Saturday, June 30, 2018

छत्रपती शाहूमहाराज आणि अस्पृश्यता निवारण

कोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते.

जेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ गडबड उडाली.

तिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम नावाचा एक मराठा शिपाई आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील घोड्याच्या पागेतील मोतद्दारास जबरदस्त मारहाण करत होते.

कारण होतं, त्यानं पाणी पिण्यासाठी मराठ्यांसाठी असलेल्या हौदाला स्पर्श केल्याचं.

एका अस्पृश्यानं हौद बाटवला म्हणून संताराम आणि त्याचे साथीदार हातात चाबूक घेवून गंगाराम यांची पाठ फोडून काढत होते. त्यांनी त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला.

खरं तरं 1919ला शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर हुकूम काढला होता. महाराजांचं या संदर्भातलं धोरण माहीत असूनही त्यांच्या संस्थानात ही घटना घडली होती. हे सर्व घडत असताना महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते.

ते दिल्लीहून येण्याची गंगाराम वाट पाहात होते. महाराज कोल्हापूरला आले. त्यांचा मुक्काम कोल्हापूर शहराबाहेरील सोनतळी इथं होता. महाराज आल्याचं कळताच गंगाराम अस्पृश्य बांधवांसह महाराजांना जाऊन भेटले.

महाराजांनी गंगाराम कांबळे यांनी येण्याचं कारण विचारले. गंगाराम कांबळे यांना हुंदका अनावर झाला त्यांनी त्यांची पाठ उघडी करून दाखवली आणि झालेला सर्व प्रकार महाराजांना सांगितला.

गंगाराम कांबळेंवर झालेल्या अत्याचाराची कथा ऐकून महाराजांच्या डोळ्यात अंगार फुलत होता. ताबडतोब त्यांनी गंगाराम कांबळेंना ज्यांनी मारलं त्यांना बोलावलं आणि स्वतःच्या हातात घोड्याची कमची घेऊन त्यांच्या पाठी फोडून काढल्या.

हे करत असताना हा मराठा आहे, असा विचार त्यांनी केला नाही आणि गंगाराम यांच्या समोर त्यांना शिक्षा दिली.

मग त्यांनी गंगाराम यांना जवळ घेतलं. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. ते म्हणाले, "जा, गंगाराम तुला नोकरी माफ केली. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर. लागेल ती मदत माझ्याकडे माग."

अस्पृश्यांनी वरच्या दर्जाच्या लोकांप्रमाणे काही व्यवसाय करणे हे त्या काळच्या समाजाला पचणारं नव्हतं. तरीही शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना व्यवसाय करण्याचा मार्ग खुला केला.

पुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर 'सत्यसुधारक' हॉटेल सुरू केलं.

त्यांच्या हॉटेलची स्वच्छता आणि उत्तम चहा कुणालाही लाजवेल असा होता. पण ते अस्पृश्याचं हॉटेल आहे, असे समजताच सवर्ण मंडळी या हॉटेलात जायची बंद झाली. एका अस्पृश्यानं सर्वांना चहा द्यावा, या विचारानेच सवर्ण मंडळी संतप्त झाली होती.

ही बातमी महाराजांना समजायला वेळ लागली नाही.

समाज हा कायदे करून बदलत नाही, त्यासाठी काही नामी युक्त्या कराव्या लागतात. समाजाला गोड बोलून परिवर्तनाच्या दिशेनं वळवावं लागतं, याची महाराजांना जाण होती.

त्यामुळे कोल्हापुरात फेरफटका मारताना त्यांची घोडागाडी (खडखडा) गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर थांबू लागली.

'काय रे तू हॉटेल काढलयसं म्हणं? खरं काय?'

राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना विचारलं.

'होय महाराज, आपणच सांगितलं काही तरी स्वतंत्र धंदा सुरू कर म्हणून,!' गंगाराम कांबळे यांनी उत्तर दिलं.

'मग, पाटी का लावली नाहीस कुणाचं हॉटेल आहे म्हणून?'

'काय म्हणून पाटी लावायची महाराज? माझी काय कुणावर सक्ती आहे? सगळ्या हाटेलवर काय जातीच्या पाट्या लागल्यात?

'असं, व्हय? खरं हाय तुझं. आतापर्यंत किती लोक चहा प्यायले तुझ्या दुकानात?'

'बरेच लोक प्यायलेत. मला संख्या माहीत नाही.'

'मग सगळ्या गावालाच बाटवलसं की तू. बरं तर चांगला चहा करून ठेव. जाताना येतो मी.'

महाराजांनी आपण चहा प्यायला येणार हे बाहेर गाडीत बसूनच सांगितलं. महाराज गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहासाठी येणार ही बातमी म्हणता म्हणता सगळ्या कोल्हापुरात पसरली.

महाराज येण्यापूर्वीच अनेक लोक हॉटेलसमोर थांबले. या सगळ्या लोकांसमक्ष महाराज इथं चहा प्यायले. आणि त्यांच्या गाडीतल्या इतर मंडळींनाही चहा पाजला.

