मराठीतील प्रतिभावंत कवी नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या कवितेतून नेहमीच दलित समाजावर होणा-या सामाजिक अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्या कवितेतील शब्द नेहमीच प्रस्थापित व्यवस्थेविरुध्द बंड पुकारण्यासाठी अंगार निर्माण करायचे. त्यांनी लिहिलेली अशीच एक अन्याय विरुध्द अंगार फुलवणारी रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो ही कविता.
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखेमाजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिँदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यँत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिँदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …
आग लावत चला …
कविवर्य- नामदेव ढसाळ
No comments:
Post a Comment