Tuesday, January 29, 2019

बॅड पॅच- एक संघर्ष...

प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी 'बॅड पॅच' येतो.

शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात

करीयर मध्ये काहीतरी बिघडतं,

नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,

व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,

पैशांची बिकट  वाट लागते...नड येते

आणि बहुदा हे सारं एकदमच, एकाच वेळी घडतं!!

हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो... आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो... आयुष्य नकोसं करुन सोडतो...

आपण कितीही नको म्हणलं, टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतो.... ...

संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो... अन आपल्याला तो भोगावा, अनुभवावाच लागतो...

कितीही नकोसा वाटला, कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!

यातले दोन प्रमुख फायदे म्हणजे:

१. खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही हे बॅडपॅच असतानाच कळतं... आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही, कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं!

२. आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत रहाते.

अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,
काय बोलतो,
काय करतो,
काय निर्णय घेतो
हे आपलं आपल्याला समजू शकतं...
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते.  हा वाईट काळ प्रत्येकाला   काही शिकवून जातो.

यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत रहाते...!

अर्थात, बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही... पण तो जेंव्हा येतो तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा react कसं करायचं हे आपल्या हातात असतं... आपला बॅडपॅच आहे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्वीकारून नम्र व्हायचं, आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं हे आपल्याच हातात असतं!!

असो... आपणा सर्वांच्या आयुष्यात कमित कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो...!

संघर्षातून  जीवन जगण्याची मजा काही औरच......

प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो . शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपण दाखवतात , यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो !!!
               *तुमचं आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही*. ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
               *तुम्हाला जर कोणी प्रगती पासून रोखु शकतो* तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतः  "कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
              
मी गरीब आहे. पैसा नाही,हे नाही, ते नाही म्हणत *जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.* स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही.
             
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण *ज्याची नियतच खराब असते, त्याची सोबत सोडणेच चांगले असते.....*
              
चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान, सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच
             
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले, असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका....
               
  स्वताच्या मनाला पुन्हा एकदा लढ म्हणा......

      

( संग्रहित लेख )

Monday, January 28, 2019

व्यवसाय करत असताना छत्रपती शिवरायांकडून काय शिकाल?



व्यवसाय करत असताना छत्रपती शिवरायांकडून काय शिकाल?





छत्रपती शिवाजी महाराज
Swapnwel.blogspot.com


१.सुरवात करण्यावर भर दया, कमरतेवर लक्ष देऊ नका.
रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबानं सोबत फक्त ८-१० मावळे होते.


२.यशाचा, वय, अनुभवाचा संबंध नसतो.
महाराजांनी तोरणागड वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते.


३.स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुघल, निझाम, आदिलशाह असे कसलेले विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापले होते.


४.सहकारी चांगले निवडा.  
आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असे म्हणत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची ताकत होती.


५.संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा.
अफझलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते, शांत राहून प्रत्येक निर्णय आमलात आणला होता.


६.नियोजनबद्ध काम करा, अंमलबजावणी योग्य प्रकारे करा.
पुण्याला वेढा घालून बसलेल्या शाहिस्तेखानाला अतिशय नियोजनबद्धरीतीने पराभूत केले.


७.संकटकाळी धीर सोडू नका, शांतपणे निर्णय घ्या.
पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले.


८.सगळं संपलंय असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा.
पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज संपलं असंच सगळ्यांना वाटलं होतं.... महाराज सोडून.


९.स्वाभिमानी रहा, आत्मसन्मान आवश्यक आहे.
आग्ऱ्यामध्ये औरंगजेबासमोर त्यांच्याच दरबारात आपल्या अपमानाविरोधात बोलण्याची हिंमत महाराजांनी दाखवली होती.


१०.नैतिकतेने, नियमाने वागा, सहकार्यांनाही शिस्त लावा.
 महाराजांचे नियम स्वतः महाराज सुद्धा मोडत नसत. अगदी जवळच्या सहकार्यांना सुद्धा नियमभंगाच्या शिक्षेत माफी नसे.


