Friday, September 30, 2016

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी
मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे
तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥
शाळेभोवती तळे साचून सुट्टी
मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय

Wednesday, September 28, 2016

अरे कोंडला कोंडला देव


अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला
बारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला

भक्तांसाठी केला उभा हा संसार, भांडाराचे दार तुझ्या हाती
नरा दिले कर, करणी देवाची, माया जोडण्याची भक्ती ठेवी

उजेड-अंधार देवाचं हे रूप, त्याचे मनी पाप ठेवू नये
कोंडलं हे पाणी, वाट द्या मोकळी, विश्वाचा तू माळी होई भक्ता

गरीब-श्रीमंत, त्याची तुला खंत, गरिबाचा संत भक्त तोची
सेवाधर्म सारा करावा मुकाट, मागे कटकट ठेवू नये

Tuesday, September 27, 2016

आठवण शहिदांची- सरदार भगतसिंग

२८ सप्टेंबर- सरदार भगतसिंग जन्मदिवस

जन्म :- २८ सप्टेंबर १९०७, बंगा
फांशी - २३ मार्च १९३१, लाहोर
स्वातंत्र्य लढ्यात मोठ्या हिरीरीने भाग घेणारे
सरदार अर्जूनसिंग यांची तिन्ही मुले
स्वातंत्र्यलढ्यात उतरली. किशनसिंग, सरदार
अजितसिंग सरदार स्वर्णसिंह असा उज्वल वारसा
असलेल्या घराण्यात, सरदार किशनसिंग आणि
विद्यावती देवी यांच्या पोटी सरदार भगतसिंह
यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे
झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार
किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून
सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे
जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले.
भगतसिंगांच्या अंगात लहानपणापासूनच
स्वातंत्र्याचे वारे होते. लहानपणी शेतात बंदुकीची
झाडे लावून त्यांना बंदुकी उगवण्याचा खेळ ते खेळत
असत. लहान वयातच त्यांनी अनेक क्रांतिलढ्याची
पुस्तके वाचून काढली. नवव्या इयत्तेत असताना
त्यांनी विदेशी कापडाच्या होळ्या पेटवल्या.
जालियनवाला बागेचे हत्याकांड त्यांच्या मनावर
खोल परिणाम करून गेले. प्रसिद्ध क्रांतिकारक
भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे
होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर
सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ
इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता.
घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर
सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत
नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची
क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग'
या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक
धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते.
लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या
मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणार्या
स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत
सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या
प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे
म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे
यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक
सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत
होता. या बिलावर सेंट्रल असेंब्लीत चर्चा चालू
असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी
असेंब्लित बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून
अटक करून घेतली. कोर्टात आपली बाजू प्रभावीपणे
मांडली. कोर्टाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू
यांना फाशीची शिक्षा फर्मावली. २३ मार्च
१९३१ ला 'इन्कलाब झिंदाबाद' च्या घोषणा देत ते
तिघेही हसत हसत फासावर चढले.

व. पु. ची अशीच एक भन्नाट कविता

-व. पु. ची अशीच एक भन्नाट कविता -

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत

पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक'  नव्हतं..

तरीही माझ जीवन सुखाच होत ||१||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,

पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत..

तरीही माझ जीवन सुखाच होत ||२||

घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होत,

दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होत- विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ३ ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा, माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,

दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा- दगडाने अंग घासण फ़ारस सुसह्य नव्हतं

तरीही माझ जीवन सुखाच होत || ४ ॥

पायात चप्पल असण सक्तीच नव्हतं- अंडरपॅट बनियनवर फ़िरण जगन्मान्य होतं

शाळेसाठी मैलभर चालण्याच अप्रूप नव्हतं- मोठ्यांना सायकलशिवाय दुसर वाहन नव्हत..

तरीही माझ जीवन सुखाच होत || ५ ॥

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता- घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,

पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता- छडी हे शिक्षकाचं लाडक शस्त्र होतं..

तरीही माझ जीवन सुखाच होत || ६ ॥

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता, --नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,

अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता -  कलांना "भिकेचे डोहाळे" असच नाव होते,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ७ ॥

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा - पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,

शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा - तिन्हीसांजेला घरी परतणे सक्तीच होते,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ८ ||

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या - पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,

कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा - उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्या राज्य होत..