चहा घेऊन झाल्यानंतर महाराज गंगाराम यांना म्हणाले, "तू सोडावॉटरचं यंत्रही घे. मी घेऊन देईन तुला." महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेलमध्ये सोडावॉटरचं मशिनही घेऊन दिलं.

गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातल्या भाऊसिंगजी रोडवर हॉटेल सुरू केलं होत. या घटनेला 100 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. राजर्षी शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातला हा संवाद बरंच काही सांगतो.

शाहू महाराजांनी समाजाला दुभंगीत करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा आणि व्यवस्थांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा, त्यांना मानवी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.

उदात्त मानवी जीवन उभारण्याची त्यांची एक खास शैली होती. ती कधी सडेतोड, कधी मुत्सद्देगिरीची, कधी अपरंपार प्रेमाची, कधी प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणारी तर कधी मिश्किलपणे धडा शिकवणारी होती.

तो काळच असा होता की अस्पृश्यांना शिवणे म्हणजे मोठी अपवित्र गोष्ट आणि अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या वस्तुंना, ठिकाणांना, देवळांना शिवणे हा मोठा गुन्हा समजला जात होता.

या स्पृश्यांमध्ये केवळ ब्राह्मणच नव्हे तर मराठे आणि तत्सम अनेक जातींचे लोकही होते. अशा सामाजिक परिस्थितीत शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत स्वतःच जाहीर कृत्यांनी प्रस्थापित समाजाला हादरे दिले.

शाहू महाराज 1920मध्ये नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेला अध्यक्ष म्हणून गेले होते. यात त्यांनी मुद्दामच अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला होता.

पुढच्याच महिन्यात नाशकात अस्पृश्य वसतिगृहाच्या पायाभरणी समारंभासाठी गेले होते. इथं त्यांनी शेकडो लोकांच्या समोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला. याचीच पुनरावृत्ती त्यांनी तासगावला केली होती.

शिवाजी महाराजांच्या वंशजानं त्याकाळात कर्मठ समाजासमोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचं अन्नपाणी घेणं, हा शाहू महाराजांनी दिलेला एक क्रांतिकारक संदेश होता.

Monday, June 18, 2018

खरा देशभक्त

एक साधासुधा गरीब पण संवेदना जिवंत असणारा भारतीय नागरिक सुद्धा हजारो जणांचे प्राण वाचवू शकतो यार....
मित्रा तुझे सव्वाशे कोटी आभार.....

          स्वपन देबर्मा त्याच्या मुलीसोबत

या फाटक्या दिसणाऱ्या माणसाने शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता त्रिपुरात वाचवले अगणित लोकांचे प्राण....
गेले अनेक दिवसात त्रिपुरात कोसळणाऱ्या धुवाधार पावसामुळे रेल्वेमार्गाच्या शेजारची माती भुसभुशीत झाल्याने एका अत्यंत अडचणीच्या ठिकाणी रेल्वेमार्गावर इथली दरड कोसळली असल्याचे स्वपन देबर्मा या गरीब शेतमजुराने पहिली. स्वपन तेव्हा दुपारचे जेवण करून आपल्या शेतीच्या रोजंदारीच्या कामावर  आपल्या लहानग्या मुलीसोबत निघाला होता.
गावापासून खूप लांब असलेल्या या ठिकाणी काही तासातच अंबासा वरून आगरतळाला जाणारी रेल्वे धडधडत जाणार होती.
काय भीषण प्रकार होऊ शकतो हे लक्षात आल्यावर लगेच स्वपन आपल्या मुलीला घेऊन अर्ध्या दिवसाच्या रोजंदारीच्या त्याला मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता धावत पुढे निघाला आणि एका मोकळ्या ठिकाणी थांबला.
जवळपास ३ तासांनी बहुधा पावसामुळे नेहमी वेळेवर येणारी ही रेल्वे त्या दिवशी मात्र अजून उशिरा धडधडत येताना स्वपनला दुरूनच दिसली. 
स्वपनने आपल्या कमरेचा छोटासा फाटका टॉवेल रेल्वेमार्गावर उभा राहून इशारा म्हणून जोरजोरात हलवायला सुरुवात केली. पण हे इतके बहुधा पुरेसे नाही असे लक्षात आल्यावर आता त्याने आपल्या हातातली पिशवी एका हातात आणि टॉवेल एका हातात असे धरून आता रेल्वेमार्गावर उड्या मारायला सुरुवात केली.
वेगात धडधडत येणाऱ्या रेल्वेच्या मार्गात उभे राहून हे जीवावरचे काम करताना आधी स्वपनने आपल्या लहानगीला रेल्वेमार्गापासून दूर उभे केले होते.
डोंगर दर्यांनी भरलेल्या पण कदाचित उशीर झाल्याने त्रिपुरातल्या रेल्वेमार्गावरून वेगात सुसाटत निघालेल्या रेल्वेच्या चालकाने हातात काहीतरी धरून हलवत उड्या मारणाऱ्या एका बारीक चणीच्या इसमाला बर्यापैकी जवळ आल्यावर पाहिले आणि ताकतीचे आयत्या वेळचे ब्रेक्स लावत हजारो प्रवाशांना घेऊन सुसाटत निघालेली रेल्वे कशीबशी स्वपनच्या समोर काही अंतरावर येऊन थांबवली.
स्थानिक भाषा न येणाऱ्या चालकाला स्वपन याने पुढे रेल्वेमार्गावर दरड कोसळली असल्याचे हातवाऱ्यांनी सांगितले.
चालकाने घडलेल्या प्रकारची कल्पना त्वरित संबंधीत कार्यालयात पोचवली आणि मागून येणाऱ्या गाड्या थांबवण्याची व्यवस्था केली.
आता स्वपनला घेऊन चालक पुढे चालत निघाला आणि मार्गावर कोसळलेली दरड पाहून स्वपन नसता तर काय भीषण प्रकार घडला असता हे समजून अंतर्बाह्य हादरला.
दरड पाहिल्यावर स्वपनची भाषा येत नसल्याने पहिली काय गोष्ट चालकाने केली असेल तर स्वपनला अत्य्नंदाने मिठी मारली आणि त्याचे कौतुक केले.
धन्यवाद स्वपन.... पहिलं म्हणजे तू एक जबऱ्या पिता आहेस कारण छायाचित्रात दिसते आहेस त्यावरून तुझ्या पायातली स्लीपर तू आपल्या लहानग्या मुलीच्या पायात घातली आहेस आणि तू मात्र अनवाणी चालत आहेस....
आणि दुसरं म्हणजे....
...हातावर स्वतःचे आणि स्वतःच्या मुलीचे पोट असूनही, अर्ध्या दिवसाची पूर्ण मजुरी वाया जाणार आणि कदाचित घरी संध्याकाळची भाकरी शिजणार नाही हे पक्के ठाऊक असूनही, रेल्वे थांबली नाहीतर स्वतःचा जीव धोक्यात येऊ शकतो याची पूर्ण जाणीव असूनही, स्वतःच्या मुलीचे भवितव्य पणाला लावून प्रसंगावधान राखून रेल्वेमार्गावर जीवाच्या आकांताने धावत निघालेला स्वपन या धाडसी भारतीय नागरिकाने शुक्रवारी संध्याकाळी केवळ शेकडो प्राण वाचवले असे नाही तर या घरी परतणाऱ्या जीवांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या हजारोंचे आशीर्वाद सुद्धा मिळवले....

