कधी एवढे मोठे झालो कळलच नाही, कधी बाबांच्या support शिवाय सायकल चालवायला शिकलो
कळलच नाही,
कधी, मला हे नाही जमणार ते, मी आहे ना तू काळजी करू नकोस पर्यंत पोहचलो
कळलच नाही,
कधी आयुष्यातील सगळ्या जबाबदाऱ्या घेईला लागलो कळलच नाही
यार, शाळेत वेळेवर न पोहोचनारा मी, कधी वेळेला महत्व देईला लागलो
कळलंच नाही यार,
मजा मस्ती करता करता कधी आयुष्याला seriously घेईला लागलो
कळलच नाही,
छोट्या छोट्या गोष्टीवरून राडणारा मी कधी दुसर्यांच्या सुखासाठी दुःख सहन करत आलो
कळलच नाही,
मला मोठं होऊन हे बनायचं आहे पासून ते स्वतःच्या स्वप्नांनासाठी काहीही करू पर्यंत कधी पोहोचलो कळलच नाही,
आईकडे खाऊसाठी पैसे मागण्यपासून ते स्वतःचे पैसे खर्च करताना 100 वेळा विचार करायला लागलो कळलच नाही ..
खूप काही बदललं बालपणापासून ते आत्ता पर्यंत फक्त एक गोष्ट तशीच राहिली ते म्हणजे आई-बाबांनवरचं प्रेम
No comments:
Post a Comment