Tuesday, December 25, 2018

शुक्रतारा

"तुझ्यासारखे गाणे कोण गाऊ शकतो ?"

एका मित्राने स्ययंपाक घरात जाऊन आईला मी नापास झाल्याचे सांगितले, तशी तातडीने आई बाहेर आली.माझ्या डोळ्यांतील पाणी पाहून समजावू लागली.तसं मला अधिकच रडू येऊ लागले.तशी ती बाबांच्या खोलीत गेली-त्यांना बोलवायला.
कुणा तरी कलाकाराचे गाणे ऐकत बसले होते ते.भोवती १०-१२ माणसे होती.
आईने त्यांना आत बोलावले, तसे बाबा म्हणाले," अग थांब फार चांगली चीज बांधलीय यानं जरा ऐकून येतो."
त्यांनी लवकर यावे म्हणून आई दबलेल्या आवाजात म्हणाली, " अहो, अरु नापास झालाय."
ते म्हणाले, " मग होईल पुढच्या वर्षी पास !"
तेव्हा आई काकुळतीने म्हणाली, " तो रडतोय "
तेव्हा बाबा उठले व माझ्या खोलीत आले.मी म्हणालो," या पुढे मी इंजिनीरिंगचा अभ्यास सोडून देतो व गाणेही.गाण्यामुळे शिक्षण नीट होत नाही व शिक्षणा मुळे म्हणावं तसं गाणे जमत नाही.तेव्हा मी नोकरी करेन.
त्यांनी ओळखलं की निराश झाल्यामुळे मी तसं म्हणत आहे.तसं करेल सुद्धा.
ते म्हणाले," तुझं शिक्षण ही माझी जबाबदारी आहे.तेव्हा तू का रडतोस ? रडायचं असेल तर मी रडायला हवं ! मी तर आनंदात आहे.तू परवा ज्या दोन गझला गायलास त्या फार चांगल्या म्हटल्यास.इतक्या की तुझ्या नापास होण्याचे मला इतकं सुद्धा दुःख वाटत नाही.मला एक सांग तुझ्या वर्गात किती मुले आहेत ? त्यातली किती पास झाली ? मी म्हटलं २० मुले आहेत त्यातील १५-१६ तरी पास झाली असतील." त्यावर ते म्हणाले ," १९ पास झालीत व तू एकटा नापास झालास समजू .पण तुझ्यासारखे गाणे म्हणू शकतील असे किती आहेत ?" मी म्हणालो," त्यांच्यापैकी कोणीच गात नाहीत.ते सारे हुशार-अभ्यासू विद्यार्थी आहेत."
" हिंदुस्तानात इंजिनिअर्स, मॅनेजर्स किती आहेत ? आणि कुमार गंधर्व, किशोरी, लता किती आहेत ? 
उद्या तू चांगला गाऊ लागलास की सर्वत्र तुझे नाव ऐकू येईल.मॅनेजरला त्याची कंपनी सोडली तर एरवी कोण विचारतो ? तेव्हा १९ एकीकडे असले व दुसरीकडे तू एकटा असलास तरी नीट लक्षपूर्वक रियाझ कर.गुरूकडून शिक्षण घेऊन मोठा कलावंत होऊ शकलास, तर या सर्वांहून तू मोठा समजला जाशील.पुढच्या वर्षी तर पास होशीलच.तेव्हा शिक्षण व गाणे सोडण्याचा विचार सुद्धा करू नकोस.तुझी गाण्यातील प्रगती पाहून मी फार खुश आहे."
माझ्या मित्राला पैसे देऊन ते म्हणाले," जा मिठाई घेऊन ये आणि सर्वांना वाट.आमचा अरु काय सुंदर गझल गायला लागलाय. तेव्हा मिठाई हवीच...
डोळ्यांतील पाणी आवरत मी पाहतच राहिलो.असे आई-वडील लाभले , याहून जास्त देव काय देऊ शकला असता मला ? 
मी त्याच क्षणी निश्चय केला.
काहीही झालं तरी मी
इंजिनीअर होणारच आणि गायक सुद्धा !
आई-वडिलांना मनोमन दिलेले वचन पुरं केलं, ही माझ्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाची गोष्ट !

