Friday, March 29, 2019

प्रत्येक बापानं वयात येणा-या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहाव अस पत्र

प्रत्येक बापानं वयात येणा-या प्रत्येक मुलाला आवर्जुन लिहाव अस पत्र. 

नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. 

फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.... 

पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल.




       "माझ्या लाडक्या मुला. मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव....

           जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अर्त्यक्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या. मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार. मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.
 
            माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे. जेंव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी तु चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. 
 
        जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस. _जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही.
           
            आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा. 

          प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस. 

        अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना. 

         माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोपर्यंत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा. 

              आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही. 
       
         बाळा कदाचीत तुला हे पाठविलेले पत्र आवडेल कि नाही हे माहीत नाही पण हे पत्र तुझ्या आयुष्याची शिदोरी नक्की बनेल हे मात्र पक्क. म्हणुन बाळा हे पत्र तुला आवडो वा ना आवडो लगेच फेकुन देऊ नकोस या पत्राला तु नेहमी तुझ्या सोबत ठेव व वेळ मिळेल तेंव्हा पुन्हा पुन्हा वाच..... , 
फक्त तुझेच वडील. 


आवडल नाही तर पुन्हा पुन्हा वाचा, आवडल तर पुढे पाठवा, व खरच आवडल तर मला सुध्दा परत पाठवा.
धन्यवाद......

Thursday, March 28, 2019

3 इच्छा

सिकंदर ने आधी दुनिया जीत ली थी पर.. जब मरा तो 3 इच्छा थी..

1- जिन हकीमों ने इलाज किया वो सब जनाजे को कँधा दें ........क्यों ?
"ताकि सबको पता चल जाये कि हकीम भी मरने से रोक नहीं सकते"


2- जनाजे की राह में वो सारी दौलत बिछा दी जाये जो उसने जिंदगी भर इकट्ठा करी .....क्यों ?
 "ताकि सब जान लें जब मौत की घड़ी आती है तब ये दौलत भी किसी काम नहीं आती" 


3- उसकी मौत के बाद जब उसका जनाजा निकले तो उसके दोनों हाथ बाहर लटकाये जाये ..........क्यों ?
"ताकि सबको मालूम हो इंसान खाली हाथ आया है और खाली हाथ जायेगा" ??

Wednesday, March 27, 2019

we grew up!

Somewhere between
“ 8 toffees for 1 rupee” 
and 
“1 toffee for 8 rupees”,
we grew up!


Somewhere between
“Ground mein aaja”
and
“Online aaja”,
we grew up!


Somewhere between
“stealing chocolate of our sister” 
and 
“Buying chocolate for her children”,
we grew up!


Somewhere between
“Just five more mins Mummy ”
and
“Pressing the snooze button”,
we grew up!


Somewhere between
“Crying out loud just to get what we want” 
and 
“Holding our tears when we are broken inside”,
we grew up!


Somewhere between 
“I want to grow up” 
and
“I want to be a child again”,
we grew up!


Somewhere between
“Lets meet and plan” 
and
“Lets plan and meet”,
we grew up!


Somewhere between
"Being afraid of our parents"
and 
"Praying for our parents"
we finally grew up!


And as we grew up, 
we realize;
How silently, 
our lives have changed...?

Tuesday, March 26, 2019

कितने शरीफ़ लोग थे

कितने शरीफ़ लोग थे सब खुल के आ गए 

सूरज से जंग जीतने निकले थे बेवक़ूफ़ 
सारे सिपाही मोम के थे घुल के आ गए 

मस्जिद में दूर दूर कोई दूसरा न था 
हम आज अपने आप से मिल-जुल के आ गए 

नींदों से जंग होती रहेगी तमाम उम्र 
आँखों में बंद ख़्वाब अगर खुल के आ गए 

सूरज ने अपनी शक्ल भी देखी थी पहली बार 
आईने को मज़े भी तक़ाबुल के आ गए 

अनजाने साए फिरने लगे हैं इधर उधर 
मौसम हमारे शहर में काबुल के आ गए 

Sunday, March 24, 2019

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण...