तरीही माझ जीवन सुखाच होत || ९ ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे - घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,

उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे - नौनवेज खाण हे तर माहितीच नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १० ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होते- नंबरावर बक्षीस/छड्या यांचे प्रमाण ठरत असत,

कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हत - वशिल्याने पास होण माहितीच नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || ११ ||

गावची जत्रा  हीच एक करमणूक असायची - चक्र - पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,

बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची - विमानातला फोटो काढण चमत्कारिक होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १२ ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं - सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचे,

पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं - प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १३ ||

 

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा - क्रिकेटच्या मैचेस चाळीत व्हायच्या,

बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या -  डे-नाईट, ट्वेंटी- २० चे नावही नव्हते,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १४ ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा - गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
ह्ँनडल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा - लक्झरी, फर्स्टक्लास एसीच नावही नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १५ ||

दिवाळी खर्या अर्थाने दिवाळी होती - चमन चिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात होती,

रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती - लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होत..

तरीही माझ जीवन सुखाच होत || १६ ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची - बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,

रेडीवो सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची - ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १७ ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा - दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,

पानात टाकणार्याच्या पाठीत रट्टा बसायचा - हौटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १८ ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होत - धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होत,

विहिरीत पोहायला तिथेच मिळत होत - भावूबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || १९ ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे - बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,

पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचे - प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || २० ||

पाव्हणे रावळे इ चा घरात राबता असायचा - सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,

गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा - पंक्तीत श्लोक म्हणण मात्र सक्तीच होत,

तरीही माझ जीवन सुखाच होत || २१ || 

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लेट आहे - मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,

टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दनदणाट आहे - फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,

कौटुंबिक सुसंवादाची मात्र वानवा आहे || २२ ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत - दूध, बूस्ट, कोम्प्लानचा भरपूर मारा आहे,

क्लास, गाईड, कैल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे - कपडे, युनिफोर्म. क्रीडासाहित्य हवे तितके आहे,

बालकांच्या नशिबी मात्र  पाळणाघर आहे || २३ ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे - सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,

एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे - छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,

आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || २४ ||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे - मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,

इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे - सध्या बायवान गेटवनचा जमाना आहे..

म्हणून

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे,

पैशावर  समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || २५ ||

=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

“लेकीस पत्र”

“लेकीस पत्र”

मुळ लेखक – चार्ली चॅप्लीन
मराठी अनुवाद- पृथ्वीराज तौर,  ७५८८४१२१५३

प्रिय मुली,
ही रात्रीची वेळ आहे.
नाताळची रात्र.
माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.
तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.
तुझी आईही झोपी गेलीय.
पण मी अजुनही जागा आहे.
खोलीत मंद प्रकाश साकळतोय.
तू किती दूर आहेस माझ्यापासून पण विश्वास ठेव, ज्यादिवशी तुझा चेहरा माझ्या डोळ्यांपुढं तरळणार नाही, त्या दिवशी आंधळं होऊन जाण्याची माझी इच्छा असेल. 
तुझा फोटो तिथं टेबलवर आहे आणि इथं ह्रदयातही.
पण तू कूठं आहेस?
तिथं, स्वप्नांसारख्या पॅरिस शहरात!
तू चॅम्प्स एलीसिसच्या भव्य रंगमंचावर नृत्य करत असशील.
रात्रीच्या या शांततेत मला तुझ्या पावलांचा आवाज येकू येतोय.
हिवाळ्यातील आकाशात असणाऱ्या चांदण्यांची चमक, मी तुझ्या डोळ्यांत पाहू शकतो.
असं लावण्य, असं सुंदर नृत्य, तू तारा होऊन अशीच चमकत रहा.
पण
जेव्हा प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांनी वाहिलेली स्तूतीसुमनं यांची नशा येऊ लागेल आणि त्यांनी भेटीदाखल दिलेल्या फुलांचा सुगंध तुझ्या डोक्यात शिरु लागेल
तेव्हा
गुपचूप एखाद्या कोपऱ्यात बसून तू माझं हे पत्र वाच.
आणि आपल्या ह्रदयाचा आवाज ऐक.

