आपण सर्व बाबासाहेबाना बोधिसत्व
असे संबोधतो. परवाच्या रविवारी
विहारात चक्क एका स्त्रीने हा प्रश्न
विचारला की बोधिसत्व म्हणजे
काय? ते कसे प्राप्त होते? . मग
तिथल्या धम्मचा-यानी बोधीसत्वा
बद्दल सविस्तर माहिती सांगितली.
हाच प्रश्न इतराना पडत असल्यास
त्याचे उत्तर म्हणून बोधिसत्वाचा अर्थ
व प्राप्त होण्याचे टप्पे ईथे देत आहे.
बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या
व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे
अत्यावश्यक आहे. दहा पारिमितांचे
पालन करताना बोधिसत्वाकडे
स्थित्यांतर सुरु होते.
१० पारमिता
१) शील:- शील म्हणजे नितिमत्ता,
पापभिरुता, वाईट गोष्टी न करणे,
अपराध करण्याची लाज वाटणे.
२) दान:- म्हणजे निस्वार्थ, परोपकार
अर्थात तन, मन धनानी दुस-याची
भलाई करणे.
३) उपेक्षा:- म्हणजे अलिप्तता,
अनासक्ति, आवड-नावड नसणे,
फलप्राप्तिने विचलीत न होणे,
निरपेक्षतेने सतत प्रयत्नशील राहणे.
४) नैष्क्रम्य:- म्हणजे ऐहिक सुखाचा
त्याग करणे.
५) वीर्य:- योग्य प्रयत्न करणे, हाती
घेतलेले काम माघार न घेता पूर्ण
सामर्थ्याने पूर्ण करणे.
६) शांती:- म्हणजे क्षमाशीलतात,
द्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने
द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.
७) सत्य:- कधीही खोटे न बोलणे,
कोणाचीही चुगली न करणे,
कोणाचीही निंदा नालस्ती न करणे.
८) अधिष्ठान:- ध्येय गाठण्याचा द्रृढ
निश्चय म्हणजे अधिष्ठान.
९) करुणा:- समस्त प्राणिमात्रा
विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे
करुणा होय.
१०) मैत्री:- प्राणिमात्र, मित्र, शत्रू ते
सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे
म्हणजे मैत्री होय.
वरील दहा पारिमितांचा सराव करता
करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते.
ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा
टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था.
एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की
मग जी अवस्था प्राप्त होते तीला
बुद्धत्व म्हणतात. तर दहा
पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व
प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते
पाहू या.
पायरी: १) मुदिता:- आनंदर प्राप्त
करुन घेतो, सर्व पाणिमात्रांच्या
कल्याणाची तळमळ लागते.
पायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व
विचार काढून टाकणे आणि दयाशील
बनने.
पायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व
अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज
होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते,
तो कशाचाही त्याग करण्यास तयार
होतो.
पायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे
तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग
मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान
व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या
बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.
पायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष
व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.
पायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध
असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा
बाळगणे.
पायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप
होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त
होऊन परोपकार, सहनशीलता व
व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती,
शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण
अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.
पायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले
आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी
जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.
पायरी: ९) साधुमती:- ही स्थीती
अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत
उपासकास धर्म, शास्त्र, दिशा जगाचे
संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
पायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत
बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि
प्राप्त होते.
अशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन
करता करता साधक बोधिसत्वाच्या
एक एक पाय-या चढायला सुरुवात
करतो. एक एक टप्पा पार करायला
कित्येक वर्षे जावी लागतात. दहा
पारिमिताचा पाया जेवढा भक्कत
तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या
ओलांडण्याची गती जास्त.
बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर दहा
पारिमितांचे पालन करत करत
बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष
जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात
झाल्यावाचून राहिले नसते.
Wednesday, April 29, 2015
बोधिसत्व कसे प्राप्त होत
22 प्रतिज्ञा
बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला. हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच.
पण धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा होता. दलिताना हजारो वर्ष गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही
होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून होते, त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त
करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या लोकांकडून वदवून घेतल्या.
बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल प्रमाणे आहेत
१) मी ब्रह्मा , विष्णु , महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदूधर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी
मानतो.
१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११) मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२) तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
१३ ) मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४) मी चोरी करणार नाही.
१५) मी व्याभिचार करणार नाही.
१६) मी खोटे बोलणार नाही.
१७) मी दारू पिणार नाही.
१८) ज्ञान (प्रज्ञा) , शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्या व
मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
२०) तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
२२) इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी
प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
Thursday, February 26, 2015
'विचारा'वर हल्ला
दाभोलकरांना गोळ्या घालून
संपवलेच गेले होते, गोविंद
पानसर्यांचा ‘अपराध’ तर आणखीच
मोठा!
