Sunday, December 27, 2020

लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते

*लवकर जाग येणे खूप फायद्याचे असते मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो किंवा वागण्याच्या पद्धतीतून असो.* 
   ⚪🔴🟠🟡🟢🔵⚫🟤

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, "we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same"

म्हणजे, "आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे "

किती सुंदर वाक्य आहे नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखिल कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो... अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!
 *"जिंदगी एक बार मिलती है"*
  *"बिल्कुल गलत है!"*
*सिर्फ मौत एक बार मिलती है!*
 *जिंदगी हर रोज मिलती है !!*
  *बस जीना आना चाहिए!!*


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वो अपने चेहरे में सौ आफ़ताब रखते हैं

वो अपने चेहरे में सौ आफ़ताब रखते हैं
इसीलिये तो वो रुख़ पे नक़ाब रखते हैं

वो पास बैठें तो आती है दिलरुबा ख़ुश्बू
वो अपने होठों पे खिलते गुलाब रखते हैं

हर एक वर्क़ में तुम ही तुम हो जान-ए-महबूबी
हम अपने दिल की कुछ ऐसी किताब रखते हैं

जहान-ए-इश्क़ में सोहनी कहीं दिखाई दे
हम अपनी आँख में कितने चेनाब रखते हैं

- हसरत जयपुरी

Tuesday, December 15, 2020

आम्ही *मध्यमवर्गीय* होतो ..!!



साधारण 20-25 वर्षांपूर्वी  "मध्यमवर्गीय" ही जमात अस्तित्त्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा 'ब्रँड' होता.

घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजीआजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकुण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6  हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही.  म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती.....एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं...पक्कं गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत,"पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको" असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची,"खाऊन माजावं, पण टाकून माजू नये."
कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या... अशी साधी साधी समीकरण असायची. घरातली पुरूषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी - भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा 'कुचकरा' किंवा 'फोडणीचा भात'.  जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे 'टेन्शन'चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. 200-300 रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज 2 वर्ष जायचा.  
पुस्तकांचा जरा ' जुगाड ' असायचा. म्हणजे समजा 'अ' ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर 'ब' ला 70% किमतीत विकायचा.. अन् मग 'ब' तीच पुस्तकं  'क' ला 40% मधे विकायचा. 
Purchase Cost ,Selling Cost, Deprisiated Value हे कामापुरतं "अर्थशास्र"  सगळ्यांनाच येत होतं. एकदा विकत घेतलेली पुस्तकं तीन वर्षं सर्रास वापरली जायची. 

पुस्तकाच्या या 3 वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल,अहिल्याबाई अशा 
"दूरदृष्टी च्या" व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं. 

बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची. पण शाळेत असतांना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवाॅटर अशी Destanations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाहीत. 

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा,जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा 'अ' करून मोकळा व्हायचा... म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त  चित्रकलेतच "स्कोप" उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापाना वर यायचा...
 

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत.मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं,त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ' इगो बिगो' कोणाचा आड येत नव्हता..
स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा.. त्यातही लहान बाळाचं स्वेटर,कपडे,दुपटे,झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला अाठवायचं नाही..

पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना "यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू.." आणि मुलांना, "तुला रिक्षा  घेवून देवू चालवायला" अशी  "जागतिक" धमकी मिळायची..

12 वी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं ....Proposals.. हे आजच्या काळातले  "Highly Personal Issues"  त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते,
तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात  Space.. ...बाकी सगळा 'लेकुरवाळा' कारभार!! 

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा 'बाबा' लोकांचा प्रांत होता.प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी  RD , LIC काढलेल्याच असायच्या.....आणि  त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी !!! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा 'एजंट' त्या काळी उदयाला आलेला नव्हता.आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा... Share market म्हणजे जुगार.. हा 'समज' अगदी पक्का होता..

' फॅमिली डॉक्टर' हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण 'नीतिमत्ता' वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया,  पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा 'व्यावहारिक' पवित्रा असायचा.

जसा 'फॅमिली डॉक्टर' तशीच एक फॅमिली 'बोहारीण' पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही  'बोहारिण' एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई  जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी 'तहा' ला सुरवात व्हायची..तिची गाळणी खपवायची घाई....तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा!!! खूप घासाघीस करून  'Deal' चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या  कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या.शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. ...मध्यमवर्गीय ही काही 'परिस्थिती' नाहीये, ती  "वृत्ती" आहे......साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा 'कणा'.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित 'कर' भरणारे, वाहतुकीचे काटेकोर 'नियम' पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत 'मतदान' करणारे.

असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्या पर्यंत यायला 10-12 वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याच,' वादळ ' झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण.. 

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही......अचानक 'प्रोफेशनल' झालो.माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं. 

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या.Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या 'गोंडस' नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ  Packages  मधे गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा..

संग्रहित लेख

Sunday, December 6, 2020

So become निर्लज्ज

*So become निर्लज्ज*

ती : काय करतोय ?

मी : निवांत , बोल ना.

ती :  डॉ. शीतल आमटेंची बातमी वाचली ?

मी : हो.

ती : काय वाटतं ? 

मी : दुर्दैवी आहे.

ती : त्यामुळे तुझ्या-माझ्यासारखं, माणसाने निर्लज्ज असावं.

मी : तू मला इनडायरेक्टली निर्लज्ज म्हणतेय. 

ती : किती वर्षे झाली आपण एकमेकांना ओळखतो?

मी : चार.

ती : म्हणून तर म्हटले.

मी : म्हणजे?

ती : अरे, अनुभवांचे धक्के चपाटे खाल्लेली माणसं, आयुष्यात पुढे आपोआप निर्लज्ज होतात.

मी : सहमत.

ती : म्हणून आपल्यासारखी माणसं आत्महत्या वैगरे करूच शकत नाहीत. 

मी : खरं आहे.

ती : शिवाय हे मी अनुभवांती सांगत आहे.

मी : म्हणजे?

ती : मी लहानपणीपासून इतरांच्या तुलनेत अगदी डंब होते.

मी : समजलो नाही.

ती : आमचं घराणं म्हणजे हुशार लोकांचं खानदान. माझे आजोबा प्रख्यात डॉक्टर होते. वडील डॉक्टर आणि काका यशस्वी उद्योजक. माझ्या आत्या बोर्डात वैगरे आलेल्या. माझी आई प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ. माझा भाऊ कायम वर्गात पहिला. माझ्या वयाची माझी चुलतबहीण स्कॉलर. साला मीच त्या सर्वांमध्ये मंद होते.

मी : असं का वाटतं तुला?

ती : अरे बारावीला ४ वेळा नापास झालेली पोरगी हुशार कशी असू शकेल ?  

मी : यश-अपयश चालूच असतं.

ती : ते कॉमन लोकांसाठी. मी मात्र एक्स्ट्राऑर्डीनरी कुटुंबात जन्माला आलेली. 

मी : खरं आहे.

ती : समवयस्क असल्याने मला कायम माझ्या चुलत बहिणीशी कम्पेअर केलं जायचं.

मी : सगळीकडे तेच होतं.

ती : ती चौथीला स्कॉलरशिपमध्ये आलेली आणि मी काठावर पास झालेली.

मी : अरे..

ती : दरवेळी काकांसमोर पप्पांचा इगो हर्ट व्हायचा. म्हणून मग मला मारून, झोडून त्यांच्या मनाला दिलासा भेटायचा. 

मी : शीट.

ती : खरं सांगायचं तर, दहावीपर्यंत मी घरच्यांचा कुत्र्यासारखा मार खाल्ला. म्हणजे मम्मी ,पप्पा मला लिट्रली बेल्टने मारायचे.  

मी : कारण काय ?

ती : माझा मंदपणा.

मी : अरे.

ती : पण त्याच दिवसांनी मला निर्लज्ज बनवलं. आयुष्यात तर एक क्षण असा आला, की ते मला मारायचे आणि मी दात काढायचे कारण मला त्यांच्या मारण्याने काही होतच नव्हतं.  

मी : च्यामारी. 

ती : एवढ्या कमी वयात एवढा लागोपाठ अपमान सहन केल्याने, मला जिंकण्याची खरी किंमत कळाली होती. 

मी : सच बात. जो आयुष्यात पावलोपावली हरलेला असतो, त्यालाच जिंकण्याची खरी किंमत माहीत असते.

ती : तेव्हा मी कशी बशी बारावी पास झाले आणि कॉलेजला ऍडमिशन घेतली.  

मी : पुढे ?