१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे.

२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यातपाणी आणून करने.

३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे.

४)हसत खेळत आणि भावूक गप्पामित्रासोबत­ मारणे.

५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेमकरतोत्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे.

६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे.

७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो.

८)असा क्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही.

आज की रात

आज की रात जरा प्यार से
बातें कर ले
कल तेरा शहर मुझे छोड़ कर
जाना होगा
यह तेरा शहर तेरा गांव
मुबारक हो तुझे
और जूलफो की छांव
मुबारक हो तुझे
मेरी किस्मत में तेरे जलवों की
बरसात नहीं
तू अगर मुझसे खफा है
तो कोई बात नहीं
एक दिन तुझको भी
मेरे लिए रोना होगा
रात की नींद और चैन भी
खो ना होगा
मेरी यादो में तुझे
अश्क़ बहाने होंगे
कल तेरा शहर मुझे छोड़ कर
जाना होगा
आज की रात जरा प्यार से
बातें कर ले

- संग्रहित पोस्ट

Thursday, March 21, 2019

सोडून द्यायला शिका...?

सोडून द्यायला शिका...?
        
           माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

            जगात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टाहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.

सोडून द्या : दुसर्‍यांना सतत टोमणे मारणे.

सोडून द्या : दुसर्‍यांच्या सतत चुका काढणे.

सोडून द्या : दुसर्‍यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.

सोडून द्या : दुसर्‍याच्या संपत्तीची अभिलाषा ठेवणे.

सोडून द्या : दुसर्‍याची कागाळी करणे.

सोडून द्या : दुसर्‍यांच्या दुःखात आपले सुख मानणे.

सोडून द्या : दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणे.

सोडून द्या : दुसर्‍यांशी स्वतःची तुलना करत राहणे.

सोडून द्या : दुसर्‍यांशी सतत स्पर्धा करत राहणे.

सोडून द्या : दुसऱ्याची फालतू चौकशी करणे.

सोडून द्या : दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे.

सोडून द्या : तुमचा खोटा अहंकार

सोडून द्या : स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणे.

सोडून द्या : एखाद्या व्यक्तीला तोंडावर न बोलता त्या व्यक्तीबद्दल मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ टीका-टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे.

सोडून द्या: सगळ्या मित्र परिवारामध्ये मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकांना कमी लेखणे. लक्षात ठेवा.आपण आपल्या लबाडी, स्वाथीॅ स्वभावाने लोकांना एक-दोन वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकांना समजले की लोक आपल्यापासून दूर होऊ लागतात.

            तुम्ही जे दुसऱ्यांना देता तेच परत तुम्हाला मिळते. चांगलं द्या चांगलं मिळेल. वाईट दिले तर आज ना उद्या वाईट मिळेलच!  

पहाटे, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र... सदैव आनंदात राहा! 

- संग्रहित लेख

Sunday, March 17, 2019

ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय?

जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहकांचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय?

आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांना विविध 6 हक्क प्राप्त झाले आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात...

1) संरक्षणाचा/सुरक्षिततेचा हक्क : 
जीवित किंवा मालमत्तेला धोकादायक अशा वस्तूंच्या  वापरापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क ग्राहकाला आहे.


2) माहिती मिळविण्याचा हक्क : 
आपण जी वस्तू खरेदी करतो तिच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा ग्राहकाला हक्क आहे.


3) निवडीचा हक्क : 
योग्य किंमतीत आपल्या वस्तूची निवड करण्याचा हक्क ग्राहकाचा आहे. ग्राहकांनी दक्ष राहून वस्तूच्या किंमती व गुणवत्ता यांचा विचार करुनच योग्य वस्तूची खरेदी करावी.


4) तक्रार निवारणाचा हक्क : 
वस्तूच्या खरेदीनंतर काही दोष आढळल्यास किंवा खरेदीत फसवणूक झाली असे वाटत असल्यास ग्राहकांना त्या संबंधी ग्राहक न्यायालयात तक्रार करण्याचा अधिकार आहे.


