Saturday, May 31, 2014

महार रेजिमेंट

महार रेजिमेंट हे भारतीय
सेनेतील एक् सैन्यदल असून हे सर्वात
जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे.
याची स्थापना इ.स. मध्ये झाली.
सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.स च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा
देण्यात आला.

इतिहास :
              भारतीय सैन्याच्या महार रेजिमेंट या भूदलाने अनेक प्रकारचा पराक्रम गाजवला आहे. भारतीय सैन्याची यशोगाथा फडकत ठेवण्यात या दलाचा सिंहाचा वाटा आहे.
          प्राचीन हिंदू राजांच्या सैन्यात प्रसंगोपात्त क्षात्रकर्माला वंचित केलेल्यांना सैन्यात प्रवेश दिला जात असावा, असे
राजनीतिप्रबंधा वरून दिसते.
मात्र कोट- किल्ल्यांच्या घडणकार्यांत
महारांनी बलिदान केल्याचे प्रचलित आहेत. उदा., सायनाक कुटुंब. तसेच कोट-किल्ल्यांच्या तटबंदीबाहेरील चौक्या सांभाळण्याचे कामही त्यांनी उत्तम प्रकारे
पार पाडले आहे. या दृष्टीने सायनाक, भागनाक, रामनाक इ. नावे प्रसिद्ध आहेत.
           छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महारांना भरती केले जात असे.
महार किंवा त्यांच्यासारख्या जातिवर्णहीनांना मोठ्या प्रमाणावर सैन्यात भरती करण्याची परंपरा
यूरोपीयांनी सुरू केली.
         कोरेगाव (जिल्हा पुणे, तहसील
शिरुर) येथील दुसरा बाजीराव पेशवा व
ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील लढाईत (१ जानेवारी १८१८) महार सैनिकांनी लक्षणीय मर्दुमकी गाजविली. इंग्रजांनी तेथे उभ्या केलेल्या विजयस्मारक स्तंभावरील लेखात त्या महार सैनिकांची नावे दिली आहेत.
          पुढे काठेवाड (१८२६), मुलतान
(१८४६) व दुसऱ्या आंग्ल−अफगाण युद्धात (१८८०) कंदहार येथील लढायांत आणि वेढ्यांत महार जवानांनी तलवार
गाजविली. मुंबईच्या वॉडबी मार्गावरील शिलालेखात तसे नमूद केले आहे. मेजर
वॉडबी हा महार सैनिकांचा अधिकारी
होता.
         १८५८ नंतर मुंबई सेनेत १८९२ सालापर्यंत १० ते ११ टक्के सैनिक मांग, रामोशी व ५ ते ६ टक्के इतर जातींचे भरती केले जात. ‘महाबळेश्वर समिती’ (१८९३) च्या शिफारसीप्रमाणे वरील टक्केवारीत भरीव बदल करण्यात आले. १९१७साली महार जवानांच्याच दोन कंपन्या तैनात करण्यास ब्रिटिश सरकारने हुकूम काढला.
       जुलै १९१७ मध्ये महारांची १११ वी पलटण खडी झाली; परंतु १९२२ साली ही पलटण विघटित करण्यात आली. त्यानंतर १९२२ ते दुसरे जागतिक महायुद्ध सुरू होईपर्यंत महारांची लढाऊ
सैनिकांची भरती होण्याचे थांबले; पण महार जातीच्या पुढाऱ्यांनी नेट धरल्याने
प्रारंभी रुग्णसेवा पथकात त्यांची भरती सुरू झाली.
            सप्टेंबर १९४१ मध्ये भारत सरकारने बेळगाव (कर्नाटक) येथील मराठा रेजिमेंटच्या केंद्रात पहिली (ऑक्टोबर १९४१) व दुसरी (जून १९४२) अशा दोन महार पायदळ लढाऊ
पलटणी खड्या केल्या. मराठा पलटणीतील अधिकारीवर्गच या नूतन
महार पलटणीकडे देण्यात आला होता.           युद्धाचा व्याप वाढल्याने तसेच महार जवानांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्यानेही त्यांच्या आणखी पलटणी उभ्या झाल्या.