त्यांनीअंधश्रद्धापसरवणार्याबुवाबाबांचीउपरणीनुसतीखेचलीच
नाहीत, तर
त्याश्रद्धांच्यामूळस्थानीअसणार्या धर्मश्रद्धांनाच
आव्हान दिले. हे
त्यांच्या विरोधकांना कसे चालणार
होते?
पानसर्यांचा अपराध हा की ते
या परंपरेने बदनाम
ठरविलेल्या विज्ञाननिष्ठेच्यापरंपरेशीएकनिष्ठ
राहिले.
-----------------
मार्क्स म्हणाला होता,
‘सगळ्या चिकित्सांचा आरंभ
धर्मचिकित्सेपाशी होतो.’
- मात्र धर्माचा एकमेव आधार
श्रद्धा हा असल्याने
आणिश्रद्धेलाचिकित्सामानवणारीनसल्याने
अशा चिकित्सा सहसा होत नाहीत
आणिझाल्यातरीत्यात्यांच्याशेवटापर्यंत
पोहचत नाहीत.
प्रस्थापित श्रद्धांना प्रश्न विचारणे
वा त्यांच्याविषयी शंका घेणे हेच
या क्षेत्रात मुळात पाप मानले जाते.
‘संशयात्मा प्रणश्यति’
हा त्या प्रकाराचा शेवट असतो.
हा विनाश आपोआपही घडत नाही,
तो घडविला जातो.
श्रद्धेला प्रश्न
विचारण्याचा पहिला मान
गांधींनीज्याला‘जगातलापहिलासत्याग्रही’
मानले त्या सॉक्रेटिसकडे जातो.
तो सगळ्या श्रद्धांविषयी संशय
घ्यायचा. तो बोलून
दाखवायचाआणित्याच्यासोबतच्यातरुणांच्यातोते
गळीही उतरवायचा..
परिणामीअथेन्सच्यालोकन्यायालयाने
त्याला विषप्राशन करण्याची म्हणजे
मृत्युदंडाची शिक्षा दिली.
सॉक्रेटिसचा परात्पर शिष्य
आणि जगातील बहुसंख्य
शास्त्रांचीपायाभरणीकरणाराअँरिस्टॉटल
यालालोकांनीतशीशिक्षादिलीनाही.
मात्र त्याच्या भोवतालचे
वातावरणच असे बनविले
की विषप्राशन करून
त्यालाही आपला देह
ठेवावासा वाटावा.
- श्रद्धा हे असे सार्मथ्यशाली प्रकरण
आहे. त्याला आव्हान देण्यात अनेक
पिढय़ांचे आयुष्य खर्ची पडले आहे.
हजारो वर्षे सार्या जगात
सतीप्रथा होती. भारतात तिच्यावर
कायद्याने
बंदी आल्यानंतरही ती बरीच वर्षे चालू
राहिली. वपन संपायला किती काळ
लागला? नाभिक समाजातील
बहाद्दर तरुणांनी नकार दिला तेव्हाच
या क्रूर प्रथेची समाप्ती झाली.
सगळ्यासुधारकांच्यावाट्यालातरीकसले
जिणे आले? ल्यूथरला जिवंत जाळले,
आपल्याआगरकरांनात्यांच्याजिवंतपणीच
त्यांची प्रेतयात्रा पाहावी लागली.
सावित्रीबाईंपासून
आंबेडकरांपर्यंतच्यासार्यांच्यावाट्यालाकसले
जिणे आले?
‘स्वतंत्र विचार
करणारी स्त्री चेटकीण आहे
आणि प्रत्येक चेटकीण
ही देहदंडाला पात्र आहे’ असे
चौथ्या शतकात पोपने सांगितले..
त्यापायी नंतरच्या काळात
किती लाख स्त्रिया जिवंत
जाळल्या गेल्या? गावकुसाबाहेरचे
जिणे आपल्या समाजातील
किती जणांच्या वाट्याला परवापर्यंत
येत राहिले?
..तात्पर्य, श्रद्धा ही साधी गोष्ट
नाही. ती धार्मिक
असो वा सामाजिक, सांस्कृतिक
असो वा राजकीय, ती जेवढी दयाळू
तेवढीच प्रसंगी क्रूर होत असते. माणसे
धर्मांध असतात
तशी विचारांधही असतात.
शंका वा संशय त्यांनाही चालत
नाही. हिटलरने दोन, स्टॅलिनने पाच
आणि माओने सात कोटी ‘संशयात्मे’
गेल्याच शतकात ठार मारले.
श्रद्धा आणि विचार यांच्यातले
भांडण सनातन आहे.
त्यांच्यातली तडजोड हाच तर
समाजाचा प्रवास असतो.
अब्राहम लिंकन ठार होतो,
गांधीजींनागोळ्याघातल्याजातात,
मार्टिन ल्युथर किंगची हत्त्या होते
आणि
केनेडींचीही शिकार केली जाते..
