Monday, July 21, 2014

गौतम बुध्द. भाग:३

ह्या श्रावस्ती नगरीमध्ये
मिगार श्रेष्ठी म्हणून एक
मोठा धनाढ्य व्यापारी राहत
असे. त्याची सून
विशाखा ही बुद्धाची चाहती होती.
तिच्या चाणाक्षपणामुळे तिने असा एक प्रसंग घडवून
आणला, की त्यामुळे तो श्रेष्ठी बुद्धाचा उपासक
बनला. आपल्या सुनेच्या शहाणपणामुळे
आपल्याला बुद्धाचा उपासक होण्याचे भाग्य
लाभले म्हणून त्याने तिला ‘आई’ म्हणण्यास सुरुवात
केली. तिने बुद्धाकरिता व
त्याच्या भिक्षुसंघाकरिता पूर्वाराम
नावाच्या उद्यानात एक प्रासाद बांधला. त्याला
‘मिगारमातेचा प्रासाद’ म्हणूनच लोक ओळखू
लागले. विशाखा ही प्रमुख उपासिका बनली.
शाक्यांचे महाजनसत्ताक असे
राज्य होते. त्यात महत्त्वाचे
असे राज्यासंबंधीचे प्रश्न
त्यांच्या संथागार (संस्थागार)
नावाच्या सभेत चर्चिले जाऊन
निकालात निघत असत. अनेक
कुळांपैकी महानाम शाक्याचे
एक कुळ होते. शाक्य कुळातील
शुद्धोदन राजाचा पुत्र बुद्ध
होऊन त्याने दिगंत
कीर्ती मिळविली.
आपल्या कुळातील
लोकांनीही बौद्ध संघात शिरूर अशीच
कीर्ती संपादन करावी म्हणून त्या कुळातील
भद्दिय, अनुरुद्ध, भृगू, किबिल, आनंद, देवदत्त व उपा
ली असे तरुण बुद्ध संघात शिरले.⇨ उपाली हा बौद्ध
विनयांत प्रवीण म्हणून त्याला पुढे ‘विनयधर’
ही संज्ञा बुद्धाने दिली.⇨ आनंद हा बुद्धाचा अनेक
वर्षे उपस्थाय (प) क (पाली — उपट्ठाक,
खासा सेवक) बनला. देवदत्त मात्र
त्याचा प्रतिस्पर्धी होऊन पाहत होता व
त्या प्रतिस्पर्धेच्या भावनेने
राजा बिंबिसाराचा मुलगा ⇨ अजातशत्रू
ह्याला हाताशी धरून खुद्द बुद्धाचा घात करण्याचे
त्याने अनेक प्रयत्न केले व शेवटी भिक्षुसंघात फूट
पाडण्यात यश मिळविले.
बुद्धाच्या अन्य परिव्राजिक
शत्रूंनी त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून
त्याची नालस्ती करण्याचे अनेक प्रयत्न केले व
त्यामुळे बौद्ध भिक्षूंना त्रास होऊ लागला. तेव्हा
‘जगराहटीच अशी आहे, की ह्या जगात निं
दिला जात नाही असा एकही मनुष्यप्राणी नाही.
गप्प बसला तरी लोक निंदा करतात.
मितभाषणी किंवा बहुभाषणी असला तरीही निंदा करतात’,
असे म्हणून बुद्धाने त्यांचे समाधान केले.
आपल्या वयाच्या शेवटच्या काही वर्षांत
आपली सापत्न
माता महाप्रजापती गौतमी हिच्या विनंतीवरून व
आनंदाच्या मध्यस्थीने स्त्रियांचाही संघ —
भिक्षुणी संघ — स्थापण्याची अनुज्ञा,
जरा नाखुशीनेच, बुद्धाने दिली.
कोसल देशाचा राजा पसेनदी (प्रसेनजित)
हाही बुद्धाचा उपासकच होता; पण
त्याचा मुलगा विडुडभ वा विदूदभ (विदुर्दभ) ह्याने
आपणाला आपल्या मातृकुलातील लोक हीन
समजतात (कारण त्याची आई ‘वासभखत्तिया’
ही दासीपासून उत्पन्न झालेली शाक्य
कन्या होती, ही गोष्ट
शाक्यांनी पसेनदी राजापासून प्रथम लपवून
ठेविलेली होती.) म्हणून विडूडभाने सूडबुद्धीने
त्या शाक्यांचा सर्वनाश केला.
पसेनदी राजानेही वस्तुस्थिती कळल्यानंतर
तिला पट्टराणी पदावरून काढून टाकले होते; पण पुढे
बुद्धाने त्याला समजावून सांगितल्यानंतर ते पद
तिला पुन्हा प्राप्त झाले.
बुद्धाने आपले धर्मप्रचाराचे कार्य
आपल्या बोधिप्राप्तीपासून सु. ४५ वर्षे
केले. जरावस्था प्राप्त झाली व त्यामुळे
त्याची शरीर प्रकृती नीट
राहिनाशी झाली. महासीहनाद सूत्रांत
(१२) त्याने स्पष्ट म्हटले आहे, की ‘मी वृद्ध
जीर्ण झालो आहे. माझे वय ८० वर्षांचे
झाले आहे.’ ‘माझी पाठ दुखते आहे.
मी जरा पडतो’ असे म्हणून त्याने
आपल्या शिष्यालाच धर्मोपदेश पुढे चालू
करण्यास सांगितले आहे (महासीहनाद सूत्र ५३).
परिनिर्वाणापूर्वीच्या शेवटच्या प्रवासाचे वर्णन
