Monday, January 7, 2019

शोधतेय मी...

शोधतेय मी...

कांट्यांबद्दल तक्रार कधीच नव्हती माझी
फक्त त्यांची सल विसरवणारी
माझ्या वाट्याची 'ती पाकळी'
                शोधतेय मी...

अंधाराची भीतीही वाटत नाही हल्ली
फक्त प्रकाशाची आस जागवणारा
माझ्या हक्काचा 'तो कवडसा'
                      शोधतेय मी...

दुःखाचं दुःख करणं कधीच सोडलंय मी
फक्त क्षणासाठी का होईना हसवणारा
सुखाचा 'तो क्षण'
                    शोधतेय मी....

अश्रूंचा हिशेबही मी मांडत नाही हल्ली
फक्त त्यात मिसळलेला एखादाच
'तो आनंदाश्रू'
                     शोधतेय मी....

          कवियत्री : नीता सूर्यवंशी

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...