( स्व.अरुण दाते यांच्या
" शुक्रतारा " या सुलभा 
तेरणीकरांनी शब्दबद्ध केलेल्या आत्मचरित्रपर पुस्तकातील अरुण दाते यांनी आपल्या वडिलांची सांगितलेली हृद्य आठवण - साभार )

Monday, December 17, 2018

संघर्ष

एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला.

नाराजीचे कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.

एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,''तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.''

देव हसला आणि म्‍हणाला,''तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर'' इतके बोलून देव निघून गेला.

शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.

प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.

पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला.

 पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.

थोड्यावेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,

'' अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.

 त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

 सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.

तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले.

सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते.

हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.''

आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.

तात्पर्य:-

- जीवनात जर संघर्षच नसेल तर, आव्‍हाने नसतील तर मनुष्‍य अगदी खिळखिळा बनून राहतो. त्‍याच्‍यात कोणतेच गुण येऊ शकत नाहीत. संकटेच माणसाला तलवार किंवा ढाल बनण्‍याची प्रेरणा देतात. कधी तलवार बनून वार करायचा आणि कधी ढाल बनून सामोरे जायचे हे संकटाकडूनच माणूस शिकतो. जीवनात जर कधी यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही.

-स्पर्धा परीक्षेत तयारी करताना येणारी संकटे तुम्हाला अधिकारी बनल्यावर अथवा आयुष्यात लढायला ताकद देतात

-comfort झोनच्या बाहेर या

( संग्रहित कथा )

Thursday, December 6, 2018

अश्वत्थाम्याची भळाळती जखम

"अश्वत्थाम्याची भळाळती जखम"....एक प्रेरक कथा . आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा .....

एका "बुजुर्ग" प्रवचनकार ताईंनी त्यांच्या एका प्रवचनांत "वांग्याच्या भाजीची" एक छान गोष्ट सांगितली. त्या कोणाकडे तरी जेवायला गेल्या होत्या तेव्हा वांग्याची भाजी केली होती, ती भाजी काही "तितकीशी" जमली नव्हती. त्याला काही विशेष "चव ढव" नव्हती.. आता ती तितकीशी जमली नव्हती ,हा विषय खरं तर तिथेच सोडून द्यायला हवा होता. पण तसं झालं नाही.. काही दिवसांनी त्या आणखी कोणाकडे तरी गेल्या, त्यांनीही वांग्याची भाजीच केली होती.. त्यांची भाजी मात्र "चांगली" झाली होती, ती भाजी खातानाही पुन्हा न जमलेली "ती" भाजीच त्यांना आठवली. काही दिवसांनी मंडईत कृष्णाकाठची ताजी वांगी पाहिल्यावर पुन्हा ती "न जमलेली भाजी" त्यांना आठवली.. या प्रसंगाचा शेवट करताना त्या म्हणाल्या, ‘‘जी गोष्ट चांगली झाली नाही ती स्मरणांत राहिली. त्यापूर्वी चांगल्या चवीची वांग्याची भाजी खाल्ली नव्हती का कधी? खाल्ली होती. पण ती लक्षांत राहिली नाही.. बिघडलेली मात्र लक्षांत राहिली.. आपलं मन असंच असतं.. जे लक्षांत ठेवायला हवं ते ठेवत नाही आणि "नको" ते धरून बसतं.’’

स्वत:ला नातसून आलेली आज्जे सासूबाई, तिच्या सासूबाई तिला पुरणपोळ्या नीट "जमल्या" नाहीत म्हणून जेवताना पानावर कसं "टाकून" बोलल्या, हे आजही डोळ्याला "पदर लावून" सांगत असतात , पण याच सासूबाईंनी तिच्या बाळंतपणांत तिची "सेवा" केली हे मात्र "विस्मृतीकोशांत" गेलेलं असतं. मानवी स्वभाव.. नको ते आठवत राहतं.

