Saturday, January 23, 2021

अक्कलशून्य माणसे निंदा करतात


तुम्ही लोकांचे जेवढे भले कराल, लोकांचे कल्याण कराल, लोकांना ज्ञान द्याल, लोकांना सुखी कराल तितके तुम्ही लोकांमध्ये प्रिय होता, तितके लोक तुम्हाला मानतात; पण याला उपद्रव कर, त्याला उपद्रव कर, याची निंदा कर. निंदा करणे हे फार सोपे काम आहे.
जगात सोपे काम कुठले असेल तर निंदा करणे. कारण का, त्याला अक्कल लागत नाही. जगात एकच गोष्ट अशी आहे की त्याला अक्कल लागत नाही म्हणून *अक्कलशून्य माणसे निंदा करतात. "शहाणपण ज्याच्याजवळ आहे ती माणसे इतरांचे कौतुक करतात."* इतरांचे कौतुक करायचे की निंदा करायची हे तू ठरव, कारण *"तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार."*
इतरांचे दोष पाहणे फार सोपे आहे. *स्वतःचे दोष पाहतो का? नाही पाहात. आपले दोष कुणी बघत नाही त्याचे कारण ते आपल्याला दिसत नाहीत, कारण ते आपल्या जवळ असतात.आपल्याजवळ असलेले कपाळ आपल्याला दिसत नाही. तुझ्या कपाळावर लिहिलेले आहे ते बघ सांगतात. कारण तो ते बघू शकत नाही. आरशात बघण्याचा प्रयत्न केला तरी आरशात दिसते ते प्रतिबिंब असते, कपाळ नव्हे.*
[1/23, 22:39] +91 88302 98936: सांगायचा मुद्दा. *आपण एखाद्याचे कौतुक करणे व निंदा करणे यात कौतुक करणे कठीण आहे व निंदा करणे सोपे आहे. कार्य करतात त्यांचे कौतुक इतरांनी केले पाहिजे,* पण अरे हा कार्य करतो याला सद्गुरू तर व्हायचे नाही ना? असे सद्गुरू होता आले असते तर सगळेच सद्गुरू झाले असते. सद्गुरू असे होता येत नाही. कार्य करणाऱ्याचे कौतुक करा, त्याला प्रोत्साहन द्या. प्रोत्साहन देता येत नसेल तर गप्प तरी बसा. निंदा तरी करू नका. *जीवनात आपण काय करतो, कशासाठी आलेले आहोत, जन्माला कशासाठी आलो, कुठल्या तरी संप्रदायात कशासाठी आलो आहोत, याचा पहिला विचार केला पाहिजे. अहंकार घालविण्यासाठी आपण इथे आलेले आहोत हे स्मरण ठेवा* व तुम्हाला अहंकार येतो का?, बघा.
अहंकार गेल्याशिवाय देव मिळणार नाही व देव मिळाला नाहीतर आपण सुखी होणार नाही. *देव एकदा मिळाला, आपल्या दिव्य स्वरूपाची जागृती आली, आत्मज्ञान मिळविले की तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी होता.*

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...