Friday, August 31, 2018

ताण (टेंशन)

               बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
                एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
               मुलगा म्हणाला, "वादळीवार्‍यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'
                 त्या धनिक शेतकर्यारला हे थोडेसे वेगळं वाटलं. त्याला एका महत्वाचा कामासाठी बाहेर जायची घाईसुद्धा होती. कुतुहलाने त्याने मुलाला ठेवून घेतले. काम संपवून तो रात्री उशिराने थकून परत आला .थकल्याने तो लगेच झोपायला गेला. मध्यरात्री नंतर उशिराने सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला, वीजांचा कडकडाट होत व ढगांचा मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊसही सुरू झाला.
               त्यामुले त्या धनिक शेतकऱ्याची झोपमोड झाली. त्याला आठवले की, बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते.गोठ्यातील गुरांसाठी गव्हाणीत गवतही टाकलेले नव्हते व पाणीही ठेवलेले नव्हते.
                त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या पण त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीतचं धनिक शेतकर्यााने रेनकोट चढवला , छत्री, विजेरी घेतली आणि तो माळावर गेला.तेथे त्याला सर्व गवत नीट आवरून, त्याचे
ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत गोठ्यात गेला. गव्हाणीत
गवत, पाण्याचा ड्रम भरून ठेवलेला दिसला,सर्व गुरे चारापाणी खाऊन समाधानाने झोपलेली होती.
                 त्याने कुतूहलाने पाहिले, गोठातील वरच्या पोटमाळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! बाहेर निसर्गाचे एवढे तांडव चालले होते पण ते त्याच्या गावीही नव्हते. नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला कसलाही ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. ताणाला तिथे आत शिरायला फटच ठेवली नव्हती!

--रात्री झोपताना अभ्यास पूर्ण करा
--आपआपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करा
--सर्व अडचणींवर मात करता येत

Wednesday, August 29, 2018

my_master_used_to _ say

​​My Master used to say:
         "Religion can be given and taken more tangibly, more real than anything else in the world.” Be therefore spiritual first; have something to give, and then stand before the world and give it.
      Religion is not talk, nor doctrines nor theories, nor is it sectarianism. Religion cannot live insects and societies. It is the relation between the soul and God; how can it be made into a society?
       It would then degenerate into business, and wherever there is business, or  business principles in religion, spirituality dies. Religion does not consist in erecting temples, or building churches, or attending public worship.
          It is not to be found in books, not in words, nor in lectures, nor in organizations. Religion consists in realization. As a fact, we all know that nothing will satisfy us until we know the truth for ourselves.
         However we may argue, how ever much we may hear, but one thing will satisfy us, and that is our own realization, and such an experience is possible for every one of us, if we will only try.
        The first ideal of this attempt to realize religion is that of renunciation. As far as we can, we must give up. Light and darkness, enjoyment of Mammon." the world and enjoyment of God will never go together. “You cannot serve God and Mammon"
- Sri Ramakrishna

Tuesday, August 28, 2018

What this Inspirational Quote teaches us?

Start where you are. Use what you have. Do what you can.” –

What this Inspirational Quote teaches us?




       It is a human tendency to lose hope in life. At such time an Inspirational Quote like this one helps you to get up, dust yourself and move on. 

     Forging ahead in life is very essential for sustenance on the materialistic level. But not everyone is born with a silver spoon. No one will prepare a platter for you and serve it to you to give you the feel of being a Royal.

        You’ve got to start with whatever resources you have at your disposal. Whether it is time, money, finances or in times of trouble even a listening ear. If Gold wishes to gain that valuable shine, glitter and lustre, facing the heat becomes its destiny
       
          When time gives you a hard jolt that shakes you to your nerves, it is then when you need to pick yourself up and start from scratch.

     Give your outlook a transformation from pessimistic to an optimistic one. Make your own fundamentals after careful introspection of your thoughts. Stretch your comfort zone and begin to work with what you have got. Push your limits to their extreme heights, walk that extra mile and before you realize, you will have the ultimate results in your hand.

       Sometimes the ideas that begin on a piece of paper go on to become volumes for the world to read, the little things that you might not be observing carefully and might go unnoticed, when accumulated and brushed with the Midas touch of your knowledge and creativity, may give you the final product that brings global recognition to you.

           Pick up what you have, go against the odds of your life, do not get deviated from your vision, keep an unambiguous focus on your performance, never underestimate your own capabilities couple it with undeterred determination and work your way towards the zenith of glory.

Thursday, August 23, 2018

South East Central Railway Recruitment 2018

South East Central Railway Recruitment 2018

South East Central Railway Recruitment 2018 (South East Central Railway Bharti 2018) for 413 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961, Raipur Division of South East Central Railway. 

