*_पूर्वीचा काळ बाबा,_*
*_खरंच होता चांगला,_*
*_साधे घरं साधी माणसं,_*
*_कुठे होता बंगला ?_*
*घरं जरी साधेच पण,*
*माणसं होती मायाळू,*
*साधी राहणी चटणी भाकरी,*
*देवभोळी अन श्रद्धाळू.*
*_सख्खे काय चुलत काय,_*
*_सगळेच आपले वाटायचे,_*
*_सुख असो दुःख असो,_*
*_आपुलकीने भेटायचे._*
*पाहुणा दारात दिसला की,*
*खूपच आनंद व्हायचा हो,*
*हसून खेळून गप्पा मारून,*
*शीण निघून जायचा हो.*
*_श्रीमंती जरी नसली तरी,_*
*_एकट कधी वाटलं नाही,_*
*_खिसे फाटके असले तरीही,_*
*_कोणतंच काम रुकलं नाही._*
*उसनं पासनं करायचे पण,*
*पोटभर खाऊ घालायचे,*
*पैसे आडके नव्हते तरीही,*
*मन मोकळं बोलायचे.*
*_कणकेच्या उपम्या सोबत,_*
*_गुळाचा शिरा हटायचा,_*
*_पत्रावळ जरी असली तरी,_*
*_पाट , तांब्या मिळायचा._*
*लपाछपी पळापळी,*
*बिन पैशाचे खेळ हो,*
*कुणीच कुठे busy नव्हते,*
*होता वेळच वेळ हो.*
*_चिरेबंदी वाडे सुद्धा,_*
*_खळखळून हसायचे,_*
*_निवांत गप्पा मारीत माणसं,_*
*_ओसरीवर बसायचे._*
*सुख शांती समाधान " ते "*
*आता कुठे दिसते का ?*
*पॉश पॉश घरा मधे,*
*" तशी " मैफिल सजते का ?*
*_नाते गोते घट्ट होते,_*
*_किंमत होती माणसाला,_*
*_प्रेमामुळे चव होती,_*
*_अंगणातल्या फणसाला._*
*तुम्हीच सांगा नात्या मध्ये,*
*राहिला आहे का राम ?*
*भावाकडे बहिणीचा हो,*
*असतो का मुक्काम ?*
*_सख्खे भाऊ सख्ख्या बहिणी,_*
*_कुणीच कुणाला बोलत नाही,_*
*_मृदंगाच्या ताला वरती,_*
*_गाव आता का डोलत नाही._*
*प्रेम , माया , आपुलकी हे,*
*शब्द आम्हाला गावतील का ?*
*बैठकीतल्या सतरंजीवर,*
*पुन्हा पाहुणे मावतील का ?*
*_तुटक तुसडे वागण्यामुळे,_*
*_मजा आता कमी झाली,_*
*_श्रीकृष्णाच्या महाला मधुनी,_*
*_सुदामाची सुट्टी झाली._*
*हॉल किचन बेड मधे,*
*प्रदर्शन असतं वस्तूंचं,*
*का बरं विसर्जन झालं,*
*चांगुलपणाच्या अस्थीचं ???*
*🙏🏻🙏🏻_*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
No comments:
Post a Comment