११.स्वतःचे अस्तित्व दाखवण्यात कोणतीही कसर ठेवू नका.
राज्याभिषेक फक्त जनतेसाठी नव्हता तर देशातील तमाम अन्यायकारी शाह्यांना कल्याणकारी स्वराज्याचे अस्तित्व दिमाखात दाखवण्यासाठी होता.


१२.जबाबदारीचे वाटप करा.
महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना, तसेच इतरवेळी जबाबदारीचे वाटप करून ठेवत, त्यामुळे कामात सुसूत्रता राही.


१३.शांतपणे निर्णय घ्या.
 कोणताही निर्णय घेताना महाराज घाईगडबड करत नसत, शांत राहून पूर्ण विचार करून मगच योग्य निर्णयाप्रत येत.


१४.वेळप्रसंगी कठोर निर्णय घेताना कचरू नका.
स्वराज्य हितासाठी महाराजांनी अनेक कठोर आणि कटू निर्णय घेतले, वेळप्रसंगी आपल्या आप्तेष्टांविरोधात सुद्धा निर्णय घेताना डगमगले नाहीत.


१५.लोकांना आपलेसे करा.
लोकांशी फटकून वागून तुम्ही प्रगती करू शकत नाही. महाराज जनतेसोबत वागताना कोणतेही अंतर न ठेवता अगदी त्यांच्यातले होऊन जात, अगदी घरातील सदस्य असल्यासारखे.


१६.वचक असायलाच हवा.
महाराजांच्या परस्पर कोणताही निर्णय घेण्याची हिम्मत कुणातही नसे, महाराजांनी ठरवून दिलेल्या नियमांबाहेर कुणीही जात नसे. यामुळे कामावर योग्य अंकुश राही.


१७.क्षमाशील असा.
महाराज जितके कठोर होते तेवढे दयाळू आणि क्षमाशीलही होते. महाराजांच्या या स्वभावामुळे कित्येक विरोधक सुद्धा त्यांचे सहकारी बनले होते.


१८.मनाचा ठाव घ्या.
समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे हे महाराजांना चांगलं समजायचं. त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीला तात्काळ आपल्याबाजूने वळवण्यात यशस्वी होत.


१९.माघार घेणे सुद्धा काहीवेळेस आवश्यक असते.
 महाराज कित्येक वेळा परस्थिती पाहून माघार घेत. त्यामुळे होणारे नुकसान टळत, आणि पुन्हा तयारी करण्याची संधी मिळे. यात कोणताही कमीपणा नाही!


२०.युद्धात हराल किंवा जिंकाल पण तहात हरू नका.
महाराजांनी प्रत्येक वेळी फक्त लढाई जिंकण्यालाच महत्व दिले नाही तर तहात जिंकणे महाराजांसाठी महत्वाचे असे. युद्धाचा अंतिम परिणाम तहच असतो.


महाराजांचा आदर्श जीवनात ठेवा नक्कीच यशस्वी व्हाल....




(संग्रहित लेख)

Thursday, January 24, 2019

लग्नानंतर कुठे जातात टॉपर मुली?

           सगळ्याच गोष्टीत मुलं पुढे आहेत मग ९०-९९% घेऊन मुली जातात तरी कुठे..?

       मुली दहावीत टॉप , बारावीत टॉप, Engineering, MBBS, LLB, MBA, CA, CS सगळ्या गोष्टीत मुली टॉप...!!


                मग बहुतांश तज्ज्ञ आणि हुशार लोकांनाच प्रश्न असतो... कुठे जातात या टॉपर मुली..? आज उत्तर देतो त्या इकडेच असतात तुमच्या आजू-बाजूला पण दिसत नाही कारण... त्या नाती सांभाळत असतात. कोणी हातात बाळ घेऊन जगण्याशी लढत असतात. तर कोणी नवऱ्याचे डबे बनवत असतात आणि कोणी कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी सुद्धा होत असतात....

            मुलींचं शिक्षण आपल्या आई वडिलांकडे असतात तोवर सुरळीत होत असते, घरात कसलीही जबाबदारी नाही मुलीचे आई वडील आपल्या मुलीच्या करिअर संबंधी खूप विचार करतात, पैसा ओततात. पण मग २५ वय होताच अचानक लग्न होतं आणि तिकडून टॉपर मुली गायब होण्यास सुरवात होते...