Advertisement No.: E/PB/RCT/Act App/2018/10

Total: 413 Posts

Name of the Post: Apprentice

Educational Qualification: (i) Must have passed the 10th class examination under 10+2 system or its equivalent  (ii) ITI in the relevant trade

Age Limit: 15 to 24 years as on 01 August 2018 [SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation]

Job Location: Raipur Division.

Fee: No fee.

Last Date of Online Application: 09 September 2018 (06:00 PM)

Notification: View

Online Application: Apply Online

_______________________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी
+ नोकरी च्या जाहिराती , मार्गदर्शन ,निकाल
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/लक्ष्यवेध

Tuesday, August 21, 2018

“दोष हा कुणाचा?”


“दोष हा कुणाचा?”

एका हाॅटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारच्या टेबलावर चार मुली बसल्या होत्या. त्यांचं जेवण आटोपलं, वेटर ने बडीशेपचा बाऊल समोर ठेवला. चारही मुलींनी टिश्यू पेपरमध्ये बचकभर बडीशेप भरून घेतली आणि ती पुरचुंडी पर्समध्ये टाकली. आजूबाजूच्या १०० माणसांमध्ये असूनही आणि चांगल्या कुटुंबातल्या असूनही असं करताना त्यांना काहीही वाटलं नाही.

अनेक काॅलेजवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी हाॅटेल्समधून चमचे चोरतानाही पाहिलं आहे. विमानातून प्रवास करताना काही मंडळी अक्षरश: ओंजळी भरभरून चाॅकलेट्स किंवा टाॅफीज् घेतात. काही रेल्वे प्रवासात पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेकजण दोन-दोन किंवा तीन-तीन बाटल्या सुद्धा घेतात. रेल्वे प्रवासात (केवळ त्या प्रवासापुरतेच मिळणारे) टर्किश नॅपकिन्स सर्रास बॅगेत भरतात. साॅस किंवा साखरेची ट्रॅव्हलिंग पाऊचेस न विचारता उचलणे, टीबॅग्ज उचलणे, टिश्यू पेपर्सचा गठ्ठाच उचलणे हे प्रकार माणसं अगदी बिनधास्त करतात.

एकदा एका ट्रेक ला गेलो होतो आणि एका रिसाॅर्टवर राहिलो. तिथं आलेल्या एकानं शॅम्पूचे सॅशे आणि साबणाच्या छोट्या वड्यांचा बाॅक्सच उचलून नेला. एका सुशिक्षित, जाणत्या बाईंनी लाॅबीमध्ये सहज म्हणून वाचण्याकरिता ठेवलेली दोन मॅगेझिन्स उचलली आणि पर्समध्ये घातली. हा प्रकार आजूबाजूची माणसं, हाॅटेल व्यवस्थापनातले कर्मचारी पाहत होते. पण कुणी काही विरोध केला नाही.

घराजवळच्या हाॅट चिप्स च्या दुकानात गेलो होतो. दोन मुली आल्या. त्यांनी सात-आठ प्रकारचे वेफर्स टेस्ट करून पाहिले आणि काहीही खरेदी न करता निघून गेल्या. दुकानाचा मालक म्हणाला, “ऐसे तो बहोत लोग आतें हैं , सब के सब पढें-लिखे और अच्छे घर के ही होतें हैं । पता नहीं, ऐसा क्यूॅं करतें हैं?”

रस्त्यावरच्या एखाद्या फळविक्रेत्याकडे गेलात आणि फळं खरेदी करायची असतील तर एखादं फळ चवीपुरतं चाखायला देतो. काहीजण स्वत:च हात पुढं करून सात-आठ फळं तर उभ्या-उभ्या सहजच मटकावतात. चणे विक्रेते किंवा चुरमुऱ्यांची भट्टी चालवणाऱ्यांना तर हा अनुभव दररोज शंभरदा येत असेल. माणसं अगदी स्वत:चा हक्क असल्यासारखा हात घालतात.

मंडईत गेलो होतो. कैऱ्या विकणाऱ्या एका वयस्कर विक्रेतीसमोर एक काकू उभ्या राहिल्या. विक्रेतीनं भाव सांगितला आणि कैरीची एक फोड कापून त्यांच्या हातावर ठेवली. कैरीची फोड खात-खात काकू एक अक्षरही न बोलता निघून गेल्या. आम्ही दोघेही शेजारीच उभे होतो. तो प्रसंग पाहून आम्हालाच कसंतरी झालं.