ती : माझ्या अफाट पराक्रमांमुळे मला कधीच घरून पॉकेटमनी मिळत नसायचा म्हणून मग झोल करून पैसे कसे कमवायचे हे आधीच समजलं होतं. त्यात माझ्या फ्रॅंक स्वभावामुळे फ्रेंड सर्कल तुफान असल्याने , कॉलेज सुरु असताना एका मैत्रिणीने तिच्या जिममध्ये जॉब करायची मला ऑफर दिली.

मी : ग्रेट.

ती : घरच्यांचा माझ्या त्या जॉबला विरोध होता, म्हणून मग वयाच्या १९ व्या वर्षी मी घर सोडलं आणि थेट दुनियादारीशी संबंध आला.

मी : मग?
 
ती : तुला म्हटलं ना, निर्लज्ज लोक कधी आत्महत्या करत नाहीत. कारण त्यांनी स्वतःमध्ये डॅमेज कंट्रोल मेकॅनिझम डेव्हलप केलेलं असतं.

मी : सेल्फ हीलिंग.

ती : येस.

मी : पुढे ?

ती : माझ्याजागी दुसरी कुठलीही पोरगी असती, तर तिने स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं असतं. 

मी : का बरं ?

ती : कारण त्या काळात आपण इमोशनली उध्वस्त झालेलो असतो. 

मी : खरं आहे. 

ती : त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कुणी मदतीला येणार नाही, हे मी ओळखलं आणि स्वतःला सावरत कशीबशी उभी राहिले. 

मी : ग्रेट , मग ?

ती : त्यातच एक दिवस माझी स्कॉलर चुलतबहीण डिप्रेशनमध्ये असल्याचं मला समजलं.

मी : काय कारण ? 

ती : यशस्वी माणसाला अनपेक्षित अपयश पचवता येत नाही. ती अभ्यासात हुशार होती, मात्र दुनियादारीच्या शाळेत मठ्ठ ठरली.

मी : म्हणजे?

ती : काय झालं हे मलाही नाही समजलं. मात्र डिप्रेशनमुळे ती एका सायकॉलिजिस्टकडे ट्रीटमेंट घेत असल्याचं काकांनी मला सांगितलं होतं.  

मी : सेल्फ हीलिंग नाही जमलं. 

ती : कसं जमणार ? मी हजारो धक्के, टोमणे खात लहानाची मोठी झाले. म्हणून मला अपयश आणि अपमान पचवण्याची सवय होती. नेमकी तिथे ती कमी पडली.

मी : खरं आहे.

ती : मी आज एक सेलिब्रिटी ट्रेनर आहे. मला पर्सनल कोचिंग देण्याचे महिन्याला लाख रुपये भेटतात. माझ्या प्रत्येक क्षेत्रात ओळखी आहेत. याचा माझ्या आई-बापाला आता प्रचंड अभिमान वाटतो. कधीकधी तर पप्पाही एखाद्या कामासाठी मला फोन करतात. काका आणि दादा हेल्प मागतात.   

मी : क्या बात..

ती : कारण आज मी माझी वेगळी ओळख बनवली आहे.

मी : सच बात.

ती : अरे अक्षु , एका चुकीच्या निर्णयाने स्वतःचं आयुष्य संपवणं हा केवळ मूर्खपणा आहे. खरी मजा तर यशस्वी होऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्यात असते. 

मी : अगदी सहमत.

ती : म्हणून कितीही कठीण परिस्थिती असो, उभं रहायला शिकायचं. 

मी : हो ना.

ती : मात्र त्यासाठी निर्लज्ज बनावं लागेल. कारण खूपदा तुम्ही इतरांचा विचार करत बसता आणि इतर कुणाला तुमचं काही पडलेलं नसतं.

मी : True.

ती : आज लिही मस्त माझ्याबद्दल. ज्यांनी आयुष्यात पावलोपावली अपयश पाहिलं आहे, त्यांना नक्कीच स्वतःमध्ये दडलेल्या स्पार्कची जाणीव होईल. 

मी : सच बात.

ती : लोक काहीही म्हणो, कितीही निंदानालस्ती करो. त्यांना फाट्यावर मारायला शिकलं पाहिजे. हजारो अपमान सहन करा, अपयश पचवा, हवं तर निर्लज्ज बना. कारण वर्तमानात खंबीर राहून भविष्यात तुम्ही मिळवलेलं यश, तुमच्या विरोधकांच्या तोंडात मारलेली खरी सणसणीत चपराक ठरतं.

So become निर्लज्ज
*.....अक्षय भिंगारदिवे*

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...