगली घडवून आणण्यासाठी त्याने योजनाबद्ध कार्यक्रम आखला. रामोशांच्या टोळ्या विखरून ठेवणे आणि सर्व भागात एकाच वेळी उठाव करणे. इंग्रजाबरोबर समोरासमोर संघर्ष करण्याचे टाळणे व गनिमिकावा तंत्राचा अवलंब करून त्यांना हैराण करणे. रयतेला त्रास द्यायचा नाही. परंतु त्यांच्याकडे भाकरी मागून भूक भागवणे.
इंग्रज सरकारने उमाजिला पकडण्याची जबाबदारी कॅ. अलेक्सझंडर व कॅ. मॅकिंटोशवर सोपवली. उमाजींचा त्यांच्याशी पहिला संघर्ष मांढरदेवच्या डोंगरावर झाला. परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती लागला नाही. त्या नंतर 26 जानेवारी 1831 ला पुण्याच्या कलेक्टर जॉर्ज जिर्बन यांनी एक जाहीरनामा काढला. त्याने खालील घोषणा केल्या.
उमाजी, भुजाजी, येशाजी, कृष्णाजी यांना पकडून देणार्यास प्रत्यकी रोख 5000 व 200 बिघे जमीन दिली जाईल. सरकारला उमाजी बाबत बातमी देणार्यास रु. 2500 बक्षीस आणि 100 बिघे जमीन दिली जाईल. प्रत्यक्ष बंडात सामील असणार्याने बातमी पुरवल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ केले जातील.
वरील जाहीरनाम्याचा काही उपयोग झाला नाही. एकाही व्यक्तीने उमाजीची माहिती दिली जात नाही. उलट कलेक्टर च्या जाहीरनाम्याला उत्तर देणारा जाहीरनामा काढला. दिसेल त्या युरोपीयांना ठार करावे. ज्यांची वेतन व तनखे इंग्रजांनी बंद केले आहेत त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा दिला तर ती वतणे व तनखे आपण परत मिळवून देऊ.
कंपनी सरकारच्या पायदळ व घोडदळातील कंपनीचे नियम धुडकावून लावावेत. अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे. कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये. अन्यथा त्या गावाचा उध्वंस केला जाईल.
या जाहीरनाम्या नंतर उमाजीने पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, मराठवाडा इ. भागात दंगे घडवून आणून इंग्रजांना हैराण केले. साधारणतः 7 महीने हे उठाव सुरू होते. तरीही इंग्रजांनी उमाजीस पकडता आले नाही.
इंग्रजांनी 8 ऑगस्ट 1831 ला पुन्हा जाहीरनामा काढून इनामची रक्कम 10,000 रु रोख आणि 400 बिघा जमीन एवढी केली व बातमी पुरविणार्यास 5000 रु. रोख आणि 200 बिघा जमीन देण्याची घोषणा केली. इंग्रजांनी जाहीर केलेली रक्कम व जमीन इतकी मोठी होती की कोणीही आमिषाला बळी पडेल. उमाजीचे जवळचे सहकारी काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजीला पुण्याच्या मुळशी जवळ आवळस जवळ आणले. नानाने उत्तावेळी येथे 15 डिसेंबर 1831 ला उमाजीला पकडले आणि इंग्रजांनी स्वाधीन केले. उमाजीला कैद करण्यात येऊन चौकशी करण्यात आली. त्याला गुन्हेगार ठरवून 3 फेब्रुवारी 1834 ला फाशी देण्यात आली. एका तळागाळातील मराठी नेत्याच्या हा ब्रिटिश विरोधी लढा होता.
No comments:
Post a Comment