Monday, June 11, 2018

आई कोणालाच कळत नाही

आई  तुला काही कळत नाही !
किती सहजपणे आपण हे वाक्य उच्चारतो⁉

खरच आई तुला काही कळत नाही

ज्या दिवसी पोटात बाळ असल्याची जाणीव होते , त्या दिवसापासून ती स्वतःसाठी जगायचे विसरून गेलेली असते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

दिवसभर  घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून दमलेली तू
रात्रीच्या रात्री आमच्यासाठी जागून काढते ,
लहान असताना आम्ही का रडतोय हे न कळाल्याने आणि
आम्ही मोठे असताना तुला का रडवतोय ? हे न कळाल्यामुळे ,
खरच आई तुला काही कळत नाही !

आमचा चेहरा कोणत्याही कारणाने पडला तर तुझ्या हातातला घास तोंडात न जाता ताटातच गळून पडतो , मग
तुला कितीही भूक लागलेली असली तरी ,
खरच आई तुला काही कळत नाही !

आमच्या चुकीला झाकताना प्रसंगी बापाच्या शिव्या खाऊन , काही वेळा मार खाऊनही
तू कधी चकार शब्द उच्चारला नाही ,
खरच आई तुला काही कळत नाही !

बाजारातून आणलेला खाऊ प्रत्येक घरात मर्यादित असतो , तुलाही तो आमच्याइतकाच आवडत असतो , पण
तुझ्या वाट्याला तो नेहमी सर्वांपेक्षा कमी येतो , तरीही आई तू आयुष्यात एकदासुध्दा तक्रार केली नाही ,
खरच आई तुला काही कळत नाही !

मुलावर कर्ज झाले तर बापाच्या परस्पर मागच्या हाताने आमच्यासाठीच ठेवलेले पैसे गुपचूप आम्हाला देते , वेळ आलीच तर स्वतःचे दागिनेही देते आणि
समारंभात खोटे दागिने घालून उसने हासू चेहऱ्यावर आणून मिरवते आणि आमचे कार्यक्रम राबराब राबून उत्साहाने पार पाडते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

आमच्यावर कोणी चालून आला , तर
आपल्या जीवाची पर्वा न करता माणूसच काय ? तू नाग , वाघ आणि बिबट्यावरही धाऊन जाते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

शेवटचा श्वास घेतानासुध्दा लेकराचाच विचार आणि काळजी करत तू प्राण सोडते ,
शेवटी देवाचे नाव मुखात यावे हे तुला माहीत असूनही तू लेकराचेच नाव घेते , आईला देवापेक्षाही लेकरू मोठे वाटते ,
खरच आई तुला काही कळत नाही !

