मोठ्या धावपळीनंतर तो कार्यालयात पोहचला त्यांची आज पहीली मुलाखत होती.
तो घराबाहेर निघतांना विचार करीत होता व त्याची इच्छा होती !
जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या पूर्वजांची हवेली सोडून येथे शहरात स्थाईक होईल .
सकाळी झोपेतून उठल्यापासून ते परत झोपेपर्यंत आईवडिलांच्या रोजच्या कटकटीपासुन मुक्तता मीळेल.
सकाळी झोपेतून उठलो कि अगोदर अंथरूण आवरा .
मग बाथरूममध्ये जा ,
बाथरूमच्या बाहेर निघत नाही कि मातोश्रीचे फर्मान "नळ बंद केला का ?"
टाँवेल जागेवर ठेवला की दिला फेकुन ?
नाश्ता करून घराबाहेर निघालो कि लगेच वडिलांचा आवाज
"पंखा बंद केला की चालुच आहे ?"
काय काय ऐकावे नुसता वैताग आला यार...
नौकरी मिळाली की घर सोडून देईल व शहरात राहील......
आँफीसमध्ये भरपूर उमेदवार बसलेले होते , बॉसची वाट पाहत होते, दहा वाजलेले होते तरीपण ऱ्हरांड्यात अजूनही लाईट चालुच होता , लगेच आईची आठवण आली लाईट बंद केला का ?
अन उठून मी ऱ्हरांड्यातील लाईट बंद केला...
ऑफिसच्या दरवाज़्याजवळ कोणीच नव्हते , बाजूला ठेवलेल्या वाटर कूलर मधून पानी टपकत होते ,
ते पाहून वडीलांचे रागावणे आठवले , म्हणून वाँटर कुलरचा नळ व्यवस्थित बंद केला गळणारे पाणी बंद केले ,
समोर बोर्ड वर लीहलेले होते तुमचा इंटरव्यू दूसऱ्या मजल्यावर आहे....*
जीन्यातील लाइट चालुच होता तो बंद करून पुढे सरकलो तर रस्त्यात एक खुर्ची पडलेली होती ती जागेवर व्यवस्थित उभी केली व वरच्या मजल्यावर पोहोचलो व पाहीले की आपल्या अगोदर बसलेले उमेदवार बाँसच्या कँबिनमध्ये जात होते व लगेच बाहेर पडत होते............
तेथे मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारास विचारल्यावर कळले की , बॉस फाइल पाहुन काहीच प्रश्न वीचारत नाहीत आणि परत पाठवुन देत आहेत . असे समजले.
माझा नंबर आला व मला मुलाखतीसाठी बोलावले मी दरवाजा वाजवून वीचारले , आत येऊ का सर ?
" एस कम इन " आतुन आवाज आला . बसण्यासाठी सुचना मीळाल्यानतंर खुर्चीवर बसलो आणि माझी फाईल पुढे केली ,.......
फाईल मधिल माझ्या कागदपत्रावर नज़र मारत असतांना कोणताही प्रश्न न विचारता बाँसने विचारले "केव्हा ज्वाइन करत आहात ?"
बाँसच्या या प्रश्नाने मी चक्रावलो मला वाटले ते माझी गंमत करत आहेत , माझा चेहरा पाहून ते म्हणाले मी गंमत करीत नाही ही वास्तविकता आहे .
आजच्या इंटरव्यूत कोणालाही कोणताच प्रश्न विचारला नाही, फक्त सीसीटीव्हीमध्ये इंटरव्यूमध्ये आलेल्या उमेदवारांच्या हालचाली मध्ये सर्व काही पाहिले,
मुलाखतीसाठी बरेचजण आले,
वाँटर कुलरचे गळणारे पाणी सर्वानी पाहीले पण दुर्लक्ष केले , पण तूम्ही नळ बंद केला.
ऱ्हरांड्यातील जळणारा लाईट कोणीच बंद केला नाही तो लाईट तुम्ही बंद केला .
मध्येच रस्त्यावर पडलेली खुर्ची सर्वानी पाहीली पण दुर्लक्ष केले परंतु ती खुर्ची तुम्ही उचलली .
धन्य तुमच्या पालकांना , ज्यांनी तुम्हाला चांगले व उत्तम संस्कार केले.
ज्यांच्याजवळ Self Discipline नाही तो कितीही हूशार असला , चतुर असला तरी ती व्यक्ती मैनेजमेंट आणि जीवनातील घौडदौडीत यशस्वी होऊ शकत नाही.
घरी जाऊन आई वडीलांच्या गळ्यातच पडलो आणि त्यांची माफी मागून त्यांना सर्व काही सांगितले तुम्ही केलेल्या संस्कारामुळेच आज मला ही नौकरी मीळाली .
आपल्या जीवनात रोज रोज लहान सहान बाबीवर बोलणारे ,नेहमी सुचना देणाऱ्या आई वडीलाकडुन मला जी शिस्त मीळाली ती अनमोल आहे . या संस्कारक्षम शिस्तप्रीय संस्कारापुढे मी मीळवलेली पदवीची काहीच हैसियत नाहीं.
जीवनात फक्त शिक्षणच महत्त्वाचे नाही तर त्यासोबत आई वडीलांची शिकवण व संस्कार महत्त्वाचे आहेत...
जीवनात संस्कार महत्त्वाचे आहेत.
या संस्कारासाठी आई वडिलांचा सम्मान जरूरी है ।
अनामिक लेखक