आता संशोधकांनी म्हटले आहे की, मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी केवळ 43 टक्के पेशीच मानवी आहेत. अन्य पेशी म्हणजे निव्वळ सुक्ष्म जीवांच्या वसाहती आहेत.
मानवी शरीरातील या सुक्ष्म जीवांचे, जीवाणूंचे अध्ययन अॅलर्जीपासून पार्किन्सनपर्यंतच्या अनेक आजारांच्या संशोधनाचे मूळ आहे. या सुक्ष्म जीवांचा शरीरात इतका भडीमार आहे कि, हा देह खरोखरच माणसाचाच आहे का, याबाबत विचार करावा लागेल, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील मायक्रोबीओम सायन्स विभागाच्या रुथ ले यांनी याबाबतची माहिती दिली.
No comments:
Post a Comment