चांगली शिकली-सवरलेली माणसं अशी का वागत असतील? आपण परदेशातल्या लोकांकडून त्यांची भाषा, राहणीमान, कपडे, फॅशन्स हे सगळं घेतलं पण सार्वजनिक आयुष्यात ती माणसं किती संतुलितपणे वागतात,हे आपण नाही स्वीकारत..! 
कॅरीबॅगसाठी दुकानदारांशी हुज्जत घालणारी सुशिक्षित जनता मी पाहतो, तेव्हा मला त्यांच्या सुशिक्षितपणाचाच अर्थ लागत नाही. नुसतंच बाह्यरूप पाॅश करून आपण सुशिक्षित असल्याचा आभास निर्माण करत राहण्याच्याच कृत्रिम देखाव्याच्या चक्रात माणसं अडकली आहेत का?

हा बिनबुडाचा सुशिक्षितपणा केवळ अशा चोऱ्या-माऱ्या आणि उचलाउचलीचे उद्योग करून थांबत नाही. उघडपणे सामाजिक नियम मोडण्यातही हा वर्ग आघाडीवर आहे.

पेट्रोलपंपावर मोबाईल फोनवर गप्पा मारणे, एटीएम सेंटरमध्ये गाॅगल्स, स्कार्फ किंवा टोपी घालून जाणे, सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर खुशाल धूम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात बिनदिक्कतपणे थुंकणे, या गोष्टी करून माणसं नक्की काय दाखवण्याचा प्रयत्न करत असतात?

नामवंत काॅलेजेसमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी पार्किंग आणि नो पार्किंगमधला फरकही ओळखू शकत नाहीत का? सुशिक्षित माणसं मुद्दामच झेब्रा क्राॅसिंगवरच का थांबतात? शिकली-सवरलेली माणसं बसस्टाॅप सोडून भर रस्त्यावर गर्दी करून बसची वाट का पाहतात? खिशात पैसे असूनही बस कंडक्टर ला फसवून विनातिकीट प्रवास का करतात?

लक्ष्मी रस्ता हा जसा बाजारपेठेचा रस्ता आहे तसं ते माणसांच्या अतरंगीपणाची लक्षणं पाहण्याचंही एक ठिकाण आहे. माणसं रस्त्यातच आपली भलीमोठी चारचाकी गाडी थांबवून दुकानासमोर उतरतात आणि ड्रायव्हर ती गाडी रस्त्यातच उभी करून , काचा वर करून, आतमध्ये एसी लावून बसलेला असतो. बाकीची वाहतूक कोलमडून जाऊन याच्या नावानं शंख करत असते, पण हा एकदम कूल..!

माणसं कुल्फी घेतील आणि काड्या रस्त्यावरच टाकतील. मक्याचं कणीस घेतील, उरलेला भाग रस्त्यावरच टाकतील. प्लास्टिकच्या ग्लासात काॅर्नभेळ घेतील, रिकामा ग्लास रस्त्यावरच टाकून मोकळे.. याच रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत रस्ता क्राॅस करणारे अनेकजण दिसतील. नो एण्ट्री तून वाहने चालवणारे अनेकजण दिसतील. ही सगळी मंडळी लौकिकार्थानं किमान ग्रॅज्युएट तरी निश्चित असतात. पण, सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं आणि कसं वागू नये, असा कुठला पेपर त्यांच्या कोर्समध्ये नसतो, त्यामुळे त्या विषयाचा त्यांना गंध नसतो. त्यामुळे, सार्वजनिक जीवनात सगळे नापास!

अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या आहेत, तिथले खाद्यपदार्थ विक्रेते संध्याकाळी व्यवसाय संपला की, सांडपाणी थेट रस्त्यावर टाकून देतात. त्यामुळे तो रस्ता अस्वच्छ, चिकट होतो, माशा घोंगावतात. पण सार्वजनिक ठिकाणचं त्यांचं हे वागणं आपण कुणीही मनावर घेत नाही.

भर रात्री बारा वाजता झोपलेल्या जगाला जागं करून वाढदिवस साजरा करणारा एक नवीन वर्ग तयार झाला आहे. ही मंडळीसुद्धा सुशिक्षित असतात. अनेकदा काॅलेजात शिकत असतात. पण, भर रात्री केकच्या दुकानाबाहेरच टोळकं जमवून ज्याचा वाढदिवस आहे अशा उत्सवमूर्तीच्यातोंडाला, डोक्याला येथेच्छ केक फासून, त्याला दारू पाजून लाथाबुक्क्यांनी बदडून काढणे, त्याच्या डोक्यात अंडी फोडणे असे प्रकार करतात. हे सगळं चांगलं वागणं आहे का? आणि एकविसाव्या शतकातल्या समाजाला हे शोभतं का?

ही मंडळी असं का वागतात, याला काहीही उत्तर नसतं.अशी कितीतरी लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं आपल्याला ठायीठायी दिसतील. ही माणसं उघडपणे चोऱ्या करतात, गरिबांना नाडतात, त्यांना त्रास देतात, स्वत:च्या वागणुकीनं इतरांचं सार्वजनिक आयुष्यही पार खराब करून टाकतात. 
आपण यावर कधी आक्षेप घेतला आहे का? 
लोकांना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसेल पण स्वत:च्या ताटातलं मुसळ दिसणार नाही.

