एक कागदाचं
पान असतं...!!
*'श्री'* लिहलं, की
पूजलं जातं ...
*प्रेमाचे* चार शब्द
लिहले, की
जपलं जातं...
काही *चुकीचं*
आढळलं, की
फाडलं जातं...
एक कागदाचं
पान असतं...!!
कधी त्याला
*विमान* बनवून
भिरकावलं जातं...
कधी *होडी* बनवून
पाण्यात सोडलं जातं...
कधी *भिरभिरं* बनवून
वाऱ्यावर फिरवलं जातं...
आणि कधी तर
*निरुपयोगी* म्हणून
चुरगाळलंही जातं...
एक कागदाचं
पान असतं....!!
जे लेखकाच्या
*लेखणीला* हात देतं...
जे चित्रकाराच्या
*चित्राला* साथ देतं...
जे व्यापाऱ्याच्या
*हिशोबाला* ज्ञात ठेवतं...
आणि हो,
वकीलासोबत *कोर्टात* गेलं,
की *साक्षही* देतं...
एक कागदाचं
पान असतं.....!!
*पेपरवेट* ठेवलं, की
एकदम गप्प बसतं...
काढून घेतलं, की
*स्वच्छंदी* फिरतं आणि
कशांत अडकलं, तर
*फडफडायला* लागतं...
एक कागदाचं
पान असतं.....!!
ज्यावर बातम्या छापल्या,
की *वर्तमानपत्र* बनतं...
प्रश्न छापले, की
*प्रश्नपत्रिका* बनतं...
विवाहाचं निमंत्रण छापलं,
की *लग्नपत्रिका* बनतं...
तर कधी आदेश~संदेश
लिहले, की तेच *टपालही*
बनतं...
एक कागदाचं
पान असतं....!!
*माणसाच्या* जीवनांत
आणि *त्यांत* खूप
*साम्य* असतं...!!
एक कागदाचं
पान असतं...!!
जन्मला आला तर birth certificate असतं
निधन झाला तर Death certificate असतं
*एक कागदाचं*
*पान असतं* 🌻🌻🌻🌻
No comments:
Post a Comment