म्हातारे आई वडील खूप दुःखी आहेत अशा बऱ्याच कविता आहेत.
पण दोघे मजेत आहेत अशी एक कविता नुकतीच व्हाट्सअँपवर वाचली तीच फॉरवर्ड करत आहे.
————————————————————
"आम्ही दोघे"
मुलगी आमची युरोपात असते
आणि मुलगा यूएस मध्ये असतो
इथे मात्र आम्ही दोघेच असतो
मुलगा,जावई आॅफिसात राब राब राबतो
मुली,सुनेचा ही कामाने पिट्टया पडतो
मदतीला या मदतीला या
दोघींचाही आग्रह असतो
चतुराईने आम्ही टाळतो कारण
इथे मात्र आम्ही एन्जाँय करत असतो !
हिच्या खूप हाँबीज आहेत
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो
मला कसलीच आवड नाही
मी राहिलेल्या झोपा पूर्ण करून घेतो..
कारण आम्ही दोघेच
असतो !
कधी संध्याकाळी आम्ही सिनेमाला जातो
येतांना बाहेरच जेवून येतो
रोज रात्री मनसोक्त टीव्ही बघत
चवीचवीने जेवण करतो
कारण आम्ही दोघेच असतो !
एकदा मुलाचा फोन येतो
एकदा मुलीचा फोन येतो
वेळ नाही अशी तक्रार करतात
आमचाही उर भरून येतो
तुम्हीही नंतर एन्जाँय कराल
असा त्यांना धीर देतो
कारण आम्ही दोघेच असतो !
नव्या नवलाईने सगळीकडे जाऊनही आलो
स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो
इकडचं - तिकडचं
दोन्ही जगं एन्जाँय करतो
कारण आम्ही दोघेच असतो !
नाही जबाबदारी नाही कसलीच इथे
आणि नाही कसली तक्रार तिथे
नाही कसली अडचण सुखाची
मस्त लाईफ एन्जाँय करतो
कारण आम्ही दोघेच असतो !
भांडण तंटे आमचेही खूप होतात
नसते तिला स्मरण नि मला आठवण
खरे तर काहीच नसते वादाचे कारण
वाद विसरून गट्टी करतो
कारण आम्ही दोघेच असतो !
तिला मंचुरीयन आवडते
ती ही ठराविकच हाँटेलात मिळते
नेहमीच ती मिळते असे नाही
पण ती आली की मी नक्की आणतो
घरच्या स्वैपाकाची कटकट नाही
कारण आम्ही दोघेच असतो !
मरणाच्या गोष्टी आम्ही करत नाही
पार्ट्या करतो ट्रिपा काढतो
हाताशी आता पैसे आहेत
वेळ अन मित्रही भरपूर आहेत
मुलांच्यामुळे अडकायचे दिवस संपले
हे जाणून मनोमनी खूश होतो
कारण आम्ही दोघेच असतो !
मुलांना हेवा वाटायला नको त्यांच्यापासून ही मौजमस्ती लपवून ठेवतो
संगनमताने तीही हसते .. साथ देऊन मीही हसतो
कारण आम्ही दोघेच असतो !
कारण आम्ही दोघेच असतो !!
No comments:
Post a Comment