गाय दूध देते तेव्हा ते चांगलंच असतं. पण, आपण ते नीट तापवलं नाही तर ते नासणारच. म्हणून, मग आपण गायीला दोष देणार का? तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं दही कळकलं तर दोष दह्याचा नसतो आणि भांड्याचाही नसतो, दोष दही तांब्याच्या भांड्यात ठेवणाऱ्याचा असतो. 
आपण नेहमी प्रशासनाकडे, सरकारकडेच बोटं दाखवत राहू, आरोप करत राहू. सरकारकडून आपल्या अपेक्षा फार मोठ्या असतात, पण साध्या साध्या गोष्टी जपण्यातही आपण स्वत: कमी पडतो. स्वत:ला पारखलं आणि स्वत:च्या वागण्यातले दोष दूर करायचं ठरवलं तर प्रगतीला सुरूवात होईल..सगळं मळभ जाऊन आभाळ स्वच्छ होईल..!

समाजाने स्वत: पुढाकार घेऊन या साध्या साध्या गोष्टी सुधारल्या तर चांगले दिवस नक्कीच येतील...!

संग्रहित लेख

Monday, August 20, 2018

औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागात 220 जागांसाठी भरती - 2018

औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागात विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ४ सप्टेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

एकूण जागा:- 220

पदाचे नाव :-

1) बायोकेमिस्ट्री
2) केमिस्ट्री
3) पॉलिमर सायन्स
4) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
5) बायोमेडिकल इंजिनिअरिंग
6) कॉम्पुटर सायन्स /IT
7) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन
8) मेटलर्जिकल इंजिनिअरिंग

पात्रता:-

1) बायोकेमिस्ट्री पदव्युत्तर पदवी
2) केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी
3) पॉलिमर सायन्स पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (पॉलिमर)
4) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी 
5) BE/B.Tech (बायोमेडिकल)
6) कॉम्पुटर सायन्स /IT पदव्युत्तर पदवी किंवा BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स /IT)
7) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन)
8) BE/B.Tech (मेटलर्जिकल)

वयाची अट:-
4 सप्टेंबर2018 रोजी 21 ते 35 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)

Fee :-
General/OBC: ₹200/-
(SC/ST/अपंग/महिला: फी नाही)

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवट तारीख:- 04/09/2018

जाहिरात : पहा

Online अर्ज: APPLY ONLINE

_______________________________

स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन

+ चालू घडामोडी

+ नोकरी च्या जाहिराती , मार्गदर्शन ,निकाल

यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/लक्ष्यवेध

Sunday, August 19, 2018

DFCCIL Recruitment 2018

DFCCIL Recruitment 2018

जाहिरात क्र.: 11/2018
Total: 1572 जागा
पदाचे नाव:  
1. एक्झिक्युटिव (सिव्हिल): 82 जागा
2. एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल): 39 जागा
3. एक्झिक्युटिव  (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन): 97 जागा
4. एक्झिक्युटिव/ ऑपरेटिंग (स्टेशन मास्टर & कंट्रोलर): 109 जागा
5. ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ सिव्हिल (Artisan): 239 जागा
6. ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ इलेक्ट्रिकल: 68 जागा
7.ज्युनिअर एक्झिक्युटिव (ग्रेड -III)/ (सिग्नल & टेलीकम्युनिकेशन): 42 जागा
8. MTS (ग्रेड -IV) सिव्हिल (ट्रॅकमन): 451 जागा
9.MTS (ग्रेड -IV) इलेक्ट्रिकल (हेल्पर): 37 जागा
10. MTS (ग्रेड-IV) S&T (हेल्पर): 06 जागा
11. MTS (ग्रेड-IV) ऑपरेटिंग: 402 जागा

शैक्षणिक पात्रता: 
पद क्र.1 ते 3:  60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.4: 60% गुणांसह पदवीधर
पद क्र.5 ते 11: 
(i) 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट:
 01 जुलै 2018 रोजी, 
[SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
पद क्र.5 ते 11: 18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee:  
[SC/ST/अपंग/माजी सैनिक: फी नाही]
पद क्र.1 ते 3:  General/OBC: ₹900/- 
पद क्र.4: General/OBC: ₹700/- 
पद क्र.5 ते 11: General/OBC: ₹500/- 

परीक्षा (CBT):
 01 ते 05 ऑक्टोबर 2018

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2018

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:  Apply Online 
_______________________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी
+ नोकरी च्या जाहिराती , मार्गदर्शन ,निकाल
यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/लक्ष्यवेध