          या पलटणींनी हिंदुस्थानचे सीमासंरक्षण केले. तसेच जपानी सैन्याविरुद्ध इंफाळ, आराकन( म्यानमार) येथील लढायांत उत्तम कामगिरी बजावली. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी
वरील पायदळी पलटणींचे मध्यम पलटणीत रूपांतर करण्याचा निर्णय तत्कालीन सरसेनापती जनरल क्लॉड ऑकिन्लेक यांनी घेतला. तद्नुसार मद्रास
रेजिमेंटच्या साहाय्याने १९४७ पर्यंत तीन
पलटणींच्या मशीनगन पलटणीत रुपांतराचे काम पूर्ण झाले.
       १९४७ साली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
भारताच्या सीमासंरक्षणासाठी ‘पूर्व पंजाब सीमादल’ नावाच्या तीन पलटणी उभ्या करण्यात आल्या. त्यांमध्ये शीख , जाट व
डोग्रा यांच्या एकोणीस जातींच्या जवानांची भरती झाली.
             मे १९५६ मध्ये जनरल शंकरराव थोरात यांच्या सूचनेप्रमाणे महार रेजिमेंटला महार मशीनगन रेजिमेंट (सीमा) असे नाव देण्यात आले. डिसेंबर १९५९ ते ३० एप्रिल १९७० या कालात
रेजिमेंटमध्ये नऊ पलटणींची (७ ते
१५ क्रमांकाच्या) भर पडली. जानेवारी १९६१ मध्ये छत्रीधारी मशीनगन
कंपनी उभी झाली. सप्टेंबर १९६३ मध्ये मशीनगन पलटणी रद्दबातल करण्यात
आल्याने महार (मशीनगन) रेजिमेंटचे पायदळ रेजिमेंटमध्ये रूपांतर झाले.
महार रेजिमेंट-केंद्र
       या रेजिमेंटमध्ये भरती झालेल्या जवानांना सैनिक शिक्षण देण्यासाठी व
रेजिमेंटच्या व्यवस्थापनासाठी [भरती,
पगारहिशेब, वैयक्तिक सैनिकदप्तर (पर्सोनेल रेकार्ड)] प्रथम १९४२ मध्ये कामठी नागपूर , १९४६ अरणगाव अहमदनगर आणि १९४६ अखेर सागर मध्य प्रदेश येथे रेजिमेंट-केंद्रे स्थापण्यात आली. सागर येथे पलटणींच्या अधिकाऱ्यांच्या वार्षिक सभा भरतात.
त्यांमध्ये सैनिक-कार्यक्रम, शिक्षणपद्धती, गणवेष, सैनिकी कल्याण इत्यादींवर चर्चा होते व त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे
शिफारसी केल्या जातात.
            १९४७ साली तत्कालीन मुंबई
प्रांत सरकारने या केंद्राल २५,००० रूपयांचे अनुदान दिले होते.
महार रेजिमेंटचे लढाऊ कार्य
    पहिल्या महायुद्धात महार दलांना लढाऊ कार्याची संधी मिळाली नाही; परंतु दुसऱ्या महायुद्धात मात्र पठाणी टोळ्यांच्या व इतरांच्या आक्रमणापासून हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीचे संरक्षणकार्य यांनी पार पाडले; तसेच
इराकमध्ये अरब लुटारुंचा बीमोड केला, तर हिंदुस्थानच्या फाळणीपूर्वी सव्वालक्ष मुसलमानांना होऊ घातलेल्या पाकिस्तानकडे सुखरूप पोहोचविण्याचे कार्य त्यांनीच केले.