यामाणसांच्यामृत्यूच्याबातम्याहोतात.
समाज त्यामुळे काही काळ हळहळतो.
मात्र काळ लोटला की सारे शांत
होते. मारणारे सापडत नाहीत
आणि कालांतराने समाजही सारे
विसरतो.
तालिबान, अल् कायदा, इसिस
किंवा बोकोहराम
यांनीकेलेल्याहत्त्याकांडांच्याबातम्याताज्याम्हणून
मोठय़ा वाटतात.
अशी किती हत्त्याकांडे
सगळ्या धर्म-
पंथांनीपचविलीयाचाछडाकधीतरीलावावाच
लागेल. सध्या दिल्लीतील
शिखांच्याहत्त्याकांडाचीचर्चाजोरात
आहे आणि गुजरातेतील
मुसलमानांच्याहत्त्याकांडाचीकथाविस्मरणात
गेली आहे. ही हत्त्याकांडे
संपणारी नाहीत.
त्यांच्या बातम्या दर दिवसाआड
आपल्यापर्यंत येतच आहेत.
दरक्षणीकोणानाकोणालात्याविषयीच्याधमक्याअजून
दिल्या जात आहेत.
‘नरेंद्र दाभोलकरांचे आणि एन. डी.
पाटलांचे हातपाय तोडा’ असे
आपल्या प्रवचनातून सांगणारा एक
बाबा आपल्या महाराष्ट्रातच
शेकडो लोकांच्या श्रद्धेचा व
दर्शनाचा विषय आहे की नाही?
आसाराम
नावाचा बलात्कारी माणूस तुरुंगात
असतानाही त्याच्या शिष्यांचे तांडे
त्याला भेटायला तेथे जातात
की नाही? आणि समाजजीवनात
काडीचा बदल घडवून आणू न
शकणारी श्री श्रींसारखी माणसे
त्यात सन्मानाचेच नव्हे, तर समृद्धीचे
जिणे जगतातच की नाही?
नरेंद्र दाभोलकरांची हत्त्या होऊन
किती दिवस झाले?
त्यांना मारण्याच्या धमक्या येणे सुरू
झाले त्याला किती दिवस लोटले?
‘दाभोलकरांचे मारेकरी पकडू’
म्हणणारे राज्याचे
गृहमंत्रीही आता इतिहासजमा झाले
आहेत. दाभोलकरांचे मारेकरी मात्र
अजूनही मजेत आणि मोकळेच आहेत
की नाही?
दाभोलकरांच्याकुटुंबीयांनामारण्याच्याधमक्यानियमितपणे
मिळतातच की नाही?
- गोविंदराव पानसर्यांचा ‘अपराध’
तर आणखीच मोठा!
त्यांनीअंधश्रद्धापसरवणार्याबुवाबाबांचीउपरणीनुसतीखेचलीच
नाहीत, तर
त्याश्रद्धांच्यामूळस्थानीअसणार्याधर्मश्रद्धांनाच
आव्हान दिले. विज्ञाननिष्ठेची शपथ
घेतलेल्या या माणसाने ‘प्रबोधन’
नावाचे लोकजागरण करणारे
नियतकालिक काढले आणि त्यातून
विज्ञानाविरुद्ध जाणार्या प्रत्येकच
रूढीची,
परंपरेची आणि श्रद्धेची रेवडी उडविली.
त्यांनी चार्वाकाला प्रमाण मानले
आणि चार्वाकाच्या वैज्ञानिक
आग्रहापुढे
कोणत्याही धर्मातलीश्रद्धाउभीराहू
शकणारी नव्हती.
चार्वाकांनी वेदांना दुष्ट, भंड
आणि निशाचरांची निर्मिती मानले
आणि मृत्यूनंतरच्या सगळ्याच
निर्वाणादि कथा अविश्वसनीय
ठरविल्या. पूर्वजन्म नाकारला,
पुनर्जन्म झिडकारला आणि ‘देव’ व
‘दानव’ यासारख्या अनुभवाला न
येणार्या सार्याच
गोष्टी खोट्या ठरविल्या. ‘यज्ञात
बळी दिलेला पशू स्वर्गात जात असेल
तर सगळे स्वर्गेच्छू स्वत:लाच
यज्ञाच्या वेदीवर बळी का देत
नाहीत?’ असा उद्दाम
प्रश्नही चार्वाकांनी विचारला.
त्यांची समाजमनावरची पकड
नाकारणे अशक्य असल्याने प्रत्येक
भारतीय धर्मग्रंथाने
चार्वाकांना आपल्या टीकेचे पहिले
लक्ष्य बनविले. ते
बनवितानात्यांनीसत्यासत्याचीचाडहीठेवलीनाही.
अगदी ‘ऋणम् कृत्वा घृतम् पिबेत’
हा चार्वाकांच्या नावावर
खपविलेलाश्लोकार्धहीचार्वाकांचानव्हता.