Friday, August 17, 2018

(MTNL) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती

(MTNL) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती


जाहिरात क्र.: MTNL/CO/R&E/1(145)/2017/Non-Technical

Total: 38 जागा  

पदाचे नाव: 

असिस्टंट मॅनेजर (HR): 06 जागा 

 असिस्टंट मॅनेजर (सेल्स & मार्केटिंग): 15 जागा  

असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) /JAO: 17 जागा  

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1:  MBA /MSW/MA(PM&IR) किंवा PG डिप्लोमा  (Human Resource/Personnel)  

 पद क्र.2:  MBA किंवा PG डिप्लोमा (मार्केटिंग)

पद क्र.3: CA/ICWA किंवा B.Com सह इंटरमिजिएट CA व 05 वर्षे अनुभव

वयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 27 सप्टेंबर 2018 रोजी 23 ते 30 वर्षे  

 पद क्र.2: 27 सप्टेंबर 2018 रोजी 23 ते 30 वर्षे  

 पद क्र.3: 01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 30 वर्षे   

नोकरी ठिकाण: मुंबई & दिल्ली

Fee: General/OBC: ₹1000/-   [SC/ST/अपंग:₹500/-]

परीक्षा: 21 नोव्हेंबर 2018 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2018 

जाहिरात (Notification): पाहा

Online Application: Apply Online

_______________________________
स्पर्धा परीक्षा तयारी साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा :
t.me/marathi_mpsc

Thursday, August 9, 2018

(AAI) भारतीय विमानतळ प्राधिकरणात 1027 जागांसाठी भरती

AAI Recruitment 2018

Airports Authority of India (AAI), a Government of India Public Sector Enterprise, constituted by an Act of Parliament, is entrusted with the responsibility of creating, upgrading, maintaining and managing civil aviation infrastructure both on the ground and airspace in the country. 

 AAI Recruitment 2018 

Grand Total: 1027 जागा (908+119)

Total: 119 जागा

पदाचे नाव:

ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्विस )

शैक्षणिक पात्रता :

 10 वी उत्तीर्ण व 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाइल/फायर डिप्लोमा  किंवा 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण 

वयाची अट : 

30 जून 2018 रोजी 18 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : मुंबई 

Fee : 

General & OBC: ₹1000/-  

[SC/ST/अपंग/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2018

जाहिरात : पाहा

Online अर्ज: Apply Online  

--------------------------------------------------------

जाहिरात क्र. : 02/2018

Total : 908 जागा

पदाचे नाव:

मॅनेजर : 492 जागा

 ज्युनिअर एक्झिक्युटिव : 412 जागा

पदांचा तपशील:

पदाचे नाव :  मॅनेजर

शाखा                              जागा 

फायनान्स                          18

फायर सर्व्हिसेस                 16

टेक्निकल                          01

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग      52

सिव्हिल इंजिनिअरिंग।         71

अधिकृत भाषा।                    03

कमर्शियल                            06

ह्यूमन रिसोर्सेस (HR)             05

इलेक्ट्रॉनिक्स                       324 

पदाचे नाव: ज्युनिअर एक्झिक्युटिव

शाखा                           जागा

एअर ट्रॅफिक कंट्रोल :     200

फायनान्स :                    25

 फायर सर्व्हिसेस :          15

एअरपोर्ट ऑपरेशन्स :      69

टेक्निकल :                      10

अधिकृत भाषा :              06

IT :                                 27

कॉर्पोरेट प्लॅनिंग & मॅनेजमेंट सर्व्हिसेस :03

ह्यूमन रिसोर्सेस (HR) :       32

कमर्शियल :                        25

शैक्षणिक पात्रता: 

मॅनेजर (i) B.E./B.Tech / MBA /पदवी / पदव्युत्तर पदवी  (ii) संबंधित अनुभव ज्युनिअर एक्झिक्युटिव: B.Sc. (with Physics & Mathematics) किंवा B.E./B.Tech

वयाची अट :

 30 जून 2018 रोजी, 

 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

मॅनेजर : 18 ते 32 वर्षे

ज्युनिअर एक्झिक्युटिव: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Fee: 

General & OBC : ₹1000/-  

[SC/ST/अपंग/महिला: फी नाही]

परीक्षा (Online): 

11 ते 14 सप्टेंबर 2018 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख

: 16 ऑगस्ट 2018

जाहिरात : पाहा

Online अर्ज: Apply Online  
_______________________________
स्पर्धा परीक्षा तयारी साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा :
t.me/saral_sewa_bharti

Tuesday, August 7, 2018

‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’

भोसरीवरून घरी परतत होतो. दुपारपासून कस्टमरच्या कंपनीत ‘पेमेंट टर्म्स’वरून डोकं उठलं होतं. ऑर्डर हातात पडल्यात जमा होती, तोच एक आनंद होता.