म्हणून देवही तुझ्यापुढे खुजा आहे ,
पण तुला हे कधी समजलेच नाही ,
खरच आई तुला काही कळत नाही !

लेकुराचे हीत ।
वाहे माऊलीचे चित्त ।।
ऐसी कळवळ्याची जाती ।
करी लाभावीण प्रिती ।।
खरच आई तुला काही कळत नाही !
                    आणि
  आई कोणालाच कळत नाही !

Sunday, June 10, 2018

स्मार्ट उद्योजक' च्या WhatsApp आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त ₹६० मध्ये

'स्मार्ट उद्योजक' च्या WhatsApp आवृत्तीचे वर्गणीदार व्हा फक्त ₹६० मध्ये

'स्मार्ट उद्योजक' हे व्यवसाय आणि उद्योजकता विषयक मासिक आहे. एप्रिल २०१५ पासून हे मुंबईतून प्रकाशित होते. उद्योजकांना त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी लागणारे विविध विषय जसे की मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स, मनुष्यबळ, ऑपरेशन्स अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे लेख या मासिकात दर महिन्याला प्रकाशित होतात. तसेच ज्यांना भविष्यात उद्योजक होऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे अशांसाठी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा व उद्योजकता विकासविषयक साहित्यही या मासिकात प्रसिद्ध होते.

आतापर्यंत मुद्रित आणि डिजिटल अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये हे मासिक प्रकाशित होत होते. जून २०१८ पासून 'स्मार्ट उद्योजक' आपली WhatsApp आवृत्तीही प्रकाशित करणार आहे. प्रत्येकाच्या खिशाला परवडावी म्हणून या WhatsApp आवृत्तीची प्रारंभाची वर्गणी ही फक्त ६० रुपये ठेवली आहे. फक्त ६० रुपयांत आपल्या WhatsApp वर वर्षभर (नियमित १२ अंक + दिवाळी अंक) मिळतील.

'स्मार्ट उद्योजक' WhatsApp आवृत्तीचे वर्गणीदार होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :

https://imjo.in/M3btyu

'स्मार्ट उद्योजका'चा नमुना अंक पाहण्यासाठी खालील लिंकमध्ये डिजिटल अंक जोडत आहे.

नमुना अंक डाउनलोड करण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा : https://bit.ly/2s6pr7S

Friday, June 8, 2018

टायटॅनिक बुडाले तेव्हा

टायटॅनिक बुडाले तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती.
 
त्यापैकी एक सॅम्पसन म्हणून ओळखले जात असे. ते टायटॅनिकपासून 7 मैल दूर होते आणि त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून टायटॅनिक च्या उलट दिशेने निघून गेले

हे जहाज आपल्यापैकी त्या लोकांच प्रतिनिधित्व करतात जे लोक आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आणि कोणीतरी गरजवंत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!

दुसरे जहाज कॅलिफोर्निया होते. हे जहाज टायटॅनिकपासून फक्त 14 मैलांवरच होते, पण ते चोहोबाजूंनी हिमनगांनी वेढलेले होते त्यावरिल कप्तानाने बाहेर बघितले आणि संकटात सापडल्याचा इशारा देणाऱ्या पांढऱ्या फ्लेयर्स पाहिल्या, परंतु परिस्थिती अनुकूल नव्हती आणि अंधारलेली होती म्हणून त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला व झोपी गेला व  क्रूंनी स्वत: ला असे समजावण्याचा प्रयत्न केला की काहीही झाले नाही....
हे जहाज आपल्यातील त्या व्यक्तींच प्रतिनिधीत्व करतात  जे आता काही करू शकत नाही  परिस्थिती योग्य नाहीत आणि त्यामुळे कोणाला मदत करण्यापूर्वी परिस्थिती अनुकूल होईपर्यंत ते प्रतीक्षा करतात

शेवटचे जहाज होते  कार्पाथियान. टायटानिकपासून 58 मैल दूर दक्षिणेकडील दिशेने धावणारी हे जहाज... त्यांनी रेडिओवर टायटँनिक वरील हलकल्लोळ, रडणे,मदतीचा आक्रोश  ऐकला,  या जहाजाचा कप्तानाने गुडघे टेकून, ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि मग पुर्ण वेगाने जहाज चालू केले आणि सभोवतालच्या पसरलेल्या हिमनगातून मार्ग काढत हे जहाज टायटॅनिक जवळ पोहोचले व हेच ते जहाज होते ज्याने टायटॅनिक वरिल 705 जणांना  वाचवले.

               

🎀 बोध....

अडथळे आणि जबाबदारी टाळण्यासाठी कारणे नेहमी असतील, परंतु जे लोक ते स्वीकारतात ते नेहमी त्यांच्या चांगल्या कृत्याने जगाच्या हृदयात स्थान मिळवतात....!
व जग नेहमी त्यांना त्यांच्या चांगुलपणामुळे अंतःकरणात स्थान देते

मला खरोखर इच्छा आहे की आम्ही सर्वांनी  कार्पेथियन प्रमाणे जीवनात जगावे...
ना की सॅम्पसन आणि कॅलिफोर्निया प्रमाणे जीवन व्यतीत करावे..