नवव्या शतकात झालेल्या जयंत भट्ट
या नैय्यायिकाचा हा श्लोक मुळात
‘यावत् जिवेत् सुखम् जिवेत्,
नास्ति मृत्यू: अगोचर:,
भस्मिभूतस्य देहस्य
पुनरागमनम् कृत:’
- असा आहे. चौदाव्या शतकात
झालेल्या सर्वदर्शनसंग्रहकार
माधवाचार्य या वेदांत्याने
त्यातला ‘नास्ति मृत्यू अगोचर:’
हा श्लोकार्ध बदलून त्यात ‘ऋणं
कृत्वा’ हा बदनाम श्लोकार्ध
घातला. हे करण्याचे कारण
चार्वाकांची यथेच्छ
कुचेष्टा करता यावी हे होते..
अशा अनेक गोष्टी येथे पुराव्यादाखल
सांगता येतील.
चार्वाकांचे आव्हान एवढे जबर होते
की त्यांना नेस्तनाबूत करायला सगळे
धर्म, सगळ्या राजसत्ता आणि सगळे
अर्थबळ एकत्र आले. मृत्यूनंतरचे जीवन,
स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म इ.
कल्पना मानणारे व त्या श्रद्धांवर उभे
असलेले सारे धर्म व
धर्मानुयायी त्यांच्यावर उलटले.
धर्मसत्ता,
राजसत्ता आणि अर्थसत्ता असे सारेच
विरोधात गेल्याने चार्वाक
एकाकी झाले आणि उपेक्षित ठरले.
परिणाम व्हायचा तोच झाला.
स्वत:ला सहिष्णू
म्हणविणार्या भारतीय धर्म परंपरेने
चार्वाकांचा एकही ग्रंथ शिल्लक
ठेवला नाही. त्यामुळे आज
एकविसाव्याशतकातहीचार्वाकांचाअभ्यास
त्यांच्याटीकाकारांच्याग्रंथांच्याआधारे
करावा लागतो. (तेराव्या शतकात
सापडलेला ‘तत्वोपप्लवसिंह’ हा ग्रंथ
चार्वाकांचा असल्याची एक
चर्चा काही काळ पुढे आली. मात्र
जयराशी भट्ट
या त्या ग्रंथाच्या कर्त्याने ‘आपण
चार्वाकासह कोणतेही मत बाधित
करून दाखवू शकतो’ असे त्यात
म्हटल्याने ती चर्चाही पुढे थांबली.)
गोविंदराव पानसरे यांचा पंथ
खरोखरीच एवढा उच्छृंखल आहे काय?
की त्याची तशी बदनामी त्याच्या विरोधकांनी केली?
- महाभारताच्या वनपर्वात
द्रौपदी म्हणते, ‘चार्वाकांचे ग्रंथ
मला समजावून
सांगायला माझ्यावडिलांनीविद्वान
पंडितांची नियुक्ती केली होती.’
एकाराजकन्येलाज्याग्रंथाचीशिकवण
दिली जाते ते उच्छृंखल किंवा ऋणं
कृत्व: कसे असतील? श्रीमत् आद्य
शंकराचार्यांनीहीचार्वाकमतालासामान्य
जनांचे मत किंवा लोकायत असेच
म्हटले आहे आणि सामान्य माणूस कर्ज
काढून तूप पिणारा असत नाही हे
त्यांनाही कळणारे आहे.. वास्तव हे
की चार्वाक विज्ञाननिष्ठ होते
आणि त्यांच्या तर्ककठोर वैज्ञानिक
चिकित्सेपुढे
एकाही धर्माची परंपरा टिकू
शकणारी नव्हती. पण सारा समाजच
धर्मनिष्ठ असल्याने
आणि राजधर्मापासूनचे सारे धर्म
परंपरांनाच तेवढय़ा मान्यता देणारे
असल्याने चार्वाक बदनाम झाले.
- गोविंदरावांचा अपराध हा की ते
या परंपरेने बदनाम
ठरविलेल्याविज्ञाननिष्ठेच्यापरंपरेशीएकनिष्ठ
राहिले.
स्वातंत्र्य
आणि तर्कशुद्धता या तशाही धर्ममान्य
बाबी नाहीत. त्या सलमान
रश्दीला देशोधडीला लावतात
आणि त्याचे शीर कापून
आणणार्याला दहा कोटी दिनारांचे
बक्षीस द्यायला तयार होतात.
तसलिमा नसरीनला तिचा मुसलमान
देश आश्रय देत
नाही आणि भारतासारखा सेक्युलर
देशही तिला रहायला जागा देत
नाही. एम. एफ. हुसेन या आपल्याच
नागरिकाला तो कतारसारख्या नगण्य
देशाचा आश्रय
घ्यायला लावतो आणि नरेंद्र
दाभोलकरांची पुण्याच्या रस्त्यावर
भरदिवसा हत्त्या होतानाही पाहतो.
