*प्रवास खूप छोटा आहे*
. -------------------------------
*एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती.*
*पुढच्याच स्टॉपवर एक स्थूल आणि वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तित जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्या सोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली.*
🚌
*त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो त्या तरूणीला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"😴*
*तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला*
👉🏼 *"अनावश्यक किंवा बाष्फळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."*
*👉🏼ही प्रतिक्रिया* *सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे.*
*👉"इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, आपला प्रवास खूपच छोटा आहे"*
*⭕आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, हा तर काही मिनीटांचाच प्रवास आहे , तसेच जीवन हा सुद्धा एक काही काळापुरता प्रवासच आहे.* *मानवाचे आयुष्य मर्यादित आहे. आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे;* *की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.*
*⭕कोणी आपले मन दुखावलंय का?*
*शांत रहा, प्रवास खूप छोटा आहे.*
*⭕कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?*
*सोडून द्या, शांत रहा, कारण*
*प्रवास खूप छोटा आहे.*
*⭕कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की,* *हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.*
*आपला प्रवास खूप छोटा आहे.*
*⭕आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू,* *एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया.*
*जर मी तुम्हाला अनावधानाने कधी दुखावले असेल तर मला माफ करा. जर तुम्ही मला कधी दुखावले असेल तर मी ते कधीच सोडून दिले आहे.*
*कारण एकच की,*
👉 *आपला प्रवास खूप छोटा आहे!.*
*👉इतिहासातील काही घटना नक्कीच बोधप्रद आहेत.त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे.*
*⭕🤺अर्धे जग जिंकलेला* *आणि पूर्ण जग जिंकण्याची जिद्द बाळगलेला सिकंदर राजा* *आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, ' मी मरेल तेंव्हा माझे प्रेत नेताना माझे हात पेटीच्या बाहेर मोकळे सोडा, जगाला कळू द्या,जिवंतपणी जग जिंकायला निघालेला सिकंदर मेल्यानंतर खाली हात गेला.👐🏽*
*⭕फ्रान्सचा सम्राट नेपोलियन* *बोनापार्ट वाटरलूच्या तुरुंगात खंगुन खंगुन मेला.*
*⭕जर्मनीचा शहेनशहा* *ज्याने दुसरे महायुद्ध घडवले त्या एडॉल्फ हिटलरला आत्महत्या करावी लागली.*
*⭕इराकचा बादशहा सद्दाम हुसेन याने इराकवर हुकूमत केली.* *नको तितकी संपत्ती गोळा केली. शेवटी फासावर लटकावे लागले.*
*⭕अमेरिकन सरकारला धडकी भरवणारा ओसामा बिन लादेन*याला अमेरिकन सैन्याने सर्जिकल स्ट्राइकने उचलून ठार केले व त्याचे प्रेत समुद्रात टाकून दिले.*
*⭕आपल्या वडिलांना (शाहजहानला ) तुरुंगात टाकून, भावांचा खून करून सत्ता मिळवलेल्या, भारतावर साम्राज्य असलेल्या बादशहा औरंगजेबाच्या समाधी कडेही कोणी बघत ही नाही.*
*⭕एकेकाळी दहशत असलेल्या बेनेटो मुसोलिनीला* *झाडाला टांगून लोक त्याच्या प्रेतावर थुंकले.*
*⭕फ्रांसची हुकूमत ताब्यात असलेल्या 16 व्या लुईला* *लोकांनी गिलोटिनवर चढवले.*
*⭕कार्ल मार्क्सला* *डोक्यावर घेणाऱ्या लोकांनीच त्याचे पुतळे फोडून टाकले.*
*⭕जगाला आपल्या अभिनयाने हसवणारा चार्ली चॅप्लिन असाच झटका येऊन मेला.*
*⭕भल्याभल्यांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी अभिनेत्री मर्लिन मंरो ही अति मद्य सेवनाने मेली.*
*⭕मनोरंजनातून लोकांच्या मनावर राज्य करणारे* *राजेश खन्ना, विनोद खन्ना, भगवान दादा, ए के हँगल, परवीन बाबी, माला सिन्हा यांचे मृत्यू आठवा.नुकतेच चित्रपट अभिनेते सुशांतसिंग राजपूत यांनी नैराश्यातून स्वतःचे जीवन संपविले.*
*सध्याच्या कोरोना विषाणू मुळेतर जगावर मोठेच संकट आले आहे.*
*सांगायचे तात्पर्य हे कि आपले आयुष्य मर्यादित आहे*.
*जन्मापासून तर म्रुत्यूपर्यंतचा जीवनप्रवास असतो काळ कुणासाठी थांबत नाही*
*आपल्या कडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल.*
*पण चांगल्या कर्माने मिळवलेली माणुसकीच साथ देईल.*👏🏼
⭕ *कितीही संपत्ती मिळविली असली तरी ती म्रुत्युनंतर इथेच रहाणार आहे*
👉 *भरकटलेल्या जहाजात कितीही पैसा असला तरी पिण्याचे पाणी मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा. संपत्ती आणि पदाचा गैरवापर करू नका. जोडलेला पैसा कपाटात रहातो , जोडलेली माणसे , नातेवाईक स्मशानापर्यंतच येतात ,सोबत काहीही येत नाही , पण चांगले कर्म , सत्किर्ती मात्र सोबत येत असते*
*⭕शेवटी एकच सांगतो, आपला जीवनप्रवास खूप छोटा आहे. जीवन सुंदर आहे, ते आनंदाने जगा , परोपकारी जीवन जगा ,आपले हातून एखादयाचे काम होत असेल तर ते निस्वार्थी व निसंकोच करा.इतरांना जे सहकार्य करता येईल , जे शक्य असेल ती मदत करा,🤝🏼 दुसऱ्याला त्रास होईल असे कदापी वागू नका.. प्रत्येकाला शेवटी तिथेच जायचे आहे... जिथे परत येण्याचा रस्ताच नाही.... आपला प्रवास खूप छोटा आहे!*
No comments:
Post a Comment