             काल क्लासेस वरून निघत असताना कित्येक वर्षाने एक मैत्रीण भेटली १ वर्षाच्या मुलासोबत तिला पाहून आश्चर्यचकित झालो.. इकडच्या-तिकडच्या गोष्टी करून तिने विचारलं, "तुझ्या क्लास मध्ये एखादा विषय आहे का शिकवायला, मी घेत जाईन क्लास, कमी पगार असला तरी चालेल....!"

                  हे ऐकून विचारात पडलो.अत्यंत हुशार, शाळेत कायम पहिली, कधी कुणाशी वैर नाही की कोणत्या मुलाशी भानगड नाही... आई वडिलांनी भरपूर पैसे खर्च करून शिकवलं, मोठे क्लासेस, चांगले कॉलेज या मधून शिक्षण ही भविष्यात काहीतरी करणार अशी सगळ्यांची आशा... तिची अशी अवस्था पाहून धक्काच बसला खूप विचारपूस केल्यावर समजलं तिच्या आई वडिलांनी खूप पैसा असलेल्या, सरकारी नोकरीत उच्च पदावर असलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं. लग्नानंतर शिकू देऊ, नोकरी करू देऊ सांगून फसवलं..

                   पण घरात बायकोला थोडेफार पैसे देऊन सगळा हिशोब मागायचा... शिक्षण-नोकरी तर लांब राहिली स्वयंपाक आणि घरातली कामं यावरून तिची पारख होण्यास सुरुवात झाली....  कारण लग्नानंतर सासरच्या लोकांसाठी टॉपर, हुशार, शिक्षण या सर्व गोष्टीं शून्य असतात पण स्वयंपाक येत नसेल तर "काय उपयोग एवढं शिकून..? साधा स्वयंपाक येत नाही..." असा प्रश्न करतात!

              
                 मग तिने कसंतरी घरचं काम शिकून नोकरी करण्यास सुरुवात केली. पण नंतर... 
"खुशाल नोकरीवर जातेस सगळी कामं माझ्या आईला करावी लागतात"  
"भांड्यांना साबण तसाच असतो, भाजीत केस निघाला.. 
"मी एवढी वर्षे संसार केला पण कधी भाजीत खडा निघाला नाही"  
"डोळे खाली करून बोलायचं, मोठ्या आवाज नको" ..!!

              मुल होण्यासाठी घाई केली आणि त्यात पूर्ण अडकवून दिलं, घरात रोजचे पाहुणे, त्यांचं आगत स्वागत, बाळाचा सांभाळ या सगळ्या चक्रव्यूहात अडकून गेली होती ती ..बाजूला राहीलं ते तीचं शिक्षण आणि हुशारी... कागताचे तुकडे बनून राहिल्या होत्या तिच्या सर्व डिग्र्या ...


                  नंतर मनात विचार आला कोणी पोटातून तर शिकून येत नाही आणि कालपर्यंत शिक्षण आणि करिअर मध्ये गुंतलेल्या मुलींना सगळं शिकायला आणि नीट जमायला थोडा वेळ तर लागेल हे का कोणी समजून घेतं नाही..??

            याउलट जर फक्त घर आणि परिवार सांभाळण्यासाठी मुलगी हवी असेल तर एखादी दहावी नापास पण स्वयंपाक आणि घरकाम उत्तम येत असेल अश्या मुलीशी लग्न का नाही करत..??

            चार लोकांमध्ये अपमान होऊ नये म्हणून शिकलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि मग भाजीत तेल जास्त, मीठ कमी, मसाला कमी, पोळ्या कडक किंवा भाजी पातळ यावरून तिच्या शिक्षणाचं आकलन का करायचं..!!

                 लता मंगेशकर खरंच यांनी लग्न केलं नाही कदाचित म्हणून त्यांचा कर्तुत्वाला थांबवू शकलं नाही कोणी..? की मेरी कोम च्या नवऱ्याने घरातली अगदी स्वयंपाकपासून ते बाळ सांभाळण्याची जबाबदारी उचलली म्हणून ती जिंकत गेली असेल का..??


