Tuesday, September 26, 2023

कथा झालेलं जगणं!

माणसं असं का करतात?
आयुष्यातल्या महत्वाच्या निवडी का चूकवतात?
मनकल्लोळाची तजवीज का करतात?
सुयशने करिअरची दिशा कशी फसवली?
प्रिया प्रेमात पडताना सतत चूकीच्या व्यक्तीच का निवडते?
नवऱ्याने cheating केलंय हे कळल्यावर रिधी चिडली होती;
खरंतर त्याचवेळी घटस्फोट घेऊ शकली असती ती
आणि move on झाली असती.
पण तिने संसार न मोडण्याचा निर्णय घेतला. बरं ठीक आहे.
पण मग आता सतत भूतकाळ उगाळत का बसते ती?
धीरज बोलताना इंपल्सिव होऊन बरोब्बर नातं विस्कटेल
याची तजवीज का करतो?

याचं एक कारण आहे.
मानवी मेंदू एका विशिष्ट गोष्टीसाठी बनलाय हे जाणवतं‌.
ती गोष्ट म्हणजे, 'कथा'.
माणसाला कथा वाचायची, ऐकायची, पाहायची असते;
पण मुख्य म्हणजे माणसाला स्वत: 'कथा' व्हायचं असतं.
कारण कथेतून विचार-भावनांची मुबलकता मिळते,
जी consciousness ला हवी असते. का? 
✓कारण कशावरूनतरी conscious होता आलं
तरच consciousness जिवंत राहील ना?✓
समोर सतत घटना असेल तरच भावना असेल ना?
भावना असेल तरच चेतना राहील ना?
मनाची survival need आहे ती.
म्हणूनच माणसं सतत आपल्या क्रिया-प्रतिक्रियांमधून
काहीएक नाट्य घडेल याची सोय करत बसलेली असतात.
त्यातून मनाला occupation देण्यासाठी भावना मिळवत राहतात.
"याचा आपल्याला काय फायदा?" हे बहिर्मन झालं;
पण त्याला आंधळं करण्याचं काम अंतर्मन करतं!
ते सकारात्मकतेची आस ठेवतं;
पण नकारात्मकतेचीही सोय करून ठेवतं! का?
पटणार नाही लगेच; पण आपण ज्याला मनस्ताप म्हणतो
तोच consciousnessला सर्वात जास्त व्याप देतो.
Food for consciousness.
जेवढा जास्त व्याप, तेवढं जास्त occupation. 
तेवढं जास्त मनाचं अस्तित्व. 
म्हणूनच 'स्वत:ची काशी करून घेणं' हा मानवी जीवनाचा हेतू असल्यागत मन वागतं!

अर्थात हा अंतर्मनाचा गैरसमज असतो.
सात्विक जेवण असेल तर उगाच भरमसाठ बुफेची गरज नसते.
सात्विकता सत्यतेत असते; त्यापासून फारकत घेऊन
कथेत घुसायची लागलेली सवयच माणसाचा घात करते.

यातून होणारा त्रास टाळायचा असेल,
तर उपाय mindfulness.
"निवडीचा जो impulse मला खुणावतोय,
तो मला वैचारिक वाट देतोय की
भावनिक लाट देतोय?"
या प्रश्नाच्या उत्तरात शहाणपण दडलंय.
कथेत भाग घेताना जाणवतं, की 
इथे विचार नाहीयेत; फक्त एक भावनिक तरंग आहे, 
ज्यावर आरूढ होऊन चाललोय आपण.
कथाविरहित सत्य जगताना आपण भावनाशून्य असतो
अशातला भाग नाही.
पण त्यात वैचारिक स्पष्टता असते. 
त्यात 'चालणं' असतं; 'वाहत जाणं' नाही. 

© अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ 
{कृपया लेख शेअर केल्यास लेखकाच्या तपशीलासहित करावा, ही नम्र विनंती. शेअरिंगबद्दल आभार ! आवडल्यास जरूर कळवा !}

Friday, September 22, 2023

थोडं पुढं जाऊ गड्या

चित्रपट, मालिका यांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या तसेच आजूबाजूला उपलब्ध असणाऱ्या सुखसुविधा आणि त्यांचा उपभोग घेणारी माणसे बघून आपल्या मनामध्ये त्या गोष्टी, सुखसुविधा आपल्याकडेही असाव्यात अशा सुप्त इच्छा निर्माण होतात.

 फक्त त्या लोकांच्या चेहऱ्यावर त्या सुखसुविधा असल्यामुळे आलेला आनंद दिसतो. खरंतर त्यातील अनेक गोष्टींची आपल्याला अजिबातही गरज नसते किंवा त्या आपल्याला सूट सुद्धा होणार नसतात. परंतु फक्त त्यांच्याकडे आहे मग आपल्याकडे का नाही? अशा भावनेतून ते आपल्याकडेही असावे असे वाटू लागते. यातूनच आपले प्रयत्न त्या दिशेला होऊ लागतात. पण हे प्रयत्न करत असताना आपली पात्रता, क्षमता, कौशल्य त्यासाठी योग्य आहे का हे तपासून घेणे मात्र आपण विसरून जातो.

खरंतर प्रत्येक व्यक्तीला त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार आहेत असे मला वाटते. परंतु ती इच्छा पूर्ण करण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट हे ही नजरेआड करून चालणार नाही. काहीतरी हवय, काहीतरी मिळवायचे म्हणून जिद्दीला पेटलेली लोक आजूबाजूला भरपूर भेटतात. पण यात सगळेच जण यशस्वी होतात का? जे यशस्वी होतात त्यांचे समाधान किती दिवस टिकते? की पुन्हा एकदा नवीन गोष्टीचा शोधात ते पुढे पुढे जातात.