       क्वेट्टा शहरामध्ये मुसलमान दंगलखोरांना वठणीवर आणले व बलुचिस्तानातील हिंदु, शीख आणि इतर
मुसलमानेतरांना भारतात यांनीच आणून सोडले. हे काम त्यांनी मानवता व निःपक्षपातीपणाने केल्याबद्दल उच्च सैनिक अधिकाऱ्यांनी व पुढाऱ्यांनी महार
रेजिमेंटची प्रशंसा केली होती.
        भारत स्वतंत्र झाल्यानंतर१९४७-४८ काळात पाकिस्तानने भारताविरुदध केलेल्या युद्धात जांगारे येथील भीषण लढाईत (२४ डिसेंबर १९४७) शेकडो पाकिस्तानी सैनिकांना व पठाणी घुसखोरांना कंठस्नान घालताना एक महार लढाऊ तुकडी गारद झाली. या तुकडीचे नेते हवालदार रावू कांबळे व नाईक बारकू कांबळे होते. नौशहर, उरी,vचकोथी, टिटवाल, दरास, कार्गिल येथील लढायांत
महार पलटणींनी लक्षणीय वीरकार्य केले; तर १९५३ मध्ये कोरिया युद्धसमाप्तीनंतर
युद्धबंद्यांच्या अदलाबदलीचे अवघड व नाजूक कार्य पार पाडण्यात जनरल थोरातांना तिसऱ्या महार पलटणीचे साहाय्य मिळाले
होते.
        जून १९६० मध्ये बेल्जियन काँगो स्वतंत्र झाल्याबरोबरच तेथे यादवी युद्ध सुरू झाले. संयुक्त राष्ट्रसंघटनेने युद्ध थांबविण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघटना सेना’ निर्माण केली. त्या सेनेत महार रेजिमेंटची एक कंपनी होती. काँगोच्या कटांगा प्रांतातील लढाईमध्ये निर्भयतेने व निःपक्षपातीपणे काम केल्याबद्दल
कंपनीच्या एका अधिकाऱ्याला वीरचक्र हे
सैनिकी पदक देण्यात आले.
        गोवा मुक्तिसंग्रामामध्ये (१९६१) याच छत्रीधारी कंपनीने भाग घेतला होता; तर १९६२ साली चिनी आक्रमणाला ( ऑक्टोबर-नोव्हेंबर) तोंड देण्यासाठी महार पलटणींनीच चुशूल, दौलतबेगोल्डी (लडाख व अक्साई चीन) आणि कार्मेग
विभाग (ईशान्य भारत) या ठिकाणी शौर्य
गाजविले होते. त्यासाठी हवालदार गोविंद कांबळे यांस ‘वीरचक्र’ मिळाले. १९६५
च्या चिनी आक्रमणाच्या वेळीही कच्छ रणातील सरदारचौकी व व्हिगोकोट येथील लढायांत महार जवानांनी तलवार
गाजविली. त्याप्रसंगी हवालदार भिंगारदिवे यास वीरचक्र मिळाले.
       सप्टेंबर १९६५ मध्येही काश्मीरातील संबा, जोरियान, खेमकरण, अस्सल उत्तर
इ. लढायांत महार पलटनींनी शौर्य प्रकट केले होते. खेमकरणच्या लढाईत महार पलटणींनी भयंकर नुकसान सोसले.
तसेच १९७१ सालच्या पाकिस्तानी
आक्रमणातही महार पलटणी बांगलादेश, पंजाब व काश्मीर येथील युद्धांत
होत्या; तर हरहरकलान, पर्वतअली, कैयान, शेजरा, ठाणपीर आणि बांगला देशात शमशेरनगर, मौलवी बाझार, सिल्हेट, बेलोनिया व चितगाग इ. ठिकाणच्या युद्धप्रसंगी त्यांच्या पराक्रमाची
वाहवा झाली होती.
       निरनिराळ्या युद्धांत असामान्य पराक्रम केल्याबद्दल नाईक कृष्णा सोनावणे, कर्नल गुरुबक्षसिंग, नाईक अनसूयाप्रसाद (मरणोत्तर) यांना महावीर चक्र, बावीस जवान व अधिकाऱ्यांना वीरचक्र आणि मेजर जनरल व्यंकट कृष्णराव यांस परमविशिष्ट सेवापदक असे सैनिकी सन्मान मिळाले आहेत.