आमच्या घरी रोज श्लोक पाठ करून आजोबांना म्हणून दाखवण्याची शिस्त होती. कंटाळा यायचा कधी कधी, मग मी नाही पाठ करायचे. आजोबा रागवायचे, कधी कधी "अबोला" धरायचे. मग मी एका दिवसांत आठ श्लोक पाठ करून दाखवायचे. त्याचं कौतुक असायचं, पण "त्या" दिवशी पाठ केले नाहीत,हे ते विसरायचे नाहीत. मग आई नेहमीचं तिचं ठेवणीतलं वाक्य म्हणायची, "बूंद से गई वो हौद से नही आती" तो बूंद एकदा मनातून पडला ,की तोच लक्षात राहतो. नंतर कितीही मोठा हौद बांधला तरी.. काय म्हणायचं या मानवी स्वभावाला?

पाच वर्षांपूर्वी एखादा "प्रसंग" घडलेला असतो.. त्यातल्या व्यक्तींशी आपलं बोलणं, संभाषण "बंद" झालेलं असतं. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा आपल्याला "तोच" प्रसंग आठवत राहतो.. कटू आठवण, अढी "अधिकच घट्ट" होत जाते.. पाच वर्षांनीही आपण सगळे तेच आणि तसेच आहोत असं मानूनच आपण वागत असतो.. या पाच वर्षांत माणसं बदललेली असू शकतात, हा विचार करण्याएवढे "उदार" आपण नसतो. त्या व्यक्तीने पुन्हा चांगल्या हेतूने नात्याचा हात पुढे केला तरी आपण धरून ठेवलेली ती "कटू" आठवण आपल्याला प्रतिसादाचा "हात" पुढे करू देत नाही.* म्हणून कटू आठवण जिथल्या तिथे सोडून देणं हाच उत्तम उपाय. ती "कुरवाळत" ठेवू नये. आपलं सुदैव की आपण खूप जुनी, "भळभळणारी जखम" वागवत फिरणारा "अश्वत्थामा" नाही.. जखम अंगावर, मनावर ताजी ठेवण्याचं "दु:ख" काय असतं ते त्यालाच माहीत. त्याला तो शाप आहे पण ,आपल्याला तर अशी "सक्ती" नाही, मग "अश्वत्थाम्याचंदु:ख" विनाकारण मागून का घ्यायचं?

मेमरी चिपवरून भूतकाळाच्या आठवणी हळूहळू "पुसून" टाकून चिपमध्ये नव्या आठवणींना "जागा" करून द्यायला हवी.. मनाला त्रास देणाऱ्या आठवणी तर "जाणीवपूर्वक" पुसून टाकायला हव्यात. त्यातून फक्त धडा घेऊन, कोणाहीबद्दल मनांत "गाठ" न ठेवता पुढे पाऊल टाकायला हवं आणि एखाद्या वळणावर भेटली पुन्हा तीच कटू आठवण, तर ‘तुझ्या कटुत्वामध्येही गोडवाच मी शोधणार आहे..’ असं तिलाच ठणकावून सांगावं. स्मृतिकोशांत काय ठेवायचं ? हे ज्याला समजलं तो "खरा" विवेकी! भूतकाळाला वर्तमानाची जागा "अडवू" देऊ नये..

‘कुंग फू पांडा’ या चित्रपटांत मास्टर उग्वे नावाचं एक कासव आहे. ते तीनशे वर्षांचं आहे. त्याच्या तोंडी एक "सुंदर वाक्य" आहे, ‘यस्टर्डे इज हिस्टरी, टुमारो इज मिस्टरी. टूडे इज अ गिफ्ट फ्रॉम द लॉर्ड, हेन्स इट इज कॉल्ड द प्रेझेंट.’ गम्मत म्हणजे तीनशे वर्षांचं असलं तरी ते ‘आमच्या वेळेला असं होतं’ असं न म्हणता ‘वर्तमान हीच "अमूल्य भेट" आहे’ असं सांगतं. रात्री झोपताना आपण "टोचणारे" अलंकार जसे काढून ठेवतो तशाच "टोचणाऱ्या" आठवणीही मनांतून "काढून" ठेवाव्यात.. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त "अलंकार" घालावेत.. 
सकाळी तन मोकळं, मन मोकळं आणि नवीन वांग्याच्या भाजीची "चव" चाखायला जीभही मोकळी.

