Tuesday, June 11, 2019

भाड्याची सायकल




Old Atlas cycle advertisement

१९९०-९१ चा काळ होता तो...
त्यावेळेस आम्ही लोकं भाड्याने छोटी सायकल घेत होतो...
बहुधा ती लाल रंगाची असायची जिला कँरीअर नसायचे, ज्यामुळे तुम्ही कुणाला डबल सिट नेऊ नये हा उद्देश असायचा. 
भाडे जेमतेम ५० पैसे ते १ रू तास च्या आसपास होतं. 
दुकानदार भाडे पहिले घ्यायचा आणि आपले नाव त्याच्या रजिस्टर वर नोंदवायचा. 
घराच्या जवळ असे अनेकजण सायकल दुकानदार होते...

भाड्याचे नियम कडक असायचे. 
जसे पंचर झाली तर त्याचे वेगळे पैसे, तुटफुट आपली जबाबदारी... 
मग त्या सायकल वर आम्ही गल्लीतले युवराज सवार व्हायचो 鸞
पुर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडुन पुन्हा उठून चालवायचो. 
आपल्या गल्लीत येऊन सर्व मित्र आळीपाळीने सायकल चालवायला मागायचे.  
भाड्याच्या टाईमाचा लिमिट निघुन न जावा म्हणून 
तीन चार वेळेस त्या दुकानापासुन चक्कर व्हायची...

तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे आमच्या श्रीमंतीचे लक्षण होतं... 朗
स्वतः ची लहान सायकल असणारे त्यावेळेस खुप रईसी झाडायचे... 類

एव्हाना आमच्या घरी तेव्हा मोठी काळी अँटलस सायकल आणली, पण तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं 
यातचं अर्धी एनर्जी वाया जायची
आणि वरुन वडिलधाऱ्याचा धाक...
खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फुटुन येशील...
तरी पण न जुमानता आम्ही घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकायचो... 
पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं...
असं करत करत आम्ही कैची ( हाफींग ) शिकलो. 
नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नविन विक्रम घडवला.. 
यानंतर सिट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता , 
नंतर सिंगल, डबल,  हात सोडुन, कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट आम्ही तेव्हाच करुन चुकलो...

खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालु आहे 
पण आता ते दिवस नाही...
तो आनंद नाही.... 

आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकलवर नजर गेली तेव्हा वाटलं एक काळ गाजवलेल्या सायकल ची किंमत अन् मजा यांची सर आता असलेल्या बुलेटला पण येणार नाही...
संग्रहित पोस्ट

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...