माणसं असं का करतात?
आयुष्यातल्या महत्वाच्या निवडी का चूकवतात?
मनकल्लोळाची तजवीज का करतात?
सुयशने करिअरची दिशा कशी फसवली?
प्रिया प्रेमात पडताना सतत चूकीच्या व्यक्तीच का निवडते?
नवऱ्याने cheating केलंय हे कळल्यावर रिधी चिडली होती;
खरंतर त्याचवेळी घटस्फोट घेऊ शकली असती ती
आणि move on झाली असती.
पण तिने संसार न मोडण्याचा निर्णय घेतला. बरं ठीक आहे.
पण मग आता सतत भूतकाळ उगाळत का बसते ती?
धीरज बोलताना इंपल्सिव होऊन बरोब्बर नातं विस्कटेल
याची तजवीज का करतो?
याचं एक कारण आहे.
मानवी मेंदू एका विशिष्ट गोष्टीसाठी बनलाय हे जाणवतं.
ती गोष्ट म्हणजे, 'कथा'.
माणसाला कथा वाचायची, ऐकायची, पाहायची असते;
पण मुख्य म्हणजे माणसाला स्वत: 'कथा' व्हायचं असतं.
कारण कथेतून विचार-भावनांची मुबलकता मिळते,
जी consciousness ला हवी असते. का?
✓कारण कशावरूनतरी conscious होता आलं
तरच consciousness जिवंत राहील ना?✓
समोर सतत घटना असेल तरच भावना असेल ना?
भावना असेल तरच चेतना राहील ना?
मनाची survival need आहे ती.
म्हणूनच माणसं सतत आपल्या क्रिया-प्रतिक्रियांमधून
काहीएक नाट्य घडेल याची सोय करत बसलेली असतात.
त्यातून मनाला occupation देण्यासाठी भावना मिळवत राहतात.
"याचा आपल्याला काय फायदा?" हे बहिर्मन झालं;
पण त्याला आंधळं करण्याचं काम अंतर्मन करतं!
ते सकारात्मकतेची आस ठेवतं;
पण नकारात्मकतेचीही सोय करून ठेवतं! का?
पटणार नाही लगेच; पण आपण ज्याला मनस्ताप म्हणतो
तोच consciousnessला सर्वात जास्त व्याप देतो.
Food for consciousness.
जेवढा जास्त व्याप, तेवढं जास्त occupation.
तेवढं जास्त मनाचं अस्तित्व.
म्हणूनच 'स्वत:ची काशी करून घेणं' हा मानवी जीवनाचा हेतू असल्यागत मन वागतं!
अर्थात हा अंतर्मनाचा गैरसमज असतो.
सात्विक जेवण असेल तर उगाच भरमसाठ बुफेची गरज नसते.
सात्विकता सत्यतेत असते; त्यापासून फारकत घेऊन
कथेत घुसायची लागलेली सवयच माणसाचा घात करते.
यातून होणारा त्रास टाळायचा असेल,
तर उपाय mindfulness.
"निवडीचा जो impulse मला खुणावतोय,
तो मला वैचारिक वाट देतोय की
भावनिक लाट देतोय?"
या प्रश्नाच्या उत्तरात शहाणपण दडलंय.
कथेत भाग घेताना जाणवतं, की
इथे विचार नाहीयेत; फक्त एक भावनिक तरंग आहे,
ज्यावर आरूढ होऊन चाललोय आपण.
कथाविरहित सत्य जगताना आपण भावनाशून्य असतो
अशातला भाग नाही.
पण त्यात वैचारिक स्पष्टता असते.
त्यात 'चालणं' असतं; 'वाहत जाणं' नाही.
© अपूर्व विकास
समुपदेशक व मानसशास्त्र तज्ज्ञ
{कृपया लेख शेअर केल्यास लेखकाच्या तपशीलासहित करावा, ही नम्र विनंती. शेअरिंगबद्दल आभार ! आवडल्यास जरूर कळवा !}
No comments:
Post a Comment