Saturday, June 8, 2019

तुमचं Gmail अकाऊंट किती ठिकाणी आहे लॉग इन, असं करा चेक_

◆ Gmail आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. जीमेलमध्ये असेलल्या फीचरमुळे अनेक कामं सोपी होतात.

◆ पण अनेकदा जीमेलच्या व्हेरिफिकेशन कोडसाठी ईमेल पाठवला जातो अशा वेळी अन्य कोणी आपलं जीमेल अकाऊंट हॅक केलं तर अशी भीती वाटते.

◆ तुमचं जीमेल अकाऊंट कुठे कुठे लॉग इन आहे हे पाहता येतं कसं ते जाणून घेऊया.

◆ सर्वप्रथम आपलं जीमेल अकाऊंट ओपन करा. त्यानंतर त्यातील सेटींगमध्ये जा.

◆ सेटींग ओपन केल्यावर तुम्हाला समोर एक जीमेल आयडी ओपन झालेला दिसेल त्यावर टॅप करा.

◆ ‘Manage your google account’ सिलेक्ट करा.

◆ हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर पेजवर काही इतर पर्याय दिसतील. ज्यामध्ये ‘Security’ या पर्यायावर क्लिक करा.

◆ त्यानंतर खालच्या दिशेने स्क्रोल करा. ‘Your Devices’ चा एक पर्याय मिळेल.

◆ ‘Your Devices’ वर क्लिक केल्यास तुमचं जीमेल लॉग इन असलेल्या सर्व डिव्हाईसच्या नावाची एक लिस्ट समोर येईल.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...