जशी "पुराणातली" वांगी.. तशी ही "भूतकाळातली" वांगी

संग्रहित लेख

Monday, December 3, 2018

ब्राझिलियन कवीची कविता

मारिओ दि अन्द्रादे (1893 - 1945) ब्राझिलियन कवीची कविता

आज मी माझी सरलेली वर्ष मोजली आणि अचानक लक्षात आलं ..अरेच्चा!
जेवढं जगून झालंय
त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं..
मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना..
खूप आवडीचा खाऊ खाताना..
तसं झालं काहीसं...

सुरवातीला तो
आवडीने खाऊ खातोच पण जेंव्हा त्याच्या लक्षात येतं की आता
थोडासाच खाऊ उरलाय, तेंव्हा मात्र ते मुल खाऊ अधिकच चवीचवीने
आणि अगदी मन लावून खायला लागतं.
कुठल्याच संकेत,
नियम आणि कायदयांचं पालन होणार नाहीय हे पुरेपूर ठाऊक असताना..

केवळ त्यांचीच चर्चा करणाऱ्या प्रदीर्घ बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाही.

ज्यांची केवळ वयच वाढलीत.. बुद्धी नाही.. अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम
आता माझ्यात अजिबात उरलेला नाही.

फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे..
आता मला फक्त अर्क हवा आहे..
आत्मा घाईत आहे माझा..फार थोडा खाऊ शिल्लक आहे माझ्याजवळ आता..

मला माणसांच्या जवळ जगायचंय आता..
खऱ्याखुऱ्या माणसांच्या... ज्यांना माहीत आहे, आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं.
ती माणसं..
जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत
आणि ती माणसं... जी त्यांनी केलेल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी घेतात. खरंतर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते आणि आपण कायम सत्य
आणि प्रमाणिकतेच्या मार्गावर राहतो.

आपलं आयुष्य कामी येणं उपयुक्त होणं हे अत्यंत महत्त्वाच.

मला अशी माणसं माझ्या अवतीभवती हवी आहेत की ज्यांना दुसऱ्यांच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच ठाऊक आहे..
अशांच्या हृदयाला... ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत,
आत्म्याच्या पवित्र, मधुर स्पर्शाने ज्यांना तरीही
मोठं केलंय..

हो आहे मी घाईत..
मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे..ती उत्कटता... जी केवळ प्रगल्भतेतून येते.
आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई
फुकट घालवायची माझी इच्छा नाहीय..

मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अतिशय उत्तम आहे..
मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही खूप सुग्रास.

माझं आता एकच ध्येय आहे..
माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्सद्विवेकबुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठणं..बस.

आपल्याकडे बरं का दोस्तांनो ..
दोन आयुष्य असतात..आणि दुसरं आयुष्य सुरू होतं जेंव्हा लक्षात येतं की आपल्याकडे जगायला फक्त एकच आयुष्य आहे.!

मारिओ दि अन्द्रादे

Tuesday, November 20, 2018

टाइमबँक

*टाइमबँक*

          स्वित्झर्लंडमधे अभ्यास करीत असतांना मी एका भाड्याच्या घरात राहत होतो. त्या घराची मालकीण श्रीमती क्रित्सीना ही ६७ वर्षांची बाई शिक्षिका म्हणून ररिटायर्ड झाली. खरं म्हणजे तेथले पेन्शन इतकं मोठं असतं की तिला तिच्या उत्तरायुष्यात खायची, प्यायची काही ददात नव्हती. तरीसुध्दा आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने एका  ८७ वर्षांच्या महिलेची सेवा करण्याचे काम पत्करले काळजीवाहक म्हणून. मी तिला विचारले अधिक पैशाच्या मोहाने तू हे स्वीकारले आहेस कां? तर तिने दिलेले उत्तर मला संभ्रमीत करणारे होते. ती म्हणाली, नाही, मी पैशांसाठी नाही हे करीत. मी माझा हा कामाचा वेळ *टाइमबँक* मध्ये टाकते. आणि मी जेंव्हा म्हातारी होईन तेंव्हा मी ह्या टाईमबँकमधून मला सेवेचा वेळ काढून घेईन.