‘मॉर्डन कॅफे’च्या चौकात सिग्नलला थांबलेलो असताना एक लहानसा पोरगा गाडीजवळ आला.

मी स्वतः भीक द्यायच्या विरुद्ध आहे. भिकाऱ्यांना कधीच पैसे नाही देत. पण त्या मुलाच्या हातात विकायला पुस्तकं दिसली. अशा गोष्टी या मुलांकडून घ्यायची संधी मात्र मी कधीच सोडत नाही.

त्या मुलाला हात दाखवून गाडी बाजूला घेतली. मुलगा आला, ६० रुपयाला ४ पुस्तकं घ्या म्हणाला. सहज पुस्तकं बघितली तर लहान मुलांची स्केचबुक होती. बरी वाटली. नुकताच जोराचा पाऊस येऊन गेल्यामुळे आणि रात्री नऊची वेळ झाल्यामुळे रस्त्यावर पण अगदीच तुरळक गर्दी होती.

पोरगा वयाने असेल ११-१२ वर्षांचा पण पक्का सेल्समन होता. शेवटची थोडीच शिल्लक आहेत, घेऊन टाका. स्वस्तात देतो म्हणाला. मला नाही आवडत कधीच बार्गेनिंग करायला आणि मुलांच्या बरोबर तर नाहीच. पण एक विचार करून त्याला म्हणालो मी १० सेट घेतो.

कितीला देणार ?

क्षणभर विचार करून शंभरला देतो म्हणाला.

त्याला विचारलं किती दिवस पुस्तकं विकतोयस ?

तर म्हणाला,

पुस्तकं नाही, मला हातात जे काही मिळत ते सगळं मी विकतो.

मला जाता जाता  ‘सेल्स’ मधला एक गुरु भेटला होता. नाव विचारलं म्हणाला ‘दत्तू’, गाव उमरगा.

मनात म्हणलो चला आज गुरुवार, बहुतेक प्रत्यक्ष ‘दत्तगुरूंच ‘आले आपल्याला ज्ञान द्यायला.

त्याला म्हणालो काही खाणार ?

बहुतेक त्याचा विश्वास नाही बसला. म्हणला

‘पुस्तकांचे पैसे आधी देणार का
नंतर ?’
हसू आलं मला.
म्हणलो दे पुस्तकं आणि घे पैसे. १० सेटचे १०० दिले.

वरती शंभरची नोट ठेवली त्याच्या हातात, म्हणलो असुदे तुला बक्षीस.
एक मिनिट शांत झाला आणि म्हणाला
‘चला साहेब, आपण डोसा खायला जाऊ, समोर लई भारी डोसा भेटतो बोलत्यात’.

अस्मादिकांनी गाडी पार्क केली रस्त्यावरच. त्याच्या हाताला धरून रस्ता क्रॉस करून समोर ‘मॉर्डन कॅफे’मध्ये शिरलो. मला त्यांच्याबरोबर आत शिरताना काऊंटरवरच्या अण्णांनी थोडसं आश्चर्यानी पाहिलं.
आत पाहिलं तर हॉटेल बऱ्यापैकी रिकामं होतं. समोरच बसलो. त्याला मेनुकार्ड दिलं. म्हणलो काय हवं ते मागव. समोर पाण्याचे ग्लास आणून ठेवणाऱ्या वेटरला त्याने झोकात मसाला डोस्याची ऑर्डर दिली वरती
‘अमूल ज्यादा मारना’
असही ऐकवलं, माझी ऑर्डर घेत, वेटर त्याच्याकडे एक तिरका कटाक्ष टाकत काही न बोलता निघून गेला. मला पोराच्या ‘कॉन्फिडन्सचं’ कौतुक वाटायला आधीच सुरुवात झालेली होती.
आजुबाजूची टेबले आमच्याकडे कुचेष्टेनी बघतच होती.

मी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे एखादा ठेवणीतला पुणेरी कटाक्ष टाकत दुर्लक्ष करत होतो.

मग आली आमच्या मुलाखतीची वेळ, म्हणलो
काय रे दत्तू,
पुण्यात कधी आलास ?

“२-३ वर्षे झाली म्हणाला. “आईबा मजुरी करायची, बा वारल्यावर तिला कामं मिळण कमी झालं. मी आणि माझ्यापेक्षा बारकी बहीण हाय, मग एका नात्यातल्या मामानी सांगितलं पुण्यामुंबैकडे लई कामं भेटत्यान, तिकडच जा, ऱ्हावा आणि खावा. आईनी जरुरीपुरती चा भांडी, होते नव्हते ते कपडे गोळा केले, घराला अडसर लावला आणि आलो मंग पुण्याला.”

विचारलं राहता कुठे ?