Thursday, June 7, 2018

दहावीचा निकाल आज

दहावीचा निकाल आज
 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच शुक्रवारी 8 जून 2018 रोजी जाहीर होणार आहे._

🕐 बोर्डाच्या www.mahresult.nic  या वेबसाईटवर दुपारी 1 पासून हा निकाल पाहता येईल.

👨‍🎓 राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

❗ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

⌛ दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे.

🌐 दहावीचा निकाल खालील वेबसाईटवर पाहू शकाल

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

--------------------------------

Tuesday, June 5, 2018

11 Lessons From Lord Shiva You Can Apply To Your Life

11 Lessons From Lord Shiva You Can Apply To Your Life
There is a reason Shiva is called 'The Devo ke Dev-Mahadev'. The tranquil-looking lord can turn into a destroyer, and can also be a bholenath. He has multiple shades to his personality, and is one god who can truly teach us the wisdom to live life. Take a look at 11 lessons we can learn from him.
1. Come what may, you must never tolerate evil 
Lord Shiva was known as the destroyer of evil. He couldn't tolerate injustice and destroyed the evil rakshasas in a fair manner. Similarly, even we should try to keep zero tolerance for the evil happening around us and take a stand against injustice.
2. Self-control is the key to living life to the fullest
An controlled mind can lead you to live a disastrous life. You cannot win battles when you lose focus and fall prey to your desires and addictions. Therefore, it’s necessary to keep your mind aligned to your goals and heart too.

3. Keep calm and carry on
Shiva was called a ‘Maha Yogi’ because he meditated for hours for the well-being of the universe. His calm state of mind was disturbed only due to extreme reasons, but otherwise he would always be in a meditative state of mind. Thus highlighting the fact that you can win half the battle just by being calm in a stressful situation. It's really the best strategy to sorting out a problem. 
4. Materialistic happiness never stays for long
Take a look at Shiva’s attire for a second. Only armed with a trishul and damru, Lord Shiva always stayed away from wealth. You’re missing out on nothing in life if you’re not attached to wealth and materialistic things. Because materialistic happiness is temporary. You need to find your happiness in events and experiences, and not things.
5. You must learn how to suppress negativity gracefully
Shiva was a ‘neelkanth’ because he swallowed poison named ‘halahala’, that emerged from the ocean. Only Shiva could have consumed this poison and suppressed it in his throat. The important lesson to take back from this incident is to take negativity in our stride, and turn it into positivity.
6. Desires lead to obsessions and obsessions lead to destruction
Since he was free from desires, Shiva never obsessed over things. It is a fact that desires always lead to obsessions, and these in turn make us self-destructive. 
7. Respect your better half
Shiva was ‘Ardhanarishwar’, where half of him was Parvati. He treated Parvati with utmost respect and care. She was his ‘shakti’ and he gave her the importance she deserved. 
8. You must control your ego and let go off pride
Your ego is the only thing that prevents you from attaining greatness. It is your ego that comes between your goals and your dreams, and makes you a less loving person. It is said that Shiva carried his trishul to keep his ego in check. He never let his ego get the better of himself. On the other hand, nor did he tolerate anyone else’s ego.
9. Do thorough research on something you're likely to get into
The Ganga in Shiva’s hair symbolises the end of ignorance. This implies that you should know what you are getting into. Being in denial about facts is not going to help.
10. Understand that everything is temporary 
Maha yogis don’t fall for ‘moh maya’. They know that life is ephemeral and what happens today is not going to exist forever. Time changes and so do we. 
11. Dance
Lord Shiva is known as Nataraja or the King of Dance. Although his ‘tandav’ destroyed the world, it was also an art that passed on to us.  

Sunday, June 3, 2018

How to join NDA (National Defence Academy)?

*How to join NDA (National Defence Academy)?*
*तयारी एन.डी.ए ची…!!!*   
**************************    

*(ही माहिती जास्तीत जास्त मराठी विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. जेणेकरून महाराष्ट्रातील अधिकाधिक तरुणांना लष्करात अधिकारी होण्याबद्दल माहिती मिळेल.*

         *देशासाठी काहीही करण्यासाठी आजची तरुण पिढी तयार आहे. देशाच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी काहीतरी करुन दाखवण्याची उर्मी या तरुणांमध्ये असते. मग देशाचे संरक्षण करण्याबरोबरच एक अत्युच्च प्रतीची जीवनशैली जगण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे भारतीय सैन्यदलांत म्हणजेच लष्कर, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होणे…!!! आज संपूर्ण भारतातील लाखो तरुण भारतीय सैन्यदलांत अधिकारी होण्याचं स्वप्नं उराशी बाळगून असतात. आणि संपूर्ण देशही सर्व प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्या संरक्षणदलांच्या भरवश्यावर निश्चिंत असतात. मग तो एखादा अतिरेकी हल्ला असो किवां देशाने नुकताच अनुभवलेला चेन्नई सारखा महापूर असो किंवा ढासळलेली कायदा व सुरक्षा स्थिती असो…. कोणत्याही आपत्कालीन स्थितीमध्ये एकदा का लष्कराने तेथील स्थितिचा ताबा घेतला की सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण होते.*