          मला टाईमबँक असं काही असतं, हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. मी तिला विस्ताराने या संकल्पनेची माहिती विचारली. ती म्हणाली, स्वीसच्या शासनाने एक कल्याणकारी कार्यक्रम म्हणून याची सुरुवात केली. त्याचं असं आहे की जेंव्हा व्यक्ती सुद्रुढपणे तारुण्यात असते तेंव्हा ती आपल्यापेक्षा व्रुध्दाची सेवा करतात आणि ती जेंव्हा व्रुध्द होते तेंव्हा अशा सेवेची तिला आवश्यकता भासते. तेंव्हा अशा पूर्वी सेवा केलेल्या वेळेची परतफेड म्हणून तिला सेवा मिळते. अशी सेवेकरी व्यक्ती सुद्रुढ, संवेदनशील आणि प्रेमळ स्वभावाची असावी. ज्या व्रुध्दांनासेवेची अपेक्षा असते अशा अनेक संधी त्या तरुण व्यक्तीला मिळू शकतात. अशी त्यांची सेवेची वेळ त्यांच्या सेवा खात्यात जमा होते. सामाजिक कल्याण विभागाच्या. त्याच्यि घराची मालकीण आठवड्यातून दोन वेळा दोन दोन तास व्रुध्दांना त्यांच्या काही गोष्टी खरेदीसाठी किंवा त्यांच्या घरकामासाठी किंवा त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी, वाचनासाठी अथवा बाहेर फिरण्यासाठी व्यतीत करीत होती. अशाप्रकारे एक वर्षापर्यंत सेवा दिल्यावर तिच्या सेवेची गणना करुन तिला *टाइमबँक कार्ड* दिलं जाईल. त्यात त्या सेवेची वेळ नमूद केलेली असेल. जेंव्हा सेवेकरी व्रुध्द होईल, तेंव्हा तिला तिच्यासाठी त्या टाइमबँक कार्डाव्दारे सेवा मिळू शकेल. तिच्या टाइमकार्डाची तपासणी होऊन *टाइमबँक* तिच्यासाठी सेवेकरी तिच्या घरी अथवा हाँस्पिटलमधे पाठवून देईल.

          एके दिवशी मला माझ्या घरमालकीणीचा फोन आला. ती म्हणाली, काही गोष्टी काढण्यासाठी ती स्टुलावर उभी होती. तोल जाऊन ती पडली आणि तिच्या मांडीचे हाड मोडले आहे. मी आँफिसमधून रजा घेतली आणि तिला हाँस्पिटलमधे पोहोचवली. मी तिच्या सेवेसाठी रजा टाकत होतो. पण ती म्हणाली, तशी काही जरुरी नाही. मी माझ्या टाइमबँकेतून सेवेसाठी टाइम विड्राव्हल फाँर्म भरला आहे. आणि टाइमबँक आता माझी काळजी घेईल. आणि खरेच दोन तासात टाइमबँकेतून सेवेकरी हजर झाले. त्यानंतर महिनाभर त्या सेवा स्वयंसेविकेने माझ्या घर मालकिणीचे घर सांभाळले. तिच्यासाठी स्वयंपाक करुन जेवू घातले. तिच्याशी गप्पा मारुन आनंदी ठेवले. सेवेकरीच्या सहाय्याने घरमाकीण लवकरघ पूर्ण बरी झाली. बरी झाल्यावर लगेच ती आपल्या सेवाभावी कार्याला लागली. तिचे म्हणणे असे की, ती जोपर्यंत कार्यक्षम  आहे तोपर्यंत ती जास्तीत जास्त वेळ टाइमबँक मध्ये टाकू इच्छिते.

