Thursday, February 25, 2021

आपला प्रवास खूप छोटा आहे!

*प्रवास खूप छोटा आहे*
. -------------------------------
*एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती.*
*पुढच्याच स्टॉपवर एक स्थूल आणि वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्या सोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली.*
🚌
*त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो त्या तरूणीला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"😴*
*तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला*
👉🏼 *"अनावश्यक किंवा बाष्फळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."*

*👉🏼ही प्रतिक्रिया* *सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे.*

*👉"इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, आपला प्रवास खूपच छोटा आहे"*

*आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, हा तर काही मिनीटांचाच प्रवास आहे , तसेच जीवन हा सुद्धा एक काही काळापुरता प्रवासच आहे.* *मानवाचे आयुष्य मर्यादित आहे. आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे;* *की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.*

*कोणी आपले मन दुखावलंय का?*

*शांत रहा, प्रवास खूप छोटा आहे.*

*कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?*

*सोडून द्या, शांत रहा, कारण*
*प्रवास खूप छोटा आहे.*

*कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की,* *हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.*
*आपला प्रवास खूप छोटा आहे.*
*आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू,* *एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया.*
*जर मी तुम्हाला अनावधानाने कधी दुखावले असेल तर मला माफ करा. जर तुम्ही मला कधी दुखावले असेल तर मी ते कधीच सोडून दिले आहे.*
*कारण एकच की,*
👉 *आपला प्रवास खूप छोटा आहे!.*

*👉इतिहासातील काही घटना नक्कीच बोधप्रद आहेत.त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे.*

*🤺अर्धे जग जिंकलेला* *आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर राजा* *आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, ' मी मरेल तेंव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा, जगाला कळू द्या,जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर खाली हात गेला.👐🏽*

*फ्रान्सचा सम्राट नेपोलियन* *बोनापार्ट वाटरलूच्या तुरुंगात खंगुन खंगुन मेला.*

*जर्मनीचा शहेनशहा* *ज्याने दुसरे महायुद्ध घडवले त्या एडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली.*

*इराकचा बादशहा सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली.* *नको तितकी संपत्ती गोळा केली. शेवटी फासावर लटकावे लागले.*
*अमेरिकन सरकारला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन*याला अमेरिकन सैन्याने सर्जिकल स्ट्राइकने उचलून ठार केले व त्याचे प्रेत समुद्रात टाकून दिले.*
*आपल्या वडिलांना (शाहजहानला ) तुरुंगात टाकून, भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या, भारतावर साम्राज्य असलेल्या बादशहा औरंगजेबाच्या समाधी कडेही कोणी बघत ही नाही.*

*एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुसोलिनीला* *झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले.*

*फ्रांसची हुकूमत ताब्यात असलेल्या 16 व्या लुईला* *लोकांनी गिलोटिनवर चढवले.*

*कार्ल मार्क्सला* *डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले.*

*जगाला आपल्या अभिनयाने हसवणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला.*

*भल्याभल्यांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मंरो ही अति मद्य सेवनाने मेली.*

*मनोरंजनातून लोकांच्या मनावर राज्य करणारे* *राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, ए के हँगल, परवीन बाबी, माला सिन्हा यांचे मृत्यू आठवा.नुकतेच चित्रपट अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांनी नैराश्यातून स्वतःचे जीवन संपविले.*

*सध्याच्या कोरोना विषाणू मुळेतर जगावर मोठेच संकट आले आहे.*

*सांगायचे तात्पर्य हे कि आपले आयुष्य मर्यादित आहे*.

*जन्मापासून तर म्रुत्यूपर्यंतचा जीवनप्रवास असतो काळ कुणासाठी थांबत नाही*
*आपल्या कडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल.*
*पण चांगल्या कर्माने मिळवलेली माणुसकीच साथ देईल.*👏🏼

 *कितीही संपत्ती मिळविली असली तरी ती म्रुत्युनंतर इथेच रहाणार आहे*

👉 *भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका. जोडलेला पैसा कपाटात रहातो , जोडलेली माणसे , नातेवाईक स्मशानापर्यंतच येतात ,सोबत काहीही येत नाही , पण चांगले कर्म , सत्किर्ती मात्र सोबत येत असते*

*शेवटी एकच सांगतो, आपला जीवनप्रवास खूप छोटा आहे. जीवन सुंदर आहे, ते आनंदाने जगा , परोपकारी जीवन जगा ,आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा.इतरांना जे सहकार्य करता येईल , जे शक्य असेल ती मदत करा,🤝🏼 दुसऱ्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.. प्रत्येकाला शेवटी तिथेच जायचे आहे... जिथे परत येण्याचा रस्ताच नाही.... आपला प्रवास खूप छोटा आहे!*

Sunday, February 21, 2021

!!!नकारात्मक प्रभाव :


असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते. एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसें दिवस अधिकाधिक कंगाल होतो ? आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो, कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं, का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं ? आणि एखादीला मनातून मुलगी नको, मुलगी नको असा सतत धावा करुनही मुलगीच होते ? का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिका धिक गरीब होतायतं ?

तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन.

तुम्हाला माहितीय ? जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम ? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळ सगळं.

जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.

उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं. माझं वजन वाढतयं, म्हंटलं की वजन अजुन वाढतं. माझे केस गळतायत म्हंटलं की अजुनच केस गळतात, माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजुनच उशीर होतो, कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजुन अडचणी निर्माण होतात, वगैरे वगैरे.

ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.
म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.

मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडुन दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली.

विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन चेहर्‍यावर स्मितहास्ये ठेवुन मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा !..

१) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
२) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
३) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच आहे आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
४) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे.
५) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन प्रचंड संपत्ती वान आहे.
६) मी एका प्रसन्न व्यक्ती मत्वाचा मालक असुन संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
७) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
८) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळून जातात.
९) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे आणि ती जिंकली आहे.
१०) माझ्या आजुबाजुचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात आणि मी ही खुप खुप त्यांच्यावर प्रेम करतो.
११) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहेत आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
१२) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो.
१३) मी निरोगी आहे,
१४) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
१५) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.

याला पॉझीटीव्ह अफेर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल

तुम्ही हे जर मनापासुन फील करुन बोललात आणि ते तुमच्या सुप्त मेंदुपर्यंत पोहोचलं तर तुमच्या नकळत तो तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल.

आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ ऍट्रॅक्शन”ची दणदणीत सुरुवात असेल !

ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो, अशा शुभेच्छांसह...

Show More Reactions

Saturday, February 20, 2021

*हे सुंदर जग आहे*


*हे सुंदर जग आहे*

✍🏼 रवि वाळेकर

पहाटेपासूनच पाऊस कोसळतं होता. इतरत्र पाऊस फक्त पडतो, मुंबईत तो कोसळतो! 'रोमँटिक पाऊस' वगैरे शब्द मुंबईबाहेरचें. बाहेरचा येऊन कोणी मुंबईत पावसाला 'रोमँटिक' वगैरे म्हंटला, तर अस्सल मुंबईकर त्याला जोड्याने मारेल!

