Saturday, March 28, 2020

Apply for Essential Service Pass from maharashtra police

Lockdown21 च्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार. संबंधितांना

 https://covid19.mhpolice.in

या लिंकवरून अर्ज करता येणार.


नवीन पास साठी अर्ज / Apply for New Pass


सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी अर्ज करू शकतात.

सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.

संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.

वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.

प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.

वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.

अधिकृततेशिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.

फोटो ची साईझ ही २०० Kb तसेच संबंधित कागदपत्रा ची साईझ ५०० Kb पेक्षा जास्त नसावी.

सरदर्हू अर्ज हा English मध्येच भरावा

Apply for New Pass: 



पास डाउनलोड करा / Download Pass

आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा.

आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.

आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण या पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.

Friday, March 27, 2020

अत्यावश्यक सेवा व अति तातडीची गरज यांचे करिता पास (कोल्हापूर जिल्हा)

कोल्हापूर जिल्हा पोलीस दल अत्यावश्यक सेवा व अति तातडीची गरज यांचे करिता पास देत आहे. जेणेकरून आपणास अडचण येणार नाही. आपल्या नजीकच्या पोलिस ठाण्यात पास उपलब्ध केले आहेत. 



डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी (फक्त पुणे जिल्हा)

पुणेकरांनो,

डिजिटल पास/परवानगी मिळवण्यासाठी punepolice.in वर आपली माहिती भरा.

अर्ज मंजूर झाल्यास आपणास क्यूआर कोड (QR Code) असलेला एक एसएमएस पाठवला जाईल. पोलिसांनी अडवल्यास हा एसएमएस त्यांना दाखवावा अशी विनंती.

आपण सतत करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार.
- पुणे पोलीस

Terms & Conditions
  • Always carry government approved Identity card you have given in above request. Whenever stopped by police, the concerned person should show their ID card, and kindly cooperate with police on the ground.
  • You will be liable for prosecution if any false information provided.
  • This permission is subject to your adherence to various guidelines /orders given by authorities from time to time.
  • Please note, staying at home is important for your & others health until the lockdown is over. #StayHome #StaySafe

Wednesday, March 25, 2020

संचारबंदी काळात अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्यासाठी परवानगी (फक्त सांगलीतुन बाहेर जाण्यासाठी)

संचारबंदी काळात अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालयास करावयाचा अर्ज (फक्त सांगलीतुन बाहेर जाण्यासाठी)
 website: sanglipolice.gov.i n

Link: spofficeform



Monday, March 23, 2020

"चहा"


दार उघडलं तर ती भसकन् अंगावर आली. मी अक्षरशः भेलकांडलेच. कसाबसा भिंतीचा आधार घेत सावरलं स्वतःला आणि तिच्याकडे वळले तर ती दाणदाण पावलं टाकत पार आतल्या खोलीत पोहोचलेली. घाईघाईने तिच्या मागे जात खोलीत पोहोचते तर ती पलंगावर कोसळून उशीत डोकं खुपसून मुसमुसत होती. मी प्रेमाने जवळ जात डोक्यावरून हात फिरवत विचारपूस केली तशी झपकन् गळ्यात पडत ओक्साबोक्शी रडत म्हणाली, "मी आता परत जाणार नाहीये त्याच्याकडे! नवरा झाला म्हणून काय झालं? दर वेळी माझ्याकडूनच अपेक्षा! मीच का सावरून घ्यायचं नेहमी? सदानकदा हा माझ्यावर डाफरत असतो. कधीही बघा ह्याचं चेहरा कडू! काही विचारायला गेलं तर  नुसता उकळत राहातो! कंटाळा आलाय मला आता."

ती बराच वेळ बरसत राहिली. मीही मग तिला मोकळं होऊ दिलं. अशा वेळी तिला समजावण्यात अर्थ नव्हता. वेळ टळू देणं हाच ह्यावर उपाय होता. दिवस मावळला तशी ती शांत होत गेली.

रात्री झोपताना मला बिलगत म्हणाली, "आई, मी कुठे कमी पडतेय तेच कळत नाही! किती प्रयत्न केला तरी तो वळत नाही. कधीकधी वाटतं मी लग्न करून  चूक केली का? वर्षं होत आलंय लग्नाला. पुढे हे असंच होत राहणार का?तू कसा गं संसार केलास एवढी २८ वर्षं?तेही बाबांसारख्या तापट माणसाबरोबर? तुला त्रास नाही झाला कधी?" माझी २६ वर्षांची MBA झालेली University Topper लाडकी लेक मला माझ्या यशस्वी संसाराचं गमक विचारत होती!