5) ग्राहक शिक्षणाचा हक्क : 
बाजारपेठेची व व्यापारी व्यवहाराची ग्राहकाला माहिती असणे आवश्यक आहे. ग्राहकाच्या हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आहेत.


6) आरोग्यदायी पर्यावरणाचा हक्क : 
ग्राहकांना प्रदूषणापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. याबरोबरच प्रामाणिकता मिळविण्याचा, मत प्रदर्शन करण्याचा ग्रहाकांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क ही ग्राहकाला आहे.


7) ग्राहकांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य काय? :

▪ कोणत्याही हॉटेलमध्ये मोफत पाणी पिऊ शकता किंवा स्वच्छतागृहचा वापर करू शकता.

▪ सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही. चलनाला दुसरी पर्यायी वस्तू देण्याचा अधिकार दुकानदारांना नाही.

▪ जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच, पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता.

▪ जर रुग्णालयानं काही सेवा देण्यासाठी पैसे स्वीकारले असतील तर त्या सेवा देण्यास ते बांधील आहेत. जर त्यांची पूर्तता त्यांनी केली नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

8)सर्व माहिती एकाच ठिकाणी :
ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या jagograhakjago.gov.in या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल.

Saturday, March 16, 2019

हृदयांतर

तात्वीक "भांडण" सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये...
      खरं तर "मतभेद" एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..
      एखाद्याशी "वाद" घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
      "अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे, तो विनाकारण बाळगुन जगू नये..
       शेवटी "मृत्यू" हे सुंदर, शाश्वत "वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे "भय" नसावे.
       आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेल्या दिवसांचा "आनंद" उपभोग घेण्यासाठी, याचे "स्मरण" ठेवू या.
       आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती जण आनंदात आहेत याला खूप महत्व आहे.

       "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे.
       
क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.      

Friday, March 15, 2019

बालपणीचा काळ सुखाचा

शाळा सुटल्यावर चड्डीवर करदुडा चढवून या असल्या मग्रुर ऊन्हात भर बाराच्या ठोक्याला माळाच्या गाडीवाटेनं पायात चपल्या नं घालता बैलगाडीच्या चाकुर्यातनं फुफाटा ऊडवत चालायचो.

चालता चालता त्याच फुफाटयातला बाबळीचा निबरढोक जुन काटा काचदिशी पायात मोडून मस्तकात कळ जायची.

मोडलेला काटा काढायला काटयाची पांजर शोधत लंगडत भीरी भीरी हिंडायचो.

तिथंच  रस्त्याकडेला  मांडी घालुन पायाला थुका लावून काटा काढायला घ्यायचो.

काढलेला काटा तळहातावर घेवून पापणीचा केस खसकन तोडायचो.
तोडलेला पापणीचा केस काटयाला चिकटवून हळूहळू वर ऊचलायचो..
काटा ऊचलून वर यायचा...भारी वाटायचं.


तेव्हा पापणीच्या केसानेही वेदना हलकी व्हायची.काटयासारखी...
कारण तेव्हा व्यवहाराचा स्पर्श नं झालेली निरागस स्वप्नं होती डोळ्यात..

ऊन्ह तेव्हाही होतंच की..
आता डोक्याला कॅप , डोळ्यावर गौगल चढवूनही ऊन्ह लागतं.

भौतिकाची बाधा झाली की सावलीही सलू लागते.
ऊन्हाची तर गोष्टच वेगळी....

बालपणीचा काळ सुखाचा

संग्रहीत पोस्ट
( आंतरजालावरून  साभार )

Wednesday, March 13, 2019

इंटरनेट वरील सर्वात पहिली माहिती

पहिलं ट्विट

२१ मार्च २००६ रोजी ट्विटरचे को-फाउंडर Jack Dorsey यांनी पहिलं ट्विट केलं होतं. याच्या दहा वर्षांनंतर ३०० मिलियन लोकांकडून वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार झालं होतं.

