Monday, May 27, 2019

मोठी खेळी

मोठी खेळी खेळायची असेल तर कोणत्याही परिस्थितीमधे पीच वर टिकून राहणे खूप आवश्यक असते. यासाठी संयम, समर्पण आणि निरीक्षण खूप आवश्यक असते. स्कोर होतो कि नाही याला महत्व नाही, तुम्ही टिकून आहात हे महत्वाचे असते. जसजसे पीच वर रुळायला लागतात हळूहळू स्कोर वाढायला सुरुवात होईल. एक एक करत धावा जमा होत जातील आणि तुम्ही एका मोठ्या खेळीची तयारी सुरू केलेली असेल.... लोकांना वाटतं कि तुम्ही नुसतेच टाईमपास करत आहात, पन्नास चेंडू खेळूनही एकही धाव काढली नाही, तुम्ही खूपच स्लो खेळात आहात... पण जसजसा सामना पुढे सरकत जातो तसतसे लक्षात येते कि सगळे खेळाडू बाद होत असताना सामना फक्त तुमच्या संयमी खेळीमुळेच सावरला आहे... ......
.
.
शांत रहा, धीर सोडू नका, संयमी खेळी खेळा... मोठा स्कोर आपोआपच होईल.....
.....
व्यवसाय सुरु झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षात बंद पाडण्याचे प्रमाण खूप मोठे आहे, कारण या कालखंडात स्कोर काहीच होत नसतो पण अडचणी भरपूर येत असतात. इथे खचणारे पुढे जाऊ शकत नाहीत आणि इथे खंबीर राहून परिस्थितीला तोंड देत हळूहळू का होईना पण एक एक पाऊल पुढे टाकणारे कधी माघारी फिरत नाहीत.....
.
.
व्यवसाय साक्षर व्हा... उद्योजक व्हा... समृद्ध व्हा...

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...