          सध्या स्वित्झर्लंडमध्ये *टाइमबँक*हा विषय अगदी सर्वमान्य झाला आहे. यामुळे शासनाला केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर अनेक सामाजिक समस्या त्यामुळे मिटल्या आहेत. समाजामध्ये अधिक सामंजस्य व सहिष्णुततेची वाढ होण्यास मदत झाली आहे. बहुसंख्य स्वीस नागरिकांनी हा विषय उचलून धरला आहे. शासनाने केलेल्या पाहणीत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात नागरिक या संकल्पनेत सहभागी होऊ इच्छीतात, हे दिसून आले आहे. त्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये शासनाने अशाप्रकारचे कायदे करण्यात तत्परता दाखविली आहे.

          ज्येष्ठ नागरिकांच्या भारतातील सर्वात मोठ्या संघटनेचा दोन टर्म असण्याच्या पूर्वीपासून सक्षम ज्येष्ठांची अति ज्येष्ठांच्या सेवेसाठी काही वेळ देऊन हा विषय आपलासा करावा हा प्रयत्न अनेक श्रेष्ठींनी नागरिकांत प्रस्रुत करण्याचा प्रयत्न केला पण सर्व काही फक्त *शासनानेच*करावे ही मनिषा असल्याने त्या विषयावर बहुसंख्यांनी पाठ फिरवली. आपणही पुढे व्रुध्द होणार आहोत आणि सध्या न्यूक्लीअर कुटुंबाची प्रथा मूळ धरु पहात असल्याने आपल्या व्रुध्दत्वी काळजीवाहक म्हणून आपल्याला कोणी साथी उपलब्ध होऊ शकेल ह्या भावनेने आजच्या तरुणाईने वृद्धांशी सेवाभाव ठेवावा हा विचार केल्यास भारतीय वृद्धांचे भवितव्य उज्वल असेल.

*बघा विचार करुन*

संग्रहित लेख

Saturday, November 3, 2018

RRB Railway Result

RRB Railway Result

Those Candidates who have Applied for this Recruitment Can Download Result,From Below Given Link.

प्रथम टप्यातील CBT परीक्षा: 09 ते 31 ऑगस्ट 2018

निकाल Click Here

Community Cut-OffClick Here 

PWD Cut-OffClick Here

Ex-Servicemen Cut-Off Click Here

प्रश्नपत्रिका /उत्तरतालिका Click Here


_____________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+  महत्वाच्या चालू घडामोडी
+  नोकरी च्या जाहिराती , मार्गदर्शन ,निकाल
+  प्रत्येक विषयावर सराव प्रश्न
+ प्रत्येक विषयावर महत्वाच्या नोट्स
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे


Wednesday, October 24, 2018

In Memoriam

In Memoriam

by Ewart Alan Mackintosh (killed in action 21st November 1917 aged 24)

So you were David’s father,
And he was your only son,
And the new-cut peats are rotting
And the work is left undone,
Because of an old man weeping,
Just an old man in pain,
For David, his son David,
That will not come again.

Oh, the letters he wrote you,
And I can see them still,
Not a word of the fighting,
But just the sheep on the hill
And how you should get the crops in
Ere the year get stormier,
And the Bosches have got his body,
And I was his officer.

You were only David’s father,
But I had fifty sons
When we went up in the evening
Under the arch of the guns,
And we came back at twilight - 
O God! I heard them call
To me for help and pity
That could not help at all.

Oh, never will I forget you,
My men that trusted me,
More my sons than your fathers’,
For they could only see
The little helpless babies
And the young men in their pride.
They could not see you dying,
And hold you while you died.

Happy and young and gallant,
They saw their first-born go,
But not the strong limbs broken
And the beautiful men brought low,
The piteous writhing bodies,
They screamed “Don’t leave me, sir”,
For they were only your fathers
But I was your officer.