इथेच राहतो म्हणाला. रस्त्याच्या पल्ल्याडच्या झोपडपट्टीत. खोली घेतलिया भाड्यानी.

आई सोसायट्यांमध्ये धुण्याभांड्याची कामं करते, मी इकडे येतो.

त्याला विचारलं ‘कोण देतं रोज विकायच्या गोष्टी ?’

म्हणाला “हाय ना ठेकेदार आमचा”.

रोज सकाळी ‘बॉम्बे ‘वरून आलेल्या वस्तू देतो, काय बोलायचं असत ते आणि भाव सांगतो, पैसे घेतो आणि निघून जातो.”

आता धंद्याच्या गप्पा सुरु झाल्यावर पोरगा बोलायच्या मूड मध्ये आला होता.

मी विचारलं ‘म्हणजे कमिशन वर काम करतोस का ?’

तर अभिमानानी दत्तू म्हणला “नाय सायेब, आता आपला आपण माल रोज इकत घेतो आणि दुसऱ्यांना इकतो. स्वतः दुपारी काहीतरी खातो आणि रात्री राहिलेले पैशे आईकडे देतो’’ आता गेल्या वर्षीपासून आईपेक्षा लई जास्त कमावतो”

मी विचारलं,

बहिणीचं काय ? तिला तरी शाळेत पाठवता का ?

हां मंग? ती जाते की कॉर्पोरेशनच्या शाळेत. शिकते, अन मलाबी थोडं शिकवते. गावाकडे पन जास्त नाही जायचो शाळेत. पर आई बोलते थोडातरी लीव्ह्याला वाचायला शिक, कुठंतरी उपेगाला येईल. म्हून थोडं शिकतो.
सायेब दिवसभर बाह्येर फिरल्यावर लई कटाळा येतो. पर आता धाकल्या बहिनीसमोर गप बसतो. ते पाढे अन इंग्लिशभाषेचे धडे काय केल्या डोक्यात नाही शिरत, पर आईला दाखवायला हो हो करतो. आता एकदोन वर्ष जावूदे, मग बघा आईचे काम बंद करायला लावतो का न्हाई ?पलीकडच्या सोसायटीमध्ये flat घेणार भाड्यानी. तिकडे राहणार.
मी मनात म्हणलं दिवसभर शेकडो लोकांशी बोलणाऱ्याला आणि त्यांना दररोज वेगवेगळी वस्तू घ्यायला “कन्व्हिन्स “करणाऱ्याला काय फरक पडतो भाषेचे धडे नाही म्हणता आलेतर ?

आणि या वयात सगळा घरचा खर्च भागाणाऱ्याला कशाला आले पाहिजेत पाढे यायला ?

तेवढ्यात आमचा डोसा आला. दत्तूनी एकदा माझ्याकडे हळूच बघत दिलेला काटाचमचा बाजूला ठेवून मस्तपैकी हातानी चटणी, सांबारात बुडवून डोसा खायला सुरुवात केली. मला तर कधीच डोसा हा प्रकार फोर्क नि खाता येत नाही, त्यामुळे मी पण तसाच खायला सुरुवात केल्यावर एकदम मनमोकळ हसला. म्हणला
साहेब आज तुम्ही आणल ना बरोबर म्हणून हॉटेलवाल्यांनी आत घेतला, नाही तर बाहेरूनच “चल जा असं म्हणत्यात. आपले कपडे नसतात ना चांगले म्हून. नाय तर आपणपण इथल्या वेटर एवढंच कमावतो”.

क्षणभर विचार आला;

श्रीमंतीची व्याख्या कुठेही गेलं तरी साधारण एकसारखीच. प्रत्येकाला दुसऱ्या बरोबर बरोबरी करतच पैसा कमवायला लागतो. मग तो खराखरा पैशांनी श्रीमंत असो किंवा रस्त्यावर वस्तू विकणारा मुलगा.

सहज विचारलं किती सुटतात रे महिन्याचे ?

म्हणाला

”सांगू नका कोणाला, हफ्त्याला खर्च जावून ९-१० हजार मिळतात. पन आक्खा दिवस सिग्नलला थांबायला लागतं. कधी रस्ता बंद करतात, कोणी मोठी पार्टी (मंत्री वगेरे) येणार असली की पोलीसलोक हाकलून देतात, मग जरा कमी होतो”

मी मनात म्हणलं, म्हणजे महिन्याचे कमीतकमी ३५-४० हजार ?

आयला, माझी आजची ऑर्डर झाली असती तर त्यात मला जेमतेम २० हजार मिळाले असते, ते पण सगळं सुरळीत पार पडल्यावर एक महिन्यानी.