"सांग ना गं. का सहन करत राहिलीस बाबांना?" ती घट्ट मिठी मारत मुसमुसत राहिली नि मी मूक राहात फक्त तिला थोपटत राहिले. शांत झाली तसं म्हणाले, "उद्या सकाळचा चहा तू करायचास."

"आई! मी काय म्हणतेय नि तुला उद्याच्या चहाचं पडलंय?काय गं हे?" म्हणत माझ्याकडे पाठ फिरवुन झोपली. मी मंदसं हसत डोळे मिटत स्वस्थ राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली ती तिच्या स्वैपाकघरातल्या खुडबुडीने. मी सावकाश तोंड धुवून आत गेले तर ती चहाचं आधण ठेवून गॅस लावत   असलेली दिसली. मी समोरच्या टेबलवर बसून तिच्या हालचाली निरखत राहिले. तिने आधणात चहा पावडर घातली, साखर घातली नि तो उकळण्याची वाट पाहात उभी राहिली.कुठेतरी शूइ घाईघाईने तिने तो दोन कपांमध्ये गाळला, दूध घातलं नि कप माझ्यासमोर टेकवत म्हणाली, "घे बाई. केला तुझा चहा! झालं?"

मी शांतपणे तिने दिलेला कप तोंडाला लावून फुक मारत चहाचे घोट घेत राहिले. तिने पहिल्या घोटातच तोंड वाकडं करत कप बाजूला सारला नि करवादली, " तू पावडर बदलून टाक बघू. कसातरीच झालाय चहा. काही चवच नाही." मी मात्र मला मिळालेला आयता चहा चवीने पित राहिले. ते बघून ती अधिकच वैतागली! "आई! मी माहेरी आलेय नं? मग मला निदान एक कप पूर्वीसारखा चहा करून दे की. कि आता तूही त्याच्यासारखीच वागणार आहेस? का वागते आहेस अशी? मी इथुन जाऊ का?" डोळ्यात आलेलं पाणी कसंबसं आवरत ती पटकन उठलीच. मग मी घाईने तिला पुन्हा खाली बसवत म्हणाले,"अगं अगं! काय हे? कपभर चहासाठी का ही अशी वैतागली आहेस? थांब. देते तुला चहा."

 ती मग टेबलजवळ नुसतीच बसून माझ्याकडे रागाने पाहत राहिली. मी चहाचं आधण ठेवलं नि म्हटलं, "ये. आज तुला चांगला चहा कसा करायचा ते नव्याने शिकवते. बहुतेक तू विसरली आहेस. मी शिकवला होता तुला पूर्वी."

"आई गं! सकाळी सकाळी आता तू मला लहान मुलीसारखा चहा करायला शिकवणार आहेस का? काय गं तू!"

मीही मग तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत  चहाचं आधण ठेवत म्हटलं, "चांगला चहा करण्यासाठी  महत्त्वाचं असतं ते सगळ्या घटकांचं योग्य प्रमाण. आधणात आवश्यक तेवढीच चहाची पावडर घालावी लागते - ना कमी ना जास्त. कमी घातली तर चहा पांचट होतो, बेचव लागतो. आणि जास्त घातली तर कडू होतो. साखरेचंही तसंच आहे. साखर जास्त झाली तर अति गोड चहाने तोंडाला मीठी बसते.आणि कमी झाली तर चहा निगोड,बेचव होतो." असं म्हणत माझी आधणात योग्य प्रमाणात चहा पावडर नि साखर घालून झाली होती. तिकडे समोर बसलेली ती कंटाळवाणा चेहरा करत माझं बोलणं संपण्याची  वाट बघत होती.

"हे जिन्नस घालून झाले कि चहाला नीट उकळी येऊ द्यावी लागते. आणि एकदा का उकळी आली की मग करावी लागते ती सगळ्यात महत्त्वाची कृती. तयार झालेल्या चहावर झाकण देऊन तो काही काळ ठरू द्यावा लागतो. आणि बरं का गं... ही कृती सगळ्यात महत्त्वाची असते हं. हे ठरू देणं म्हणजे काय? तर तयार झालेल्या चहाला त्यातले सगळे रस, त्यात घातलेल्या जिन्नसांच्या सगळ्या चवी एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ द्यावा लागतो.  हे वेळ देणं फार महत्त्वाचं असतं बेटा. त्यामुळे तयार झालेल्या चहात घातलेल्या निरनिराळ्या रसांच्या, चवींच्या योग्य मिश्रणामुळे चहाला एक नवीनच खुमारी येते ज्याने पिणाऱ्याला छान तरतरी  येऊन तो आनंदी होतो आणि पुढे जाण्याचं वेगळं बळ मिळतं त्याला!" असं म्हणत मी केलेल्या चहाचा कप तिच्या हातात ठेवला. "बघ. कसा झालाय?हा आवडेल तुला."