◆ युट्युबवरील पहिला व्हिडीओ
Me at the zoo नावाने असलेला हा (https://www.youtube.com/watch?v=jNQXAC9IVRw) व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आलेला पहिला व्हिडीओ होता. हा व्हिडीओ यूट्यूबचा को-फाउंडर जावेद करीमने २३ एप्रिल २००५ मध्ये शेअर केला होता.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेला पहिला फोटो
इन्स्टाग्रामचा को-फाउंडर Kevin Systrom ने या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पहिला फोटो शेअर केला होता. हा फोटो त्याच्या कुत्र्याचा होता. जुलै २०१० ला हा फोटो अपलोड केला होता.

◆ पहिलं वेब पेज
टिम बर्नर्स ली ने १९९१ मध्ये पहिलं वेब पेज इंटरनेटवर शेअर केलं होतं. यात वर्ल्ड वाइब वेबचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यात आली होती.

◆ पहिलं .Com डोमेन
१५ मार्च १९८५ मध्ये Massachusetts च्या एका कॉम्प्युटर तयार करणाऱ्या कंपनीने symbolics.com नावाने पहिलं डोमेन रजिस्टर केलं होतं. हे आजही जगतालं सर्वात जुनं डोमेन आहे. आजही हे वापरात आहे.

eBay वर विकली गेलेली पहिली वस्तू
१९९५ मध्ये eBay ने त्यांच्या वेबसाइटवर चेक करण्यासाठी त्यावर एका तुटलेल्या लेजर पॉइंट पेनचा सेल लावला होता. हा पेन एका व्यक्तीने १४.८३ डॉलरला खरेदी केला होता.

◆ Amazon वर विकली गेलेली पहिली वस्तू
३ एप्रिल १९९५ ला Amazon पुस्तकांचा सेल लावण्यात आला होता.

पहिलं सर्च इंजिन
गुगलच्या आविष्काराच्या ८ वर्षांआधी १९९० मध्ये McGill University चा विद्यार्थी Alan Emtage ने आर्ची नावाने एक सर्च इंजिन सुरू केलं होतं.

◆पहिलं फेसबुक प्रोफाइल
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुकचं पहिलं प्रोफाइल फेसबुकचा फाउंडर Mark Zuckerberg याचं होतं.

पहिला Unsolicited Commercial Email (SPAM)
पहिला ई-मेल पाठविल्यानंतर ७ वर्षांनी इंटरनेट एका नव्या बदलाचा साक्षीदार ठरलं. हे होतं कमर्शिअल ई-मेल.

- संग्रहित
( आंतरजालावरून साभार )

Monday, March 11, 2019

बाप - इंद्रजीत भालेराव

बाप

शेतामधी माझी खोप

तिला बोराटीची झाप

तिथं राबतो, कष्टतो

माझा शेतकरी बाप

लेतो अंगावर चिंध्या

खातो मिरची भाकर

काढी उसाची पाचट

जगा मिळायासाखर

काटा त्याच्याच का पायी

त्यानं काय केलं पाप?

माझा बाप शेतकरी

उभ्याजगाचा पोशिंदा

त्याच्या भाळी लिहिलेला

रातदिस कामधंदा

कष्ट सारे त्याच्याहाती

दुसऱ्याच्या हाती माप

बाप फोडतो लाकडं

मायपेटविते चुल्हा

पिठामागल्या घामाची

काय चव सांगू तुला

आम्ही कष्टाचंच खातो

जग करी हापाहाप !