                 पण आता सगळं लक्षात आलं की कुठे जातात या टॉपर मुली...असतात या आपल्याच आजूबाजूला, डोक्यावर पदर घेऊन सासुसोबत पूजेला जात असतात तर कोणी नवऱ्याचा मित्रांना चहा नाश्ता बनवत असतात... कधी त्या आपल्यातच असतात..!!!

             ह्या टॉपर मुली अजून टॉप वर जाऊ शकतात... फक्त हवेत उडण्या आधी त्यांचे पंख छाटू नका..!!!!



लेखक Sanjana
( संग्रहित लेख ,आंतरजालावरून साभार )


Wednesday, January 23, 2019

माणसे जिंकायची आहेत ?📖 …मग दोन तीन मिनिटे काढून हे वाचाच !!


                 एका ऑफिसमध्ये लेडीज रिसेप्शनिस्टची जागा भरायची असते. पेपरला जाहिरात देण्यात येते. कंपनी नामांकित असल्याने अर्जही खूप येतात. ठरलेल्या दिवशी मुलाखती सुरू होतात. बॉस स्वतःच मुलाखत घेत असतो. एकीची मुलाखत चालू असतानाच टेबलावरचा फोन वाजतो. डिस्टर्ब् झाल्याने बॉस त्रासून फोन उचलतो. मात्र तिकडून अतिशय गोड आवाज येतो. 
"नमस्कार सर, मी स्वरदा बोलतेय."
फोनवरचा तो गोड आणि मंजुळ आवाज ऐकून बॉसचा वैताग कमी होतो. 
बॉस : "बोला"
"काही नाही. तुमच्या ऑफिसमधील रिसेप्शनिस्टच्या जागेसाठी मलाही यायचंय."
बॉस : "मग प्रॉब्लेम काय आहे ? इथे मुलाखती सुरू आहेत. तुम्हीही येऊ शकता"
"तेच तर न सर, मलाही यायचंय पण ट्रॅफिक जाममध्ये अडकली आहे. पोचायला उशीर होतोय:"
बॉस : "ओके ओके, या तुम्ही"

               इकडे मुलाखत सुरू राहते. अजून एकदोन मुलाखती होतात . पण बॉसच्या कानात त्या स्वरदाचा आवाज गुंजत असतो. 
दहा पंधरा मिनिटांनी पुन्हा फोन येतो. 
"सर, ट्रॅफिक कमी झालेय मी निघाली आहे. पण प्लिज सर उशीर झाला तर समजून घ्या"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही, पण शक्यतो वेळेत या"

                    पुन्हा तो आवाज ऐकून बॉस विचार करू लागतो. खरेच किती सौजन्यशील मुलगी आहे. फोनवरचा आवाज ऐकताना आपण मंत्रमुगध होतोय. हीच मुलगी परफेक्ट आहे रिसेप्शनिस्ट म्हणून !!

              तरी इकडे अजून शिल्लक उमेदवाराच्या मुलाखती सुरूच असतात. पण बॉस आता या मुलाखती औपचारिकपणे घेत असतो. कारण त्याच्यासाठी "स्वरदा" फिक्स झालेली असते. इतक्यात अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो.
"सर, मी तुमच्या ऑफिसच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये आहे. पण गाडी लावायला जागा नाहीये. मी बाहेर रस्त्यावर कुठे जागा मिळतेय का पाहून येतेय. सर प्लिज, त्यामुळे थोडा उशीर होतोय. प्लिज प्लिज"
बॉस : "हरकत नाही. या तुम्ही सावकाश"

                  आता बॉसला तिला भेटायची, पाहायची उत्सुकता लागून राहते. इतक्या मंजुळ आवाजाची मुलगी, नक्की कशी असेल ? म्यानर्स तर चांगले आहेत. नक्की हिलाच घेऊया. 

