Wednesday, September 20, 2023

प्रश्न

अभिव्यक्ती..

Friday, October 30, 2020कधीतरी असं होतं की आपण निराशेच्या गर्ततेत खोल खोल बुडत असताना कुणीतरी अचानक येऊन आपला हात धरतं आणि बाहेर खेचतं अगदी ध्यानी मनी नसतानाही. त्याचं असं अलवार जखमेवर फुंकर घालणं किती सुखावून जातं मनाला ! त्याची आश्वस्थ नजर सतत धीर देते की मी आहे तुझ्यासोबत, अगदी कायम ! मुठीत चांदणं लपवावं तसं त्याचं ते स्मित डोळ्यात दडवून आपणही मग बागडत राहतो बेभान होऊन हरणीसारखं माळभर अन् अचानक ठेच लागते.

आपण भानावर येतो तेव्हा कळतं अरे सावरणारा हाही हात काळाच्या चक्रात कधीचाच मागे राहिला ! आपण कोणत्या अनामिक धुंदीत एकटंच पूढे आलो इतकं ? मागे वळून पहावं तर आठवणीशिवाय कोणत्याच पाऊलखुणा त्याच्या असण्याची साक्ष देत नाहीत. मग पुन्हा एकदा तोच जुना काळाभोर विषाद पसरू लागतो माळभर. आता हा अंधार कोंडावा आत खोलवर नि लावून घ्यावं मनाच दार कायमचं की प्रतीक्षा करावी पुन्हा एखाद्या अशा हाताची जो सुटणार नाही मधेच कधीही ?

निकिता सु. विचारे

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...