मी तुझा बाप आहे जिरल्डाइन,
मी चार्ली, चार्ली चॅप्लीन.
तुला आठवतं का?
जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तुझ्या उशाशी बसून मी तुला ‘झोपणाऱ्या परी’ची गोष्ट ऐकवायचो.
पोरी, मी तुझ्या स्वप्नांचा साक्षीदार आहे.
मी तुझं भविष्य पाहिलं आहे…
रंगमंचावर नृत्य करणारी एक मुलगी, जणू आभाळातून उडणारी एखादी परी.
लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात मला हे शब्द ऐकू येतात, ‘या मुलीला बघीतलत का, ती एका म्हाताऱ्या विदूषकाची मुलगी आहे. तुम्हाला आठवतं का त्याचं नाव चार्ली होतं.’

हो! मी चार्ली आहे!! एक म्हातारा विदूषक!!!
आणि आता तुझी वेळ आहे.
मी फाटून जीर्ण झालेल्या पॅंटमध्ये नाचायचो.
आणि माझी राजकुमारी! तू सूंदर रेशमी पोषाखात नृत्य करतेस.
हे नृत्य, या टाळ्या, तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जातील.
उंच जा, खूप उंच जा – पण लक्षात ठेव की तुझी पावलं नेहमीच जमिनीवर असली पाहिजेत.
तू लोकांचं जगणं जवळून बघायला हवं –
छोट्या छोट्या गल्यांमध्ये, बाजारांमध्ये नाचणाऱ्या नर्तकांना तू जवळून बघ, ते गोठवणाऱ्या थंडीत भूकेनं तडफडताहेत.
मी ही त्यांच्यातलाच होतो, जिरल्डाइन!

त्या जादूच्या रात्री जेव्हा मी तुला अंगाई म्हणवून झोपी घालत असे
आणि तू झोपेच्या डोहात उतरत जायचीस
तेव्हा मी जागा असे, टक्क जागा.
मी तुझा चेहरा बघायचो, तुझ्या काळजाचे ठोके ऐकायचो.
आणि विचार करायचो, ‘चार्ली ! ही पोरगी तुला कधी ओळखू शकेल का?’
तुला माझ्याबद्दल फारशी माहिती नाहिय, जिरल्डाइन!
मी तुला हजारो गोष्टी ऐकवल्या, पण ‘त्याची’ गोष्ट कधीच सांगितली नाही.
ही कहाणीही तितकीच ऐकण्यासारखी आहे.
ही त्या भुकेल्या विदूषकाची गोष्ट आहे, जो लंडनच्या गरिब वस्त्यांमध्ये नाचत- गाणं म्हणत पोटापुरतं मिळवायचा.
ही माझी गोष्ट्य.
मला ठाऊक आहे पोटाची भूक म्हणतात, ती काय असते.
मला माहितय ‘डोक्यावर छत नसणे’ या शब्दांचा अर्थ काय आहे.
मदतीसाठी तुमच्याकडे फेकलेल्या नाण्यांतून आपल्या स्वाभीमानाची चाळण होतांना मी अनुभवली आहे. आणि तरिही मी जिवंत आहे.
असो, ही गोष्ट इथेच सोडू.

तुझ्याबद्दलच बोलणं जास्त उचीत राहिल, जिरल्डाइन.
तुझ्या नावानंतर माझं नाव येतं…… चॅप्लीन.
या नाव घेऊन मी चाळीस पेक्षा जास्त वर्षे लोकांचं मनोरंजन केलं आहे.
पण हसण्यापेक्षा मी जास्त रडलो आहे.

ज्या जगात तू राहातेस तिथं नाच-गाण्याव्यतिरीक्त काहीच नाहीय.
अर्ध्या रात्रीनंतर जेव्हा तू थिएटरच्या बाहेर येशील
तेव्हा तू तुझ्या समृद्ध आणि संपन्न चाहत्यांना विसरू शकतेस.
पण
ज्या टॅक्सीत बसून तू घरी जाशील, त्या टॅक्सी ड्रायव्हरला हे विचारायला विसरू नकोस की त्याची बायको कशी आहे?
जर ती गर्भार असेल तर जन्म घेणाऱ्या बाळासाठी, त्याच्या कपड्यांसाठी आणि औषधासाठी त्याच्याकडे पैसे आहेत काय?
त्याच्या खिशात थोडे अधिकचे पैसे टाकायला विसरू नकोस.

मी तुझ्या खर्चासाठी तुझ्या बॅंक खात्यावर काही रक्कम भरली आहे,
खर्च करताना नेहमी विचार कर. 