मी नऊलाच ऑफिसला पोहोचलो होतो. कामाचा बराचं व्याप होता. फोन्स, इमेल्स, मिटींग्ज करता करता, दिड वाजता जेवावे म्हंटलो, तेवढ्यात ऑफिसचेच एक 'अंतर्गत इमेल' येऊन थडकले.
'पाऊस जास्त असल्याने, आज सर्व कर्मचाऱ्यांनी लवकर घरी निघावे'
इतका वेळ ऑफिसमध्ये बसल्यामुळे बाहेर पावसाने काय कहर केलायं, या विषयी अनभिज्ञ होतो. बाहेर येऊन बघतो, तर विश्वास बसेना!

समोरचा नेहमीचा गजबजलेला रस्ता ओळखू येत नव्हता!
सोसाट्याचा वारा आणि वरून बादलीने ओतल्यासारखा तुफानी पाऊस. झाडांच्या फांद्या, अगणित पाने, कागदं, कचरा रस्त्यावर पडलेला. तुरळक रिक्षा धावतं होत्या. बस वा टॅक्सी नाहीचं. संपूर्ण रस्त्यावर घोट्याच्या वरपर्यंत वाहते पाणी.
सगळा रस्ताचं गटार झाला होता! त्याचं गढूळ पाण्यात शेकडो लोक पडतं, चाचपडंत चालतं होते. पाण्यात दिसेनासे झालेले खड्डे चुकवण्यासाठी रस्त्यातले पाय जमिनीवरून घसरवतं पुढचा पाय टाकायचा!
त्यातचं, पायी चालणाऱ्यांच्या अंगावर पाणी ऊडवतं ऊर्मटपणे वाहने धावत होते.
वरती पाणी, खाली पाणी. आभाळ काळे झालेले. सगळीकडे काळजी, भीती आणि एक भयावह अंधूकपणा भरलेला.
या अशा पावसातं लवकरात लवकर घरी पोहोचणेचं शहाणपणाचे. मी त्वरेने निघालो.
मला रिक्षाने घर ते ऑफिस आणि ऊलटं, अर्धा ते पाऊण तास लागतो. पण आज रिक्षाच मिळेना. एकतरं रिकाम्या रिक्षा नाहीतचं आणि ज्या होत्या, त्या थांबायला तयार नाही. पावसाचे पाणी वाऱ्यामुळे चहुबाजूंनी अंगावर येत होते. कसेबसे डोके कोरडे राहिले, बाकी नखशिखांत भिजलो. जवळपास तासाभराने एक रिक्षा मिळाली.
"सब तरफ पाणी भरेला है. सब जाम है साब" काहीतरी नवीन सांगितल्याप्रमाणे रिक्षावाला सांगत होता.

रस्त्यावर सगळीकडेचं पाणी. कासवाला लाजवील अशा संथगतीने वाहने चालतं होती. त्यात भर पाण्यात रस्ता ओलांडणाऱ्यां बेशिस्त पादचाऱ्यांची भर! सिग्नल बंद होते. वाहने दोन तिन फूट पुढे सरकायची आणि तिथेचं पाच दहा मिनिटे थांबायची. थांबण्याशिवाय दुसरा पर्यायचं नव्हता!
पुढे जाता येईना, मागे परतता येईना. मागेपुढे हजारो वाहने अडकलेली. दोन्ही बाजूला शेकडो लोक पाण्यात चालतायेत.कपडे भिजलेले, शरीर गारठलेले आणि चेहरे चिंताक्रांत. एवढे भिजलेले की आता वरून पडणाऱ्या पावसाचीही पर्वा नाही. छत्रीचेचं ओझे झालेले.
मुली, स्त्रिया सुद्धा आज भिजलेल्या कपड्यांनी बिनदिक्कत चालतं होत्या. बघायला, कोणाची विखारी नजरं त्यांच्याकडे जातेच कशाला? सगळेचं खाली बघतं, रस्ता पायाने चाचपडतं, जीव वाचवतं चालतायेत...

मला दुरवर गुडघ्याच्याही वरपर्यंत पाण्यात ऊभा असलेला विशीतला एक मुलगा दिसला. मुख्य रस्ता थोडा ऊंचावर होता. इथे बाजूपेक्षा थोडे कमी पाणी होते. रस्त्याच्या बाजूला, कडेपासून पाच-सहा फुटावर, तुफानी वेगाने पाणी वाहात होते. हा खाली त्या गुडघाभर पाण्यात आणि वरून कोसळणाऱ्या पावसात भिजत बावळटासारखा निव्वळ ऊभा होता!

हा वेडा आहे का?
या असल्या जिवघेण्या पावसातं घरी निवांत बसायचे सोडून हा असा का ऊभा आहे? जर पावसाची गंमतचं बघायची असेल, तर कुठे आडोश्याला ऊभा रहा!
मी आता आजुबाजूची रहदारी बघण्याऐवजी खुळ्यागतं याच्याकडेचं बघतं बसलो!
विस एक मिनीटांनी माझी रिक्षा डाव्या बाजूला नेमकीचं याच्या समोर आली.
मी त्याच्याकडे बघून स्माईल दिले.
हा मख्ख!
"क्या कर रहा है?"
"कुच नही"
"अबे, बारीश मे कायको भिग रहा है?"
ऊत्तर नाही.
रिक्षा ऊभीचं होती. दहा मिनिटे तरी पुढे जाता यईल, असे वाटत नव्हते. हा ध्रूवबाळाप्रमाणे अढळपद मिळाल्यासारखा तिथेचं. एक इंचही जागेवरून हलतं नव्हता!
रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या प्रत्येक पादचाऱ्याला, दुचाकीस्वाराला याचा अडथळा होत होता. सगळ्यांना याला वळसा घालूनच जावे लागतं होते. काहीजण जाताजाता त्याला शेलक्या शिव्याही देतं होते.
त्याचे कपडे भिजलेले होते, असे म्हणणे मुर्खपणाचे होते. डोक्यावरच्या केसांमधूनही पाणी ठिबकतं होते. याला काही फरकचं पडत नव्हता! मध्येचं तोंडावर हात फिरवून पावसाचे पाणी पुसतं होता. कपड्यांची अजिबात काळजी नव्हती. ते इतके भिजले होते, की सुकायलाचं आठवडा लागणारं! खाली काळपट अर्धी चड्डी आणि वरती एकेकाळी पांढरा असावा, असा टिशर्ट. त्यावरच्या असंख्य काळ्या तेलकट डागांमुळे हा बहुधा 'गॅरेजवाला' मुलगा आहे, हे कळतं होते.
मला राहावले नाही. मी त्याला विचारले, "बांद्रा आने का है क्या रे? चलं बैठ ऑटो मे"
"नही साब" त्याच्या डाव्या बाजूला जमिनीकडे बोट दाखवतं तो म्हणाला,
"इधर निचे बडा पाईपलाईन है. ढक्कन निकल गयेला है"
तो त्या मॅनहोलमध्ये कोणी पडू नये, म्हणून तिथे ऊभा होता!
रस्त्याखालचा पाईप पुर्ण भरला असावा, अन्यथा पाणी चक्राकार आत घुसताना दिसले असते. फुटभर ऊंचीचे पाणी वरून वेगाने जात होते. पायी चालणाऱ्याला वा दुचाकीवरून जाणाऱ्या कोणाला जाणवलेही नसते, की खाली खोल सांडपाण्याचा पाईप आहे!
मी अवाक झालो! कोण होता हा? कोणासाठी हा असा पाण्यात ऊभा राहिलायं?
मी भरं पावसातं खाली ऊतरलो. त्याला म्हंटले, "बहोत बढिया, भाई!"
तो फक्त कसनूसं हसला आणि म्हणाला,
"बस, कोई गिरना नै मंगता इधर"
"कबसे खडा है?"
"दो बजे से"
घड्याळातं पाच वाजले होते!
३ तास तसेचं ऊभे राहून याला भुक लागली असणारं. दुदैवाने माझ्याकडे काहीच नव्हते. सगळी दुकानेही बंदं. हा भुक लागल्यामुळे जागा सोडेल, असे काहीच चिन्ह नव्हते!

