बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेकर्यााला घरकामासाठी, गोठ्यातील कामासाठी व गुरांची राखण करण्यासाठी एक नोकर हवा होता.
एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला व त्याने त्याच्याकडे नोकरीची याचना केली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, "वादळीवार्यासह गडगडाटी धुवांधार पाऊस पडत असताना व वीजांचा कडकडाट होत असतांनाही मी रात्री शांतपणे गाढ झोपू शकतो !'
त्या धनिक शेतकर्यारला हे थोडेसे वेगळं वाटलं. त्याला एका महत्वाचा कामासाठी बाहेर जायची घाईसुद्धा होती. कुतुहलाने त्याने मुलाला ठेवून घेतले. काम संपवून तो रात्री उशिराने थकून परत आला .थकल्याने तो लगेच झोपायला गेला. मध्यरात्री नंतर उशिराने सोसाट्याचा वादळी वारा सुरू झाला, वीजांचा कडकडाट होत व ढगांचा मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊसही सुरू झाला.
त्यामुले त्या धनिक शेतकऱ्याची झोपमोड झाली. त्याला आठवले की, बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते.गोठ्यातील गुरांसाठी गव्हाणीत गवतही टाकलेले नव्हते व पाणीही ठेवलेले नव्हते.
त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या पण त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीतचं धनिक शेतकर्यााने रेनकोट चढवला , छत्री, विजेरी घेतली आणि तो माळावर गेला.तेथे त्याला सर्व गवत नीट आवरून, त्याचे
ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत गोठ्यात गेला. गव्हाणीत
गवत, पाण्याचा ड्रम भरून ठेवलेला दिसला,सर्व गुरे चारापाणी खाऊन समाधानाने झोपलेली होती.
त्याने कुतूहलाने पाहिले, गोठातील वरच्या पोटमाळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! बाहेर निसर्गाचे एवढे तांडव चालले होते पण ते त्याच्या गावीही नव्हते. नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला कसलाही ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. ताणाला तिथे आत शिरायला फटच ठेवली नव्हती!
--रात्री झोपताना अभ्यास पूर्ण करा
--आपआपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पूर्ण करा
--सर्व अडचणींवर मात करता येत
No comments:
Post a Comment