कवी - इंद्रजीत भालेराव

Saturday, March 9, 2019

युरी गागारीन

अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वीतळावरचा पहिला माणूस म्हणून ज्याची नोंद इतिहासात आहे
युरी गागारीन यांचा जन्म ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात झाला. 9 मार्च 1934 रोजी रशियात जन्म झालेल्या युरी गागरिन बद्दल कोणालाही वाटलं नसेल की, हा मुलगा अंतराळातील गूढ रहस्य उलगडून दाखवण्यात यशस्वी होईल. अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वीतळावरचा हा पहिला माणूस आहे. युरीचा जन्म ग्रामीण भागातील गरीब कुटुंबात झाला. युरीचे वडील सामान्य मजूर आणि आई दूध विकण्याचे काम करत होती. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे युरीला शिक्षण घेण्यासाठीही पुरेसे पैसे नव्हते, दुसऱ्या महायुद्धावेळी युरी आणि त्याच्या कुटूंबाला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. दोन वर्ष युरी आणि परिवाराला एका छोट्या झोपडीमध्ये वास्तव्य करावं लागलं.
मात्र अशा संघर्षाच्या परिस्थितीतून मार्ग काढत युरीने 1951 मध्ये ग्रॅज्युएट शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील तांत्रिक शिक्षणासाठी युरीने सेवियत येथे एका स्थानिक विमान प्रशिक्षण संस्थेकडून विमान चालवण्याचे प्रशिक्षण सुरु केले. प्रशिक्षणानंतर सेवियत संघाच्या (आत्ताचे रशिया) एअरफोर्समध्ये नियुक्ती झाली.
12 एप्रिल 1961 मध्ये युरीने व्होस्तोक-1 नावाच्या यानातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर झेप घेत अंतराळात प्रवेश केला. अंतराळात प्रवेश करणारा पृथ्वी तळावरचा पहिला माणूस हा बहुमान युरीने पटकावला. अंतराळात प्रवेश करण्याची मोहिम किती जोखमीची असू शकेल याची कल्पना युरी गागरिन यांना होती. त्यामुळेच गागरिन यांनी आपल्या कुटुंबियांना या मोहिमेबाबत कोणतीही कल्पना दिली नाही.
अंतराळातील या मोहिमेतून परत येण्याचीही कोणतीच खात्री युरी गागरिन यांना नव्हती. एक क्षण असाही आला ज्यावेळी युरी गागरिन यांच्या यानाला आग लागण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र युरी यांच्या धाडसाने आणि चाणाक्ष बुद्धीने तब्बल 108 मिनिटे त्यांचे यान अंतराळात फिरत राहिले. पृथ्वीतळावरील अंतराळात जाणारा पहिला माणूस युरी गागरिन यांची इतिहासात नोंद आहे.
27 मार्च 1968 रोजी गागरिन मिग १५ यूटीआय’ या विमानाची चाचणी घेत असताना त्यांचा आणि गागरिन यांच्या सहकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. गागरिन यांच्या अंतराळातील मोहीमेनंतर नासा यांचे धाडस वाढले अन् तीन आठवड्यानंतर अमेरिकेचे एलन शेफर्ड यांनी अंतराळ मोहिम फत्ते केली.

Friday, March 8, 2019

रिचार्ज


मिटींग्स, टार्गेट्स, टेन्शन्स, कामाचे प्रेशर, सतत मोबाईल कानाला असे रुटीन रोजचेच.

रविवार...निवांत, आरामाचा दिवस...आळसावून बसलो होतो. काहीच करायची इच्छा होत नव्हती.
सवयीने मोबाईल ऑन केला, स्क्रीनवर मेसेज 'लो बॅटरी'..
चार्जिंगला लावण्यासाठी ताडकन उठलो, पण लाईट नव्हते. पॉवर बँक सुद्धा चार्ज नव्हती.

अरे बापरे...?? काय करावे तेच सुचेना...

मोबाईल बंद.. त्यामुळे वैतागलो, रेस्टलेस झालो, दोनतीनदा फॅनकडे, लाईट आले का म्हणून पाहिले. चकरा मारून कंटाळलो, नाईलाज म्हणून बसलो.

माझी अस्वस्थता पाहून वडील म्हणाले, “चिडणार नसशील तर, एक विचारू?”

“नाही चिडणार” .. हसत मी उत्तर दिले.