         *भारतीय संरक्षण दले देखील वेळोवेळी आपल्या देशातील तरुणांना लष्करी अधिकारी होण्याची संधी देत असतात. आज आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त संस्था "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी" म्हणजेच "National Defence Academy (NDA) / एन.डी.ए." च्या पात्रता, निवड प्रक्रिया व निवड झाल्यानंतरचे प्रशिक्षण या बद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय लष्कर, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची पूर्व तयारी संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या एन.डी.ए., खडकवासला, पूणे  येथे करवून घेतली जाते.*

*पात्रता:*
*शैक्षणिक पात्रता:*
         *एन.डी.ए. मध्ये दाखल होतांना उमेदवार १२वी उत्तीर्ण असायला हवा. अर्ज करण्यासाठी विद्यार्थी १२वीत शिकत असावा अथवा १२वी उत्तीर्ण असावा. एन.डी.ए. च्या आर्मी शाखेसाठी उमेदवार १२वी च्या कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेचा असावा. आणि हवाई दल व नौदल शाखेसाठी उमेदवारने १२वी ला गणित व भौतिकशास्त्र (Maths आणि Physics) हे विषय घेतलेले असावे.*

*वयोमर्यादा:*
         *एन.डी.ए मध्ये दाखल होतांना उमेदवारांचे वय - साडे सोळा ते साडे एकोणीस (Sixteen and Half to Nineteen and Half) दरम्यान असावे.*

*निवड प्रक्रिया:*
         *एन.डी.ए मध्ये दाखल होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगा मार्फत घेतली जाणारी प्रवेश परीक्षा व त्यानंतर होणारी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण करणे हा होय.*

*प्रवेश परीक्षा:*
         *एन.डी.ए ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा, एप्रिल व सप्टेंबर महिन्यात घेतली जाते. यासाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर हे दोन केंद्र असतात. या परीक्षेसाठी दोन पेपर्स असतात त्यात पहिला पेपर गणित (३०० गुण) व दुसरा पेपर सामान्य अध्ययनाचा (६०० गुण) असतो. एकूण ९०० गुणांची परीक्षा होते. या दोन्ही पेपर्ससाठी प्रत्येकी अडीच तासांची वेळ असते. संपूर्ण परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची असते. दोन्ही पेपर्स हे एकाच दिवशी घेतले जातात. गणित या विषयासाठी इ. ११वी व १२वी चा अभ्यासक्रम असतो तर सामान्य अध्ययन या पेपर मध्ये इंग्रजी, फिजिक्स, केमिस्ट्री, इतिहास, भूगोल, बायोलॉजी, भारतीय राज्यघटना व चालू घडामोडी इत्यादी विषय सामाविष्ट असतात. परीक्षा झाल्यानंतर साधारणता तीन महिन्यांनी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मार्फत मुलाखती साठी बोलावले जाते.*

*सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत:*
         *भारतीय सैन्यदलांत अधिकारी होऊ इच्छिणार्या सर्व तरुणांना ही मुलाखत उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत ५ दिवस चालते. मुलाखत दोन टप्यांत घेतली जाते.*

*पहिला टप्पा:*
         *या टप्यास स्क्रिनिंग टेस्ट असेही म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखवलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्या चित्रावर गटचर्चा करणे यांचा समावेश असतो. जे उमेदवार पहिल्या टप्यात उत्तीर्ण होतात त्यांनाच दुसर्या टप्यासाठी प्रवेश मिळतो. बाकीचे उमेदवार त्याच वेळी निवड प्रक्रियेतून बाहेर पडतात.*

*दुसरा टप्पा:*
         *या टप्यात उमेदवारांच्या मानसशास्त्रीय चाचण्या, ग्रुप टास्क्स (Group  Tasks) व वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असतो. मानसशास्त्रीय चाचण्यांमध्ये दिलेल्या चित्रांवरून गोष्ट लिहिणे, दिलेल्या शब्दांवरून वाक्य तयार करणे. दिलेल्या विविध परिस्थितींमधून मार्ग कसा काढणार हे लिहिणे तसेच स्वत:बद्दलचे मत लिहिणे या लेखी चाचण्यांचा समावेश असतो. ग्रुप टास्क्स मध्ये विविध प्रकारच्या सांघिक व वैयक्तिक चाचण्या घेतल्या जातात. यात उमेदवार विविध अडथळे एक संघ म्हणून कसे पार करतात हे पाहिले जाते. तसेच उमेदवार एक संघ नायक म्हणून कश्याप्रकारे काम करतो हे देखील पाहिले जाते. याच बरोबर येथे गट चर्चांचाही समावेश असतो. या सर्व गट चर्चा इंग्रजी मध्ये होतात. वैयक्तिक चाचण्यांमध्ये दिलेल्या विषयांमधील एका विषयावर तीन मिनिटे भाषण करणे, तसेच जमिनीवरचे विविध अडथळे तीन मिनिटात पार करणे अशा चाचण्यांचा समावेश असतो. हवाई दलात वैमानिक होऊ इच्छिणार्या उमेदवारांची Pilot Aptitude Battery Test  (PABT) ही आणखी एक चाचणी होते.*
         *मुलाखतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. जे उमेदवार मुलाखत उत्तीर्ण झाले असतील त्यांची पुढील काही दिवस वैद्यकीय चाचणी घेतली जाते. यानंतर एक अंतिम गुणवत्ता यादी प्रकाशित करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना एन.डी.ए च्या आर्मी, नौदल किंवा हवाई दल या शाखांत आपल्या आवडीनुसार आणि अंतिम गुणवत्ता यादीतील स्थानानुसार प्रवेश दिला जातो.*