कधी कधी बसमधून प्रवास कर,
छोट्या छोट्या रस्त्यानं प्रवास कर,
कधी कधी पायाखाली शहराचे रस्ते तुडव.
लोकांकडं ध्यान देऊन बघ.
अनाथांप्रति दया ठेव.
आणि दिवसातून एकदा तरी स्वतःला हे नक्की सांग की, ‘मी सुद्धा त्यांच्या सारखीच आहे.’
हो, तू ही त्यांच्यातलीच एक आहेस पोरी.

कोणत्याही कलावंताला त्याचे पंख देण्याअगोदर कला त्याच्या पावलांना रक्ताळवत असते.
जेव्हा तुला एखाद्या दिवशी असं वाटेल की तू तुझ्या प्रेक्षकांपेक्षा मोठी आहेस तर त्याच दिवशी
रंगमंच सोडून पळ काढ.
टॅक्सी पकड आणि पॅरिसच्या कुठल्याही गल्लीबोळात जा.
मला माहितीय तिथं तुला तुझ्यासारख्या कितीतरी नर्तकी भेटतील –
तुझ्यापेक्षाही जास्त सूंदर आणि प्रतिभासंपन्न.
अंतर फक्त ऐवढचंय की त्यांच्याजवळ थियटरचा झगमगाट नाही,
त्यांच्याजवळ चमचम करणारा उजेड नाही.
ते चंद्रप्रकाश हाच त्यांचा सर्च लाईट आहे.
जर तुला वाटलं की यातील एखादी जरी तुझ्यापेक्षा चांगलं नृत्य करतेय तर नृत्य करणं सोडून दे.
नेहमीच कुणी ना कूणी अधीक चांगलं असतं, हे लक्षात घे.
सतत पूढे जात राहाणं आणि सतत शिकत राहाणं म्हणजेच तर कला आहे.

मी मरून जाईल, तू जिवंत राहशील.
मला वाटतं तुला कधीही गरीबीचा स्पर्श होऊ नये.
या पत्रासोबत मी तुला चेकबूकही पाठवतोय, म्हणजे तुला मनासारखा खर्च करता येईल.
पण दोन नाणी खर्च केल्यानंतर हा विचार कर की तुझ्या हातात असणारं तिसरं नाणं तुझं नाहीय –
ते त्या अनोळखी माणसाचं आहे, ज्याची त्याला खूप खूप गरज आहे.
असा माणूस तू सहज शोधू शकतेस, फक्त आजूबाजुला चौकस नजर टाकली पाहिजे.
मी पैशांबद्दल बोलतोय कारण मला पैश्यांची राक्षसी शक्ती परिचीतय.

होऊ शकतं एखाद्या दिवशी कुणी राजकुमार तुझ्यावर भाळेल!
बाहेरचं रंगीन जग पाहून आपलं सुंदर काळीज कुणाला देऊ नकोस.
लक्षात घे जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा हा सूर्य आहे, जो सगळ्यांसाठी प्रकाशतो.
आणि हो, जेव्हा एखाद्यावर प्रेम करशील तेव्हा काळजाच्या देठापासून प्रेम कर.
मी तुझ्या आईला याबद्दल तुला पत्र लिहायला सांगितलं आहे,
प्रेमाच्या बाबतीत तिला माझ्यापेक्षा जरा जास्त कळतं.

मला हे ठाऊक आहे की बाप आणि त्याच्या लेकरांत नेहमीच एक तणाव असतो.
पण विश्वास ठेव
मला फार आज्ञाधारक मुलंही आवडत नाहीत.
मला वाटतं या नाताळच्या रात्री एखादा चमत्कार व्हावा, म्हणजे मला तुला जे सांगायचंय ते तुला नीट समजून येईल.

चार्ली आता म्हातारा झालाय जिरल्डाइन.
कधी ना कधी, शोकमग्न काळ्या कपड्यात तुला माझ्या कबरीवर यावं लागेल.
मी तुला विचलित करू इच्छीत नाही
पण वेळोवेळी स्वतःला आरशात बघ, तुला माझंच प्रतिबींब त्यात दिसेल.
तुझ्या धमण्यात माझंच तर रक्त वाहतय.
जेव्हा माझ्या धमण्यातील रक्त गोठून जाईल तेव्हा तुझ्या धमण्यांतून वाहणारं रक्त तुला माझी आठवण करून देईल.
हे लक्षात ठेव की तुझा बाप कुणी देवदूत नव्हता, कूणी महात्मा नव्हता, तर तो नेहमीच एक चांगला माणूस होण्यासाठी धडपडत राहिला.
तू ही असाच प्रयत्न करावास, ही माझी इच्छा आहे.
   
