Wednesday, April 29, 2015

22 प्रतिज्ञा

बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला. हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच.
     पण धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा होता. दलिताना हजारो वर्ष गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही
होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून  होते, त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त
करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या लोकांकडून वदवून घेतल्या.
बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल प्रमाणे आहेत

१) मी ब्रह्मा , विष्णु , महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

२) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदूधर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.

४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.

५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.

६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.

७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.

८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.

९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी
मानतो.

१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.

११) मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.

१२) तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.

१३ ) मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.

१४) मी चोरी करणार नाही.

१५) मी व्याभिचार करणार नाही.

१६) मी खोटे बोलणार नाही.

१७) मी दारू पिणार नाही.

१८) ज्ञान (प्रज्ञा) , शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.

१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्या व
मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.

२०) तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.

२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.

२२) इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी
प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...