Saturday, February 13, 2021

*आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आम्ही एक 'जमाना' होतो.*

*ते दिवस....!*

पाचव्या इयत्तेपर्यंत पाटीवरची पेन्सिल जिभेने चाटत *कॅल्शियमची* कमतरता भरून काढायची आमची जन्मजात सवय होती.

पण यामध्ये *'सरस्वति देवी नाराज न होवो'* हा पापभिरुपणा पण असायचा.
 अभ्यासाचं टेन्शन आम्ही पेन्सिलीचं मागचं टोक *चावून* झेललं होतं

 पुस्तकामध्ये *झाडाची पानं* आणि *मोरपिस* ठेवून आम्ही हुशार होऊ शकतो असा आमचा *दृढ* विश्वास होता.

कापडाच्या पिशवीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा *शिरस्ता* हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं
दरवर्षी जेव्हा नव्या इयेत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे हा आमच्या जीवनातला एक *वार्षिक उत्सव* असायचा.

आई वडिलांना आमच्या शिक्षणाची फारशी *फिकीर* नव्हती आणि ना हि आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा *बोजा* होते. वर्षानुवर्षं आमच्या आईवडिलांची पावलं कधी आमच्या *शाळेकडे* वळत नव्हती.

एका मित्राला सायकलच्या पुढच्या *दांड्यावर* व दुसऱ्याला मागच्या *carrier* वर बसवून आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही. बस्सं!......काही *धूसर* आठवणी उरल्यात इतकंच.......!!

शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन उभं राहताना आमचा *'ईगो'* कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला *'ईगो'* काय असतो हेच माहीत नव्हतं.

मार खाणं ही आमच्या *दैनंदिन* जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. *मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे.* मार खाणारा यासाठी की 'चला!,कालच्यापेक्षा तरी आज कमी *धोपटला* गेलो 'म्हणून आणि मारणारा 'आज पुन्हा *हात धुवून* घ्यायला मिळाले' म्हणून......

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की आम्ही *तुमच्यावर किती प्रेम करतो,* कारण आम्हाला *'आय लव यू'* म्हणणं माहीतच नव्हतं.

आज आम्ही असंख्य टक्के टोणपे खात, संघर्ष करत *दुनियेचा एक हिस्सा झालोय.* काहींना जे हवं होतं ते त्यांनी *मिळवलंय* तर काही 'काय माहीत....?कुठे हरवलेत ते ...??!

आम्ही जगात कुठेही असू पण हे *सत्य* आहे की आम्ही *वास्तव दुनियेत जगलो,* आणि *वास्तवात* वाढलो.

कपड्यांना *सुरकुत्या* पडू न देणं आणि नात्यांमध्ये *औपचारिकता जपणं* आम्हाला कधी जमलंच नाही. त्या बाबतीत आम्ही *मूर्खच* राहिलो.

आपल्या *नशिबाला* कबूल करून आम्ही आजही *स्वप्नं* पहातोय. कदाचित ती स्वप्नच आम्हाला *जगायला मदत करतायत* नाहीतर जे जीवन आम्ही आतापर्यंत जगलोय त्याची *वर्तमानाशी* काहीच तुलना होणार नाही.

*आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आम्ही एक 'जमाना' होतो.*

गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी .....! ते दिवस पुन्हा येतील.....🤔
🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...