तुमच्याकडे सर्वप्रथम स्वतःवरती पूर्ण विश्वास असला पाहिजे.
तुम्ही दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी नेहमी तत्पर असला पाहिजेत.
काय करायचे आहे हे तुम्हाला नक्की ठाऊक असले पाहिजे.
आपले अज्ञान न लपवता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या तुम्ही इतिहासाचा संदर्भ घेऊन, भविष्याचा वेध घेत, वर्तमान काळात वाटचाल केली पाहिजे.
कठीण परिश्रम घेण्यास तुम्ही नेहमी तयार असले पाहिजे.
सुरुवातीच्या काळात तुम्हाला हे करावेच लागेल.
अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टे असली पाहिजेत.
तुम्ही मल्टिटास्किंग असला पाहिजेत. पैशाचे महत्त्व समजून घेता आले पाहिजे.
उत्कृष्ट विक्री कौशल्य आत्मसात करा. संभाषण कला खूप महत्त्वाची आहे.
आपण नेहमी विनम्र व अहंकारविरहित असले पाहिजे.
आपल्यामध्ये जोखीम उचलण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे.
चांगले उत्पादन किंवा सेवा आणि चांगले ग्राहक बनवण्यासाठी प्रयत्नशील राहा.
उद्योग यशस्वी झाला की, तुमच्या कामामध्ये इतरांना सामावून घ्या.
त्याला डेलिगेशन असे म्हणतात.
तीन वर्षांनंतर तुमचा वेळ नवीन कल्पना, गुणवत्ता वाढवणे व मार्केट मिळवणे यात घालवा.
या सर्व गोष्टी तुमच्यामध्ये आल्या म्हणजे जोखीम पत्करू शकाल.
No comments:
Post a Comment