कुठल्या प्रेरणेने तो हे करतं होता? त्या घाण गुडघाभर ऊंचीच्या पाण्यात उभे राहून तो तिन तासांपासून कोणाला वाचवतं होता? आणि का? दोन वाजल्यापासून त्याने कित्येक जणांना वाचवले असणार. कोणाला त्याची जाणीवही नव्हती. खुद्द याला तरी त्याची कुठे पर्वा होती?
ही अशी छोटी छोटी माणसें हे जग सुंदर करून जातात!

मागच्या डिसेंबरमध्ये दादरला फुटपाथवर एक आंधळा म्हातारा 'कालनिर्णय' विकतं बसलेला दिसला.
दुकानातून घेण्याऐवजी, याच्याकडून घेतलेले काय वाईट, असा विचार करून थबकलो.
"कालनिर्णय' केवढ्याला, काका?"
"फक्त बत्तीस रूपये, साहेब" केविलवाणे तो म्हणाला. सकाळपासून काहीचं विकल्या गेलेले दिसतं नव्हते. मी एक घेतले. पन्नासची नोट होती. ती त्याला दिली. हाताने चाचपडत तो ती नोट तपासतचं होता, की ऊंची कपडे घातलेला साठीतला एक देखणा गृहस्थ खाली वाकला.
"कितने का है ये?"
"बत्तीस रुपया"
"कितने है?"
"चौदा रहेंगे, साब"
ज्याला मराठी येतं नाही, असा हा माणूस मराठीतले कालनिर्णय कशासाठी विकत घेतोयं?
त्या माणसाने खिशातून साडेचारशे रुपये काढून त्याला दिले आणि ते सगळे कालनिर्णय बखोटीला मारले!

मी आश्चर्यचकित! छापील किंमतीत विकतं घेतोय, म्हणजे पुनर्विक्रीसाठी निश्चितच घेतं नाहीये. तसाही, कपड्यांवरूनही हा असले किरकोळ धंदा करणाऱ्यातला वाटतं नव्हता.
तो गृहस्थ थोडा पुढे गेला असेल. मला राहवलेचं नाही. मी थांबवून त्यांना विचारलेच!
हे मुळचें लखनौचे महोदय एअरइंडियातल्या मोठ्या पदावरून नुकतेचं निवृत्त झाले होते. शिवाजीपार्कात स्वत:चे घर होते. एकुलता एक मुलगा अमेरीकेत स्थाईक झाला होता. लठ्ठ पेन्शन येत होती.
"वो बेचारा पंधरा कालनिर्णय बेचके कितना कमाता होगा? सौ, डेढसौ? वैसे भी बेचारे को सौ रुपये के लिए दिनभरं ऐसेही धुप मे बैठना पडता था. मैने ऊसका काम थोडा हलका करं दिया. बस इतनाही!"
मला काही बोलणेचं सुचले नाही! पण एवढ्या चौदा कालनिर्णयांचे तो करणारं काय होता?
"सोसायटी मे बहोत मराठी फ्रेंडस है, ऊनमे बांट दूंगा!"
मी दिग्मूढ!
"तु एक मिनीट लेट आता, तो तुझे भी फोकट मे देता!" मला डोळा मारतं, हसतं तो लखनवी देवदूत रस्ता पार करून गेला सुद्धा!

माणूसकी याहून काय वेगळी असते?

एखाद्या हॉस्पिटलबाहेर 'तत्काळ रक्त हवे' असा फलक वाचून, ऑफिसला वा घरात जायला ऊशीर होईल, याची तमा न बाळगतां रक्त देणारे कोण असतात? ते ही रांग लाऊन!
कोण असतात हे? कुठल्या जातीचे? कोणत्या धर्माचे? 'भैये' असतात की 'आपले' मराठी?
मुंबईत रस्त्यावर चहा विकणारे लाखो 'चायवाले' आहेत.
बहुतांश ऊत्तरेकडले. सकाळी चहा बनवल्यावर पहिला कपभरं चहा ते रस्त्यावर फेकतात.
दिवसाचा पहिला चहा रस्त्यावर न फेकता भिकाऱ्याला पाजणारा बांद्र्याचा एक 'चायवाला' मला माहिती आहे! सकाळी सकाळी भिकारी आलाचं नाही, तर एका भांड्यात तेवढा चहा बाजूला काढून, धंद्याला सुरूवात करतो!
"बर्कत आती है" एवढीचं कारणमिमांसा त्याने दिली होती.

डोळे ऊघडून पाहिले, तर असे असंख्य अज्ञात देवदूत आपल्याला ठायीठायी आढळतात, पण आपली नजरचं मेलेली असते.
परवा थायलंडमध्ये गुहेत अटकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी हजारो अनामिक हात मदतीस आले.
गुहेतले पाणी पंपाने बाहेर काढावे लागले. ते पाणी कुठे फेकले?

ज्याच्या शेतातं ते पाणी फेकावे लागले, त्या शेतातलें तीन एकरातले ऊभे पिक या पाण्याने अक्षरशः वाहून गेले. एका छोट्या शेतकऱ्यासाठी हे प्रचंड नुकसान.
एका पत्रकाराने त्या शेतकऱ्याला या नुकसानीविषयी खोदून खोदून विचारले.
"नुकसानीचे काय एवढं? मुले वाचली ना? पेरणी परतं करता येईल. मुलांचे प्राण परतं आणता आले असते का?"
हे ऊत्तर ऐकूनचं डोळ्यात पाणी आले!

हे जग सुंदर आहे. ते सुंदर करणारे अनामिक देवदूत आजही या जगात आहेत आणि राहतीलही.

फक्त तो तिरस्काराचा, आत्मकेंद्री स्वार्थाच्या काळ्या काचांचा गॉगल डोळ्यावरून काढला पाहिजे!
********
कॉपी पेस्ट

Show More Reactions

Saturday, February 13, 2021

*आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आम्ही एक 'जमाना' होतो.*

*ते दिवस....!*

पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.

पण यामध्ये *'सरस्वति देवी नाराज न होवो'* हा पापभिरुपणा पण असायचा.
 अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं

 पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा *दृढ* विश्वास होता.

कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा.

आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी *फिकीर* नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा *बोजा* होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती.

एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!!

शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच माहीत नव्हतं.

मार खाणं ही आमच्या *दैनंदिन* जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. *मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे.* मार खाणारा यासाठी की 'चला!,कालच्यापेक्षा तरी आज कमी *धोपटला* गेलो 'म्हणून आणि मारणारा 'आज पुन्हा *हात धुवून* घ्यायला मिळाले' म्हणून......

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही *तुमच्यावर किती प्रेम करतो,* कारण आम्हाला *'आय लव यू'* म्हणणं माहीतच नव्हतं.