           सैनिकी परंपरेप्रमाणे (१९४९ ते
१९६१) रेजिमेंटचे पहिले कर्नल लेफ्टनंट-जनरल शंकरराव थोरात होते; तर दुसरे कर्नल लेफ्टनंट जनरल कृष्णराव हे होते.
स्वतंत्र भारताच्या निर्मितीनंतर रेजिमेंटच्या बॅजमध्ये असलेला ‘कोरेगाव’ हा शब्द आणि ‘कोरेगाव विजयस्तंभ’ ही प्रतिमा प्रदर्शित करण्याचे बंद करण्यात येऊन
त्या जागी ‘यश-सिद्धी’ हा कार्यवाचक शब्द व ‘खंजीर’ हे शौर्यदर्शक प्रतीक
घालण्यात आले.
‘‘ऐसा देश कभी न देखा,
कभी न सुना है।
देशों का सरताज,
यह भारत देश हैं’’।।
हे धृपद असलेले गाणे रेजिमेंटचे
संचलन-गीत आहे.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष गिरी यांच्या हस्ते रेजिमेंटला ३ फेब्रुवारी १९७० रोजी ‘राष्ट्राध्यक्ष ध्वज’ प्रदान करण्यात आला. ह्याच दिवशी पंधरावी पलटण सोडून
इतर चौदा पलटणींना राष्ट्राध्यक्षांनी ‘पलटण पताका’ ही प्रदान केल्या. या शुभसमारंभानंतर पंधरावी पलटण खडी झाली होती; म्हणून तिला पताका देणे शक्य झाले नव्हते.
महार रेजिमेंट दलाला युद्धातील पराक्रमांबद्दल अनेक सन्मान व पदके प्रदान केली गेली आहेत.
संदर्भ
1. ↑ Commandant, Mahar
Regimental Centre : Regimental
History of the Mahar Regiment,
Sagar, 1972
2. ↑ आत्रे, त्रिंबक नारायण,
गांव-गाडा, मुंबई, १९५९.
3. ↑ http://
www.marathivishwakosh.in/
khandas/khand12/index.php?
option=com_content&view=
article&id=10525

आमच्या मनासारखं वागायचं.

नमस्कार मंडळी , सुट्यांचा आनंद घेताय  सगळेजण? गावी जायचं, उन्हात फिरायचं, शेतातपळायचं, कैऱ्या, चिंचा खायच्या,आजारी पडायचं; पण बालपणात रमायचं आणि पुन्हा एकदा लहानपण जगून घ्यायचं, यापेक्षा सुट्यांचा अर्थ तो काय वेगळा ना? 
     पण एक-दोन दिवस बऱ्या वाटतातहो या बिनकामाच्या पण आळशी सुट्या. पण नंतर नंतर कंटाळा यायला लागतो आणि रोजची पळापळच बरी वाटायला लागते मग. आणि हे फक्त आपल्याच बाबतीत होतं असं नाही, पण मुलांचंसुद्धा असंच होतं ना हो? बिच्चारे शाळेच्या वेळेत तरी आयांच्या तावडीतून सुटत असतात. तेवढाच अभ्यास, तेवढाच दंगा,।मित्रांच्या खोड्या, भांडणे, मारामाऱ्या यात कसा छान वेळ जात असतो शाळेत त्यांचा. 
        पण घरी आहे म्हटलं की हे करू नको, असं करू नको, इथे खेळू नको, तिकडे जाऊ नको, हे खाऊ नको, ते पिऊ नको... दुपारची वेळ आहे, झोपू द्या जरा... दंगा करू नका...।कधी एकदा शाळा सुरू होते, कुणास ठाऊक... बाप रे! कित्त्ती सूचना त्या?