जे अयशस्वी होतात ते हार मानून गप्प बसतात की आपण अयशस्वी का झालो? याची विशिष्ट कारणे देऊन स्वतःचे आणि इतरांचे समाधान करतात. पण हे समाधान सुद्धा वरवरचे असते. खोलवर दडलेल्या त्या सुप्त इच्छेला आपण पूर्ण करू शकलेलो नाही. याची पुसटशी जाणीव मनात सल बनून राहते..... टोचत....

खरंतर दुःख करत बसणे याचा आपल्याला आपल्या आयुष्यात विशेष असा काही फायदा असावा असे मला वाटत नाही. आपण का अपयशी ठरलेला आहोत? याचा योग्य आणि सत्य कारणांचा शोध घेऊन पुन्हा एकदा प्रयत्न केले जाऊ शकतात. दुःख करण्यापेक्षा पुन्हा प्रयत्न केल्याचा मात्र काहीतरी फायदा होऊ शकतो. 

परंतु यात एक छोटीशी गोम आहे जेव्हा व्यक्ती भरपूर प्रयत्न करून हरतो तेव्हा त्याला पुन्हा प्रयत्न करण्याची इच्छा उरत नाही. कारण सुप्त अवस्थेत एक भीती निर्माण होते... पुन्हा असंच घडलं तर.... पुन्हा अपयश आले तर...

बस या निर्माण झालेल्या भीतीचे भरपूर लोक बळी ठरतात आणि विशेष म्हणजे अनेकांना त्याची जाणीव सुद्धा नसते. थोडे संकट आले किंवा थोडे प्रश्न निर्माण झाले तरीही आपण घाबरून जायला लागतो..अशाच सुप्त भीतीमुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक घटकांच्या ठिकाणी प्रयत्न करण्याचे धाडस देखील दाखवत नाही. अनेक संधी सोडून देतो... 

यापेक्षाही बिकट अवस्था असेल तरीही आपण एकदा प्रयत्न करून पाहू शकतो फक्त मार्ग थोडा वेगळा वापरून थोडं पुढं जाऊ गड्या 

- नवनाथ वाघ

Wednesday, September 20, 2023

प्रश्न

अभिव्यक्ती..

Friday, October 30, 2020कधीतरी असं होतं की आपण निराशेच्या गर्ततेत खोल खोल बुडत असताना कुणीतरी अचानक येऊन आपला हात धरतं आणि बाहेर खेचतं अगदी ध्यानी मनी नसतानाही. त्याचं असं अलवार जखमेवर फुंकर घालणं किती सुखावून जातं मनाला ! त्याची आश्वस्थ नजर सतत धीर देते की मी आहे तुझ्यासोबत, अगदी कायम ! मुठीत चांदणं लपवावं तसं त्याचं ते स्मित डोळ्यात दडवून आपणही मग बागडत राहतो बेभान होऊन हरणीसारखं माळभर अन् अचानक ठेच लागते.

आपण भानावर येतो तेव्हा कळतं अरे सावरणारा हाही हात काळाच्या चक्रात कधीचाच मागे राहिला ! आपण कोणत्या अनामिक धुंदीत एकटंच पूढे आलो इतकं ? मागे वळून पहावं तर आठवणीशिवाय कोणत्याच पाऊलखुणा त्याच्या असण्याची साक्ष देत नाहीत. मग पुन्हा एकदा तोच जुना काळाभोर विषाद पसरू लागतो माळभर. आता हा अंधार कोंडावा आत खोलवर नि लावून घ्यावं मनाच दार कायमचं की प्रतीक्षा करावी पुन्हा एखाद्या अशा हाताची जो सुटणार नाही मधेच कधीही ?

निकिता सु. विचारे

Tuesday, September 19, 2023

कळलच नाही,

 कधी एवढे मोठे झालो कळलच नाही, कधी बाबांच्या support शिवाय सायकल चालवायला शिकलो
कळलच नाही,

कधी, मला हे नाही जमणार ते, मी आहे ना तू काळजी करू नकोस पर्यंत पोहचलो 
कळलच नाही, 

कधी आयुष्यातील सगळ्या जबाबदाऱ्या घेईला लागलो कळलच नाही

यार, शाळेत वेळेवर न पोहोचनारा मी, कधी वेळेला महत्व देईला लागलो
कळलंच नाही यार,

मजा मस्ती करता करता कधी आयुष्याला seriously घेईला लागलो
कळलच नाही,

छोट्या छोट्या गोष्टीवरून राडणारा मी कधी दुसर्यांच्या सुखासाठी  दुःख सहन करत आलो
कळलच नाही,

मला मोठं होऊन हे बनायचं आहे पासून ते स्वतःच्या स्वप्नांनासाठी काहीही करू पर्यंत कधी पोहोचलो कळलच नाही, 

आईकडे खाऊसाठी पैसे मागण्यपासून ते स्वतःचे पैसे खर्च करताना 100 वेळा विचार करायला लागलो कळलच नाही ..

 खूप काही बदललं बालपणापासून ते आत्ता पर्यंत फक्त एक गोष्ट तशीच राहिली ते म्हणजे आई-बाबांनवरचं प्रेम



माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...