मागे एकदा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला होता, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. त्यावर हातोडी चा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते
" वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते. "
मॅसेज वाचला व मनात विचार आला हे खिळे जन्मतः वाकडे असतील का.? मग मी एका हार्डवेअर च्या दुकानात जाऊन १०० ग्राम खिळे घेतले ते सगळेच सरळ होते. मी दुकानदारास विचारले भाऊ वाकडे खिळे नाहीत का.?
त्याचे उत्तर _"दादा कारखान्यातून सर्वच खिळे सरळ येतात. फक्त हातोडी चा चुकीचा दणका किंवा मग खिळ्याची प्रहार सहन करण्याची क्षमता कमी असल्याने हे खिळे वाकतात"_
मग मी विचारले केला की मग ह्या वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?
तर तो बोलला _"साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा, जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे एकदा सरळ झाले की मग त्यांना त्याची जबाबदारी द्या, म्हणजे परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल"_.
त्या दुकानदाराने माझे डोळे उघडले, आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, त्याचा वापर योग्य न झाल्याने तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात. म्हणून त्याला प्रेमाने सरळ करा व जबाबदारी द्या तो निश्चितच निभावेल ही जाण मला झाली. आपणासही व्हावी हीच अपेक्षा माणसे जोडूया संघटना वाढवूया मी लेखक किंवा कवी नाही पण एक मॅसेज चे पोस्टमार्टम केल्याने खरा रिपोर्ट नक्की मिळतो.
No comments:
Post a Comment