         त्यांना सुद्धा वाटायला लागतं मग, शाळा होती तेच बरं होतं आपलं...! नुकताच जे.ई.ई.चा निकाल।लागला आणि त्यापाठोपाठ बातम्या आल्या पेपरमध्ये की,।परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने ....ची आत्महत्या...! ...अरे अजून बारावीचा निकाल बाकी आहे तरी...? एवढ्यात कसली घाई ही मरणाची?
        यामध्ये मार्क्स कमी पडले।म्हणजे आयुष्य संपलं का? सध्या टीव्हीवर पिझ्झाची एक जाहिरात दाखवली जातेय. त्यातील।त्या छोट्या मुलाच्या प्रश्नांना खरंच उत्तरे नाहीत आपल्याकडे... "नेहमी पहिले आल्यानंतरच बक्षीस मिळते का?' "दुपारच्या वेळी दंगा न करता आजोबांना शांत झोपू दिलं, तर का मिळू नये बक्षीस?'..."दररोज होमवर्क पूर्ण केला तरी का नाही देत कुणी बक्षीस?'..."बाबांचं।एखादं काम हलकं केलं तरी नाही बक्षीस?' ...आपल्याच आसपासचे रोजचे प्रश्न आहेत हे, असं वाचताना, ऐकताना आपल्याला काही नाही वाटत?... फक्त आपण।तेव्हा चुचकारतो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. 
       पण याच छोट्या छोट्या प्रश्नांतून आपल्याला कळून जातं की आपण किती परीक्षामय झालो आहोत. आपण जे काही करत असतो, जे काही वाचत असतो ते काय फक्त परीक्षेसाठीच? यात आपल्या आनंदासाठी काहीच नसतं?... अर्रे, किती लहानपणापासून आपण या मुलांच्या मानगुटीवर परीक्षेचं भूत बसवलेलं असतं. शाळेच्या प्रवेशापासून जी सुरुवात होते, ती थांबतच नाही. तिची भूक वाढतच जाते. आणि तहान विसरली जाते. केवळ अभ्यास, अभ्यास आणि अभ्यासच...!
           आता तर सुट्या लागल्यात, आता तरी गप्प बसावं ना आपण? ...पण नाही... पुढच्या वर्षीची तयारी करून घेऊच आपण. शिवाय उन्हाळी शिबिरं तर असतातच, चित्रकलेचे क्लासेस आले, अक्षर सुधारण्यासाठीचे क्लासेस आले, इंग्लिश ग्रामर
आलं, स्पर्धा परीक्षेची तयारी आली... सगळं कसं टाईट... आणि शाळेत अजून जात नसेल मूल, अजून बोलायला पण जमत नसेल कदाचित पण र षीे रश्रिश आणि ल षीे लरश्रश्र हे हजारवेळा घोकून घेऊच त्याच्याकडून... अहो काय चाललंय हे?
        आपल्या शाळेला दिवाळी सुटी आणि मे सुटी असते, हेच ही मुलं विसरून गेलीत हल्ली... खूप वाईट वाटतं हो हे पाहून. बघा ना, लहान असताना या सुट्यांमध्ये आपण किती हुंदडायचो गल्लीबोळातून? हातात कधी पाटी-पुस्तक घेतलेलं आठवतंय सुटीत? मग आपण कसं वागत असतो हो हे? बरं, ही शाळेत द्यावी लागणारी परीक्षा झाली. पण चक्र हे इथेच संपत नाही. त्यापुढेही आहेच की. नोकरीसाठी दहा ठिकाणी परीक्षा द्या. त्यातून कुठे सिलेक्ट झालोच तर पुन्हा प्रमोशनसाठी परीक्षा.
