व्यवसाय करत असताना छत्रपती शिवरायांकडून काय शिकाल?
छत्रपती शिवाजी महाराज Swapnwel.blogspot.com |
१.सुरवात करण्यावर भर दया, कमरतेवर लक्ष देऊ नका.
रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबानं सोबत फक्त ८-१० मावळे होते.
२.यशाचा, वय, अनुभवाचा संबंध नसतो.
महाराजांनी तोरणागड वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते.
३.स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं. मुघल, निझाम, आदिलशाह असे कसलेले विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापले होते.
४.सहकारी चांगले निवडा.
आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असे म्हणत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची ताकत होती.
५.संकटाला घाबरू नका, संकटकाळी स्वतः नेतृत्व करा.
अफझलखानाचे संकट महाराजांनी स्वतः हाताळले होते, शांत राहून प्रत्येक निर्णय आमलात आणला होता.
६.नियोजनबद्ध काम करा, अंमलबजावणी योग्य प्रकारे करा.
पुण्याला वेढा घालून बसलेल्या शाहिस्तेखानाला अतिशय नियोजनबद्धरीतीने पराभूत केले.
७.संकटकाळी धीर सोडू नका, शांतपणे निर्णय घ्या.
पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही महाराजांनी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले.
८.सगळं संपलंय असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा.
पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज संपलं असंच सगळ्यांना वाटलं होतं.... महाराज सोडून.
९.स्वाभिमानी रहा, आत्मसन्मान आवश्यक आहे.
आग्ऱ्यामध्ये औरंगजेबासमोर त्यांच्याच दरबारात आपल्या अपमानाविरोधात बोलण्याची हिंमत महाराजांनी दाखवली होती.
१०.नैतिकतेने, नियमाने वागा, सहकार्यांनाही शिस्त लावा.
महाराजांचे नियम स्वतः महाराज सुद्धा मोडत नसत. अगदी जवळच्या सहकार्यांना सुद्धा नियमभंगाच्या शिक्षेत माफी नसे.
११.स्वतःचे अस्तित्व दाखवण्यात कोणतीही कसर ठेवू नका.
राज्याभिषेक फक्त जनतेसाठी नव्हता तर देशातील तमाम अन्यायकारी शाह्यांना कल्याणकारी स्वराज्याचे अस्तित्व दिमाखात दाखवण्यासाठी होता.
१२.जबाबदारीचे वाटप करा.
महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना, तसेच इतरवेळी जबाबदारीचे वाटप करून ठेवत, त्यामुळे कामात सुसूत्रता राही.
१३.शांतपणे निर्णय घ्या.
कोणताही निर्णय घेताना महाराज घाईगडबड करत नसत, शांत राहून पूर्ण विचार करून मगच योग्य निर्णयाप्रत येत.
१४.वेळप्रसंगी कठोर निर्णय घेताना कचरू नका.
स्वराज्य हितासाठी महाराजांनी अनेक कठोर आणि कटू निर्णय घेतले, वेळप्रसंगी आपल्या आप्तेष्टांविरोधात सुद्धा निर्णय घेताना डगमगले नाहीत.
१५.लोकांना आपलेसे करा.
लोकांशी फटकून वागून तुम्ही प्रगती करू शकत नाही. महाराज जनतेसोबत वागताना कोणतेही अंतर न ठेवता अगदी त्यांच्यातले होऊन जात, अगदी घरातील सदस्य असल्यासारखे.
१६.वचक असायलाच हवा.
महाराजांच्या परस्पर कोणताही निर्णय घेण्याची हिम्मत कुणातही नसे, महाराजांनी ठरवून दिलेल्या नियमांबाहेर कुणीही जात नसे. यामुळे कामावर योग्य अंकुश राही.
१७.क्षमाशील असा.
महाराज जितके कठोर होते तेवढे दयाळू आणि क्षमाशीलही होते. महाराजांच्या या स्वभावामुळे कित्येक विरोधक सुद्धा त्यांचे सहकारी बनले होते.
१८.मनाचा ठाव घ्या.
समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे हे महाराजांना चांगलं समजायचं. त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीला तात्काळ आपल्याबाजूने वळवण्यात यशस्वी होत.
१९.माघार घेणे सुद्धा काहीवेळेस आवश्यक असते.
महाराज कित्येक वेळा परस्थिती पाहून माघार घेत. त्यामुळे होणारे नुकसान टळत, आणि पुन्हा तयारी करण्याची संधी मिळे. यात कोणताही कमीपणा नाही!
२०.युद्धात हराल किंवा जिंकाल पण तहात हरू नका.
महाराजांनी प्रत्येक वेळी फक्त लढाई जिंकण्यालाच महत्व दिले नाही तर तहात जिंकणे महाराजांसाठी महत्वाचे असे. युद्धाचा अंतिम परिणाम तहच असतो.
महाराजांचा आदर्श जीवनात ठेवा नक्कीच यशस्वी व्हाल....
(संग्रहित लेख)
No comments:
Post a Comment