“मघापासून पाहतो आहे मोबाईल बंद आणी चार्जिंग करता येत नाही म्हणून खूप डिस्टर्ब आहेस. मोबाईलच्या चार्जिंगची एवढी काळजी घेतो. इतके त्याला जपतो.. मग दिवसभर वागणे-बोलणे, सगळ्या जबाबदाऱ्या यासाठी सदासर्वकाळ काम करणाऱ्या आपल्या मनाचा कधी विचार केला का?? त्या मनाच्या चार्जिंगचे काय..?”

पंच्याहत्तर पावसाळे पाहिलेले वडील बोलत होते.

“मनाचे चार्जिंग,हे काय नवीन..”

“नवीन नाही, जुनेच आहे. चार्जिंग, अपडेट हे तुमचे आजचे परवलीचे शब्द. प्रत्येकजण कपडे, राहणीमान, अँप्स सतत न चुकता अपडेट करीत असतो. परंतू, रोजच्या जगण्याच्या धांदलीत या सगळ्यात दुर्लक्ष होते  ते मनाकडे.”

“भारी, इंटरेस्टिंग बोलत आहात” सहजपणे वडिलाच्या शेजारी बसलो.

लहान असताना बाबांची खूप सवय होती, सतत सोबत असायचो, त्यांची कॉपी करायचो. जसजसा मोठा होत गेलो तसे आमच्या दोघात नकळत अंतर पडत गेले, संवाद बंद झाला नाही.. पण, कमी मात्र झाला.

माझें धावपळीचे आयुष्य,टेन्शन यामुळे बाबा माझा मूड पाहून बोलत आणि आज खूप दिवासानंतर खरतरं वर्षानंतर असे शेजारी बसलो. बाबा इमोशनल झाले हे त्यांच्या भरल्या डोळ्यातून समजले.

मीच त्यांची पाठ थोपटली. त्यावेळी मलाही भरून आले. आईची खूप आठवण आली.
किती साधी गोष्ट ती सुद्धा इतक्या वर्षामध्ये मी केली नव्हती.
बाबांसोबत पुढचा तासभर गप्पा मारल्या.
एकदम फ्रेश, मस्त वाटलं.. !!

“मनाचे चार्जिंग सुरु झाले बघ, तासाभरात मोबाईलची आठवण तरी झाली का.. लाईट केव्हाच आली.. आज खूप खूप वर्षानंतर तुझ्याशी बोलल्यामुळे मी फुल्ल चार्ज झालो, दोस्ता..!!”

“दोस्ता...” बाबा मला लहान असताना हाक मारायचे. आज खूप खूप वर्षांनी बाबांच्या तोंडून ऐकले. बाबा आपल्या खोलीत गेले. मला भारी वाटत होते.
क्लास वरून नुकताच आलेला मुलगा म्हणाला, “बाबा, चेस खेळणार”

“नको..तू हरला तर मला बरे वाटणार नाही..”

“चॅलेंज..तू हरणार हे नक्की.. तेव्हा नो टेन्शन..”

बुद्धीबळाचा डाव चांगलाच रंगला आणि चक्क मी जिंकलो.

मुलाने स्पोर्टीगली घेतले. मित्राने बोलावले म्हणून तो खेळायला गेला.

आता काय करायचे...?

अचानक मनात आले.. घर आवरु या.. बायको आश्चर्याच्या सुखद धक्क्यात.. मला थांबायला सांगून, ती घराबाहेर गेली आणी लगेच परत आली.

“कसं शक्य आहे? आज सूर्य पूर्वेलाच उगवलाय..” बायकोचा टोमणा.

दोघेही मनापासून हसलो.अत्यंत उत्साहाने कामाला लागलो. सगळ्यात आधी कपाट आवरायला घेतले.बॅग मध्ये भरून ठेवलेली कागदपत्रे चेक करताना शाळेत,कॉलेजमध्ये असतानाच्या डायऱ्या, वह्या सापडल्या.त्यातील जुने हिशोब,जपून ठेवलेली पेपरची कात्रणे,पाहताना त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप वर्षापूर्वी लिहून ठेवलेल्या कविता वाचताना गमंत वाटली. विसरल्या गेलेल्या कॉलेजमधील काही खास व्यक्ती आठवल्या.आठवणींचा पिटारा उघडत होता.

