Wednesday, May 15, 2019

आज १५ मे. महाकवी वामनदादांचा स्मृतीदिन

आज १५ मे.

महाकवी वामनदादांचा स्मृतीदिन

त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ! व कोटी कोटी प्रणाम !!

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते.

वाणीत भीम आहे, करणीत भीम असता
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते.

गोळी खुशाल घाला फाशी खुशाल द्यारे
खोटे इथे खऱ्‍याचे दुसरेच टोक असते.

तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते
सारे चलन तयांचे ते रोखठोक असते.

सदभाव एकतेचे जर अंतरात असते
चुकले कुणीही नसते सारेच एक असते.

वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते
तुझिया कृतीप्रमाणे सारेच नेक असते.

- वामनदादा कर्डक.

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...