          एवढ्यात नोकरी लागते ना लागते तोच वधू-परीक्षा, वर-परीक्षा... वैताग येतो हो कधी कधी. त्यानंतर आणि लगेच मूल झालं तर बरं, नाहीतर...? नाहीतर आणखी पुढच्या परीक्षा...! तर मंडळी, याला जीवन ऐसे नाव. पण सगळं रांकेला लागल्यावर तरी संपाव्यात ना या परीक्षा आणि मिळावी सुटी? पण नाही! प्रत्येक पावलावर आपल्याला नवीन कसोट्यांना सामोरे जावं लागतं. मिळवेपर्यंतच्या परीक्षा वेगळ्या, नंतर त्या पचवण्यासाठीच्या वेगळ्या, मुलांच्या वेगळ्या,मुलींच्या वेगळ्या, पुरुषांच्या वेगळ्या, स्त्रियांच्या वेगळ्या आणि यापुढे जाऊन म्हातारपणातल्या, मरण येईपर्यंतच्या वेगळ्याच परीक्षा...!
        तुम्ही म्हणाल आयुष्य आहे, चालायचंच. पण किती आणि कुठंवर चालायचं ना? पाय इतके गळून जातात की पायात काटे टोचले तरी त्याची जाणीव होत नाही, मन इतकं बोथट होऊन जातं की त्याला संवेदनेचा अर्थच कळत नाही. प्रत्येक गोष्टीत नुसता विचार. सरळ विचारच करू शकत नाही आपण... समोर छान धबधबा कोसळत असतो आणि आपला वैज्ञानिक मेंदू विचार करू लागतो, किती पाणी वाया जातंय नाही?... आभाळ आलेलं असतं डोक्यावर, छान वातावरण असतं, काही सुचावं ना छान लिहायला? पण आपण विचार करू लागतो, कोणकोणत्या फळांवर या वातावरणाचा परिणाम होईल आता? किती नुकसान होईल?... मस्त पाऊस कोसळतोय. भिजावं ना? पण नाही. खिडक्या बंद करा, दारे लावून घ्या. मग घरच्यांना फोन करा, तुम्ही कुठे आहात? भिजला नाहीत ना? सर्दी होईल, ताप येईल... अर्रे, घ्या ना भिजण्याचा आनंद थोडा वेळ आणि इतरांनाही घेऊ द्या!
       खूप छोटं आहे हो जीवन. आता आहे तर आता नाही. फुलपाखराला तर अवघ्या काही तासांचं आयुष्य असतं. पण बघा कसं ते मनसोक्त जगून घेतं. आपणही आनंदी होतं आणि दुसऱ्यालाही आनंदी करतं. त्याच्यासारखं जगायला जमलं पाहिजे. परीक्षा, कसोट्या, संकटं तर येतच असतात, पास तर होणारच असतो त्यात. एखाद्या वेळी अपयश येईलही. पण म्हणून जीवन संपवणं हा पर्याय नाही त्यावर. आलेल्या अपयशापेक्षाही कित्येक सुंदर गोष्टी आपल्या अवती भोवती आहेत. त्यांचा का आपण विरस करायचा? त्यांचा आनंद घेऊन त्यांनाही आनंद द्यायचा. कुठल्याही गोष्टीकडे सतत तिरकस आणि शंकेने बघत राहिलात तर लोक आपल्यालाच कावीळ झालीय असं समजतील.     
         त्यापेक्षा जे समोर आहे त्याचा चांगलाच विचार करूया आणि या सुटीचा आनंद खऱ्या अर्थाने घेऊन जीवनाचे गीत गाऊया... हे जीवन सुंदर आहे!!! तेव्हा मंडळी आता या उरलेल्या सुटीत, अभ्यासाचं नाव नाही काढायचं, कोणत्याही क्लासमध्ये नाव नाही द्यायचं, मस्त आम्हाला कसं हिंड-फिरू द्यायचं, वाऱ्यावर बसूनआभाळाशी गप्पा मारू द्यायचं... आलाच पाऊस मधून तर भिजू आम्हा द्यायचं, पडल्याच गारा तरी खाऊ आम्हा द्यायचं..दमून जातो हो आम्ही वर्षभर, आम्हाला आता पुस्तक नाही उघडायचं, घडीभर आम्हालाही आहे, आमच्या मनासारखं वागायचं...!
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा. 
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु. 
Thanks !


माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...