जुने फोटो अल्बम सापडले आणि मग काय..!!!
आजूबाजूला पसारा तसाच पडलेला आणि लहान मूल जसे खेळताना पसाऱ्यात बसून एखाद्या खेळण्यात हरवून जातात... अगदी तसेच जुने फोटो बघण्यात तसाच हरवून गेलो आणि मनाने त्याकाळात पोहचलो.सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणीचे फोटो पाहताना मजा आली.स्वताःचे तरुण रूप पाहताना हुरळून गेलो.
चटकन आरशात पाहिले.

“अरे..! फारसा फरक पडला नाही”

उगीचच स्वतःला समजावले. अल्बम पाहताना काही ठिकाणी नजर थांबली, स्थिरावली.तिथे हयात नसलेल्या आप्तांचे हसरे फोटो होते.बराच वेळ पाहत राहिलो.
मन गलबलून आले.खोल खोल कप्प्यात दडपलेल्या सगळ्या आठवणी सर्रकन समोर आल्या.डोळ्यातले थेंब फोटोवर कधी पडले समजले नाही.नंतरचे फोटो पाहताच आले नाही.

काही वेळ डोळे मिटून शांत बसलो.मनात विचार आले,'कसं असतं ना आपलं मन..?
अचानक आनंदून जाते..
क्षणात गहिवरते, हळवे होते..
एका आयुष्यात किती आठवणी जमा होत असतात त्याची गिनती नाही. आठवणींचे वेगवेगळे फोल्डर सेव्ह असतात.ती फक्त ओपन/ क्लोज करता येतात.. मात्र डिलीट करता येत नाही.'

या विचारात असताना पाठीवर थोपटत बायकोने काँफीचा कप हातात दिला. माझी अवस्था बरोब्बर तिच्या लक्षात आली.
“वा..! आज एकदम रेट्रो मूड मध्ये..”

“रोज न चुकता मोबाईलचे करतो, आज मनाचे चार्जिंग चालू आहे”

समोर पडलेले फोटो अल्बम पाहून ती म्हणाली,“अरे वा..!चला तर मग जोडीने, आपल्या लग्नाचे फोटो पाहू”

मग जोडीने आमच्या लग्नाचे फोटो पाहू लागलो त्यावेळी घडलेल्या गमती जमती, रुसवे फुगवे सगळे आठवले.
लग्न पुन्हा एन्जॉय केलं.

“आज खूप दिवसांनी तुला फ्रेश पाहिले, अगदी खेळकर, स्वच्छंदी पूर्वी असायचा तसा. रागावू नकोस.. पण.. काम, स्टेटस, रिस्पॉन्सिबिलीटी वाढल्या तसा तू हरवत गेलास. त्यातच गुरफटलास, एवढा की आमच्यासाठी तुझ्याकडे वेळ राहिला नाही. खूप मोठा झालास. पण, आमच्यापासून लांब गेला. उगीच वाद नको म्हणून आजवर बोलले नाही.. पण, आज पुन्हा पूर्वीचा वाटलास म्हणून हे बोलण्याचे धाडस केले.”

डोळ्यात आलेले पाणी पुसत बायको कुशीत शिरली. काही वेळ विलक्षण शांततेत गेले. दोघांचा मौनातून संवाद चालू होता.

“थँक्यू सो मच..! इतरवेळी असे बोलल्यावर मी चिडलो असतो.. पण, आज नाही. आजचा दिवस मस्त आहे. करियर, स्टेटस, अम्बीशन हे सगळं सांभाळताना स्वतःसाठी जगणं विसरलो होतो.
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
मन मारत राहतो.. त्याची इतकी सवय होते की आपली नेमकी आवड काय आहे हेच विसरलो होतो. रुटीनसोडून आज खूप दिवासांनी काही वेगळे केले. सगळ्यात महत्वाचे कशाततरी हरवून गेलो.आज खूप हलकं वाटतंय.”