गोविंदरावांचीचार्वाकनिष्ठाआणित्यांनीहातीघेतलेले
प्रबोधनाचे काम याएवढेच
किंवा याहूनही जास्तीचे दाहक
आहे.. त्यांच्या नियतकालिकाचे नाव
आहे प्रबोधन! अखेर
प्रबोधनाचा तरी अर्थ काय?
- माणसाच्या जीवनात दोन
निष्ठा असतात. त्यातली एक
जन्मदत्त, ती जन्माने मिळते. घर, कुटुंब,
जात, गाव, भाषा व देश इ.
विषयीचीही निष्ठामिळवावीलागत
नाही. ती जन्माने चिकटते.
दुसरी निष्ठा मूल्यांविषयीची असते.
ती परिश्रमपूर्वक मिळवावी व
आत्मसात करावी लागते. न्याय,
स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती,
लोकशाही व
ज्ञानाविषयीची ही निष्ठा आहे.
प्रबोधनाचा खरा अर्थ जन्मदत्त
निष्ठांकडून मूल्यनिष्ठांकडे जाणे
हा आहे. हा उन्नयनाचा मार्ग आहे.
- तो ज्यांना मान्य नाही तेच
गांधींना मारतात,
दाभोलकरांची हत्त्या करतात
आणि गोविंदराव पानसर्यांवर
गोळ्या झाडतात.
‘नरेंद्र दाभोलकरांचे आणि एन. डी.
पाटलांचे हातपाय तोडा’ असे
आपल्या प्रवचनातून सांगणारा एक
बाबा आपल्या महाराष्ट्रातच
शेकडो लोकांच्या श्रद्धेचा व
दर्शनाचा विषय आहे की नाही?
आसाराम
नावाचा बलात्कारी माणूस तुरुंगात
असतानाही त्याच्या शिष्यांचे तांडे
त्याला भेटायला तेथे जातात
की नाही?
आणि समाजजीवनात काडीचा बदल
घडवून आणू न
शकणारी श्री श्रींसारखी माणसे
त्यात सन्मानाचेच नव्हे, तर समृद्धीचे
जिणे जगतातच की नाही?
============================================================================= जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा E-mail करा.
आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !
Sunday, January 11, 2015
आपली प्राचीनातली उड्डाणकला!
मुंबईत नुकतीच भारतीय विज्ञान परिषद पार
पडली. तीत प्राचीन भारतीय विज्ञानावर एक
परिसंवाद झाला. त्यात माजी वैमानिक कॅ.
आनंद बोडस यांनी भारतातील प्राचीन
विमानविद्येची माहिती देत आपल्याकडे
त्याकाळी विमानविद्या किती प्रगत
होती याचे दाखले दिले.
त्यांच्या या दाव्याची तपशिलांत
चिकित्सा करणारा लेख..
आपले पूर्वज थोर होते यात शंकाच नाही.
इसवी सन पूर्व २००० ते १४००
हा ऋग्वेदाचा काळ मानला जातो. म्हणजे
आजपासून साधारणत: चार- साडेचार हजार
वर्षांपूर्वी ऋग्वेदासारखे काव्य रचणारे
लोक बुद्धिमानच असणार.
सिंधुसंस्कृती त्याही आधीची. इसवी सन
पूर्व ३२०० ते २६५० मधली. त्या काळात
त्यांनी नगरे उभारली.
आजच्या आपल्या शहरांहून
त्यांची रचना कितीतरी पटीने उत्तम होती.
त्याच आपल्या पूर्वजांनी पुढे
उपनिषदांसारखे तत्त्वज्ञान सांगितले.
लोकायतांचे प्रत्यक्ष प्रमाण सिद्धान्त
आपल्या लोकप्रिय धार्मिक
तत्त्वज्ञानाला किती पटतात, हा भाग
वेगळा; पण
आपल्या पूर्वजांनी ज्योतिर्विद्या व
आयुर्वेदासारखी शास्त्रे रचली म्हटल्यावर
त्यांना विज्ञान संशोधनाचे प्राथमिक
नियम नक्कीच ठाऊक होते. चरकाने
सांगितलेले काढे, आरिष्ट आणि आसवे तर
आजही आपण घेतो. जगातला पहिला प्लास्टिक
सर्जनही आपलाच. सुश्रुत हे त्याचे नाव.
इसवी सन पूर्व ६५० हा त्याचा काळ. याच
पूर्वजांनी जगाला बीजगणिताची मूलभूत
तत्त्वे दिली. ‘लाइफ ऑफ पाय’ हे तर
आपल्या पूर्वजांमुळेच शक्य झाले.