खूप सगळ्या प्रेमासह,
चार्ली.

(चार्ली चॅप्लीन यांनी आपल्या मुलीला जिरल्डाइन ला हे पत्र लिहिले आहे. जिरल्डाइन या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ‘डॉ. झिवागो’ या कादंबरीवरील त्याच शिर्षकाच्या चित्रपटातील त्यांचा अभिनय संस्मरणीय आहे. अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत.)

Sunday, September 25, 2016

एक तरुणीची प्रेरणादायी गोष्ट

मित्रहो आज आम्ही तुमच्यासमोर एका तरुणीची सक्सेस स्टोरी समोर आणत आहोत. जेसिका क्लिसॉय असे तिचे नाव आहे. जेसिका यांनी आईकडून १.५ लाख रुपये उधार घेऊन बिझनेस सुरु केला होता. त्यांचा बिझनेस चालेल असे आईलाही वाटले नव्हते. पण म्हणतात ना की तुम्ही तुमच्या उद्देशावर ठाम राहिलात तर यशही मिळतेच. तसेच काहीसे तिच्याबाबत झाले. आता तिची १७०० कोटींची प्रॉपर्टी आहे. अमेरिकेत तिचे नाव मोठ्या कौतुकाने घेतले जाते.


जेसिका क्लिसॉय 
swapnwel.blogspot.com

अशी झाली सुरवात

जेसिका क्लिसॉय प्रेग्नंट होती तेव्हा वेबी केअर प्रोडक्टवर असलेले लेबल्स वाचायची.  काही प्रोडक्टच्या लेबलवर असलेली माहिती वाचून तिला धक्का बसला. या प्रोडक्टमध्ये अनेक हानिकारक केमिकल आहे, जे लहान बेबीला अपायकारक राहू शकतात. तिने तिच्या बेबीसाठी घरीच शॅम्पू तयार केला. त्यात केमिकल्स जराही नव्हते.  
आईकडून घेतले पैसे
बाजारपेठेत अनेक बेबी प्रोडक्ट होते. त्यात केमिकल्सचे प्रमाण भरपूर होते. तिने स्वतः तयार केलेला ऑरगॅनिक शाम्पू बाजारपेठेत विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आईकडून १.५ लाख रुपये उधार घेतले. १९९५ मध्ये कॅलिर्पोनियात सुरवात केली. आता तिचे प्रोडक्ट फुड्स, वॉलमार्ट, टारगेट सारख्या मॉलमध्ये विकले जातात.
१७०० कोटींची मालकिण
आज तिची कंपनी ९० नॉनटॉक्सिक, ऑर्गेनिक प्रोडक्ट तयार करते. अमेरिकेतील १० हजारांपेक्षा जास्त रिटेल मार्टवर तिच्या प्रोडक्टची विक्री होते. सुरवातीच्या दिवसांमध्ये तिने अगदी रोड शो आयोडित करुन प्रोडक्ट विकले. त्यानंतर लोकांचा विश्वास वाढत गेला. तिच्या प्रोडक्टची विक्री वाढली. आता तिची १०० एकरांमध्ये मोठी प्रयोगशाळा आहे. तेथील वनस्पतींचा वापर प्रोडक्टमध्ये केला जातो.
इतर तरुणींसाठी प्रेरणास्थान
अमेरिकेतील इतर तरुणी तिला मेन्टॉर मानतात. त्यांनाही तिच्यासारखा व्यवसाय सुरु करायचा आहे. ती अशा तरुणींना प्रोत्साहन देते. एखादी गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा असेल तर एखादी तरुणी काय करु शकते याचे ती मुर्तिमंत उदाहरण आहे.
From Editor's desk
जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article, स्टोरी, किंवा कविता असेल व जी तुम्हाला आमच्या सोबत share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला E-mail करा. आमचा email Id आहे : swapnwel@rediffmail.com   
     
आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
तर मग आपले लेखन आम्हाला पाठवत आहात ना?आम्ही वाट पाहत आहोत. आम्ही सभ्य भाषेतील सर्व प्रतिसाद व लेखन या ब्लॉगवर प्रकाशित करतो प्रकाशित करतो.
. Thanks !