आज आम्ही असंख्य टक्के टोणपे खात, संघर्ष करत *दुनियेचा एक हिस्सा झालोय.* काहींना जे हवं होतं ते त्यांनी *मिळवलंय* तर काही 'काय माहीत....?कुठे हरवलेत ते ...??!

आम्ही जगात कुठेही असू पण हे *सत्य* आहे की आम्ही *वास्तव दुनियेत जगलो,* आणि *वास्तवात* वाढलो.

कपड्यांना *सुरकुत्या* पडू न देणं आणि नात्यांमध्ये *औपचारिकता जपणं* आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही *मूर्खच* राहिलो.

आपल्या *नशिबाला* कबूल करून आम्ही आजही *स्वप्नं* पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला *जगायला मदत करतायत* नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची *वर्तमानाशी* काहीच तुलना होणार नाही.

*आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आम्ही एक 'जमाना' होतो.*

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी .....! ते दिवस पुन्हा येतील.....🤔
🙏🙏🙏🙏🙏

Thursday, February 11, 2021

हे भारतातच घडू शकतं...

हे भारतातच घडू शकतं... मृदुला बेळे

मी इटलीमधल्या तुरीन इथे  बौद्धिक संपदा  कायद्यात एलएलएम करत होते, तेंव्हाची गोष्ट आहे,  2013 सालामधली. दिवसवसभराच्या लेक्चर्सने डोकं आंबून  गेलं होतं, तेंव्हा एलिझा- आमची प्रोग्राम डिरेक्टर -वर्गात आली. " माझ्याकडे इथं  होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे काही फ्री पासेस आहेत, कुणाकुणाला यायचंय बोला पटकन", ती म्हणाली. मी अज्जिबात वेळ न दवडता हात वर केला, आणि दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी एलिझा आणि आम्ही चार पाच जण या चित्रपट महोत्सवाला निघालो. जाऊन पोचलो तर समजलं की तिथं आज जे चित्रपट दाखवले जाणार होते त्यात एक भारतीय चित्रपट होता. डायलन मोहन ग्रे या दिग्दर्शकाचा 'फायर इन द ब्लड' या नावाचा.

हा चित्रपट पाहून बाहेर पडले तेंव्हा मी आंतरबाह्य हादरलेले होते. या हादरण्याच्या आड दडलेलं होतं एक कौतुक आणि एक शरम. जगात केवळ औषधं परवडत नसल्याने झालेल्या करोडो गरीब आफ्रिकी लोकांच्या मृत्यूने मी हादरून गेले होते. त्यांच्या मदतीला धावून गेलेल्या सिप्ला या भारतीय कंपनीच्या डोंगराएवढ्या कामाबद्दल एक भारतीय असूनही,  आणि औषधनिर्माणशास्त्राची प्राध्यापिका असूनही मला काडीचीही माहिती नव्हती, याची मला प्रचंड लाज वाटली होती. पण त्याचवेळी कौतुक आणि आदराने मन भरून आलं होतं.  हा आदर होता गरीब लोकांना स्वस्त दरात औषधं मिळावीत म्हणून सतत धडपडत आलेल्या, त्यासाठी योग्य धोरण, कायदे ठरवत आलेल्या भारत सरकारच्या दूरदर्शी धोरणाबद्दल, त्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राह्यलेल्या भारतीय जनरिक औषध उद्योगाबद्दल, आणि  त्यातल्या सिप्ला, डॉ. रेड्डीज, रॅनबॅक्सी या सारख्या औषध कंपन्यांबाबत.

त्या दिवशी महोत्सवाहून  परत आले ती या विषायाचं भूत मानगुटीवर बसवून घेऊन. याबद्दल खोलात जाऊन वाचल्याशिवाय आणि माहिती करून घेतल्याशिवाय माझ्या जीवाला आता चैन पडणार नव्हती. सुदैवाने वाचण्यासारखं भरपूर काही उपलब्ध होतं. मुळात औषधनिर्माण आणि पेटंट हे दोन्ही माझ्या अभ्यासाचे विषय असल्याने वाचलेलं सगळं विनासायास समजत देखिल होतं. एक दिवस अचानक असं वाटायला लागलं की, " अरे आपल्या देशातल्या वाईट गोष्टींना नावं ठेवण्यात आपण सगळे किती हिरिरीने पुढाकार घेतो. आपल्या देशातला भ्रष्टाचार, इथली रहदारी, अस्वच्छता, गरिबी याबद्दल आपण किती सतत तक्रार करतो, टीका करतो. मग आपल्या देशाने जगासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीचा धिंडोराही आपण त्याच उत्साहाने पिटायला हवा,  नाही का? त्यात आपण मागे का? कुणी तरी करायलाच हवं हे काम". हा विचार डोक्याच्या एका कप्प्यात सतत सतत फेर धरून नाचत होता. 

दरम्यान मी तुरीनहून भारतात परत आले, माझ्या दिनक्रमात अडकले, तरी हा विषय पिच्छा सोडत नव्हता.  " कथा अकलेच्या कायद्याची" या बौद्धीक संपदेवरील माझ्या स्तंभाचं लोकसत्तेत लिखाण सुरू झालं.  या स्तंभाला मिळालेला प्रतिसाद अत्यंत सुखावणारा तर होताच. एक दिवस ' फायर इन द ब्लड' पाहून बसलेला धक्का, वाटलेली शरम आणि जाणवलेला अभिमान, सगळे जणू कट करून गोळा झाले, आणि माझ्याभोवती फेर धरून नाचत सांगू लागले, "तूच सांग की ही कहाणी जगाला- तूच लिही" आणि माझ्याही नकळत मी आफ्रिकेत " औषध औषध" म्हणत प्राण सोडणाऱ्या लाखो करोडो आफ्रिकन माणसांना वचन देऊन बसले - " हो मी लिहीन".

आणि मग सुरू झाला एक वेडं करणारा प्रवास. मिळेल तिथून, मिळेल त्या स्वरूपात, मिळेल ते वाचायला सुरुवात झाली. एक दिवस सिप्लाचे सर्वेसर्वा युसुफ हमीद यांचा ईमेल अ‍ॅड्रेस कुठून तरी मिळाला. तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा मला माहित नव्हतं. आणि ते मुळीच उत्तर देणार नाहीत हे माहित असूनही " मला तुमच्या कामावर असं असं पुस्तक लिहायचंय" असं कळवणारा ईमेल  मी त्यांना धाडून मोकळी झाले. दुसऱ्याच  दिवशी त्यांचं उत्तर आलं. पुढच्याच महिन्यात ते लंडनहून भारतात येणार होते आणि तेंव्हा मला भेटायला ये असं त्यांनी मला कळवलं होतं. मी हे वाचून प्रचंड खूश झाले आणि जोमाने कामाला लागले. आणखीन झपाट्याने वाचू लागले.

दरम्यानच्या काळात ते मुंबईत आले. माझं दोन तीनदा त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं.  दिलेल्या वेळेला त्याना फोन करूनही ते जर उचलू शकले नाहीत तर ते आठवणीने परत फोन करत आणि " येस्स माय डिअर गर्ल ...टेल मी व्हॉट आय कॅन डू फॉर यू" असं प्रेमाने बोलायला लागून मला आश्चर्यचकीत करत असत. 