“मग, मोबाईल ऑन करू की नको? कारण, कायम मोबाईलवर असणारा तू सकाळपासून एकदाही त्याला हात लावला नाही. खरंच आजचा दिवस मस्त आहे.”

“चल, आता मी तुला किचनमध्ये मदत करतो”

तेव्हा जोरात ठसका लागला.

“मन जरा जास्तच चार्ज झालंय वाटतंय” बायकोने चिमटा काढलाच.

.......आंतरजालावरून साभार

( संग्रहित पोस्ट )

Tuesday, March 5, 2019

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती


                       

◆ जाहिरात क्र.: 07/2018

◆ Total: 164 जागा  

◆ पदाचे नाव: 
◆ कार्यकारी अभियंता (जिल्हा): 37 जागा
◆ अतिरिक्त कार्यकारी अभियंता (जिल्हा): 37 जागा  
◆ उप कार्यकारी अभियंता (जिल्हा): 90 जागा  

◆ शैक्षणिक पात्रता: 
◆ पद क्र.1: 
(i) BE/BTech (इलेक्ट्रिकल)  
(ii) 09 वर्षे अनुभव 
◆ पद क्र.2: 
(i) BE/BTech (इलेक्ट्रिकल)  
(ii) 07 वर्षे अनुभव 
◆ पद क्र.3: 
(i) BE/BTech (इलेक्ट्रिकल)  
(ii) 03 वर्षे अनुभव 

◆ वयाची अट: 
06 नोव्हेंबर 2018 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
◆ पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
◆ पद क्र.2: 18 ते 40 वर्षे
◆ पद क्र.3: 18 ते 35 वर्षे

◆ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 

◆ Fee: 
◆ खुला प्रवर्ग: ₹500/-   
◆ राखीव प्रवर्ग:₹250/-

◆ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2019

 ◆ शुद्धिपत्रक: पाहा

◆ जाहिरात (Notification):पाहा



__________________________________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी,
+नोकरीच्या जाहिराती, 
+मार्गदर्शन, 
+निकाल,
+नोट्स

यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे


Saturday, March 2, 2019

(Teacher) महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती 2019

(Teacher) महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती 2019

एकूण जागा : 10001 जागा

पदाचे नाव: शिक्षक 

व्यवस्थापन संस्थेची पदसंख्या

1. जिल्हा परिषद :
संस्थेची संख्या:  25
पद संख्या : 5152


2.महानगरपालिका :
संस्थेची संख्या: 11
पद संख्या : 563


3. नगरपालिका : 
संस्थेची संख्या : 52
पद संख्या : 261


4. खासगी – प्राथमिक :
संस्थेची संख्या: 125
पद संख्या : 261


5. खासगी-माध्यमिक : 
संस्थेची संख्या : 612
पद संख्या : 3764


एकूण पदसंख्या : 10001

शैक्षणिक पात्रता: 
1. इयत्ता 1ली ते 8वी:  
(i) D.Ed / B.Ed 
(ii) TAIT 
(iii) TET
2.इयत्ता 09 ते 12वी: 
(i) D.Ed / B.Ed
(ii) TAIT 


वयाची अट: 
1. 02 मार्च 2019 रोजी 18 ते 38 वर्षे 
2. मागासवर्गीय: 05 वर्षे सूट


नोकरी ठिकाण:
 1.संपूर्ण महाराष्ट्र 


Fee: 
1. खुला प्रवर्ग: ₹500/-   
2. मागासवर्गीय:₹250/-


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2019 (अंदाजे)

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online 
[Starting: 03 मार्च 2019]
__________________________________________
स्पर्धा परीक्षेची माध्यमातून भरल्या जाणाऱ्या विविध पदांसाठी मार्गदर्शन
+ चालू घडामोडी,
+नोकरीच्या जाहिराती, 
+मार्गदर्शन, 
+निकाल,
+नोट्स

यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा : t.me/वाटचाल धेय्याकडे

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...