Saturday, March 28, 2020

Apply for Essential Service Pass from maharashtra police

Lockdown21 च्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार. संबंधितांना

 https://covid19.mhpolice.in

या लिंकवरून अर्ज करता येणार.


नवीन पास साठी अर्ज / Apply for New Pass


सर्व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था / व्यक्ती या प्लॅटफॉर्मवरुन ई-पास साठी अर्ज करू शकतात.

सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

अर्ज सबमिशन केल्यावर, आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा, त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.

संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर, आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.

वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.

प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.

वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.

अधिकृततेशिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.

फोटो ची साईझ ही २०० Kb तसेच संबंधित कागदपत्रा ची साईझ ५०० Kb पेक्षा जास्त नसावी.

सरदर्हू अर्ज हा English मध्येच भरावा

Apply for New Pass: 



पास डाउनलोड करा / Download Pass

आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक / बटण वापरा.

आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.

आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण या पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...