शेवटी त्यांच्या भेटीचा दिवस ठरला. भेटीच्या वेळेच्या बरीच आधी पोचून मी मुंबई सेंट्रल स्टेशन वरून सिप्लाच्या जुन्या कार्यालयाकडे चालत निघाले तेंव्हा मनात प्रचंड उत्कंठा तर होतीच. पण मी प्रचंड बेचैन होते. डॉ युसुफ हमीद यांच्या सारखा केम्ब्रीज मधे शिकलेला ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध  माणूस... अब्जाधीश....सिप्ला या भल्या मोठ्ठ्या औषध कंपनीचा सर्वेसर्वा!  तो माझ्यासारख्या एका किरकोळ प्राध्यापिकेला भेटायला तयार झाला होता. आणि मी त्यांच्याशी नीट बोलू शकेन का या विचाराने माझ्या तळहाताला घाम फुटला होता...पाय लटपटत होते...छाती धडधडत होती. एकदाची  शेवटच्या मजल्यावरच्या त्यांच्या भव्य कार्यालयात जाऊन पोचले. त्यांच्या कार्यालयात होते ते स्वत: आणि एमके हमीद- त्यांचे बंधू. लालसर गोरापान रंग, पूर्ण चंदेरी झालेले केस, तीक्ष्ण नजर पण बोलण्यात अत्यंत मार्दव असलेले माझ्या आजोबांच्या वयाचे डॉ. युसुफ हमीद. त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वलय होतं...आणि त्यांच्यासमोर बसल्या बसल्या ते मला जाणवू लागलं. त्यानी मजेशीर बोलून माझी चिंता एकदम दूर पळवून लावली आणि मग आमच्या गप्पा सुरू झाल्या. मला हे का लिहावसं वाटतंय असं त्यानी आधी समजून घेतलं. मग मी किती पाण्यात आहे हे जोखण्यासाठी त्यानी मला माझं या विषयातलं ज्ञान तपासून पाहणारे काही प्रश्न विचारले. आणि मी बरोबर उत्तरं दिल्यावर मग मला म्हणाले, " हं...आता विचार". आणि मी त्यांची मुलाखत घेऊ लागले. 

उत्तरं देताना प्रत्येक गोष्ट त्यांना अगदी लख्ख आठवत होती. किती तरी औषधांच्या रासायनिक संरचना ते समोरच्या वहीत झरझर  काढत होते. मधनंच " रोझी sssरोझीssss" अश्या मोठमोठ्याने हाका मारत आपल्या सेक्रेटरीला कुठला तरी शोधनिबंध,  वृत्तपत्रातला एखादा लेख, एखादं पुस्तक आणायला लावत होते. जेवायची वेळ झाली. त्या दिवशी प्रत्यक्ष डॉ.  युसुफ हमीद याच्या पंगतीला बसून जेवण्याचा मान माझ्या नशिबात होता. जेवणं आटपून कॉफी पीत पीत आमची मुलाखत परत सुरू झाली. त्या दिवशी संपली नाही म्हणून दुसऱ्या दिवशीही  चालू राह्यली. बोलण्याच्या ओघात मी ज्या लोकांशी बोलायला हवं अश्या किती तरी लोकांची नावं ते मला सांगत होते आणि मी लिहून घेत होते. मुलाखत संपवून  मी नाशिकला परत आले तेंव्हा मी खरोखर थक्क झाले होते. डॉ.  हमीद यांच्या ज्ञानी, मृदू हुशार व्यक्तीमत्वाने दीपून गेले होते.

दोनच दिवसात त्यांच्याकडून एक खोकं भरून पुस्तकं, सीडीज, वृत्तपत्रीय लेख माझ्या घरी येऊन पोचले. त्यानंतर त्यानी सांगितलेल्या या लढ्यातल्या शिलेदारांना शोधून काढून त्यांच्याशी संपर्क करण्याचा माझा उद्योग सुरू झाला. ही मंडळी जगभर पसरलेली होती. 

मी राजहंसच्या दि. ग. माजगावकरांना पुस्तकाची कल्पना कानावर घातली आणि त्यांनीही पुस्तक करायला आनंदाने होकार दिला. देशोदेशी पसरलेल्या माझ्या कहाणीच्या नायकांचा शोध घेण्यात गुंतून गेले. 

विशेष उल्लेख करीन तो न्यू यॉर्क टाइम्स वृत्तपत्रात आरोग्य विषयक लिखाण करणारे पत्रकार डोनाल्ड मॅकनील यांचा. डोनाल्डने मला आतोनात मदत  केली.  डॉ. हमीद यांचं काम सगळ्यात आधी जगाच्या नकाशावर जाहीरपणे आणलं ते डोनाल्डने- न्यू यॉर्क टाईम्समधे याबाबत लेख लिहून. मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला डोनाल्डने मला  मोठमोठे ईमेल्स लिहिले, दुसऱ्याना  फोनवर दिलेल्या मुलाखती मला पाठवल्या, स्वत: लिहिलेलं काही लिखाण पाठवलं...आणि इतर किमान पन्नास लोकांशी माझ्या ओळखी करून दिल्या. या सगळ्यांची मी आजन्म  ऋणी राहीन.

तुरीनला असताना जी कहाणी ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झाले होते, हलले होते, ती कहाणी या सगळ्या मंडळींबरोबर जणू पुन्हा एकदा जगले. त्या कहाणीचा एक भाग झाले. या सगळ्यांशी बोलताना, या बद्दल लिहिताना अनेकदा फार  भावनिक व्हायला झालं. ही कहाणी लिहिताना औषधनिर्माणशास्त्राची एक प्राध्यापक आणि आजन्म विद्यार्थिनी म्हणून माझी सामाजिक बांधिलकी काय आहे याची लख्ख जाणीव मला झाली. ती जाणीव माझ्या विद्यार्थ्यांमधे यावी म्हणून मी फार विचारपूर्वक प्रयत्न करू लागले.

या विषयातली सगळी तांत्रिक माहिती लिहायची,  पण ती सामान्य माणसाला समजली पाहिजे, त्यासाठी ती कादंबरीसारख्या फॉर्ममधे कशी लिहिता येईल, हे एक मोठंच आव्हान होतं.

सामान्य माणूस महाग औषधं घेत राहतो आणि पिळवटला जातो. हे थांबवण्यासाठी भारतीय पेटंट कायद्यात फार उत्तम सुविधा आहेत. त्यावर जगभरातून, विशेषतः अमेरिका आणि युरोपातून प्रचंड टिका होते, भारतावर प्रचंड दबाव आणला जातो. पण आपलं सरकार बधत नाही. आमच्या जनतेचं आरोग्य तुमच्या पेटंटसपेक्षा जास्त महत्वाचं आहे हे ठणकावून सांगत राहते. रेडक्रॉस,  डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स सारख्या सेवाभावी संस्थांना गरीब देशात काम करण्यासाठी morning स्वस्त पण उत्तम दर्जाची औषधं भारत पुरवत राहतो. पण त्याचबरोबर अमेरिका आणि युरोपसारख्या दर्जाबाबत अत्यंत जागरूक असणाऱ्या देशांचाही सगळ्यात मोठा निर्यातदार बनतो. भारत  हे कसं करू धजावतो हे जाणून घेण्यात इतर देशातल्या लोकांना प्रचंड रस असतो. आर्जेन्टिना, इंडोनेशियातले लोक जेंव्हा येऊन सांगतात की "सामान्य नागरिकांना औषधं स्वस्तात मिळावी म्हणून काय करायचं हे भारताने आम्हाला शिकवलंय आणि तुम्ही दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतोय",  तेंव्हा ऊर अभिमानाने भरून येतो. 