Tuesday, September 20, 2016

मेरे रश्क-ए-क़मर तुने पहली नज़र

मेरे रश्क-ए-क़मर तुने पहली नज़र, जब नज़र से मिलाई मज़ा आ गया
बर्क सी गिर गयी काम ही कर गयी, आग ऐसी लगाईं मज़ा आ गया
जाम में घुल कर हुस्न की मस्तियाँ, चांदनी मुस्कुराई मज़ा आ गया
चाँद के साये में ऐ मेरे साक़िया, तू ने ऐसी पिलाई मज़ा आ गया

नशा शीशे में अंगड़ाई लेने लगा, बज़्म-ए-रिंदा में सागर खनकने लगा
मैकदे पे बरसने लगी मस्तियाँ, जब घटा गिर के छाई मज़ा आ गया

बे-हिज़ाबाना वो सामने आ गए, और जवानी जवानी से टकरा गयी
आँख उनकी लड़ी यूं मेरी आँख से, देख कर ये लड़ाई मज़ा आ गया

आँख में थी हया हर मुलाक़ात पर, सुर्ख आरिज़ हुए वस्ल की बात पर
उसने शर्मा के मेरे सवालात पे, ऐसी गर्दन झुकाई मज़ा आ गया

शैख़ साहिब का ईमान बिक ही गया, देख कर हुस्न-ऐ-साकी पिघल ही गया
आज से पहले ये कितने मगरूर थे, लुट गयी पारसाई मज़ा आ गया

ऐ "फ़ना" शुक्र है आज बाद-ए-फ़ना, उसने रख ली मेरे प्यार की आबरू
अपने हाथो से उसने मेरी कब्र पर, चादर-ऐ-गुल चढाई मज़ा आ गया 
फ़ना बुलंद शहरी

Thursday, September 15, 2016

हमने जो की थी मोहब्बत


हमने जो की थी मोहब्बत, 

आज भी है

तेरी ज़ुल्फो के साये की चाहत आज भी है,


रात कटती है आज भी 

ख़यालो मे तेरे

दीवानो सी वो मेरी हालत

आज भी है,


किसी और के तसवुर 

को उठती नई

बेईमान आँखो मे थोड़ी सी शराफ़त आज भी है,


चाह के एक बार 

चाहे फिर छोड़ देना तू

तुझे दिल तोड़ जाने की इजाज़त, आज भी है.....


Wednesday, September 14, 2016

राहत इन्दोरी की प्रसिद्ध शायरियों का संकलन(भाग:1)

आँखों में पानी रखों, होंठो पे चिंगारी रखो
जिंदा रहना है तो तरकीबे बहुत सारी रखो
राह के पत्थर से बढ के, कुछ नहीं हैं मंजिलें
रास्ते आवाज़ देते हैं, सफ़र जारी रखो
___________________________________
सूरज, सितारे, चाँद मेरे साथ में रहें
जब तक तुम्हारे हाथ मेरे हाथ में रहें
शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं हैं हम
आंधी से कोई कह दे की औकात में रहें
__________________________________
गुलाब, ख्वाब, दवा, ज़हर, जाम  क्या क्या हैं
में आ गया हु बता इंतज़ाम क्या क्या हैं
फ़क़ीर, शाह, कलंदर, इमाम क्या क्या हैं
तुझे पता नहीं तेरा गुलाम क्या क्या हैं
___________________________________
ये सहारा जो न हो तो परेशां हो जाए
मुश्किलें जान ही लेले अगर आसान हो जाए
ये कुछ लोग फरिस्तों से बने फिरते हैं
मेरे हत्थे कभी चढ़ जाये तो इन्सां हो जाए

ऊंचे ऊंचे दरबारों से क्या लेना

ऊंचे ऊंचे दरबारों से क्या लेना
बेचारे हैं बेचारों से क्या लेना

जो मांगेंगे तूफानों से मांगेंगे
काग़ज़ की इन पतवारों से क्या लेना

ख्वाबों वाली कोई चीज़ नहीं मिलती
सोच रहा हूँ बाज़ारों से क्या लेना

चारागरी(चिकित्सक) का दावा करते फिरते हैं
बस्ती के इन बीमारों से क्या लेना

साथ हमारे कई सुनहरी सदियाँ हैं
हमें सनीचर इतवारों से क्या लेना

राहत इंदौरी

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...