सुत्तपिटक व विनयपिटक ह्या ग्रंथांत आढळते.
बिंबिसाराचा वध करून अजातशत्रू मगध
देशाचा राजा झाला.
तो पूर्वी जरी बुद्धाच्या प्रतिस्पर्ध्याच्या —
देवदत्ताच्या —प्रभावाने भारित होता,
तरी तो पुढे बुद्धाचा चाहता बनला. त्याच्या मनात
वज्जींचे महाजनसत्ताक राज्य काबीज करावयाचे
होते; पण बुद्धाने त्याला स्पष्टपणे बजावले,
की जोपर्यंत वज्जी एकजुटीने, एक विचाराने,
न्यायाने व धर्माने मान्य केलेले सात नियम पाळीत
आहेत तोपर्यंत ते अजिंक्य आहेत.
पाटलिपुत्र नगर त्यावेळी नवीन वसविले जात होते.
त्या नगरीला तीन प्रकारचा धोका आहे अशा तऱ्हेचे
भाकित विनयपिटक ग्रंथात आहे. पुढे
कोटिग्रामाकडे जाण्याकरिता ज्या द्वारातून
बुद्ध व त्याचे शिष्य बाहेर पडले त्याला गौतमद्वार
असे नाव दिल्याचा उल्लेख आहे. वाटेत वैशालीला⇨
अंबपाली (आम्रपाली) गणिकेचे निमंत्रण स्वीकारून
जवळच असलेल्या बिल्वग्रामाला ते गेले व तेथे
चातुर्मास घालविला.
ह्यावेळी बुद्धाची प्रकृती बरीच ढासळली. बुद्ध
आता काही फार दिवस जगत नाहीत
अशी सर्वांची खात्री झाली. निरवा-
निरवीची भाषा सुरू झाली. बुद्धाने स्पष्टपणे
सांगितले, ‘मी काहीही ‘आचार्यमुष्टि’ म्हणून
शिष्यांपासून लपवून ठेवलेले नाही. मी आता वृद्ध व
दुर्बल होऊन माझ्या
शरीराचा सांगाडा मोडक्या खटाऱ्या
सारखा झाला आहे.
कोणाला काही शंका असल्यास त्याने खुशाल
विचारावे. माझ्या पश्चात मी सांगितलेला धर्मच
तुम्हाला शरणस्थान होणार आहे. तेव्हा तुमचे तुम्हीच
आपले शरणस्थान बना. धर्मालाच शरणस्थान बनवा.
सर्व संस्कार अनित्य आहेत असे जाणून सावध
आणि जागृत रहा.’
अशा दुर्बल
अवस्थेतही बुद्धाचा थोडाफार
प्रवास चालूच होता.
पावा नावाच्या ठिकाणी आल्यानंतर चुंद
नावाच्या लोहाराकडे त्याने मुक्काम केला. तेथे
त्याने सूकर-मद्दव (डुकराचे मृदू मांस किंवा एक
प्रकारची शाक-वनस्पती किंवा एखाद्या प्रकारचे
रसायन, असे निरनिराळे अर्थ टीकाकार देतात.)
नावाचे पक्वान्न केले होते; पण ते न पचून
बुद्धाला अतिसाराचा विकार झाला.
अशा स्थितीत कुशिनगर (पालीकुसि-नारा) येथे
जाऊन पोहोचल्यावर एका जोड
शालवृक्षाखाली तो बिछान्यावर पडला [⟶
कुशिनारा]. आनंदाला स्त्रियांच्या बाबतीत कसे
वागावे हे सांगून कुसिनारा येथील ‘मल्ल’
नावाच्या लोकांना निरोप पाठवावयास
सांगितले. कुसिनाराहून आलेल्या लोकांत सुभद्र
नावाचा परिव्राजक होता.
त्याला शेवटचा धर्मोपदेश देऊन आनंदाला म्हटले —
‘माझ्या पश्चात
कोणी शास्ता राहिला नाही असे तुम्हास
वाटण्याचे कारण नाही. मी शिकविलेला धर्म
आणि विनय हाच तुमचा शास्ता होय. सर्व संस्कार
व्ययधर्मी आहेत तेव्हा सावधगिरीने जागृत राहून,
आपली कालक्रमणा करा!’ असे म्हणून बुद्धाने
आपली इहलोकीची यात्रा संपविली. हाही दिवस
वैशाखी पौर्णिमेचाच होता.
=============================================================================           जर तुमच्याकडे Hindi, english, किंवा marathi भाषेमध्ये काही article,  स्टोरी, किंवा कविता जी तुम्हाला share करायची आहे. तर कृपया ती माहिती आपल्या फोटोसोबत (फोटो नसला तरी चालेल) आम्हाला email करा  E-mail करा.
        आमचा email Id आहे : rohit.shelake7@gmail.com    आम्ही त्याला तुमच्या नाव व फोटोसहित या ब्लॉग वर PUBLISH करु.
Thanks !

No comments:

Post a Comment

माझे नवीन लेखन

खरा सुखी

 समाधान पैशावर अवलंबून नसतं, सुख पैशानं मोजता येत नसतं. पण, सुखासमाधानानं जगण्यासाठी पैशांची गरज पडत असतेच. फक्त ते पैसे किती असावेत ते आपल्...