Thursday, January 28, 2021
"आदमी की औकात "
Saturday, January 23, 2021
अक्कलशून्य माणसे निंदा करतात
Sunday, January 17, 2021
बहुत ज़रूरी होता है
एक बार बिल्कुल अकेला रह जाना,
खुद से दूर हो जाना,
अंजान राहों पर भटक जाना,
अंधियारों में गुम हो जाना|
बहुत ज़रूरी होता है
एक बार दिल का टूट जाना,
सारे भरोसे और उम्मीदों का खो जाना,
आंसुओं से भीग जाना,
फिर एक जिद के साथ उभरना |
बहुत ज़रूरी होता है
एक बार जिन्दगी में हार जाना,
और अनगिनत ठोकरें खाना |
क्योंकि तब हम पाते हैं अपने-आप को जान,
रिश्तों की खूबसूरती और उसकी भावनाओं को जान,
ढूंढ पाते हैं तब हम सही रास्ते,
तलाश पाते हैं मंजिलों को |
तब हम जान पाते हैं दर्द को,
हर जख्म और हर आंसुओं के मर्म को,
सीख जाते हैं खुलकर हंसना, मुस्कुराना,
फिर हर सपनों को सचकर दिखलाना |
तब हम जान पाते हैं सफलता का रहस्य,
सीख जाते हैं संभलना,
और लोगों की इज्जत करना,
फिर संभलते हुए आगे बढ़ते चले जाना |
Sunday, January 3, 2021
आपण लोकांना न सांगितलेल्या बऱ्या असतात
आपण लोकांना न सांगितलेल्या बऱ्या असतात
१. घरातले कलह, वाद, मतभेद लोकांना जेवढे माहित नसतील तेव्हढे बरे.
सत्य चप्पल घालून घराबाहेर निघेपर्यंत, खोट गावभर हिंडून आलेल असते.
आयुष्यात सगळ्यांत कठोर सत्य हेच आहे की, कोणीही तुमची काळजी करत नाही, Nobody Cares. घडल असते एक, लोक ऐकतात दोन आणि गावात बातमी पसरते तिसरीच.
२. तुम्ही किती कमवता हे पण सांगू नये.
जर तुम्ही म्हणाला, अरे मला १०००० मिळतात, अरे मला ४०००० मिळतात. मग जेव्हा लोक तुम्हाला संकटात पाहतील, तडजोड करतांना पाहतील, पैसे वाचवतांना पाहतील तेव्हा मदत करण्याएवजी उलट म्हणतील, "तू तर ४००००० कमवायचा ना??", "तू तर नोकरीला होता ना?". तुमचा पगार दुसऱ्यांना माहिती पडला की त्यांची खरी षड्यंत्र सुरु होतात.
३. तुमचे स्वतःचे गुपित इतरांना कधी सांगू नये.
आपली गुपित समोरच्याला कधीच सांगू नका. जर तुम्ही स्वतः, स्वतःची गुपित स्वतःकडे सुरक्षित ठेवू शकत नाहीत तर इतरांकडून अपेक्षा ठेवणे वायफळ आहे. - चाणक्य नीती
आपली गुपिते सांगतांना आपल्याला तात्पुरता आनंद वाटतो. पण आपली गुपित इतरांना माहित झाल्यावर आपणच कमकुवत होतो कारण तेच आपला पुढे विक पोइंट होतात.
४. आपला पुढच्या भविष्याची योजना (प्लानिंग) कधी लोकांना सांगू नये.
आपला समाज अशा प्रकारे बनला आहे की इथे प्रत्येक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ बनायचा, प्रशस्ती मिळवायचा प्रयत्न करतो. जेव्हा तुमची प्लानिंग लोकांना कळते तेव्हा, ते सापळे रचायला सुरुवात करतात, विघ्न आणायला सुरुवात करतात. कारणी की सगळ्यांची मनस्थिती एकच आहे ती म्हणजे, "हा वर नाही गेला पाहिजे. एकतर आपल्या लेवेलला राहिला पाहिजे नाहीतर आपल्यापेक्षा खाली… पण वर नाही"
५. तुमच आयुष्यातले सगळ्यांत मोठे ध्येय लोकांना सांगायचे नाही.
पहिले गोष्ट तर लोक हसतात त्यामुळे आपणच डिप्रेस्ड होतो. दसरी गोष्ट म्हणजे ते सतत आपल्याला "तू हे का करु शकत नाही, ते का शक्य नाही" अस सतत सांगत राहत्तात. तिसरी गोष्ट अशी की समजा ते ध्येय मिळवताना तुम्ही हरला किंवा एखाद्या संकटात सापडला की असे रिकामे बसलेलेच असतात जे म्हणतात, "आम्ही पहिलेच सांगितले होते.."
६. आपला स्वतःचा भूतकाळ लोकांना सांगू नये.
भूतकाळ म्हटल्यावर आपल्याला आपण केलेल्या चुका जास्त आठवतात. "काश", "कदाचित" राहिलेल्या गोष्टी त्यात असतात. जेव्हा तुमचा भूतकाळ लोकांना माहित होतो तेव्हा तुम्हाला जज केल जाते तुम्ही केलेल्या चुकांवरून, ना की तुम्ही मिळवलेल्या गोष्टीवरून. "कोण तो?, आर तो दहावीत नापास झाला होता!!", अस बोलताना ते ह्या गोष्टीचा विचार नाही करणार की एकदा नापास होऊन तुम्ही परत मेहनतीने पुढे आलेत. Nobody Cares.
७. तुमचे इतरांसोबत असलेले नाते कसे आहे हे लोकांना सांगायचे नाही.
जेव्हा त्यांना माहित पडेल तुमचे मित्रसबंध खूप मस्त आहेत लोक फुट पाडायला सुरु करतात. जेव्हा त्यांना माहित होते तुमचे प्रेमसंबंध खूप छान आहे, लोक त्याला वाईट, तिरस्कार नजेरेने पाहतात आणि ते तोडायचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना माहित होतो तुम्ही घरात खूप चांगले संबंध प्रस्थापित करून आहात, लोक नजर लावायला आणि आग लावायला सुरु करतात.
हे सगळ का होते त्याचे एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर हे असेल;
People always throws stones at the things that shines. लोक, समाज आपल्याकडे असलेल्या मौल्यवान गोष्टीवर नेहमी आघात करतील.
माझे नवीन लेखन
खरा सुखी
समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...
-
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना...
-
’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही -पु. ल. देशपांडे. भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्र...