आर्यभट्टांनी ग्रीकांच्या कितीतरी आधी ‘पाय’ची अगदी अचूक
किंमत सांगून ठेवली होती. शिवाय
जगाला आपण शून्य दिले, हे तर
आता बालवाडीतील मुलेही सांगू शकतात.
एकंदर ही यादी अशी बरीच लांबवता येते. पण
अलीकडे
काहीजणांना ही यादी ताणण्याचा छंद
जडला आहे.
या ताणण्याची प्रक्रियाही मोठी रंजक
असते. म्हणजे तिकडे पाश्चात्त्य देशांत
एखादा शोध लागला रे लागला,
की ही मंडळी आपली बासने झटकू लागतात.
एखादा संस्कृत ग्रंथ हुडकून काढतात
आणि फुललेल्या चेहऱ्याने व
फुगवलेल्या छातीने सांगतात की, हा शोध तर
आमच्या पूर्वजांनी केव्हाच लावून
टाकलाय. पुन्हा त्या प्रत्येक
शोधाला नासाचे प्रमाणपत्र जोडलेले असतेच.
हल्ली गायत्री मंत्र आणि हनुमान
चालिसाबाबतचे शोध समाजमाध्यमांतून फिरत
आहेत. त्यानुसार गायत्री मंत्र हा जगातील
सर्वात शक्तिशाली मंत्र आहे.
त्यासाठी जर्मनीच्या हॅम्बर्ग
विद्यापीठातल्या डॉ. हॉवर्ड स्टेनगेरील
या अमेरिकी शास्त्रज्ञाचा हवाला देण्यात
येतो. त्यात मौज अशी की,
या विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच नव्हे,
तर इंटरनेटवर अन्यत्र कोठेही हे डॉक्टर
सापडत नाहीत. ‘हनुमान चालिसा’ची कथाच
न्यारी. त्यातील ‘युग सहस्र योजन पर भानू
लील्यो ताही मधुर फल जानू’ या ओळींमध्ये
सूर्य व पृथ्वी यांमधील तंतोतंत अंतर
दिलेले आहे असे या मंडळींचे म्हणणे असून,
त्यात नासाची साक्षही काढण्यात
आली आहे.
आज आपली माती आणि आपली माणसे
तिसऱ्या जगात गणली जातात.
गेल्या कित्येक वर्षांत
एकही भारतवासी भारतीय विज्ञानातले
नोबेल मिळवू शकलेला नाही. जग बदलून
टाकतील असे कोणतेही मोठे शोध आपण लावू
शकलेलो नाही. याचा अर्थ सगळेच शून्य आहे
असे नाही. याचा अर्थ एवढाच, की आपण फार
काही मोठे तीर मारलेले नाहीत. तर मग त्यावर
उपाय काय? मारा बढाया! ते तर न्यूनगंडावरचे
जालीम औषध! भारतीय विज्ञान परिषदेत
उडविण्यात आलेली विमाने हा त्याच
बढायांचा आणि छद्मविज्ञानाचा उत्तम
नमुना होता.
या परिषदेत ४ जानेवारी रोजी ‘प्राचीन
भारतीय विज्ञान’ या विषयावर परिसंवाद
झाला. त्याचे उद्घाटन केंद्रीय
मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले
आणि त्यात परम महासंगणकाचे शिल्पकार डॉ.
विजय भटकर हेही सहभागी झाले होते.
या परिसंवादात माजी वैमानिक कॅ. आनंद
जयराम बोडस यांनी भारतातील प्राचीन
विमानविद्य्ोची माहिती दिली. बोडस
यांचा या विषयावरील उत्तम अभ्यास असून,
त्याआधारे त्यांनी ‘प्राचीन भारतीय
विमानशास्त्र’ हे पुस्तकही लिहिले आहे.
या विज्ञान परिषदेत त्यांनी याच
पुस्तकावर आधारित ‘पेपर’ वाचल्याचे दिसते.
त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतात सात
हजार वर्षांपूर्वी विमाने होती. हा काळ
अर्थातच
नागरी सिंधुसंस्कृतीच्याही आधीचा.
म्हणजे लोक दगडी हत्यारे बनवून शिकार वगैरे
करीत असत तेव्हाचा. तर या काळात लोक
विमानांतून फिरत.. परग्रहांवर जात. हे दावे
करताना कॅ. बोडस यांनी ऋग्वेद आणि पुरातन
काळातील काही ग्रंथांचा हवाला दिला. पण
त्यांचा भर होता महर्षी भारद्वाज
यांच्या ‘बृहद् विमानशास्त्र’ या ग्रंथावर.
कॅ. बोडस यांच्या पुस्तकानुसार,
महर्षी भारद्वाजांनी ‘यंत्रसर्वस्व’
नावाचा ग्रंथ तयार केला होता. त्यात
निरनिराळ्या विषयांचे ज्ञान देणारे
चाळीस खंड होते. त्यातला एक खंड म्हणजे
‘बृहद् विमानशास्त्र.’
