*So become निर्लज्ज*
ती : काय करतोय ?
मी : निवांत , बोल ना.
ती : डॉ. शीतल आमटेंची बातमी वाचली ?
मी : हो.
ती : काय वाटतं ?
मी : दुर्दैवी आहे.
ती : त्यामुळे तुझ्या-माझ्यासारखं, माणसाने निर्लज्ज असावं.
मी : तू मला इनडायरेक्टली निर्लज्ज म्हणतेय.
ती : किती वर्षे झाली आपण एकमेकांना ओळखतो?
मी : चार.
ती : म्हणून तर म्हटले.
मी : म्हणजे?
ती : अरे, अनुभवांचे धक्के चपाटे खाल्लेली माणसं, आयुष्यात पुढे आपोआप निर्लज्ज होतात.
मी : सहमत.
ती : म्हणून आपल्यासारखी माणसं आत्महत्या वैगरे करूच शकत नाहीत.
मी : खरं आहे.
ती : शिवाय हे मी अनुभवांती सांगत आहे.
मी : म्हणजे?
ती : मी लहानपणीपासून इतरांच्या तुलनेत अगदी डंब होते.
मी : समजलो नाही.
ती : आमचं घराणं म्हणजे हुशार लोकांचं खानदान. माझे आजोबा प्रख्यात डॉक्टर होते. वडील डॉक्टर आणि काका यशस्वी उद्योजक. माझ्या आत्या बोर्डात वैगरे आलेल्या. माझी आई प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ. माझा भाऊ कायम वर्गात पहिला. माझ्या वयाची माझी चुलतबहीण स्कॉलर. साला मीच त्या सर्वांमध्ये मंद होते.
मी : असं का वाटतं तुला?
ती : अरे बारावीला ४ वेळा नापास झालेली पोरगी हुशार कशी असू शकेल ?
मी : यश-अपयश चालूच असतं.
ती : ते कॉमन लोकांसाठी. मी मात्र एक्स्ट्राऑर्डीनरी कुटुंबात जन्माला आलेली.
मी : खरं आहे.
ती : समवयस्क असल्याने मला कायम माझ्या चुलत बहिणीशी कम्पेअर केलं जायचं.
मी : सगळीकडे तेच होतं.
ती : ती चौथीला स्कॉलरशिपमध्ये आलेली आणि मी काठावर पास झालेली.
मी : अरे..
ती : दरवेळी काकांसमोर पप्पांचा इगो हर्ट व्हायचा. म्हणून मग मला मारून, झोडून त्यांच्या मनाला दिलासा भेटायचा.
मी : शीट.
ती : खरं सांगायचं तर, दहावीपर्यंत मी घरच्यांचा कुत्र्यासारखा मार खाल्ला. म्हणजे मम्मी ,पप्पा मला लिट्रली बेल्टने मारायचे.
मी : कारण काय ?
ती : माझा मंदपणा.
मी : अरे.
ती : पण त्याच दिवसांनी मला निर्लज्ज बनवलं. आयुष्यात तर एक क्षण असा आला, की ते मला मारायचे आणि मी दात काढायचे कारण मला त्यांच्या मारण्याने काही होतच नव्हतं.
मी : च्यामारी.
ती : एवढ्या कमी वयात एवढा लागोपाठ अपमान सहन केल्याने, मला जिंकण्याची खरी किंमत कळाली होती.
मी : सच बात. जो आयुष्यात पावलोपावली हरलेला असतो, त्यालाच जिंकण्याची खरी किंमत माहीत असते.
ती : तेव्हा मी कशी बशी बारावी पास झाले आणि कॉलेजला ऍडमिशन घेतली.
मी : पुढे ?
ती : माझ्या अफाट पराक्रमांमुळे मला कधीच घरून पॉकेटमनी मिळत नसायचा म्हणून मग झोल करून पैसे कसे कमवायचे हे आधीच समजलं होतं. त्यात माझ्या फ्रॅंक स्वभावामुळे फ्रेंड सर्कल तुफान असल्याने , कॉलेज सुरु असताना एका मैत्रिणीने तिच्या जिममध्ये जॉब करायची मला ऑफर दिली.