Saturday, October 20, 2018

NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती

(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध पदांची भरती


जाहिरात क्र.: Kakrapar Gujarat Site/HRM/01/2018

Total: 59 जागा

पदाचे नाव:  

1. ड्रायव्हर-सह-पंप ऑपरेटर-सह-फायरमन/A(DPOF): 04 जागा

2. नर्स/A: 07 जागा

3. टेक्निशिअन/C ( एक्स रे टेक्निशिअन): 01 जागा

4. स्टायपेंडरी ट्रेनी-(डेंटल टेक्निशिअन): 01 जागा

5.स्टेनोग्राफर ग्रेड I: 21 जागा

6.असिस्टंट ग्रेड I  (HR): 09 जागा

7.असिस्टंट ग्रेड I (F&A): 07 जागा

8. असिस्टंट ग्रेड I (C & MM): 09 जागा

शैक्षणिक पात्रता: 

पद क्र.1:
(i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)   
(ii) 01 वर्षे अनुभवासह अवजड वाहन चालक परवाना 
(iii) फायरमन कोर्स

 पद क्र.2: 
(i) 12 वी उत्तीर्ण 
(ii) नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा  किंवा B.Sc (नर्सिंग) किंवा समतुल्य 

पद क्र.3:
(i) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण  
(ii) मेडिकल रेडिओग्राफी /एक्स रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र   
(iii) 02 वर्षे अनुभव 

पद क्र.4:
(i) 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (विज्ञान)   
(ii) डेंटल टेक्निशिअन डिप्लोमा 

पद क्र.5: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  
(ii) संगणकावर इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि

पद क्र.6: 
(i) 50% गुणांसह BA/B.Com/B.Sc  
(ii) संगणकावर इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि 
(iii) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

पद क्र.7:
(i) 50% गुणांसह B.Com 
(ii) संगणकावर इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि 
(iii) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

पद क्र.8:
(i) 50% गुणांसह B.Com/B.Sc (PCM)  
(ii) संगणकावर इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि 
(iii) संगणक कोर्स प्रमाणपत्र 

वयाची अट: 
25 ऑक्टोबर 2018 रोजी,

 [SC/ST:05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 & 3: 18 ते 25 वर्षे 

पद क्र.2: 18 ते 30 वर्षे 

पद क्र.4: 18 ते 24 वर्षे 

पद क्र.5 ते 8: 21 ते 28 वर्षे 

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: तापी, गुजरात

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:25 ऑक्टोबर 2018 (04:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

_____________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+  महत्वाच्या चालू घडामोडी
+  नोकरी च्या जाहिराती , मार्गदर्शन ,निकाल
+  प्रत्येक विषयावर सराव प्रश्न
+ प्रत्येक विषयावर महत्वाच्या नोट्स
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे

Wednesday, October 17, 2018

सर्वश्रेष्ठ दाता

          एकदा कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते.
               अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही?

लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकडयांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि   अर्जुनाला म्हणाला......   हे सगळे सोने गावकऱ्यांमध्ये वाटून टाक अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस. 
              लगेच अर्जुन जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की... मी प्रत्येक गावकऱ्याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले.
पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.
               दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडीदेखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जुन अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता.
         शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास....! आता यापुढे मी काम करू शकत नाही. 
              मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की....... या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या......
                 लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना बोलवले आणि सांगितले की.....

या दोन सोन्याच्या टेकडया तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जुन चकित होऊन पाहात बसला.
        हा विचार आपल्या मनात का आला नाही..... या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला..... अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास.....! तू गर्वाने प्रत्येक....... गावकऱ्याला सोने वाटू लागलास. जणू काही आपण उपकार करतो आहोत अशा थाटात तू दान करत होतास.....! 
              कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने दान केले आणि तो निघूनही गेला.
आपले कुणी कौतुक करतंय..... गुणगान गातंय...... हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे. देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे..... शुभेच्छा द्याव्यात..... धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा ठेवणे..... म्हणजे ते काही निरपेक्ष दान नसते.
कुठल्याही परताव्याची अपेक्षा न ठेवता दान करावे.............

         "काय चुकलं" हे शोधायला हवं, पण आपण मात्र "कुणाचं चुकलं" हेच शोधत राहतो.. आपली माणसं मोठी करा,

आपोआप आपणही मोठे होऊ...

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...