या ग्रंथासाठी त्यांनी ९७ संदर्भग्रंथ
वापरले असून, त्यात १०० विभागांत आणि आठ
अध्यायांत मिळून ५०० सूत्रे दिलेली आहेत.
या ग्रंथामध्ये भारद्वाज ऋषींनी विमान
वा अंतराळयानाच्या इंधनापासून रडार
यंत्रणेपर्यंत विविध माहिती दिली आहे.
वैमानिकांचा आहार कसा असावा,
त्यांनी कपडे कोणते घालावेत, हेही लिहून
ठेवलेले आहे. ही विमाने लढाऊसुद्धा असत.
तेव्हा त्यातील
शस्त्रांचीही माहिती देण्यात आली आहे.
आता भारद्वाज ऋषींनी सात हजार
वर्षांपूर्वीच हे सर्व लिहून ठेवले आहे
म्हटल्यावर त्यापुढे कोण काय बोलणार?
तशात या ग्रंथाच्या आधारे मुंबईतील
संस्कृताचार्य शिवकर बापूजी तळपदे
यांनी ‘मरूत्सखा’ नावाचे मानवरहित विमान
बनविले होते. महत्त्वाचे म्हणजे त्याचे
यशस्वी उड्डाणही करण्यात आले होते.
तेही १८९५ साली.. राइट
बंधूंच्या विमानोड्डाणाआधी,
असेही सांगण्यात येते.
त्यासाठी ‘केसरी’तील बातमीचे
पुरावेही काढण्यात येतात.
ती बातमी सध्या कुठे सापडत नाही हा भाग
असला तरी आता त्याला बढाया आणि छद्मविज्ञान
कसे म्हणायचे?
पण बरोबर ४० वर्षांपूर्वी पाच भारतीय
शास्त्रज्ञांनी नेमके तेच सिद्ध करून
दाखविले होते. एच. एस. मुकुंद, एस. एम.
देशपांडे, एच. आर. नागेंद्र, ए. प्रभब आणि एस.
पी. गोविंद राजू अशी त्यांची नावे.
बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ
सायन्समधील एरोनॉटिकल आणि मेकॅनिकल
इंजिनीअरिंग विभागात ते काम करीत. ते
स्वत: विमानविद्य्ोचे अभ्यासक. त्यामुळे
त्यांनी ‘वैमानिकशास्त्र’ या प्राचीन
ग्रंथाचा अभ्यास केला. त्यानुसार
काही प्रयोग केले आणि ते सगळे १९७४
च्या ‘सायंटिफिक ओपिनियन’
या विज्ञानपत्रिकेत ‘ए क्रिटिकल
स्टडी ऑफ द वर्क वैमानिकशास्त्र’
या शीर्षकाने प्रसिद्ध केले.
भारद्वाज ऋषींच्या नावावर खपविल्या जात
असलेल्या विमानविषयक
ग्रंथाचा नेमका इतिहास शोधणे
हेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.
त्यांच्यासमोर श्री ब्रह्ममुनी परिव्राजक
यांचा १९५९ मध्ये प्रकाशित झालेला ‘बृहद्
विमानशास्त्र’ आणि जी. आर. जोसेर
यांचा ‘वैमानिकशास्त्र’ असे दोन ग्रंथ
होते. त्यातल्या जोसेर यांचा इंग्रजी ग्रंथ
आणि परिव्राजक यांचा ग्रंथ यांत सारखेच
संस्कृत श्लोक होते. ते अर्थातच
भारद्वाजांच्या ‘यंत्रसर्वस्व’मधले होते.
आता प्रश्न असा होता की, ते आले कुठून?
‘बृहद् विमानशास्त्रा’चा आधार होता-
बडोद्यातल्या राजकीय संस्कृत
ग्रंथालयातले एक हस्तलिखित. ते १९४४ मध्ये
उपलब्ध होते. शिवाय जी. वेंकटाचल
शर्मा यांची सही आणि ९- ८- १९१९
अशी तारीख लिहिलेले एक हस्तलिखित
पुण्यात मिळाले होते. त्याचाही आधार
घेण्यात आला होता. येथे पं. सुब्बराय
शास्त्री यांचे नाव येते. हे
तेव्हाच्या मद्रास प्रांतातल्या होसूर
तालुक्यातले. जोसेर यांच्यानुसार,
विमानशास्त्राचे श्लोक सुब्बराय
शास्त्री यांनी जी. वेंकटाचल
शर्मा यांना सांगितले. ते त्यांनी लिहून
ठेवले. तेव्हा मुकुंद यांच्या चमूने
शर्मा आणि पं. सुब्बराय यांचे पुत्र
वेंकटराम शास्त्री यांचा शोध घेतला.
त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,
पंडितजींकडे विशिष्ट अतिंद्रिय
शक्ती होत्या. ते जेव्हा समाधीत जात
तेव्हा त्यांच्या मुखातून श्लोक बाहेर
पडत. शर्माजी ते लिहून ठेवीत.
