8 वर्षाचं पोरगंय हे, तिसरीत आहे.  
गाव आहे चाटगाव. 
गेल्यावर्षी नेहमीसारखं हातात तुराटीची काठी डांबरीवर ओढत शाळेत चाललेलं तर  ह्याला अचानक मधेच कोणतरी चिरकल्याचा आवाज ऐकू यायला लागला. म्हणून हा शेजारी तळयाकडे जोरात पळत गेला. तर समोर एक बारकी पोरगी तळ्यात पडलेली. ती बुडायला लागली 
ह्यानं थोडा विचार केला अन टाकली उडी. दोघांनी मिळून गटांगळ्या खाल्ल्या. नाकातोंडात पाणी गेलं... ठसकायला लागली पण बलवत्तर. बुडता बुडता वाचली. 
"पोरीचा जीव वाचवला अन एवढा बारका असूनबी यानं स्वतःच्या जीवाची किंमत काडी करत , डेरिंग करत तिला जिवंत बाहेर काढलं" म्हणून सगळी नवाजाय लागली.
बातमी पसरली तसं बऱ्याच ठिकाणाहून सत्कार व्हायला लागला. काही ठिकाणी रोख रक्कम बक्षीस म्हणून मिळायला लागली. 
बाप बीड ते परळी रेल्वे रुळावर मजुरी करून स्वतःचं अन कुटूंबाचं पोट भरतो.
दिवसभर उन्हातान्हात काबाडकष्ट करून रात्री खायला कसंबसं अन्न मिळवणाऱ्या कुटुंबाला अधिकचा एक रुपयापण एकेक हजारा सारखा वाटतो.
त्यात याला सगळीकडून मिळून 10 हजार रुपये मिळालेले.
याने हे सगळेच्या सगळे- म्हणजे 10 हजार रुपये कोरोना हरवायच्या लढाईला सुपूर्द केलेत...
अन,त्याहीपेक्षा शहारे आणणारी गोष्ट म्हणजे याचं नाव----संविधान !
Copied 
 
   
 
 
अश्या काही लोकांमुळे माणुसकी जिवंत आहे.त्या मुलाच्या शिक्षणासाठी काही मदत करता येईल का?
ReplyDelete