आजपर्यंत आपल्या इतिहासात शिवरायांचे वर्णन केवळ मुस्लिमांचे विरोधक म्हणूनच केले
आहे.आजही शिवरायांचे स्मरण करताच समोर शिवराय घोड्यावर बसले आहेत आणि हातात तलवार आहे अशा पद्धतीचं चित्र समोर
येतं.
शिवराय म्हणजे मुस्लिमांचे कर्दनकाळच
अशी प्रतिमा जनमाणसात रुजवली गेलेली आहे.’शिवराय म्हणजे मुसलमानांच्या विरुद्ध
होते’,’त्यांचे जीवीतकार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते’, ’शिवराय हिंदू धर्मरक्षक होते’,’शिवराय हिंदूपातशहा होते’,
’गोब्राह्मण प्रतिपालक होते’, अशी प्रतिमा बर्याच विस्त्रुत प्रमाणात जनमानसात आहेत.’शिवाजी न होते तो सुंता होती सबकी’, हे भुषण कवीने कवन हा द्रुष्टीकोन व्यक्त
करते.
शिवरायांचे युद्ध हे धर्मयुद्ध होते,धर्म ही शिवरायांच्या कार्याची प्रेरणा होती, शिवराय धर्मासाठी लढले,ते धर्मासाठी लढले म्हणून यशस्वी झाले,खरे म्हणजे ते परमेश्वरांचाच अवतार होते,भवानी देवीने शिवरायांना तलवार
दिली असे अनेक (गैर)समज जनमानसात खुपच विस्त्रुत प्रमाणात आहेत.
ऐतिहासिक सत्याच्या आधारावर ही सर्व प्रमये नीट तपासून घ्यायला हवीत.ही सर्वच्या सर्व प्रमये इतिहासाच्या कसोटीवर खरी उतरत नाहीत.आपण हिंदू आहोत किंवा ही सर्व (खोटी) प्रमये आपल्याला सोईस्कर आहेत म्हणून ती तशीच आंधळ्या श्रद्धेने स्वीकारणे योग्य होणार नाही.
हिंदुत्ववाद्यांचे असे एक कायमचे वक्तव्य असते की "हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा."पण हे हिंदवी स्वराज्य होते की मराठा स्वराज्य होते हे जाणुन घेण्याचे परिश्रम कोण करत नाहीत. खरच हे हिंदवी स्वराज्य किंवा हिंदू राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असे मानावे तर मग सर्व श्रींना राणाप्रतापच्या आणि प्रुथ्वीराज चौहानच्या प्रदेशातही " हिंदू राष्ट्र व्हावे" असे का वाटले नाही ? त्यामुळे धर्मरक्षणामुळे किंवा धर्मकार्यामुळे नव्हे तर
धर्मकार्याखेरीज चांगली कार्य केल्यामुळेच शिवराय एवढे यशस्वी झाले. याचा अर्थ शिवराय निधर्मी होते किंवा त्यांचे राज्य
निधर्मी राज्य होते असे मुळीच नाही.शिवराय श्रद्धाळू होते.देव- देवतांना,साधूसंतांना पुजत होते.
धर्मासाठी व देवळासाठी दान देत होते.पण याचा अर्थ शिवराय मुस्लिम धर्माच्या विरुद्ध होते काय ? शिवराय मुस्लिम धर्माचा द्वेष करत होते काय ? मुस्लिमांचे हिंदूकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता काय इतिहासाशी प्रामाणिक राहून निर्लपबुद्धीने खरे
बोलायचे तर या सार्या प्रश्नांची उत्तरे "नाही" अशीच आहेत.
शिवरायांनी सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीची तपशीलवार वर्णनं उपलब्ध आहेत.जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशाच इतरही लुटीची वर्णनं आहेत.पण एक तरी मशीद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद आहेत का ? निदान मुळात मंदीर असलेली पण मुस्लिमांनी मशिदीत रुपांतर केले अशी तरी मशीद पाडून तिथे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय ? मुळीच नाही.याउलट मशीदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी मात्र
आहेत.
सभासदाच्या बखरीतील हा उतारा पहा." मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती.त्यास दिवाबत्ती, नैवेद्य,अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले.मुस्लिमांचे पीर,मशिदी त्यांचे दिवाबत्ती,नैवेद्य,स्थान पाहून चालविले."जी गोष्ट मशिदींची तीच मुस्लिम साधुसंतांची.शिवराय आणि त्या काळातील इतर हिंदू दर्ग्यांना देणग्या देत.मुस्लिम साधू,पीर,फ़कीर यांना मान देत.शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानत होते त्यामध्ये याकुतबाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवरायांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे.
खाफ़ीखान या मुस्लिम इतिहासकारानं नोंदवून ठेवलेला हा उतारा खुपच बोलका आहे. "शिवाजीने सैनिकांकरीता असा सक्त
नियम केला होता की, सैनिक ज्या ज्या ठिकाणी लुट करण्यास जातील;तिथे तिथे त्यांनी मशिदीस,कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोषीस अगर त्रास देता कामा नये.जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पुज्यभाव दाखवून तो आपले
मुसलमान नोकराच्या स्वाधीन करीत असे.केंव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास।कोणी।जवळ नसल्यास त्यांचेनातलग त्यांची करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वत: तिची काळजी करीत होते."
२ नोव्हेंबर १६६९ च्या एका पत्रात रघुनाथ पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखली आहे ती तर त्याहून स्पष्ट आहे, ते लिहितात; "श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा.यात कोणी बखेडा करू नये असे फ़र्मावले आहे " शिवरायांनी राज्य स्थापन केले ते केवळ हिंदू धर्मिय लोकांसाठी नव्हते.सर्व धर्म आणि सर्व जातीतील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे स्वनिर्मित असे लोककल्याणकारी राज्य त्यांनी स्थापन
केले.त्या काळात लढाया झाल्या त्या राज्यविस्ताराकरिता झाल्या,धर्म वाढविण्यासाठी नव्हत्या किंवा धर्माच्या
रक्षणासाठी नव्हत्या. त्यामुळे मुस्लिम धर्माविरुद्ध स्वत:ची मते लोकमान्य करण्यासाठी जे कुणी शिवरायांचा वापर करत असतील तर त्यांना ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिमद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वत:च्या नावाने खपवापा.तसेच मुस्लिम धर्मियांनी या तथाकथीत शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवरायांना ओळखू नये. शिवरायांचा इतिहास पहावा आणि शिवरायांचा मुस्लिम
धर्मसंबंधीचा द्रुष्टीकोन समजावून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे.
शिवरायांनी स्वत:च्या राज्यातील प्रजेत कधीही धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक आणि मुस्लिमांना दुसरी वागणूक असे केले नाही.मुस्लिमांना ते
वेगळ्या धर्माचे म्हणुन पक्षपातीपणाने वागवले नाही.ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुस्लिमांनीसुद्धा लक्षात घ्यावी.
संदर्भ :
बखर (प्रुष्ठ क्र.३३) - [सभासद क्रु.अ.]. छत्रपती शिवाजी (प्रुष्ठक्र.३९)-
[सेतु माधव पगडी].
छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे (प्रुष्ठ क्र.१९९-२००) - [प्र.न.देशपांडे].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव (प्रुष्ठ क्र.४०) -[श्यामसुंदर मिरजकर].
==============================================
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !
No comments:
Post a Comment