शास्त्रीजींचा मृत्यू १९४१ मध्ये झाला.
तत्पूर्वीच या श्लोकांची हस्तलिखिते तयार
करण्यात आली होती. ती नंतर
ठिकठिकाणी गेली. त्यातील एक बडोद्यातील
ग्रंथालयात गेले. सुब्बराय
शास्त्रींच्या चरित्रानुसार,
त्यांना गुरुजी महाराज या थोर
साधुपुरुषाने विमानविद्या शिकविली होती.
ते मुंबईलाही येत असत आणि तेथेच
विमानशास्त्राचे काही श्लोक
त्यांनी सांगितले होते. १९०० ते १९१९
या काळात त्यांनी एल्लप्पा नामक
एका ड्राफ्ट्समनकडून
काही आकृत्याही काढून घेतल्या होत्या.
शिवकर बापूजी तळपदे यांनी सुब्बराय
शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली विमान
तयार केले होते, पण ते उडू शकले नाही, असे
मुकुंद यांनी नमूद केले आहे.
मुकुंद यांच्यासमोर आता सुब्बराय
यांनी सांगितलेले श्लोक होते. त्यातले
संस्कृत वैदिक वळणाचे नव्हते.
श्लोकांचा छंद अनुष्टुभ होता, पण
भाषा साधी आणि आधुनिक होती. त्यातील
अंतर्गत आणि निगडित पुरावे लक्षात घेता ते
प्राचीन असणे अशक्य असल्याचे मुकुंद
यांनी म्हटले आहे. ‘वैमानिकशास्त्र’
हा ग्रंथ १९०० ते १९२२ या काळात पं.
सुब्बराय शास्त्री यांनी रचला असून
तो भारद्वाज ऋषींचा आहे
याला कोणतेही पुरावे नाहीत. म्हणजे
या ग्रंथाचे प्राचीनत्व उडाले. तो तर
विसाव्या शतकातला निघाला.
आता मुद्दा राहिला त्यातल्या आकृत्या आणि माहिती यांतील
तथ्यांचा आणि त्यातल्या मांत्रिक,
तांत्रिक आणि कृतक
विमानांच्या खरेपणाचा. या ग्रंथात शकून,
सुंदर, रुक्म आणि त्रिपूर अशा चार
प्रकारची कृतक विमाने वर्णिली आहेत.
आपल्या या शास्त्रज्ञ पंचकाने त्यांतील
तत्त्वे, भूमिती, रसायने व अन्य
सामग्री अशा विविध बाबींचे संशोधन केले
आणि शेवटी थेटच सांगून टाकले की, यातले
एकही विमान उडू शकत नाही. त्यात ते
गुणधर्मही नाहीत आणि क्षमताही.
त्यांची भौमितिक रचना भयंकर आहे
आणि उड्डाणविषयक तत्त्वे उडण्याला साह्य़
करण्याऐवजी विरोधच करणारी आहेत.
या ग्रंथात विविध
प्रकारच्या धातूंच्या निर्मितीबद्दल
सांगितले आहे. भारतात प्राचीन काळापासून
त्याची माहिती होतीच. ती आजही चालत
आली आहे. असे असले तरी ग्रंथातील धातू
आणि त्यांच्या निर्मितीची प्रक्रिया हे
प्रत्यक्षात उतरूच शकणार नसल्याचे दिसते.
आणि सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे
या विमानांचे आणि त्याच्या भागांचे वजन
किती असेल, हे कुठेच दिलेले नाही.
म्हणजे आपले हे प्राचीन उडनखटोले
प्रतिभाशक्तीचेच नमुने ठरले. पुन्हा हे
केवळ इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधील
शास्त्रज्ञच सांगत होते असे नाही. जागतिक
कीर्तीचे वैज्ञानिक जयंत नारळीकर
यांनीही तेच म्हटले होते. एप्रिल १९८५
च्या ‘सायन्स एज’मध्ये
लिहिलेल्या एका लेखात त्यांनी हे
प्राचीन विमानशास्त्र विज्ञान
आणि तंत्रज्ञान या दोन्ही पातळ्यांवर
आपले समाधान करू शकले नसल्याचे स्पष्ट
म्हटले आहे.
मुंबईतल्या भारतीय विज्ञान
परिषदेच्या आयोजकांना हे सर्व माहीत
असणे कदाचित शक्य नाही. पण
इतरांनी तरी तसा विज्ञानांधळेपणा दाखवू
नये, इतकंच. आणि राहता राहिला प्रश्न
आपल्या इतिहासगौरवाचा! तर
आपल्या इतिहासात, संस्कृतीत गौरव
करण्यासारखे खूप काही आहे. त्या सोन्यात
हीणकस मिसळण्याची गरजच नाही.
-रवि आमल
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...