तिने चहाचा घोट घेतला नि खुशीत मनापासून तोंडभर हसली! "आई गं! काय जादू करतेस गं! मला नाही जमत असा चहा करायला!" ती कसंनुसं तोंड करत  म्हणाली!

"आता एक काम कर. तू मघाशी जो चहा केला होतास नं, त्याची तू केलेली कृती आठवून बघ. त्यात तू कुठे चुकलीस हे तुझं तुला कळेल. एकदा का आपली चूक आपल्याला उमगली कि पुढल्या वेळी केलेली कृती बरोबर ठरते." ती निमूटपणे मन लावून ऐकत राहिली.

"तेच तर शिकायचं आहे बेटा तुला....वेळ देणं".

तिने दचकून माझ्याकडे पाहिलं.

"अगं, म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. चहाची खुमारी वाढवण्यासाठी तो ठरू दिलास तरच नीट होईल नं? घाईघाईत केलेल्या चहाला काय चव येणार आणि मग तो तुला पुढे जाण्यासाठी काय बळ देणार? हो नं? आपण न दिलेल्या वेळाने चवी बिघडतात! मग आपण सगळं खापर फोडतो ते समोरच्यावर.....चहाच्या पावडरवर! प्रत्येक वेळेला पावडर बदलणं हा ह्यावर उपाय नसतो बेटा. त्यापेक्षा आपली कृती बदलली तर आयुष्य सोपं होऊन जातं बघ. "

एव्हाना तिचा चहा पिऊन झाला होता. कप खाली ठेवत तिने मला घट्ट गळामिठी मारली नि खुदकन हसत म्हणाली, "शालजोड्यातला मंत्र कळला गं! वेळ द्यावा लागतो!"

  मग माझ्या समोर उभी राहात लाडाने पुन्हा एकदा गळ्यात पडत म्हणाली, "आई गं, MBA करताना University मी Top केली पण खरी Management गुरू तूच! कुठून शिकलीस गं एवढ्या Theories?"
                                             
मीही मग दिलखुलास हसत तिला प्रेमाने कवेत घेत म्हटलं-

 "अगं तूही होशील माझ्यासारखी Management गुरू! तुझं आयुष्य जरा ठरू तरी दे!"

तिने शांतपणे आपला फोन उचलला नि नवऱ्याला फोन केला. तासाभरात आपल्या हक्काच्या घरी गेली देखील. आयुष्याला वेळ देण्यासाठी...!

- शिल्पा गुप्ते जोशी‌.

Copy from internet

Sunday, March 22, 2020

मैं आज मैं होना चाहता हूं।

बिन सफर,बिन मंजिलों का एक रास्ता होना चाहता हूं।

कहीं दूर किसी जंगल में ठहरा दरिया होना चाहता हूं।

एक जिंदगी होना चाहता हूं बिना रिश्तों और रिवाजों की।

दूर आसमान से गिरते झरने में कहीं खोना चाहता हूं,मैं आज मैं होना चाहता हूं।


Copy from internet 

Wednesday, March 11, 2020

Jobs in pune

प्रागमासिस कन्सल्टिंग एलएलपी कोथरूड
शिक्षण बीई, एमसीए, एमसीएस, बीएससी, बीसीए
इमेल पत्ता omkar.dharmadhikari@pragmasys.in


Job



SR.Accountant (M.Com):  Exp-8yrs,
Accountant (B.Com): Exp-5yrs,
Manager Spares(Graduate/DME ): Exp-5yrs
Manager Services(DME/DAE): Exp-5yrs
Clerk ( 12th/Graduate) :Exp-2yrs

Contact: AutoIndia Madhav nagar Road , Sangli. 
2620299

Mail your resume :ho.hrmanager@gmail.com

Wednesday, March 4, 2020

मैं लौटने के इरादे

मैं लौटने के इरादे से जा रहा हूँ 
मगर सफ़र सफ़र है 
मेरा इंतिज़ार मत करना 

साहिल सहरी

Job in Neighbore Technologies pune




Area of work
1.Java Developers
2.Android Developers
3.Web Developers


Send your profile to 

Company address
Neighbore Technologies 
Office No 110, Level 1Sonigara Landmark, Chatrapati Chowk
Kaspate Wasti, WakadPune, Maharashtra

Monday, March 2, 2020

Job title - Engineering graduates

Job title - Engineering graduates

Company - Avalara

Work Location: Pune

Experience - Freshers

Area of work - cloud platforms , web applications

Email - vishwesh.ransing@avalara.com 


Job title - BPO TL position

Job title -  BPO TL position
Location - Solapur
Experience 2-4 years as a TL
Shift timing - general
Contact details - Mr Darshan, HR Manager
Mobile - 9850918230
Email - hr@rtcsgroup.com

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...