मी : ग्रेट.
ती : घरच्यांचा माझ्या त्या जॉबला विरोध होता, म्हणून मग वयाच्या १९ व्या वर्षी मी घर सोडलं आणि थेट दुनियादारीशी संबंध आला.
मी : मग?
ती : तुला म्हटलं ना, निर्लज्ज लोक कधी आत्महत्या करत नाहीत. कारण त्यांनी स्वतःमध्ये डॅमेज कंट्रोल मेकॅनिझम डेव्हलप केलेलं असतं.
मी : सेल्फ हीलिंग.
ती : येस.
मी : पुढे ?
ती : माझ्याजागी दुसरी कुठलीही पोरगी असती, तर तिने स्वतःचं आयुष्य संपवून घेतलं असतं.
मी : का बरं ?
ती : कारण त्या काळात आपण इमोशनली उध्वस्त झालेलो असतो.
मी : खरं आहे.
ती : त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी कुणी मदतीला येणार नाही, हे मी ओळखलं आणि स्वतःला सावरत कशीबशी उभी राहिले.
मी : ग्रेट , मग ?
ती : त्यातच एक दिवस माझी स्कॉलर चुलतबहीण डिप्रेशनमध्ये असल्याचं मला समजलं.
मी : काय कारण ?
ती : यशस्वी माणसाला अनपेक्षित अपयश पचवता येत नाही. ती अभ्यासात हुशार होती, मात्र दुनियादारीच्या शाळेत मठ्ठ ठरली.
मी : म्हणजे?
ती : काय झालं हे मलाही नाही समजलं. मात्र डिप्रेशनमुळे ती एका सायकॉलिजिस्टकडे ट्रीटमेंट घेत असल्याचं काकांनी मला सांगितलं होतं.
मी : सेल्फ हीलिंग नाही जमलं.
ती : कसं जमणार ? मी हजारो धक्के, टोमणे खात लहानाची मोठी झाले. म्हणून मला अपयश आणि अपमान पचवण्याची सवय होती. नेमकी तिथे ती कमी पडली.
मी : खरं आहे.
ती : मी आज एक सेलिब्रिटी ट्रेनर आहे. मला पर्सनल कोचिंग देण्याचे महिन्याला लाख रुपये भेटतात. माझ्या प्रत्येक क्षेत्रात ओळखी आहेत. याचा माझ्या आई-बापाला आता प्रचंड अभिमान वाटतो. कधीकधी तर पप्पाही एखाद्या कामासाठी मला फोन करतात. काका आणि दादा हेल्प मागतात.
मी : क्या बात..
ती : कारण आज मी माझी वेगळी ओळख बनवली आहे.
मी : सच बात.
ती : अरे अक्षु , एका चुकीच्या निर्णयाने स्वतःचं आयुष्य संपवणं हा केवळ मूर्खपणा आहे. खरी मजा तर यशस्वी होऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्यात असते.
मी : अगदी सहमत.
ती : म्हणून कितीही कठीण परिस्थिती असो, उभं रहायला शिकायचं.
मी : हो ना.
ती : मात्र त्यासाठी निर्लज्ज बनावं लागेल. कारण खूपदा तुम्ही इतरांचा विचार करत बसता आणि इतर कुणाला तुमचं काही पडलेलं नसतं.
मी : True.
ती : आज लिही मस्त माझ्याबद्दल. ज्यांनी आयुष्यात पावलोपावली अपयश पाहिलं आहे, त्यांना नक्कीच स्वतःमध्ये दडलेल्या स्पार्कची जाणीव होईल.
मी : सच बात.
ती : लोक काहीही म्हणो, कितीही निंदानालस्ती करो. त्यांना फाट्यावर मारायला शिकलं पाहिजे. हजारो अपमान सहन करा, अपयश पचवा, हवं तर निर्लज्ज बना. कारण वर्तमानात खंबीर राहून भविष्यात तुम्ही मिळवलेलं यश, तुमच्या विरोधकांच्या तोंडात मारलेली खरी सणसणीत चपराक ठरतं.
So become निर्लज्ज
*.....अक्षय भिंगारदिवे*
No comments:
Post a Comment