             अजून सात आठ उमेदवार शिल्लक असतानाच एक चिट्ठी घेऊन शिपाई केबिनमध्ये येतो. चिट्ठीवर लिहिलेले असते.
"सर, मी स्वरदा, आलेय तुमच्या ऑफिसमध्ये"
बॉस बाकी उमेदवाराची लिस्ट बाजूला ठेवूंन तिला लगेच आत बोलावतो. 
स्वरदा आत येते. आणि sssssss 
बॉस एकदम दचकतो. दारात एक सावळी (जवळपास डार्कच कलरची, थोडीशी ग्रामीण ढंग वाटावा अशी "स्वरदा" उभी असते. बॉसचा भ्रम निरास होतो. त्याच्या अपेक्षेत तिची प्रतिमा जरा वेगळीच (आणि सुंदर वगैरे) असते. 
स्वरदा बोलू लागते. 
"सर, मला माहीत आहे. तुम्ही मला पाहून निराश झाला असणार. तुमच्या अपेक्षे प्रमाणे मी दिसायला सुंदर नाही. ते मलाही माहीत आहे. पण सर, मी इथे येण्याआधी तुमच्या कंपनीची माहिती काढलीय. त्यानुसार इथे बाहेरून येणारे ग्राहक कोणीच नसतात. आपली सर्व कामे फोनवर चालतात. आणि सर फोनवर आवाज लागतो, सौंदर्य नाही. हे तुम्हालादेखील माहीत आहे. आणि अजून एक सर, केवळ सौंदर्य नाही म्हणून आजवर अनेक ठिकाणाचा नकार पचवलाय. यावेळी म्हणून मी थोडा वेगळा विचार केला. आणि ठरवून तुमच्याशी मुद्दाम आधीच तीनचार वेळा फोनवर बोलत राहिले. माझे जे मेन qualification आहे तो आवाज तुम्ही ऐकला. म्हणून तर बाकी उमेदवाराला बाजूला ठेवून तुम्ही आधी मला आत बोलावलेय. आता निर्णय तुम्ही घ्यायचाय सर"

           दोन मिनिट निशब्द शांतता. 
बॉस : "ते ठीक आहे. पण तरी इथे इतर स्टाफ वेगळ्या स्टाईलमध्ये राहणारा आहे. त्यांना तू आणि तुलाही ते ऑकवर्ड होईल. त्याचे काय ?"
स्वरदा : "मनासारखी अप्सरा तर कुणालाच मिळालेली नसते. तुमचे लग्न झाले असणारच. विचार करून पहा सर,. तुमच्या १००% अपेक्षेसारखी पत्नी आहे का ? पण तरी तुम्ही सुखी होताच न. कारण सहवासाने समोरच्यामधील एखादे वैगुण्य नंतर ते वैगुण्य वाटत नाही सर. तसेच इथल्याचे होईल"

                   तात्काळ बॉसने ड्रॉवरमधून अपॉईंटमेन्ट लेटर काढले, त्यावर सही केली आणि म्हणाला, 
"उद्या सकाळी तू रिसेप्शन टेबलवर मला दिसली पाहिजेस. गुड लक"

                 आपल्यात उणीव आहे, किंवा आपण कशात तरी कमी आहोत, म्हणून निराश होण्याचे कारण नाही. दुसरा असा एकतरी गुण नक्की असेल जो तुम्हाला विजयी करेल. यशस्वी करेल. त्या "एका" गुणांचा शोध घ्या. नक्की सुखी व्हाल......


……  ✍  व.पु. काळे --- 
…… कादंबरी   ' स्वर '

Sunday, January 20, 2019

I am  J. R. D. Tata

अभिनेता दिलीप कुमार म्हणतात......
"जेव्हा माझं करिअर उंची वर होत... प्रसिध्दी पदरी होती मला... सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग.....

एकदा मी विमानाने प्रवास करत होतो... 
माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता... 
माणूस खुपच Simple...कपडे त्यांनी 
साधीच घातलेली...
Middle class वाटत होता... 
पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता...
मी विमानात आलो हे लक्षात येताच इतर प्रवासी मला हात दाखवू लागले... 
माझ्याकडे पाहू लागले... पण माझ्या बाजुला बसलेला Gentleman ते आपल्या कामात मग्न होते... 
त्यांनी माझ्याकडे लक्ष पण नाही दिलं... 
ते वर्तमानपत्र
(Newspaper) वाचत बसलेले... 
खिडकी च्या बाहेर बघत होते.... 
पण ते माझ्याशी बोलले पण नाहीत... 
बोलणं तर दूरच बघितलं सुद्धा नाही... 
जेव्हा चहा प्यायची वेळ आली मीच त्यांना Smile दिली... 
ते पण हसून उत्साहाने मला Hello म्हणाले... 
मग आम्ही बोलायला लागलो...
मी सिनेमाचा विषय काढला आणि त्यांना विचारलं, "सिनेमा बघता ना?"
ते म्हणाले, 
"हो, पण खुप कमी...खुप वर्ष झालीत शेवटचा सिनेमा पाहून.."