*एन.डी.ए. मधील प्रशिक्षण:*
         *एन.डी.ए. मधील प्रशिक्षण कालावधी हा बी. एस. सी. तीन तर बी. ई. चार वर्षांचा असतो. येथे विद्यार्थी आपल्या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच खडतर शारीरिक व मिलिटरीचे* *प्रशिक्षणही पूर्ण करतात. एन.डी.ए. मधील बी. एस. सी. चा तीन वर्षांचा कालावधी हा सहा टर्म मध्ये विभागलेला असतो तर बी. ई. 8 टर्म मध्ये.*
*येथील प्रशिक्षणात ७०% भर अभ्यासावर तर ३०% भर हा शारीरिक प्रशिक्षणावर असतो. येथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची विविध स्क्वाड्रन्स मधे विभागणी केली जाते. हे स्क्वाड्रन्स हेच पुढील तीन वर्ष या विद्यार्थ्यांचे घर असते. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांची नियमितपणे परेड, पोहणे, विविध खेळांची तयारी करवून घेतली जाते. या प्रशिक्षणात येथे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे एका १२वी पास विद्यार्थ्यामधून भविष्यातील लष्करी* *अधिकार्यामधे रुपांतर केले जाते. एन.डी.ए. चे तीन / चार वर्षांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेले कॅडेट्स आणखी एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण झाले की आर्मी, नौदल किंवा हवाई दलात अधिकारी होतात. एन.डी.ए. च्या माजी विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन अधिकारी पदावर काम करत असतांना नेहमीच आपल्या देशाची व त्यांना घडविलेल्या प्रशिक्षण संस्थेची मान आणि शान उंचावली आहे. या संस्थेने आजवर देशाला दिलेल्या हजारो दर्जेदार अधिकार्यांपैकी अनेक अधिकार्यांना त्यांनी दाखविलेल्या अतुलनीय शौर्या बद्दल विविध शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारताचे पहिले अंतराळवीर स्क्वाड्रन्स लीडर राकेश शर्मा (अशोक चक्र) हे देखील एन.डी.ए. च्या ३५व्या तुकडीचे विद्यार्थी होते. १२वी नंतर करिअर करण्यासाठी एन.डी.ए. हा सर्वोत्तम पर्याय आहे.*

*सैन्यदलांत अधिकारी होण्याचे फायदे:*
         *एक सैन्य अधिकारी म्हणून काम करत असतांना तरुणांना विविधतेने नटलेला आपला संपूर्ण देश पहाण्याची तसेच कामानिमित्त विदेशात जाण्याचीही संधी मिळते. सर्व प्रकारचे साहसी खेळ उदा. पैरा जंपींग, रिव्हर राफ्टींग, स्कुबा डायव्हिंग, रोप क्लायंबींग, ट्रेकिंग, बर्फावरील स्किईंग तसेच रायफल शुटींग, हॉर्स रायडींग, गोल्फ, पोलो, हॉकी, फुटबॉल व इतर सर्व खेळ खेळण्याची संधी मिळते.*
सातव्या वेतन आयोगा नुसार दरमहा पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते, रहाण्यासाठी क्वार्टर्स, सी.एस.डी. कॅन्टिनची सुविधा, पेन्शन तसेच वर्षात भरपूर रजा, अभ्यासासाठी पगारी रजा, देश पातळीवर नावाजलेल्या मैनेजमेंट कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राखीव जागा इ. सुविधा मिळतात. येथील अधिकार्यांना जगातील नवीन तंत्रज्ञान हाताळण्याची संधी मिळते. अतिप्रगत बंदुका, नौदलातील  लढाऊ जहाजे, पाणबुडी तसेच हेलीकॉप्टर व ध्वनिपेक्षाही वेगाने उडणारे लढाऊ विमाने चालविण्याची संधी मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे येथे काम करण्याचे समाधान मिळते.*

*अर्ज कधी करावे:*
         *जून मध्ये १२वी ला प्रवेश घेणारे तसेच १२वी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जून महिन्यात एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यांची एन.डी.ए. प्रवेशासाठी परीक्षा दि. सप्टेंबर मध्ये घेण्यात येईल. या विद्यार्थ्यांनी आपली ११वीची किंवा १२वी ची परीक्षा झाल्यानंतर लगेच मे महिन्यापासून एन.डी.ए. च्या प्रवेश परीक्षेची आणि मुलाखतीची अंतिम तयारी सुरु करायला हवी. यंदा १२वीला शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी एन.डी.ए. साठी अर्ज केला आहे त्यांची प्रवेश परीक्षा एप्रिल मध्ये घेण्यात येइल. या विद्याथ्यांना १२वी ची परीक्षा झाल्यानंतर जो वेळ मिळेल त्याचा उपयोग त्यांनी एन.डी.ए. च्या तयारीसाठी करावा.*