सगळ्या जगाची फार्मसी  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषधनिर्माण उद्योगाचा आपण एक लहान बिंदू इतका छोटा भाग आहोत या विचाराने फार कृतार्थ  वाटतं! आणि म्हणूनच हे ऋण फेडण्यासाठी माझ्यासारख्या या बिंदूने केलेला एक छोटासा प्रयत्न, उचललेला एक खारीचा वाटा,  म्हणजे हे पुस्तक आहे. भारताबद्दल अभिमान वाटण्याचे आणखी एक कारण हे पुस्तक वाचकांना नक्की देईल याची मला नुसती आशा नव्हे तर खात्री वाटते! 

-मृदुला बेळे

Wednesday, February 10, 2021

मान - अपमान

आमच्या मांजरीला शिकार करायला खूप आवडतं..

ही मांजर आमच्याकडे येऊन फार फार तर सहा महिने झाले असतील.. पण तेवढ्या कालावधीत तिने जवळपासच्या झाडावर एक खारूताई ठेवली नाही.. सरड्या ठेवला नाही.. घरात उंदीर ठेवला नाही.. किंवा भिंतीवर पाल ठेवली नाही..
ही मांजर सतत आपल्या शिकारीवर लक्ष ठेऊन असते.. आणि शिकार टप्प्यात येताच.. डोळ्यांची पापणी लवायच्या आत शिकारीवर झडप घालते... झाडावर तर अशी सरसर चढते की विचारूच नका...

पण काल एक गम्मत झाली..
एक उंदराचं पिटुकलं शेतातून कुठूनतरी रात्रीच्या वेळेला आमच्या घरात शिरलं.. आलं ते नेमकं माझ्याच अंथरूणाखाली... रात्रभर त्याने काही मला झोप येऊ दिली नाही... सारखी वळवळ... इकडून तिकडे तर तिकडून इकडे.. रात्रभर नुसता उच्छाद मांडला होता... माझ्यातर असा डोक्यात गेला म्हणता तो उंदेिरडा... झोपेचं खोबरं झालं..काय करावं तेच सुचत नव्हतं.

मग सकाळी योगायोगाने तोच उंदीर घराबाहेर पडायला आणि आमच्या मांजरीचं लक्ष त्याच्याकडे जायला एकच गाठ पडली..
उंदीर काही साधासुधा नव्हता.. विजेच्या चपळाईने तो एका फरशीच्या तुकड्याखाली जाऊन लपला.. आणि मांजर बसली हात चोळीत...

पण मांजरीने काही पिच्छा सोडला नाही.. उंदीर दगडाखालून बाहेर येण्याची वाट बघत मांजर तिथेच तळ ठोकून बसली.. टक लावून पाहत..
मांजर पाहात होती उंदराकडे.. आणि मी पाहात होतो मांजरीकडे.. आता पुढे काय होणार या उत्सुकतेने..

शेवटी एकदाचा तो उंदीर बाहेर आला आणि मांजरीने त्याच्यावर झडप घातली.. उंदीर सापडला याचा मांजरीपेक्षा मलाच जास्त आनंद झाला.. म्हटलं बरं झालं लेकाचा सापडला ते.. रात्रभर मला झोपू देत नाही काय?

पण झालं वेगळंच.. आमच्या मांजरीला एक फार वाईट खोड आहे.. शिकार हातात आल्यानंतर ती लगेच मटकावण्यापेक्षा तिच्यासोबत खेळायला तिला जास्त आवडतं.. तिला कंटाळा येत नाही तोपर्यंत ती आपल्या तावडीत सापडलेल्या शिकारीसोबत खेळत राहाते... त्याला आपल्या पंजाने हवेत उडवते.. पुन्हा निसटून ते पळायला लागलं की आपल्या पंजाखाली दाबून धरते... असा बराच वेळ तिचा हा क्रूर खेळ चालत राहातो...

मग तिच्या नेहमीच्या सवयीने आमची मांजर या उंदरासोबत खेळायला बघू लागली.. पण नेमकं आज मात्र विपरीत घडलं.. उंदीर एवढा चपळ होता.. की मांजरीने खेळण्यासाठी म्हणून त्याला आपल्या पंजाने हवेत उडवलं.. आणि नेमकी तीच संधी साधून हवेतल्या हवेत अत्यंत चपळाईने तो उंदीर कुठे गायब झाला ते मांजरालाही समजलं नाही...

पण अजून एक गम्मत झाली.. शिकार हातातून निसटल्यामुळे आमची मांजर एवढी खजील झाली की ती मान वर करून काही माझ्याकडे पाहिना.. दिवसभर अपराधीपणाच्या भावनेने एका कोपऱ्यात बसून राहीली.

त्यातून मी दोन गोष्टी शिकलो..
नंबर एक :- आलेली संधी तुमच्या मूर्खपणामुळे वाया घालवू नका..
आणि नंबर दोन :- मान - अपमान या भावना केवळ मनुष्यात नाही तर त्या प्राण्यांमध्येसुद्धा तेवढ्याच तीव्र असतात...


तानाजी तुकाराम शेजूळ
दिनांक ०५/०२/२०२१

Tuesday, February 9, 2021

1 मिनिट लागेल..नक्की वाचा..


पहाटेच जाग आली 
कोणी टकटक करीत होते,
दार उघडून पाहिले बाहेर 
तर कुणीच उभे नव्हते...

आवाजाच्या दिशेने बघताच 
खिडकीवर दिसला एक पक्षी,
चोचीने टकटक करीत तावदानावर 
उमटवीत होता नक्षी...

"का रे बाबा?" विचारले तर म्हणाला,
"भाड्याने मिळेल का एखादे झाड 
घरटे बांधण्यासाठी?,
एकटा कुठेही कसाही राहिलो असतो 
पण जागा हवी 
पिल्लांसाठी...

 
तुमच्या भाऊबंदांनी लुटले 
आमचे रान केले निर्वासित,
बेघर झालोच दाण्यापाण्यासाठी 
असतो आता फिरस्तित...

वर पुण्यं म्हणून ठेवतात गच्चीत 
थोडे दाणे अन पाणी,
पण निवाऱ्याचे काय? 
हे लक्षात घेतच नाही कुणी...

पोटाला हवेच, खातो ती भिक 
अन नेतो थोडे घरी,
खायला तर हवच, 
जरी डोक्यावर छप्पर नसले तरी...

कधीकधी वाटते  करावी आत्महत्या
बसुन विजेच्या तारेवर,
किंवा द्यावा जीव लोटून 
त्या उंच मोबाईल टाॅवरवर...

 
जसे मग आत्महत्ये नंतर 
सरकार काही देते शेतक-याला,
तसेच मिळेल का एखादं झाड 
माझ्या पिल्लांना तरी आस-याला"

ऐकून मी चक्रावलो, खरचं 
एवढा विचार मी नव्हता केला,
जंगलतोडीत त्यांच्या घरांचा 
विचार कुठेच नाही झाला...