मी म्हटलं की मी स्वतः सिनेमात काम करतो..
"अरे वाह! 
काय करता तुम्ही?" त्यांनी मला विचारलं.....मी अभिनेता आहे त्यांना सांगितलं...

ते म्हणाले “अच्छा...छानच..”
जेव्हा आम्ही पोहोचलो... विमानाच्या बाहेर निघताच... 
मी माझा हाथ समोर करून म्हटलं.. 
“खरंच, खुप छान वाटलं तुमच्या बरोबर प्रवास करून, बाय द वे, माय नेम इज दिलीपकुमार’

त्यानी माझ्याशी हात मिऴवला आणि म्हटलं..
'अरे वा....
I am  J. R. D. Tata!’

त्याक्षणी मी शिकलो की तुम्ही किती पण मोठे व्हा, तुमच्यापेक्षा नेहमीच कोणीतरी मोठं असणार..
माणसानी अहंकार न बाऴगता नम्र असावे

Friday, January 18, 2019

नामदेव ढसाळ ( कविता भाग:1 )

मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे

मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे
वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला
प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी
बायकोला म्हणालो–‘घे यातले थोडेसे वाटून’
तिने कानांवर हात ठेवले!
मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली
त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही
वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर
आर्षकाव्य तरी लिहिले.
आणि मी?
मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले.
हे जगण्याच्या वास्तवा
आता तुच सांग मी काय लिहू?

Tuesday, January 15, 2019

तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले

मेरी छोटी छोटी ग़लतियो को Too Much करने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,
मेरी ज़िंदगी सिर्फ मेरी है,
मेरे ख़ुदा ने सिर्फ़ मुझे बख्शी है,

मेरी ज़िंदगी सिर्फ मेरी है,
मेरे ख़ुदा ने सिर्फ़ मुझे बख्शी है,
तू अपनी तो जी ले पहले, मेरी पे हक़ रखने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,

मेरी छोटी छोटी ग़लतियो को Too Much करने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,
जिस्म मेरा है तो कपड़े भी मेरे होंगे,
गलतियां मेरी है तो फ़ैसले भी मेरे होंगे,
अपना काम छोड़ कर मेरे कपड़ों पे Comment करने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,

मेरी छोटी छोटी ग़लतियो को Too Much करने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,

अठारह की हो गई बेटा सम्भल कर रहना ,
पच्चीस की हो गई अभी तक शादी नही की,
मेरे घर वालो से ज्यादा मेरी फ़िक्र करने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,

मेरी छोटी छोटी ग़लतियो को Too Much करने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,
समझ नही आता किस सोच मैं जी रहे हो,
लड़को को घर का ताज और लड़कियों को पराया धन कह रहे हो,
लड़का और लड़की मैं फ़र्क़ करने वाले ,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,

मेरी छोटी छोटी ग़लतियो को Too Much करने वाले,
तुम होते कौन हो मुझे Judge करने वाले,

( संग्रहित कविता )

Monday, January 7, 2019

शोधतेय मी...

शोधतेय मी...

कांट्यांबद्दल तक्रार कधीच नव्हती माझी
फक्त त्यांची सल विसरवणारी
माझ्या वाट्याची 'ती पाकळी'
                शोधतेय मी...

अंधाराची भीतीही वाटत नाही हल्ली
फक्त प्रकाशाची आस जागवणारा
माझ्या हक्काचा 'तो कवडसा'
                      शोधतेय मी...

दुःखाचं दुःख करणं कधीच सोडलंय मी
फक्त क्षणासाठी का होईना हसवणारा
सुखाचा 'तो क्षण'
                    शोधतेय मी....

अश्रूंचा हिशेबही मी मांडत नाही हल्ली
फक्त त्यात मिसळलेला एखादाच
'तो आनंदाश्रू'
                     शोधतेय मी....

          कवियत्री : नीता सूर्यवंशी

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...