*शालेय विद्यार्थ्यांसाठी:*
         *सध्या शालेय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी पुढील मार्गांनी एन.डी.ए. मध्ये दाखल होऊ शकतात.*

*एन.डी.ए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी शासनाने विविध संस्थांची स्थापना केलेली आहे. या काही दर्जेदार शिक्षण देणार्या सर्वोत्तम संस्थापैकी काही संस्थांची थोडक्यात माहिती:*

१. *सैनिक स्कूल, सातारा: ५वी व ८वी च्या विद्यार्थांसाठी:*
        *येथे विद्यार्थ्यांना इ. ६वी व ९वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दरवर्षी जानेवारी महिन्यात घेण्यात येते. अर्ज करण्यासाठी इ. ५वी व ८वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. अधिक माहिती *www.sainiksatara.org* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.*

२. *राष्ट्रीय इंडीयन मिलिटरी कॉलेज (RIMC), डेहराडून:* *६वी व ७वी च्या विद्यार्थांसाठी:*
         *येथे विद्यार्थ्यांना इ. ८वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. अर्ज करण्यासाठी इ. ६वी व ७वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी पात्र असतात. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा वर्षातून दोन वेळेस, जून व डिसेंबर महिन्यात घेतली जाते. अधिक माहिती *www.rimc.gov.in* या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.*

३. *सर्व्हिसेस प्रिपरेटरी इंस्टिट्यूट (SPI), औरंगाबाद: १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी:*
         *या संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केवळ महाराष्ट्रीयन मुलांसाठी केली गेलेली आहे. येथे विद्यार्थ्यांना इ. ११वी साठी प्रवेश देण्यात येतो. येथे विद्यार्थी १२वी पर्यंत शिक्षण घेतात. येथे ११वी व १२वी च्या अभ्यासाबरोबरच एन.डी.ए. प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. आजवर या संस्थेने देशाला ४०० पेक्षा अधिक सैन्याधिकारी दिले आहेत. या संस्थेसाठी १०वीत शिकत असलेल्या मुलांकडून (पुरुष उमेदवार) अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दि. २८ फेब्रुवारी पर्यंत आपले अर्ज संस्थेमध्ये पाठवावे. प्रवेश अर्ज व परीक्षा फी भरण्यासाठीचे बँकेचे चलन *www.spiaurangabad.com* या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. येथील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व मुलाखत एप्रिल व मे मध्ये घेण्यात येईल.*

         *अनेक पालकांची आपल्या पाल्याला एन.डी.ए. मध्ये पाठविण्याची इच्छा असते. परंतु योग्य मार्ग माहीत  नसल्यामुळे त्यांचे पाल्य एन.डी.ए. प्रवेशास मुकतात. बर्याच पालकांचा असा गैरसमज असतो की एन.डी.ए ला जाण्यासाठी घोडसवारी, रायफल शुटींग जमणे किंवा जिमला जाणे आवशक आहे. परंतु वरील माहिती वरून आपल्या लक्षात येईल की एन.डी.ए. च्या लेखी परीक्षेसाठी ११वी व १२वी च्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच मुलाखत उत्तीर्ण करण्यासाठी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून एखादा सांघिक खेळ खेळून आपले नेतृत्व गुण विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी रोज थोडावेळ मैदानात जाऊन व्यायाम केला किंवा नियमितपणे मैदानात एखादा सांघिक खेळ खेळला तरीही असे विद्यार्थी एन.डी.ए. निवडी मधील सर्व शारीरिक चाचण्या पूर्ण करू शकतात. एक गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते की एन.डी.ए. ला निवड झालेले बरेचशे विद्यार्थी हे सर्वसाधारण कुटुंबातील तसेच कोणत्याही प्रकारची लष्करी पार्श्वभूमी नसलेली असतात. एन.डी.ए. मध्ये फक्त लष्करी अधिकार्यांचेच मुले सिलेक्ट होतात हा देखील एक गैरसमज अथवा न्यूनगंड आहे. गुगल वर थोडा शोध घेतला की लक्षात येईल की एका सर्वसाधारण रिक्षा चालकाचा मुलगा, शेतकर्याचा मुलगा, प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, पोलिस हवालदाराचा मुलगा असे बिगर लष्करी पार्श्वभूमी असलेले असंख्य मुले एन.डी.ए. मध्ये दाखल होऊन आज लष्करात अधिकारी पदाच्या मोठ्या हुद्यावर आहेत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, निर्णय घ्या, एन.डी.ए. ला जाण्याचे आपले ध्येय्य निश्चित करा आणि लागा तयारीला..*

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...