मनात म्हणलं

“लेका तुला सगळ्या वेटर्सपेक्षा जास्ती पैसे मिळतात. कशाला त्यांच्याशी बरोबरी करतोस ? तू तर स्वतःचा राजा आहेस”

डोसा खावून झाल्यावर त्याला विचारलं आता अजून काय घेणार ?

म्हणाला तुम्हीच सांगा तुम्ही काय घेणार साहेब ?

मी म्हणलो आरे मी आणलंय ना तुला इथे,तर आता तू सांगायचं.
आपण ऑर्डर करू.

दत्तू म्हणाला साहेब तुम्ही दिले ना पैसे ?
आज माझ्याकडून तुम्हाला पार्टी.

मी ओशाळलो, म्हणलं ह्या छोट्या गरीब पोराकडे मन केवढं मोठं
आहे ?

मी म्हणलो “दत्तू आज तू मला पहिल्यांदा भेटलास ना? म्हणून आज हॉटेलचे पैसे मी देणार, आता बोल अजून काय घेणार ?” त्याचा कोमेजलेला चेहेरा समजत होता, म्हणाला, नको साहेब, भूक संपली. आता मला जेवण पण नाय जानार, जाऊ आपण”
बाहेर पडत असताना हॉटेलच्या काऊंटरवरचा अण्णा जरा सलगीत येवून म्हणला,
“साब ये बच्चा दिनभर इधर चौकमे क्या क्या बेचता रेहता है, हम लोग हमेशा देखते है उसको. आज पेहेली बार इधर अंदर आके खाना खाके गया. बहोत अच्छा बच्चा है, गंदे बच्चोसे हमेशा दूर रेहता है. लेकीन क्या करे साब,
हमलोगका भी धंदा है ना ? हम लोग उसको अंदर आके खानेके लिये बोलेगा तो बाकीका कस्टमर आना बंद करेगा” मला त्याचंही पटले.
पण आता काय सांगणार त्याला आणि त्याच्या कस्टमरना ?

जाताना हॉटेलमध्ये सहज नजर टाकली तर जे लोक बसलेले होते,त्यातल्या कित्त्येकांपेक्षा तो पोरगा कितीतरी जास्त कमवत असणार. फक्त रस्त्यावर काम करतो म्हणून त्याला ‘ते स्टेट्स’ नव्हतं.

बाहेर पडलो तर दत्तू गाडीपाशी जावून थांबला होता. आत बघत होता. त्याला विचारलं,

मारायची का एक चक्कर गाडीतून ?

तुम्हाला सांगतो, ते ऐकल्यावर त्याच्या चेहेऱ्यावर जे भाव पाहिले ना, खल्लास.

त्याला शेजारच्या सिटवर बसवून एक छोटीशी चक्कर मारून पुन्हा सिग्नलला सोडले. गाडीच्या बाहेर नवलाईने बघत होता.उतरल्यावर बघून समाधानानी हसला.

म्हणाला “साहेब, पुन्हा कवा येनार?”

म्हणलो अरे मी येत असतो मधूनमधून इकडे, आता तुला बघितलं की थांबीन नक्की.

“हात मिळवल्यावर तर ते दत्तगुरू एकदम प्रसन्नच झाले”

नक्की या म्हणाला, मी आईला आणि बहिणीला काहीतरी चांगलं घेऊन सिधा घरी जानार. सांगनार आज आपण गाडीतून चक्कर मारली, अजून माझ्याबरोबरची कोणी पोरंपन गाडीच्या आत बसली नाय. मीच पहिला.” मी नंबरात आलेल्या त्या पोराला हसून टाटा केला.

तो जाताना बघत क्षणभर विचार करत बसलो, या पोराकडे शहरातल्या कित्येक पोरांपेक्षा केवढ्या गोष्टी जास्ती आहेत?

याला पैशांची किंमत समजते, आई कष्ट करून घर चालवते त्याची जाणीव आहे. स्वतः शिकत नसला तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायची अक्कल आहे. पुढे काय करायचं त्याचा प्लानिंग तयार आहे. आज हा पोरगा कष्ट करून एवढे पैसे कमावतोय, आपल्याकडे १२ वर्षांच्या एखाद्या मुलाला चाळीस हजार नुसते मोजायला सांगितले तरी नीट जमतील की नाही शंका आहे.

पण आपल्याकडे कष्ट करून पैसे कमावणाऱ्या व्यक्तींपेक्षा, नुसतेच बडेजाव दाखवणाऱ्याची चलती जास्ती असते.

हा पोरगा नक्की पुढे जाणार आयुष्यात, अशी खुणगाठ मनात बांधून गाडी सुरु केली, रेडियो लावला,

नेमकं अनाडीमधलं ‘किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार’ लागलं.

योगायोगच म्हणायचा नाहीतर काय

♻♻♻♻♻♻♻♻♻
.....(copy paste)

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...