मी हात जोडून म्हटले, 
"त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो,
पण आत्महत्या करू नको 
खरचं मनापासुन सांगतो...

तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर 
बांध वनरुम किचन खोपा,
अडचण होईल पण आत्ता तरी 
एवढाच उपाय आहे सोपा..."

तो म्हणाला, "खुप उपकार होतील, 
पण भाडे कसे देणार?",
"रोज त्रिकाळ मंजुळ गाणी ऐकव, 
बाकी काही नाही मागणार..."

तो म्हणाला, "मला तुम्ही भेटलात 
पण बाकी नातलगांच काय?,
त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी, 
कुठे ठेवतील पाय...?"

"अरे लावताहेत आता झाडे 
अन जगवतात आता कुणी कुणी,
बदलतेय चित्र हळू हळू, त्यांना सांग 
आत्महत्या करू नका कुणी..."

ऐकुन तो पक्षी उडाला 
काड्या जमवायला घरट्यासाठी,
अन मी पण मोबाइल उचलला 
तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी...

त्याची खिडकीवरची टकटक 
माझ्या मनाचे उघडले कवाड,
वाचुन तुम्ही पण लावाल ना 
कुंडीत वा अंगणात एकतरी झाड...
*निदान एक तरी झाड !*
  🌳🌳 🌳🌳🌳

अति विचार केल्याने होणारी कामे देखील होत नाहीत किंवा लांबणीवर पडतात का ?

*"अति विचार केल्याने होणारी कामे देखील होत नाहीत किंवा लांबणीवर पडतात का ?"*

हो, ह्याला Paralysis of Analysis अर्थात अतिविश्लेषणामुळे येणारी निष्क्रियता म्हणतात. एक कोडं सोडवून पाहूया.

समजा तुमच्या समोर ५ दरवाजे आहेत. तुम्ही कोणत्या दरवाज्यातून बाहेर पडणार?

पहिल्या दरवाज्यामागे आग लागलेली आहे.
दुसऱ्या दरवाज्यामागे खूप जोरात आम्लवर्षा (Acid Rain) होतेय.
तिसऱ्या दरवाज्यामागे निंजा योद्धा तुम्हाला मारायला तयार आहे.
चौथ्या दरवाज्यामागे एक मोठा सिंह आहे ज्याने मागच्या १ महिन्यापासुन जेवण नाही केलय 
आणि पाचव्या दरवाज्यामागे लावारस आहे.
कोडं समाप्त.

आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या दरवाज्यातून जाऊ - इकडून जाऊ की तिकडून जाऊ - इकडून गेले तर हे होईल - तिकडून गेले तर हे होईल असा विचार करतील. कमीतकमी १० - १२ विचार मनात येऊन जातील आणि डोक्यात विचारांचा एकप्रकारे गोंधळ होईल. जेवढी विचारांची गोची होते तेवढा आपला घेतला जाणारा निर्णय चुकतो कारण आपण प्रत्येक पर्यायबद्दल व्यवस्थितपणे विचार करण्यास असमर्थ असतो. कोणता पर्याय चांगला आणि कोणता पर्याय खराब हे आपण तेव्हाच ठरवू शकतो जेव्हा आपल्याकडे कमी पर्याय असतात किंवा प्रत्येक पर्यायला नीट समजून घेण्याची संयमता असते.

वरील कोड्याचे उत्तर आहे: "आपण चौथ्या दरवाज्यातून जाणार कारण ज्या सिंहाने मागच्या एक महिन्यापासून जेवण नाही केलंय तो नक्कीच मेलेला असेल न!!"

किती जणांनी ह्याचे उत्तर बरोबर दिले? आपले उत्तर ह्यामुळे नाही चुकले की तुम्ही सिंहाचा विचार केला नाही - आपले उत्तर ह्यामुळे चुकले कारण आपल्याकडे ५ दरवाजे असे ५ पर्याय होते. ह्याला Analysis of Paralysis अर्थात अतिविश्लेषणामुळे येणारी निष्क्रियता म्हणतात.

त्याचं मुख्य कारण हेच असते की ते जेव्हा काही गोष्ट खरेदी करतात तेव्हा एकापेक्षा अनेक गोष्टींचा ते विचार करतात. मी माझ्या वहिनींचा एक अनुभव सांगतो:

आम्ही एकदिवशी अगरबत्ती घेत होतो.

त्यांच्यासमोर जवळपास ७-८ वेगवेगळे पर्याय होते. ते कोणता विचार करत होते?

ह्यांना गुलाब गंध आवडत नाही.
शेजारणीकडे लवेंडर आहे.
तपकिरी अगरबत्तीचा रंग निघून जातो.
जांभळी दिसायला चांगली असते पण वास चांगला येत नाही.
पिवळा रंग आंबट आंबट वाटतो जर एक महिन्यात पिवळी अगरबत्ती संपली नाही.
निळा रंग मला आवडत नाही.
मला विचारलं की कोणता घेऊ, मी उलट प्रतिप्रश्न केला "देवासमोर अगरबत्ती लावतात आणि कोणती अगरबत्ती घ्यायची ही पसंद तुम्ही करता..

शेवटपर्यंत त्यांनी अगरबत्ती निवडलीच नाही, त्याच कारण त्यांनी अगरबत्ती निवडतांना खूप जास्त पर्याय विचारात घेतले होते म्हणून हे सगळे झाले.

हेरॉल्ड गरीन म्हणतात:

चांगला परंतु जलद गतीने घेतला गेलेला निर्णय - सगळ्यांत बेस्ट कारण खूप उशिरा घेतला गेलेल्या निर्णयापेक्षा तो फायदेशीर असू शकतो.

मी खूप छान वाचलं होत ते म्हणजे:

*"आयुष्यात आपण अयशस्वी ह्यामुळे होत नाही कारण आपण काही करत नाही. आपण अयशस्वी ह्यामुळे होतो कारण आपल्याला करायला खूप काही असते आणि आपण कुठूनही सुरुवात करत नाही."*

*म्हणून पर्याय जेवढे कमी तेवढी निर्णय अचूकता जास्त. जर हे शक्य नसेल तर प्रत्येक पर्यायचा अभ्यास करण्याइतका संयम अंगी असायला पाहिजे.*

नक्की विचार करा..☺️🙏

Monday, February 8, 2021

*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)

*🙏या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏*(मंदी जाणवण्याची कारणे)

1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.
2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.                                     
3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.
4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)
5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.
6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.
7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.   
8. कर्जांचे व्याज फेडणे.
9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.
10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.
11. पार्टी कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)
12. आपण दुसऱ्यावर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला? या एका भीतीपायी सामान्य माणूस आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या कुजतोय.

*🙏अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !*✍

 *लिमिटेड होतं तेच बरं होतं* ...

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा..... 

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर *छान गप्पा मारायची*.... 😊😃😁

दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. *प्रवासाचा आनंद मिळायचा* .... 😄

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे *स्थूलतेचे प्रमाण कमी होते*.....😉

शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक *जडण घडण नीट व्ह्यायची*... 💪👍

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून *कुटुंबासाठी वेळ द्यायची*...... 👏💞

अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले *आयुष्य खूप सुखी होते*......

........... पण आता सगळंच *अनलिमिटेड* झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच *लिमिटेड* झालंय !!😧😩
बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?

बेटा काळ खूप बदलला बघ...

तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.

तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.

तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली *पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.

तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की,

*तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं*

            आता

बरंच काही मिळत असूनही *आनंदी जीवन कसे जगावे* यांवरील *सेमिनर्स' अटेंड* करावे लागतात.



संग्रहित लेख

Monday, February 1, 2021

*सुख म्हणजे नक्की काय असत...* 🙏🙏

*भाकरीची किंमत* ....✍️

काल सहज फेसबुक चाळत असताना या चुलीवरच्या खरपुस भाकरी चे फोटो बघून मला दहा वर्षांपूर्वीची गमतीशीर घटना  आठवली.

संध्याकाळची वेळ होती, मी माझ्या एका मित्राबरोबर सिंहगड रोड ने जात होतो,  हिंगण्याच्या स्टॉप च्या अलीकडे एक किलोमीटर असताना पुढे वाहतुकीच्या कोंडीमुळे गाडी थांबवावी लागली, इतक्यात आमची नजर रस्त्यावर खडी फोडणाऱ्या कुटुंबाच्या पाला कडे गेली (पाल म्हणजे तात्पुरती ताडपत्रीची झोपडी), तिथे तीन दगडाच्या मांडलेल्या चुलीसमोर त्या झोपडीची मालकीण भाकरी भाजत होती, नवरा शेजारच्या बाजेवर जुन्या वर्तमानपत्राचा चुरगळलेला कागद वाचत बसला होता, त्या बाजेखाली त्याचा छोटा मुलगा एका तुटलेल्या खेळण्याबरोबर खेळण्यात दंग झाला होता, वाहतूक अजून काही सुरळीत होत नव्हती. 

माझा मित्र, जो एका मोठ्या कंपनीचा मालक होता, अगदी टक लावून त्या टम्म फुगणाऱ्या बाजरीच्या भाकरीकडे बघत होता, एव्हाना त्या भाकरीचा खमंग दरवळ आमच्या कारच्या खिडकीतून आत येत होता. 

माझ्या मित्राने कधीतरी लहानपणी आपल्या खेड्यातील मित्राकडे अशी खरपूस भाकरी खाल्ली होती व त्या भाकरीची चव तो अजूनही विसरला नव्हता. त्या नंतर मात्र त्याला परत तशी भाकरी खायला मिळाली नव्हती.
         अचानक तो मित्र म्हणाला, अरे संजू आपण जर पैसे दिले तर ती बाई त्या भाकरी आपल्याला विकत देईल का? 
मी त्याला म्हटलं अरे काहीतरीच काय वेड्यासारखं बोलतोयस. तिची झोपडी म्हणजे काय हॉटेल आहे का आणि आपण अशी कशी भाकरी मागायची तिला? 

क्षणभर त्याने विचार केला व गाडीचा दरवाजा उघडत मला म्हणाला चल उतर खाली, मीही त्याच्या मागोमाग उतरलो.

झोपडी समोर उभं राहत त्याने त्या बाजेवर बसलेल्या त्या बाईच्या नवऱ्याला नमस्कार केला, क्षणभर तो गोंधळून गेला. पण लगेच म्हणाला साहेब काही काम होत का? सरळ विषयाला हात घालत माझा मित्र म्हणाला. 

मला तुमच्या या चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत, तुम्ही मला त्या विकत द्याल का? 
ती दोघं नवराबायको आम्हा दोघांच्या तोंडाकडे बघतच राहिली, काय उत्तर द्यावं तेही त्यांना सुचेना, "काय साहेब गरीबांची चेष्टा करता" एवढंच तो म्हणाला.

अरे बाबा मी सिरियसलीच बोलतोय, अशा भाकरी आमच्या घरात कुणाला बनविता येत नाहीत व घरात चुलही नाही, लहानपणी एकदा मी अशी भाकरी खाल्ली होती व आता  यांना भाकरी करताना बघून मला त्या चवीची आठवण झाली. आता त्या नवरा बायकोला पटलं की खरचं यांना भाकरी हव्या आहेत. बाजेवरून गडबडीत उठत तो म्हणाला बसा दोघे या बाजेवर. 

(बोलताना समजलं की गावाकडे दुष्काळ पडल्यामुळे हे शेतकरी कुटुंब गुरं-ढोर, पडीक शेत म्हातारा, म्हातारीवर सोपवून रोजी-रोटी साठी शहरात आले होते.) 

आमचं बोलणं चालू असतानाच तो बायकोला म्हणाला "सुंदे साहेबांना दे त्या चार भाकरी, वाचत असलेला जुना पेपर त्याने बायकोच्या हातात दिला. तिने छान पैकी त्याच्यावर त्या ताज्या खमंग भाकरीची चवड ठेवली, वर अजून तव्यातील चौथी गरमागरम भाकरीही त्याच्यावर ठेवली. मस्तपैकी मिरचीच्या खरड्याचा गोळा वर ठेवला व ते पार्सल मित्राच्या हातात दिलं.

मोठा खजिना मिळाल्याचा भाव मित्राच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्याने आभार मानत खिशात हात घातला व पाचशेची नोट तिच्या नवऱ्याच्या हातात ठेवली.

'आवो सायेब, हे काय करता, भाकरी कधी कोण इकतं का?" 

बायकोही त्याला दुजोरा देत म्हणाली "सायेब भाकरीचं पैस  घेतले तर नरकात बी जागा मिळणार नाय आमाला"..

आम्ही दोघं त्यांचं बोलणं ऐकून दिङमूढ झालो मित्रालाही काय करावं सूचेना.. 

अचानक त्याने माझ्या हातात पार्सल देत गाडीचा दरवाजा उघडला, घरी मुलांसाठी घेतलेल्या खाऊची भलीमोठी कॅरीबॅग काढली व पुन्हा झोपडीत शिरत ती पिशवी त्यांच्या हातात देत म्हणाला, तुमच्या भाकरीची बरोबरी या खाऊशी होणार नाही पण तरीही तुमच्या बाळासाठी ठेवा हे.
                  
मी गाडी स्टार्ट केली, मित्र शेजारी बसून त्या गरमागरम भाकरीचा आस्वाद घेत होता, एक अख्खी भाकरी हडप करून राहिलेल्या भाकरी पुन्हा कागदात बांधत म्हणाला, आता या राहिलेल्या उद्या खाणार.
                    
गाडी चालवताना एकच विचार मनात रुंजी घालत होता.

गरिबीतही किती औदार्य असत या लोकांमध्ये.
*भाकरी ही विकायची वस्तू नाही* हे तत्वज्ञान त्यांना कुठल्या शाळा कॉलेजात जाऊन शिकावं लागलं नाही, आणि हो अख्ख्या जगाला भाकरी खाऊ घालणारा हा पोशिंदा तुमच्या चार भाकरीचे पैसे घेईल का? 

दुसरीकडे आपण बघतो, एखाद्या मोठ्या हॉटेल मध्ये आपण जेवायला जातो तेंव्हा जर एखाद्या छोट्या बाळासाठी अर्धी वाटी दूध मागविले तरी त्याच दहापट बिल लावलं जात.
                    
माझं शेजारी लक्ष गेलं, मित्र तृप्तीचा ढेकर देऊन घोरत होता, अगदी ब्रम्हानंदी टाळी लागली होती त्याची, त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर.

*सुख म्हणजे नक्की काय असत...* 🙏🙏


संग्रहित लेख

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...