प्यादीच का मरतात???
मला खूप दिवसांपासून प्रश्न पडला आहे की, बुद्धिबळात दोन्ही बाजूकडून प्यादीच पुढे का असतात?
उभा-आडवा मारा करु शकणारे बलदंड हत्ती , कानाकोपऱ्यातून तिरप्या चालीने वेध घेऊ शकणारे काटक उंट , उलटसुलट अडीच घरां पल्याड जाऊन हल्ला चढवू शकणारी घोडी , सर्वशक्तिमान वजीर आणि महामहीम बादशहा एवढी सारी मातब्बर मंडळी मागच्या रांगेत आणि तोफेच्या तोंडी कोण तर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसलेली, किरकोळ देहयष्टीची, एक-एक घर पुढे सरकणारी प्यादी! हा म्हणजे झाडाने सावलीत बसण्यातला प्रकार झाला!
बरं, इतर सर्व मोहरे प्रकरण अंगाशी आले तर मागे फिरु शकतात. प्याद्यांना ती मुभा नाही. एवढंच काय जीवाच्या आकांताने एखाद्या प्याद्याने शुत्रुचा प्रदेश पादाक्रांत करून अंतिम रेषा गाठलीच तरी पुनरुज्जीवन प्रतिष्ठितांचेच होणार. तसा रिवाजच आहे!
थोडक्यात काय तर प्यादी जन्माला येतात ती बळी जाण्यासाठीच. प्याद्यांनी फक्त लढायचं, तेही समोरच्या प्याद्यांविरुद्धच. का ते विचारायचं नाही.
सरपटत-फरफटत प्यादी लढणार, झगडणार, मरणार. स्मारकं मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जाणार. इतिहासाची पानही डामडौल्यांचीच नोंद घेणार. उदोउदोही मानकर्यांचाच होणार. कारण, तसाच रिवाज असतो!
( कार्यकर्त्यांनी समजून घ्या!)
समझने वाले को इशारा काफी है!
Real thoughts were written by someone but truth. Common man open your eyes its time to wake up.
No comments:
Post a Comment